अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री, तू दोन्ही साईडने बोलतो आहेस का?

इथे चर्चा फक्त अमेरिकन सरकार दोषी की खोब्रागडे दोषी अशी चालू आहे ..

ती मेड कशावरून चालू नसेल? आणि खोटंनाटं रिपोर्ट करत असेल? आणि हे असं करण्यामागे कुठल्यातरी वेगळाच पॉलिटिकल अजेन्डा असेल?

स्वाती ही बघा ती बातमी http://timesofindia.indiatimes.com/india/Devyani-case-Strip-search-finds...
सशल मी म्हणतच नाहीये की खोब्रागडे दोषी नाही , इफ शी इज गिल्टी अँड शी हॅज तो पे फॉर दॅट पण म्हणुन स्ट्रिप सर्च ?

मेडचा पगार भारतीय सरकार देतं की डिप्लोमॅट्स स्वतः?

तिचा पगार भारतीय सरकारकडून दिला गेला पाहिजे ना?

आणि भारत सरकारचा ह्या मालक-नोकर रिलेशनशिप मध्ये कसलाच संबंध नसेल, तर स्वाती२ चा प्रश्न व्हॅलिड आहे .. व्हिसा अ‍ॅप्लिकेशन वरून असेस् करत नाहीत का की एम्प्लॉयर ठरलेला पगार देऊ शकतो/ते अथवा नाही ?

वाचल्यात त्या लिंका. तू म्हणालास तो शब्द एकाही बातमीत नाही. एकतर तुला त्याचा अर्थ माहीत नाही किंवा मुद्दाम सेन्सेशनल पोस्टी टाकायच्यात.

अशा प्रकारच्या केस मधे अटक करताना आणि केल्यावर नॉर्मल प्रोसिजर काय असते? जर का नॉर्मल प्रोसिजर प्रमाणे वर्तन घडले असेल तर...

विसा फ्रॉड जर ह्युमन ट्राफिकिंग च्या कमलाखाली येत असेल तर त्याचे कायदे महाभयंकर आहेत. फेडरल ऑफेन्स प्रोटोकॉल आणि त्याचे व्हायोलेशन च्या शिक्षा कल्पनेपलिकडे कडक आहेत, जरी तो फ्रॉड केवळ कागदोपत्री असला तरी. एवढा ऊच्चस्तरीय अधिकारी जर ह्यात अडकला असेल तर भारताने सुरूवातीला अशी भावनिक पावलं ऊचलण्याआधी सखोल चौकशी करून सत्यता पडताळून मगच काय ती अंमलबजावणी करायला हवी होती. हे असं रिटॅलीएशन केल्यासारखी पावलं ऊचलणं म्हणजे अजूनच संकटांना आमंत्रण त्यात ऊच्चस्तरीय अधिकार्‍यांची ईमॅच्युअर ईमेज ऊघडी पडते ते वेगळंच.

चमन +१.
मला अजूनही भारतात त्या मेडच्या नातेवाइकांना अटक का केली होती हे समजलेलं नाही. जर 'एव्हरीवन अन्डरस्टुड' की डिप्लोमॅट्सना इतके पगार परवडत नाहीत तर हाऊ कम नोबडी अन्डरस्टुड की मेडही इतक्या कमी पगारात राहू शकत नाही आणि २४*७ काम करू शकत नाही? हा अब्यूजच आहे आणि त्यामुळे (मी वर दिलेल्या लिंकप्रमाणे) ट्रॅफिकिंगच्या कलमाखाली येऊ शकतो.
वर वारंवार उल्लेख आल्याप्रमाणे जर ही पहिलीच केस नसेल तर कधीतरी स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन घेतली जाणं स्वाभाविकच होतं.

श्री, मुख्य बातमीत कुठेही तो शब्द नाही. त्यांनी भडक मथळे दिले आणि तू इथे तेच केलंस.

>>मला अजूनही भारतात त्या मेडच्या नातेवाइकांना अटक का केली होती हे समजलेलं नाही.>>
भारतात त्या मंडळींना त्रास देऊन मेडला कोंडीत पकडण्यासाठी केले असावे.

देवयानीचा पगार वार्षिक $१००००० आहे. तिच्या रहाण्याची सोय भारत सरकारतर्फे करण्यात येते,
http://www.nydailynews.com/new-york/nyc-crime/indian-govt-livid-u-s-arre...
यापेक्षा किती तरी कमी पगार असलेली माणसे सुद्धा योग्य वेतन देतात.

श्री स्ट्रीप सर्च स्टॅन्डर्ड प्रोसिजर आहे स्त्रियांसाठी महिला कॉन्स्टेबलकडुन केला गेला असणार (non evasive) पद्धतीने, गुन्हेगाराने वेपन आत नेउ नये हाच त्या मागचा हेतु आहे.

ही अटक करण्यामागचा हेतु वेगळा आहे. राज ने खाली लिहिल्या प्रमाणे अनेक देशांतुन ह्युमन ट्रॅफिकींग साठी एम्बसी (राजदुतावास) आणि कॉन्सुलेट (अधिकारेनिवास) याचा वापर केला जातो. हल्ली अशीच एक केस रशियन राजदुतावर झाली पण एम्बसी (राजदुतावास) ला पुर्ण immunity असल्यामुळे US सरकार काही करु शकले नाही.
बरेचसे consular अधिकारी अशा पद्धतीने कामावर लोकांना आणतात आणि ठराविक काळ त्यांनी काम केल्यानंतर हे लोक गायब होतात. देवयानीचा असा काही भरभक्कम ट्रॅक रेकॉर्ड असल्या शिवाय किंवा सबळ पुराव्याशिवाय असे पाउल उचलले नक्कीच गेले नसणार.

स्वाती_आंबोळे,

>> स्पेसिफिकली "मालक व नोकर दोन्ही भारतीय दूतावासाचे कर्मचारी असतात" तेव्हा त्यातल्या
>> नोकरासाठीच्या व्हीसाची कॅटेगरी आहे ती.

असं असेल तर मग अमेरिकेला यात मध्ये पडायचं कारण नाही. हा दूतावासाशी संबंधित भारतीयांचा आपापसांतला मामला आहे. दूतावासी नागरिक इतर विदेशी नागरिकांसारखे नसतात. त्यांना खास सवलती असतात. भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांनी असा आग्रह का धरला नाही, असा प्रश्न आहे.

मात्र जर नोकराने अमेरिकी पोलिसांकडे छळ झाल्याची तक्रार केली तर गोष्ट वेगळी.

आ.न.,
-गा.पै.

गापै
एकदम बरोबर दुतावासातील (एम्बसी ambassador and related staff) मधले नागरिक इतर विदेशी नागरिकांसारखे नसतात.
पण कॉन्सुलेट हा दुतावास नाही यामुळे तेथिल कर्मचार्यांना व्हिसाची बंधने पाळावी लागतात.
जर संगिता फरार झाली नसती तर हे सर्व झाले असते असे मला अजिबात वाटत नाही.

सायो | 17 December, 2013 - 13:48
ती कामवाली गायब झाल्याचं मी ज्या बातम्या वाचल्या त्यात वाचलं नाही.

http://www.independent.co.uk/news/world/asia/indiaus-row-over-arrest-of-...

यात लिहिले आहे
Sangeeta Richard, requested permission to work for other people on her day off and then later failed to return back home to the diplomat’s house.

निलिमा,

>> कॉन्सुलेट हा दुतावास नाही यामुळे तेथिल कर्मचार्यांना व्हिसाची बंधने पाळावी लागतात.

मुद्दा उचित! दूतावास (counsulate) आणि राजदूतावास (embassy) यांत जराशी गोंधळच झाला होता माझा. तो दूर केल्याबद्दल आभार! Happy

स्वाती_आंबोळे,

तुमचा सगळा युक्तिवाद मान्य! अशा प्रकरणांवर राजनैतिक पातळीवर तोडगा निघायला हवा होता यापूर्वीच.

आ.न.,
-गा.पै.

http://timesofindia.indiatimes.com/india/Devyani-case-No-regret-but-conc...
या बातमीनुसार अमेरीकेच्या स्टेट डिपार्टमेंटने सप्टेंबरमधे लेखी कळवले होते तक्रार आहे आणि कारवाई होऊ शकते म्हणून. अशावेळी भारतीय सरकारने काहीतरी हालचाल करायला हवी होती.

तुमचा सगळा युक्तिवाद मान्य! अशा प्रकरणांवर राजनैतिक पातळीवर तोडगा निघायला हवा होता यापूर्वीच.

आ.न.,
-गा.पै.
>>
बरोबर ! एखाद्या आईला असे रस्त्यात हात्कड्या लागल्या याचे मला पण वाईट वाटले, लवकर सर्व सुरळित होवो.

म्हणजे इतकं सगळं अमेरिकेने कळवुनही देवयानी खोब्रागडे यांना भारत सरकारने परत बोलावलं नाही, यात भारत सरकार निश्चितच दोषी आहे.
एकवेळ हातकड्या घालणे चालले असते, पण ज्या पद्धतीने तीला वागवले गेले, ते अतिशय चुकिचे वाटते, भलेही ती दोषी असेल तरी.
एक गोष्ट अजुन कळत नाही आहे, ती म्हणजे यापुर्वीही अश्या घटना घडल्या होत्या, पण केवळ देवयानीच्याच बाबतीत सरकार (आणि सगळेच) एकदम कडक कसे झाले? हा येणार्‍या निवडणुकांचा परिणाम आहे का?
दुसरं म्हणजे देवयानीने दिल्ली न्यायालयात संगीता रिचर्ड्स विरुद्ध तक्रार केली होती आणि याबाबतीत जोपर्यंत दिल्ली न्यायालय काही निर्णय घेत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई अमेरिकेत करु नये असे म्हटले होते. {लिंक विसरलो चुभुद्याघ्या}. म्हणजे अमेरिकन पोलिस इतर कोणत्याही देशातील न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करत नाही का?
माझ्या मते, हे प्रकरण दोन्ही बाजुने (विशेषत: भारत सरकारकडुन) अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळले आहे. त्यात बाईंचा 'आदर्श' प्रकरणाशी संबंध जरा संशयास्पद वाटतोय.

<<<एक गोष्ट अजुन कळत नाही आहे, ती म्हणजे यापुर्वीही अश्या घटना घडल्या होत्या, पण केवळ देवयानीच्याच बाबतीत सरकार (आणि सगळेच) एकदम कडक कसे झाले?>>>यातील खरी गोम बहुतेक इथे आहे <<अमेरिकन कोर्टाची सोनिया गांधींना नोटीस http://abpmajha.newsbullet.in/world/59-more/38683-1984-

आणि http://maharashtratimes.indiatimes.com/international/us-court-summons-so...?

>>दुसरं म्हणजे देवयानीने दिल्ली न्यायालयात संगीता रिचर्ड्स विरुद्ध तक्रार केली होती >>
तिचा गुन्हा काय? असे करणे किंवा तिच्या फॅमिलीला अटक करणे हे आर्म ट्विस्टिंग कशासाठी? तुमच्याकडे काम करणारी व्यक्ती नाहिशी झाली तर अमेरीकेत मिसिंग पर्सन रिपोर्ट फाईल करायचा. दिल्लीत तक्रार कशासाठी? संगीता रिचर्ड्स ला भारताबाहेर तक्रार करण्यास दिल्ली कोर्टाने मनाई केलेय ते का?

Pages