अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे एवढच बरोबर आहे बेफिकिर<<< हू सेज धिस? यू?

मुद्दा प्रत्येक गे पिसफुल आहे कि नाही हा नाहीच , गुन्हे करणारे गे-स्ट्रेट कोणीही असोत ते गुन्हेगार आहेत!
पण अता मात्रं जे पिसफुल आहेत त्यांनाही कोर्टाने ' गुन्हा' असे शिक्का मोर्तब केल्याने आणि त्याच वेळी हे देवयानेद प्रकरण घडल्याने 'गे रिलेशिप ' असणे या एवढ्या कारणाने टार्गेट केलं जाणार हे चुकीचं वाटतय ( हा कोर्टाचा निर्णयही ही नेमका याच वेळी आलाय दुर्दैवानी .)<<<

कोर्टाने दिलेला निर्णय देवयानी खोब्रागडेंच्या प्रकाराचे टायमिंग जुळवून दिलेला नाहीच. भारतात (तूर्त) गे रिलेशनशिप बेकायदेशीर आहे आणि ती जाहीर करून येथे वावरणार्‍या अमेरिकन प्रतिनिधींना येथील कायद्याला 'आता' सामोरे जावे लागेल.

सध्या तरी वाटतय कि high level politics or something else which we are unaware of/ unable to imagine >> +१. हे वाटतंय तेवढं साधं प्रकरण वाटत नाही. त्याशिवाय भारतीय सरकार एवढं रिटॅलियेट करणार नाही (जरी २०१४ निवडणुका जवळ असल्या तरीपण).

शिवाय 'गे' ऑफिसर्सवर कारवाई करा अशी यशवंत सिन्हांनी मागणी केली आहे. सरकारातल्या कोणी तसं काही बोललेलं नाहिये.

ही हेरगिरी असू शकेल. दुर्दैव हे आहे की प्रत्येक देशाची पॉलिसी मानवतावादी असताना (अपवाद वगळून) प्रत्येक देशाला हेरगिरीची आवश्यकता भासावी, पण असे वाटते की जे काही समोर येऊ दिले गेले आहे ते बघता त्यावर रिअ‍ॅक्ट करणे, कोणीतरी रिअ‍ॅक्ट करावे असे वाटणे, कोणीतरी रिअ‍ॅक्ट केल्यावर बरे वाटणे किंवा दु:ख होणे हे साहजिक आहे.

चुकली असेल ती देवयानी खोब्रागडे, नसतील झाले कॅव्हिटी सर्च, पण आम्हाला इथल्या अमेरिकन दूतावासातील भारतीय कायदे न पाळणार्‍यांना धडा शिकवायचा आहे. गो टू हेल!
>>> किती भावनाप्रधान प्रतिसाद...भारतीय कायदे न पाळणार्‍या अमेरिकन प्रतिनिधींना शि़क्षा व्हायलाच हवी. कोणी ते नाकारत नाहीये. या आधी जर असे झाले नसेल तर त्यात भारतीय सरकार दोषी आहे.

किती भावनाप्रधान प्रतिसाद<<<

नुसता भावनाप्रधान प्रतिसाद नाही आहे हा! 'आपण उसगावात आहोत म्हणून भारतीयांना कायदे शिकवू शकतो' ह्या भावनाप्रधानतेला दिलेला प्रतिसाद आहे हा!

स्वाती_आंबोळे,

>> ती डोमेस्टिक वर्कर म्हणून A3 व्हीसावर आणली होती

संगीता ही भारत सरकारची नोकर आहे असं रेडीफवर एके ठिकाणी सूचित केलंय. खरंखोटं लवकरच उघडकीस येवो.

>> In his order on September 20, Justice Jayant Nath noted that any grievance about the
>> terms of employment, salary or ill-treatment could only be adjudicated by an Indian court,
>> since Richard and Dr Khobragade worked for the Government of India.

डॉ. खोब्रागडे आणि संगीता यांच्यात भारतात एका प्रकारचे व्यावसायिक नाते आणि अमेरिकेत दुसर्‍या प्रकारचे व्यावसायिक नाते चालू शकते का?

आ.न.,
-गा.पै.

>>डॉ. खोब्रागडे आणि संगीता यांच्यात भारतात एका प्रकारचे व्यावसायिक नाते आणि अमेरिकेत दुसर्‍या प्रकारचे व्यावसायिक नाते चालू शकते का?<<<

माफ करा गा पै, पण माझ्यामते तुम्ही बहुधा पुन्हा तेच विचारत आहात. अमेरिकन कायद्यानुसार व्यावसायिक नाते भिन्न स्वरुपाचे असू शकते व ते तसे मेन्टेन न झाल्याची ही शिक्षा आहे असे सकृतदर्शनी वाटते.

प्रश्न तो नाहीच आहे असे माझे मत!

प्रश्न हा आहे, की हे सगळे आत्ता कसे काय समजले? मुळात ती व्यक्ती घरगडी म्हणून जाताना तपासण्या कश्याकाय झाल्या नाहीत? (फॉर विच यू एस इस सो मच नोन).

किंबहुना, हे करून जर एक प्रघात पाडायचा होता की आम्ही कोणालाही भीक घालत नाही, तर तोच प्रघात कधी नव्हे ते आणि कायदेशीर कारणास्तव भारताने(ही) पाडला तर ते दुर्दैवी कसे?

बाकी, हा जर हेरगिरीचा मामला असला तर ह्या संपूर्ण चर्चेत काहीच राम नाही हे निश्चीत!

देवयानीबाईंना पुर्ण इम्युनिटी मिळावी म्हणून आता ट्रान्सफर केली ते आधी लेखी अ‍ॅलर्ट मिळाल्यावर केले असते तर हे सगळे त्रास वाचले असते. >> +१

इतके महिने हे प्रकरण शिजत असताना वेळीच प्रतिबंधात्मक पावलं उचलली गेली नाहीत, डिप्लोमसी चुकली. केस मेरिटवर खोब्रागडेंची बाजू दुबळी आहे. आणि मीडियातल्या काही अतिरंजीत बातम्यांमुळे काहीवेळा भारतीय जनमानसाचा भडका उडाला आहे हेही खरंच. तरीही, केवळ 'लेटर ऑफ द लॉ'वर हे प्रकरण आता अमेरिकेलाही हाताळता येणार नाही - विशेषतः भारताचा आक्रमक प्रतिसाद पाहता. शिवाय खूप तपशीलात जाऊन परिस्थिती समजून घेतली, तर आणखी कितीतरी ग्रे शेड्स दिसतील - ज्यावरचे प्रतिसाद केवळ 'चूक-बरोबर' असे ठरवता येणार नाहीत. कायदा आणि वास्तव यात फार तफावत असेल तर शेवटी कायद्याला मुरड घालावी लागते.

डी पी सतीश हा अतिरंजीत न लिहीणारा आणि चांगले कॉन्टॅक्ट्स असणारा पत्रकार आहे; त्याने लिहीलेले हे दोन ब्लॉग्ज जरुर वाचा:
१. http://ibnlive.in.com/news/devyani-arrest-plot-thickens-several-unanswer...
२.http://ibnlive.in.com/news/devyani-khobragade-incident-both-sides-of-the... (विशेषतः भारतीयांची बाजू)

बाकी, भारतातल्या अमेरिकन डिप्लोमॅट्सवर सूड घ्या असं कुणी म्हणू नये. तो समलिंगी साथीदारांचा मुद्दा तर अत्यंत उथळ वाटतो. भारताने ज्यांना ज्यांना अधिकृत व्हिसा देऊ केला असेल त्यांची कागदपत्रं सरकारकडे आहेतच, फारतर त्या कागदपत्रांची पुन्हा छाननी करता येईल.

लेटर ऑफ द लॉ म्हणजे काय? कृपया सांगावेत.

प्रतिसाद क्वॉलिटेटिव्हली फार आवडला, पण दोन मुद्दे समजले नाहीत.

>>>आणखी कितीतरी ग्रे शेड्स दिसतील<<< दिसतील म्हणजे कोणास त्या ज्ञात आहेत का?

>>>कायदा आणि वास्तव यात फार तफावत असेल तर शेवटी कायद्याला मुरड घालावी लागते.<<<

शब्दार्थ समजला, पण संदर्भासहित अर्थ नाही लक्षात आला.

तुमचा प्रतिसाद वाचून असे वाटत आहे की ह्या विषयावर बोलणे म्हणजे अज्ञान प्रकट करणे आहे.

तेव्हा नम्रपणे गप्प बसतो.

कौवा तुमचा संतुलित प्रतिसाद आवडला.
कायदा आणि वास्तव यात फार तफावत असेल तर शेवटी कायद्याला मुरड घालावी लागते. >>> खरचं शक्य आहे का हे ?

नवीन माहिती आणि मतांची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद मंडळी. हेही पाहा:
Secretary of State John Kerry Says He Regrets Treatment Of Indian Diplomat In New York..
http://wuwm.com/post/kerry-says-he-regrets-treatment-indian-diplomat-new...

- 'लेटर ऑफ द लॉ'नुसार म्हणजे कायद्यावर बोट ठेवून / बरहुकूम.

- @ वास्तव आणि कायद्याला मुरडः न्यूयॉर्कमधे राहणार्‍या अनेक देशांच्या प्रतिनिधींना खोब्रागडेंसारखे मार्ग अवलंबावे लागत असतील आणि ते आत्तापर्यंत निर्धोकपणे चालवून घेतले गेले असतील, तर आता खोब्रागडेंना 'यू.एन. बॅज' मिळताना अमेरिकी सरकार अडचणी उभ्या करणार नाही आणि अटक/खटला/पुढची कारवाई थंड्या बस्त्यात जाईल. ही कायद्याला मुरड.

बेफिकीर
कौवाने माझ्या मनातलेच लिहिले
'लेटर ऑफ द लॉ' म्हणजे कायदा काय सांगतो?
'स्पिरीट ओफ द लॉ' म्हणजे कायद्यामागचा मुळ उद्देश काय?

आता या उदाहरणात देवयानीने वा इतरांनी अशा प्रकारे लोक आणताना त्यांना हे इथुन निघुन जाणार आहेत याची माहिती वा कल्पना असेल आणि त्यांनी ते अमेरिकन पोलिसांपासुन लपविले असेल आणि अशा केसेस आधि झाल्या असतील तर ते स्पिरीट ऑफ लॉ च्या विरुद्ध आणि नक्कीच ह्युमन ट्रॅफिकींग होइल कारण अशा प्रकारे आणलेल्या व्यक्तिंचे शोषण होतेच होते.
पण संगिता ती देवयानीसाठी खरोखर भारतात पण काम करत असेल आणि तिच्याबरोबर इथे आल्यावर
संगिताने फसवुन पळ काढला असेल तर ते लेटर ऑफ द लॉ च्या विरुद्ध म्हणजे किरकोळ गुन्हा होइल.

मी इथे अमेरिकन वा भारतीयंच्या बाजुने म्हणायचे म्हणुन म्हणत नाही पण तुम्हीच पहा आपल्याला
१) ही साधी गोष्ट आहे का यात आत काय आहे हे जोपर्यंत माहित नाही तो पर्यंत आत काहितरी आहे आणि मुद्दाम भारताचा अपमान करण्यासाठी ही गोष्ट केली असे समजणे चुकीचे होइल.
२) मुद्दाम (खरोखर जे कायद्याविरुद्ध असतील त्यांना योग्य प्रोसिजर पाळुन आणि सर्वांना समान नियम लावुन शिक्षा दिली तर ते मुद्दाम होणार नाही) अमेरिकेच्या दुतावासातील लोकांना असा त्रास दिला गेला तर प्रत्येक देश एक दुसर्यांविरुद्ध असे "quid for quo" पावले उचलतील ज्याचा त्रास सामान्य लोकांनाच भोगावा लागेल.

आता यात असा मुद्दा येतो की भारताने का माघार घ्यावी. मी म्हणते मुळीच घेउ नये, पण योग्य प्रकारे या प्रकरणाची शहानिशा करावी आणि यात दोषी जर काही अधिकारी सापडलेत तर त्यांच्यावर जरुर कारवाई करता येइल का पहावे.

उदा जेंव्हा एखादा अमेरिकन अधिकारी (जसे भोपाळ दुर्घटनेत) पकडला जाईल तेंव्हा त्याची अजिबात गय करु नये पण जाणुन बुजुन वड्याचे तेल वांग्यावर काढ्ण्यात काय अर्थ आहे?

मला असे म्हणायचे असेल की राष्ट्राचा उथळ प्रतिसाद असा असेल.
१) जे अमेरिकन आहेत त्यांना कोणत्यातरी प्रकारे कायद्याच्या कचाट्यात पकडुन त्रास देणे.

राष्ट्राचा गंभीर प्रतिसाद असा असावा.
१) आपले इमिग्रेशनचे कायदे व त्याची अंमल बजावणी याची फेरतपासणी होउन जर काही त्रुटी असतील तर त्या दुर केल्या जातिल.
२) भारत आपल्या अधिकार्यांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहुन जर कोण त्यांना जाणिवपुर्वक त्रास देत असेल तर त्याच्या मुळाशी जाउन त्यांना न्याय मिळवुन देइल.

बेफिकीर,

>> अमेरिकन कायद्यानुसार व्यावसायिक नाते भिन्न स्वरुपाचे असू शकते व ते तसे मेन्टेन न झाल्याची ही
>> शिक्षा आहे असे सकृतदर्शनी वाटते.

माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. भारतीय नाते अस्तित्वात होते म्हणून अमेरिकी नाते अस्तित्वात आले आहे. अमेरिकी नात्यास स्वतंत्र अस्तित्व नाही. तर भारतीय नात्याचा संदर्भ टाळून थेट अमेरिकी नाते लागू करणे कितपत योग्य?

आ.न.,
-गा.पै.

चुकली असेल ती देवयानी खोब्रागडे, नसतील झाले कॅव्हिटी सर्च, पण आम्हाला इथल्या अमेरिकन दूतावासातील भारतीय कायदे न पाळणार्‍यांना धडा शिकवायचा आहे. गो टू हेल! >>>> भारी बेफिकिर... सामान्य नागरिकाला हेच वाटेल. आणि सरकारने असं करण्याची हिंमत दाखवणे, अशक्य वाटतय.

सरकारला साधं लोकपाल पास करायला इतके वर्ष लागले, स्वतःच्या देशातील लोकांना धड न्याय देता येत नाही, परदेशी लोकांचं जाउच द्या. तेव्हडी त्यांची दारू बंद केली यावर आपली एक ओली पार्टी होउन जाऊ द्या... यापेक्षा जास्त अपेक्षाही नाही. नाहीतर नायजेरिया प्रकरणातच आपण बरच काही केलं असतं. असो.

अतिशय दुबळं मानल्या जाणार्‍या सरकारात इतकी हिंमत कुठुन आली, हे एक कोडंच. बाकी हेरगिरी प्रकरण असतं तर इतका गाजावाजा होईल, असं अमेरिकन पोलिस वागले नसते. कदाचित एफबीआय ने हाताळले असते ना प्रकरण.

असो, डॉ. खोब्रागडे यांच्या या (आणि आदर्श) प्रकरणी त्यांच्यावर भारत सरकार काहीच कारवाई/ चौकशी करणार नाही असं दिसतय. एकुण काय, लॉबी पाहिजे. Sad

आणि जर संगीता सरकारी नोकर नव्हती तर ४१३०$ कमावणार्‍या खोब्रागडेंच्या गरी नॅनी म्हणुन ४५००$ वर काम करण्यासाठी विसा देणारा (अमेरिकन) अधिकारी दोषी नाही का?
आणि आतापर्यंत असच होत होतं, मग आत्ताच अमेरिकन सरकारला अचानक पुळका का यावा?

आणि जर संगीता सरकारी नोकर नव्हती तर ४१३०$ कमावणार्‍या खोब्रागडेंच्या गरी नॅनी म्हणुन ४५००$ वर काम करण्यासाठी विसा देणारा (अमेरिकन) अधिकारी दोषी नाही का?
आणि आतापर्यंत असच होत होतं, मग आत्ताच अमेरिकन सरकारला अचानक पुळका का यावा?
-------
केवळ ४१३० $ हा आकडा कुठुन आला? माहिती स्त्रोत काय आहे?

उदय :- But the question is how can Khobragade pay her nanny $ 4500 per month when she is being paid $ 4120 per month, a point that has been stated by her father Uttam Khobragade, a retired IAS officer. It is an important point which Washington needs to take into consideration, because this is not India’s story alone.

Read more at: http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

कौआ यांचा प्रतिसाद आवडला. लिंक्स सावकाश वाचेन.
एकूण बरीच गुंतागुंत आहे आणि आपल्याला (मला) बरेच कमी माहिती आहे एवढे कळले. Happy

जिनेव्हा कन्व्हेन्शनबद्दलची अतिशहाणा यांची पोस्ट इग्नोर मारण्यात आलेली दिसते आहे. >>> अरे हो की इब्लिस , खरचं सगळ्यांनीच ती पोस्ट इग्नोर केलीये. Proud
अतिशहाणा माहीतीसाठी धन्यवाद.

sangeeta's husband and child has been issued visa n flew to Usa on 10th dec n khobragade arrested on 12th dec. as per todays ET. May be she was a nanny who later stole some docs and given them to usa govt in exhange for asylum to herself n family.

लोकसत्ता मधला अग्रलेखामुळे तरी येथिल देशभक्तान्चा समज दुर होइल अशी आशा.

नियम तोडताना यान्चा राष्ट्राभिमान कुठे जातो ?

Pages