अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर वाचलेल्या इतर लेखांच्या तुलनेत हा एक बराच संतुलित लेख वाचला
http://www.rediff.com/news/column/column-tps-sreenivasan-nanny-terror-in...

सरकारने एवढी वेळच येउ द्यायला नको. एवढ्या उच्चपदस्थ व्यक्तीसाठी एक नोकर सरकारी खर्चानेच द्यायला हवा.

ज्या पद्धतीने खोब्रागडे यांना अटक झाली आणि स्ट्रिप सर्च आणि कोठडीला सामोरं जावं लागलं ते त्यांचा हुद्दा आणि आरोप बघता चुकीचंच वाटतं, तरीही

>>
Indian diplomats are allowed to take one or more India Based Domestic Assistants, IDBA, at government expense precisely because domestic help is essential to perform their representational duties and because hiring such services in Western countries is prohibitively expensive.

Some years ago, the US government began insisting that IDBAs should have contracts, indicating their wages, which should not be below the minimum wages in the country, and hours of work, etc for facilitating the issue of the necessary A3 visas.

Everyone understood that no Indian diplomat, or for that matter, any other diplomat would be able to pay nearly $10 per hour. The diplomats themselves are not paid that much!

Therefore, contracts were produced for visa purposes and they were given accommodation, food, clothes, medicine etc and wages, which are reasonable by Indian standards.
<<

एव्हरीवन अन्डरस्टुड म्हणजे काय?! एव्हरीवन म्हणजे कोणकोण? असं कसं अन्डरस्टुड? मग जेव्हा कॉन्ट्रॅक्ट्स सक्तीची केली तेव्हाच याबद्दल आवाज करायचा ना? हे डिप्लोमॅट म्हणून जाणार आणि स्वतःच अनलॉफुल वागणार?

याआधीही डोमेस्टिक हेल्प बाबत फाईन भरायला लागणे वगैरे दोन वेळा झाले आहे. तरीही त्याच चुका पुन्हा का करतात ही मंडळी?

इथे दिलेल्या बातमीनुसार डॉ. खोब्रागडे आणि त्यांची नोकर संगीता रिचर्डस दोघी भारत सरकारच्या कर्मचारी आहेत. तर मग अमेरिकेस मध्ये लक्ष घालायची गरज काय पडावी?

तसेच ज्या पद्धतीने डॉ. खोब्रागड्यांना अटक झाली ती निषेधार्ह आहे.

-गा.पै.

>> डॉ. खोब्रागडे आणि त्यांची नोकर संगीता रिचर्डस दोघी भारत सरकारच्या कर्मचारी आहेत. तर मग अमेरिकेस मध्ये लक्ष घालायची गरज काय पडावी?

अमेरिकन व्हीसा मिळवण्यासाठी तयार केलेली कागदपत्र दिशाभूल/फसवणूक करणारी असतील तर कोणी लक्ष घालायचं?

भारतात त्या मेडच्या कुटुंबियांना का अटक केली? केवळ तिने सुट्टीच्या दिवशी इतरत्र काम करून जास्त पैसे मिळवायचा प्रयत्न केला म्हणून? मुळात तिला कबूल केलेला मोबदला दिला नाही त्याचं काय? आधीच अशा दोन केसेस झालेल्या असताना पुन्हा तोच घोळ का घालायचा? अमेरिकेने अशा किती केसेस चालवून घ्यायच्या आणि का?

क्वार्टर मिल्लियची बेल कोणी दिली असेल? $४१२० पगारात शक्य आहे का?
$४१२० इन्कम असतांना $४५०० देता येणार नसतील तर $४५०० चा बॉन्ड का दिला?

सरकारने एवढी वेळच येउ द्यायला नको. एवढ्या उच्चपदस्थ व्यक्तीसाठी एक नोकर सरकारी खर्चानेच द्यायला हवा <<+१

अमेरिकेने अशा किती केसेस चालवून घ्यायच्या आणि का?<<< Rofl

देख तेरे दुनियाकी हालत क्या होगयी भगवान, कितना बदलगया इन्सान!

स्वाती_आंबोळे,

>> अमेरिकन व्हीसा मिळवण्यासाठी तयार केलेली कागदपत्र दिशाभूल/फसवणूक करणारी असतील तर कोणी
>> लक्ष घालायचं?

नक्की कोणती कागदपत्रे दिशाभूलक आहेत यावर तपास केला. तर असं दिसलं की भारत सरकारच्या दोन कर्मचार्‍यांत जो करार आहे तो अमेरिकी नियमानुसार (किमान वेतन) व्हायला हवा असा आग्रह अमेरिकेने धरला. स्वत:च्या पगारातून हे किमान वेतन देणे कोणत्याही भारतीय सरकारी कर्मचार्‍याला शक्य नाही (हे तुम्हीच उधृत केलंय). त्यामुळे सरकारी अधिकारी नोकरांचा व्हिसा मिळवायला खोटी माहीती भरत.

अमेरिकेने असा आग्रह धरणे कितपत उचित आहे? यावर सरकारी पातळीवर तोडगा निघू शकेल असे वाटते. भारतीय उच्चायुक्ताची काहीच जबाबदारी नाही का?

आ.न.,
-गा.पै.

>> अमेरिकेने असा आग्रह धरणे कितपत उचित आहे?
ते व्हीसाच्या नियमांवर अवलंबून आहे.
जाणूनबुजून चुकीची माहिती व्हीसासाठी देणं हा तरीही गुन्हाच आहे.

<< भारत सरकारच्या दोन कर्मचार्‍यांत जो करार आहे तो अमेरिकी नियमानुसार (किमान वेतन) व्हायला हवा असा आग्रह अमेरिकेने धरला. >>

वाक्यात एक शब्द राहीला:

भारत सरकारच्या दोन कर्मचार्‍यांत जो करार अमेरिकेत आहे तो अमेरिकी नियमानुसार (किमान वेतन) व्हायला हवा असा आग्रह अमेरिकेने धरला.

To apply for an A-3 visa, the visa applicant must submit each of the items explained in the How to Apply - Required Documentation section above, as well as the following.

The employment contract must be in English and, if the employee does not understand English, also in a language the employee understands.

Employment Contract signed by both the employer and the employee which must include each of the following items:

Description of Duties. The contract must describe the work to be performed, e.g., housekeeping, gardening, child care, and also must include a statement that the domestic employee shall work only for the employer who signed the contract.

Hours of Work. The contract must state the time of the normal working hours and the number of hours per week. It is generally expected that domestic workers will be required to work 35-40 hours per week. It also must state that the domestic employee will be provided a minimum of one full day off each week. The contract must indicate the number of paid holidays, sick days, and vacation days the domestic employee will be provided.

Minimum Wage. The contract must state the hourly wage to be paid to the domestic employee. The rate must be the greater of the minimum wage under U.S. Federal and state law, or the prevailing wage for all working hours. Information on the prevailing wage statistics by occupation and metropolitan area is available on the Department of Labor's Online Wage Library & Data Center website.

The contract must state that wages will be paid to the domestic employee either weekly or biweekly. As of March 2011, the Department determined that no deductions are allowed for lodging, medical care, medical insurance, or travel. As of April 2012, deductions taken for meals are also no longer allowed.

Overtime Work. The contract must state that any hours worked in excess of the normal number of hours worked per week are considered overtime hours, and that hours in which the employee is “on call” count as work hours. It also must state that such work must be paid as required by U.S. local laws.

NOTE: Under Federal law, the rate of overtime pay need not exceed the regular hourly rate if the employee resides in the home of the employer, but State law governing overtime rates also applies and must be checked. If the employee does not reside with the employer, overtime for hours in excess of 40 hours per week must be paid at the rate of time and a half.
Payment. The contract must state that after the first 90 days of employment, all wage payments must be made by check or by electronic transfer to the domestic worker’s bank account. Neither Mission members nor their family members should have access to domestic workers' bank accounts. In addition, the Department requires that the employer retain records of employment and payment for three years after the termination of the employment in order to address any complaints that may subsequently arise. Further, the bank account must be in the United States so that domestic workers may readily access and utilize their wages.
Transportation to and from the United States. The contract must state that the domestic employee will be provided with transportation to and from the United States.
Other Required Terms of Employment. The contract must state that the employer agrees to abide by all Federal, State, and local laws in the United States. The contract also must include a statement that the domestic worker’s passport and visa will be in the sole possession of the domestic worker. In addition, the contract must state that a copy of the contract and other personal property of the domestic employee will not be withheld by the employer for any reason. The contract must include a statement that the domestic worker's presence in the employer's residence will not be required except during working hours. The contract must also include a statement by the employee, promising not to accept any other employment while working for the employer.
Other Recommended Terms of Employment. The contract may include additional agreed-upon terms of employment, if any, provided they are fully consistent with all U.S. Federal, State, and local laws. Any modification to the contract must be in writing.

Important Notices - for Employers and Personal Employees/Domestic Workers - Personal employees are advised to keep their passport and a copy of their contract in their possession. They should not surrender their contract and passport to their employer under any circumstances. Personal employees and domestic workers are advised that they will be subject to U.S. law while in the United States, and that their contracts provide working arrangements that the employer is expected to respect.

Recent changes to U.S. law relate to the legal rights of certain employment-based nonimmigrants under Federal immigration, labor, and employment laws, and the information to be provided about protections and available resources. As a temporary visitor to the U.S., it is important that you are aware of your rights, as well as protections and resources available when you come to work or study here. Before your interview, review the Nonimmigrant Rights, Protections and Resources pamphlet and learn about additional information on our webpage.

The U.S. Government considers "involuntary servitude" of domestic workers, as defined under the Trafficking Victims Protection Act (TVPA), to be a severe form of trafficking in persons (TIP) and a serious criminal offense. Victims of involuntary servitude are offered protection under the TVPA. "The term 'involuntary servitude' includes a condition of servitude induced by means of any scheme, plan, or pattern intended to cause a person to believe that, if the person did not enter into or continue in such condition, that person or another person would suffer serious harm or physical restraints, or the abuse or threatened abuse of the legal process." While in the U.S., domestic workers are advised that the telephone number for police and emergency services is 911, and that the U.S. Government maintains a telephone hotline for reporting abuse of domestic employees and other TIP-related crimes, 1-888-373-7888.

अमेरिकेने इतर सर्व देशांचे फोन टॅप केले , त्यांचे इमेल्स चोरले , हजारो निरपराध मुस्लिम नागरिकांना मारलं , आणि अजुनही करताहेत हे सगळं चालतं वाटतं तुम्हाला ?
की नियम फक्त बाकीच्यांनी पाळायचे आणि त्यांनी पाहीजे तसं वागायचं , वा रे वा !

ओह बरं बरं, हा फ्रॉड त्या सगळ्याच्या विरोधात केलाय होय! मला वाटलं सस्त्यात घरकामं करायला माणूस हवं म्हणून केला. मग बरोबर आहे, करायलाच हवा, चांगला धडा शिकवायला हवा अमेरिकन सरकारला!

भारताची इमेज खराब होते याचं काहीच वाटत नाही का? एकदा नाही, दोनदा नाही किती वेळा करणार असे प्रकार? ज्या प्रकारे अटक केली ते निषेधार्ह असले तरी यांनी नियम तोडलेले दुर्लक्षित करता येत नाहीत. उगीच अमेरिका काय करते आणि काय नाही ते इथे सांगुन काय उपयोग? त्यांनी फोन टॅप केले म्हणून आपण त्यांच्या देशात येऊन कायदे तोडायचे? काहीही.

स्वाती Lol (बघा त्यांचं देशप्रेम, नाहीतर तुम्ही असं म्हणाली नाहीस हे बरं केलंस)

श्री , कुठला संबध कुठे लावतोयस रे?
चाईल्ड अ‍ॅब्युज किंवा एम्प्लॉयी अ‍ॅब्युज चे लॉ कडकच आहेत कि. माहित नाही का? फुकट या बाईंना सहानुभुती दाखवून भारताची इमेज कशाला खराब करायची.

स्वाती आणि सीमाला अनुमिदन. डिप्लोमॅट ने स्वतःच कायदे तोडणे, कहर म्हणजे व्हिसाचे खोटे पेपर्स तयार करणे , स्वस्तात नोकर मिळवण्यासाठी नियमांचे उल्लंघन इ. म्हणजे आमंत्रण च होते की या अटकेला.

सीमा , कल्पु मान्य आहे मी दुसरं उदाहरण दिलं , पण डिप्लोमॅट वर कार्यवाही करताना जे संकेत आहेत ते पाळायला नकोत का ? डिप्लोमसी न पाळण्याचं पहिलच उदाहरण नाहीये. माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांच्या वेळेस पण अशीच डिप्लोमसी पाळली नव्हती .

डिप्लोमॅट वर कार्यवाही करताना जे संकेत लागू होतात ते वकिलातीच्या कामासंबंधी असतात. घरकामाच्या बाईसाठी विसाच्या कागदपत्रात गडबड असेल तर तो व्यक्तिगत मामला होतो. या आधी दोनदा अशाच प्रकारच्या केसेस झाल्यावर यावेळी कडक कार्यवाही केली गेली. सामान्य व्यक्तीने असे केले तर चालवुन घेतले जाणार नाही तसेच हे ही.

स्वाती_आंबोळे,

तुम्ही जे लांबलचक नियम दिलेत ते एका खाजगी विदेशी (म्हणजे अमेरिकेतील विदेशी) नागरिकाने दुसर्‍या खाजगी विदेशी (म्हणजे अमेरिकेतील विदेशी) नागरिकास घरगुती कामास्तव नोकरीवर ठेवण्याचे आहेत. ते पाळले जायलाच हवेत. हे सर्वसाधारण वर्गाचे (जनरल क्याटेगरी) नियम झाले.

पण जेव्हा मालक व नोकर दोन्ही भारतीय दूतावासाचे कर्मचारी असतात तेव्हा हे नियम शिथिल व्हावेत असा आग्रह भारतातर्फे राजनैतिक पातळीवर का धरण्यात आला नाही, असा माझा मूलभूत प्रश्न आहे. जर अशा लोकांसाठी वेगळा व्हिसा निर्माण झाला असता तर ते सर्वसाधारण वर्गात धरले गेले नसते.

आ.न.,
-गा.पै.

>> हे सर्वसाधारण वर्गाचे (जनरल क्याटेगरी) नियम झाले.
नाही. A3 ही सर्वसाधारण कॅटेगरी नाही. गूगल करा. स्पेसिफिकली "मालक व नोकर दोन्ही भारतीय दूतावासाचे कर्मचारी असतात" तेव्हा त्यातल्या नोकरासाठीच्या व्हीसाची कॅटेगरी आहे ती.

विसाच्या कागदपत्रात गडबड असेल तर तो व्यक्तिगत मामला होतो. >>> स्वाती२ विसा फ्रॉडमध्ये , स्ट्रीप सर्च , कॅव्हिटी सर्च करावं लागतं का ?

श्री, माझ्या पहिल्याच पोस्टमधलं पहिलंच वाक्य वाच.
कॅव्हिटी सर्च कुठून आला? उगाच काहीतरी भडक लिहायचं का?

मला प्रश्न पडलाय तो असा - जर का वकिलाती मधील कर्मचार्‍यास घरकामासाठी ठेवलेल्या व्यक्तीला नियमानुसार पगार देता येणार नाही हे विसा देताना कुणाच्या लक्षात आले नाही का?

Pages