अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकसत्ताचा लेख एकांगी वाटला. कॅव्हिटी सर्च व स्ट्रीप सर्चचे काय? मोलकरणीला कमी पगार देण्याशी त्याचा काय संबंध आहे? की हे दोन्ही प्रकार निव्वळ बोगस असून काही जणांनी इतरांची दिशाभूल होण्यासाठी उगाचच उभे केलेले आहेत? आणि भारत सरकारने अमेरिकी दूतावासातील लोकांचे काही अधिकार 'आत्ताच' काढणे ह हास्यास्पद मानणार्‍या अग्रलेख लेखकांचे विधानच हास्यास्पद आहे. सगळे काही व्यवस्थित असताना काही सुविधा इन गूड फेथ / इंटरेस्ट दिल्या जातात, पण ही खोब्रागडेंसारखी प्रकरणे प्रकाशात आल्यावर 'जश्यास तसे' हा न्याय दाखवणे ह्यात हास्यास्पद काय आहे?

एक शंका, मिनीमन वेजेस $४५०० असतांना देवयानीला भारत सरकार अमेरिकेत $४१२० च कसे देते?
----- किमान वेतन $ ४५०० महिना असे नाही आहे. ते देवयानी यान्नी विसा अर्जासाठीच्या वेळी लिहुन दिलेले आश्वासन होते.

साधारणत: १० $/ तास, दिवसाला ८ तास काम, म्हणजे आठवड्याला ४० तासान्चे ४०० $
महिना १६०० $ (ठोबळ आकडा, यात शनी-रवि धरलेला नाही)
आता आठवड्याला ४० तासापेक्षा जास्त काम करावे लागत असल्यास त्या कामासाठी थोडा जास्त पगार (साधारण १.५ पट) द्यावा लागणार...

अग्रलेख पूर्ण वाचला का? शेवटचा परिच्छेद : " राहता राहिला मुद्दा खोब्रागडेबाईंना मिळालेल्या वागणुकीचा. किंबहुना तोच मुद्दा आहे आणि हे सर्वानाच मान्य आहे. या कथित गुन्ह्याप्रकरणी देहचाचणीची गरज होती का, एवढाच यातील तार्किक आक्षेप आहे"

कालपासून वाचतेय इथे.

लोकसत्तातल्या लेखातला एक न एक शब्द आवडला आणि पटलाच.

राहता राहिला मुद्दा खोब्रागडेबाईंना मिळालेल्या वागणुकीचा. किंबहुना तोच मुद्दा आहे आणि हे सर्वानाच मान्य आहे. या कथित गुन्ह्याप्रकरणी देहचाचणीची गरज होती का, एवढाच यातील तार्किक आक्षेप आहे"<<<

एवढाच?

देवयानी खोब्रागडे ह्या उच्चपदस्थ महिला अधिकार्‍याची देहचाचणी का व्हावी हा आक्षेप 'एवढासाच' आहे लोकसत्तासाठी? आणि 'हम गे है' असे जाहीर करून येथे समलिंगी संबंधंची लक्झरी (तूर्त लक्झरीच म्हणावे लागेल) उपभोगणार्‍यांना वठणीवर आणायचा प्रयत्न हास्यास्पद? आणि हा लेख आणि त्यातील शब्द अन् शब्द लोकांना पटत आहे?

हे म्हणजे उद्या त्या देवयानींना अमेरिकेने फासावर वगैरे लटकवले तरी हे महाभाग म्हणणार की 'अगदी फाशी वगैरे द्यायला नको होते हे मान्य आहे, पण चूक तिचीच आहे'!!!!!!

अमेरिकन दुतावासाला गरज नसलेलेही संरक्षण दिले होते, हे त्यावरुन कळते. आवश्यक असलेले संरक्षण काढलेले नाही, त्यामुळे या नसलेल्या संरक्षणाला काढुन उगाच "आम्ही कडक कारवाई करतोय" असा पवित्रा घेणे, केवळ स्टंटबाजी वाटतेय.

जर ताशी $१० नुसार (अंदाजे महिन्याला २० दिवस नुसार) ~ १६००$ वेतन होते तर ४५००$ चा आकडा कुठुन आला देव जाणे. असो. पण बातमीत म्हटल्यानुसार केवळ ५००~६००$ (१/३ * किमान वेतन) च वेतन दिल्या गेले, त्याबद्दल भारत सरकारचे काहीच म्हणणे नाही का ?

मग बेफिकीर, देवयानीने संगीताविरुद्ध तक्रार करतांना ठरलेल्या वेतनापेक्षा जास्त वेतन मागुन ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार का केली? म्हणजे ठरलेले वेतनही तिला मिळत नसावे.
चुक देवयानीची नाही, असं कसं म्हणता येईल?
दुसरं म्हणजे संगीता गायब असताना तिच्या नवर्‍याला/ मुलाला अटक करण्याचे कारण काय? आणि आता ते अमेरिकेत गेले ते कसे? त्यांना विसा कसा मिळाला?
हे प्रकरण दिसते तितके सोपे नाही. अधिक खोलात गेलं तर बरच काही बाहेर निघेल असं दिसतय. म्हणुन बहुदा देवयानींना लगेच युएनकडे पाठवले असावे, किमान पुन्हा अटक होवू नये म्हणुन.

< वठणीवर आणायचा प्रयत्न हास्यास्पद? > कसला प्रयत्न? कसा करणार? त्यासाठी त्या कलमात म्हटलेली कृत्ये करताना पकडावे लागेल. नुसते 'हम गे है' असे म्हणणे (भारतात प्रवेश करताना असे कुठे जाहीर करावे लागते का याची कल्पना नाही.) म्हणजे भारतीय कायद्यानुसार शिक्षेस पात्र होणे का?

आणि उदय, अगदी ३० दिवस* ८ तास* १० $ जरी धरले तरी ते २४००$च होतात्, मग $४५०० चा काँट्रॅट ? गणित कुठेतरी चुकतय का?

विजय, दोन भिन्न मुद्दे एकत्र आणणे अयोग्य आहे असे माझे मतः

१. प्रकरण जसे आहे तसेच समोर आले असेल तर देवयानींनी केलेल्या कोणत्याही चुकीसाठी अशी अपमानास्पद वागणूक समर्थनीय नाही व त्याचा संताप येणे गैर नाही.

२. प्रकरण दिसते तसे नसेल तर येथील कोणताही प्रतिसाददाता, कोणतीही लिंक व कोणताही लेख त्यावर काही लिहिण्यास पात्र नाही.

एक काहीतरी बोला, हे प्रकरण दिसते तितके सरळ नाही असे म्हणणे आहे का? मग लोकसत्ताचा अग्रलेख पटण्याचे कारणच काय कोणालाही?

विजय - नानी ४० तासच काम करणार असेल असे वाटत नाही, बहुधा त्याना २४ तास दिमतीला बान्धलेले असते. घरातच एक छोटी जागा रहायला दिली जाते आणि २४ तास सेवेचा आनन्द उपभोगता येतो...

४५०० $ कुठुन आले... हा आकडा किमान वेतना पेक्षा बराच चान्गला दिसतो. म्हणजे येणारी व्यक्ती अर्थिक दृष्टिने कुणावरच विसम्बुन रहात नाही. विसा मिळण्यासाठी वेतन आणि वैद्यकीय विमा अशा दोन महत्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. विसा मिळणे सुलभ व्हावे म्हणुन त्यान्नी ४५०० $ आकडा लिहीलेला असेल. देवयानी यानी आकडा लिहीला आणि तो मान्य झाला असे नक्कीच झाले नसावे. पगार देण्याची एपत आहे अथवा नाही याची पडताळणी कागदी पुराव्यानी सिद्ध केले असेल (असे मला वाटते).

प्रीत भरारा चं स्टेटमेंट वाचलं. त्यावरुन मिडियाने बराच गोंधळ घालल्याचे दिसतय. असो.
बेफी, लोकसत्तेचा अग्रलेख पटण्याचं एक कारण हे, की आपण (म्हणजे मिडिया/सरकार) देवयानी दोषी नाहीच, असं गृहित धरल्यासारखच लिहितोय. अग्रलेखातुन दुसरीही बाजू पुढे आली आहे, त्यामुळे पटला.
पण हे प्रकरण जितकं आपल्यासमोर आलय (किंवा मिडियातुन आणल्या जातय) तितकं सोपं नसावं असं मला वाटते. अर्थात खरं खोटं काय ते लौकरच कळेल.
या प्रकरणाबद्दल अधिक उत्सुकता इतकीच की भारत सरकार "सरकारी नोकर" आणि परदेशातील सामान्य भारतीय यांना कश्याप्रकारे मदत (?) करते. सुनिल जेम्सबद्दल (जेलमधे असुनही) काय झालं हे दिसतच आहे. Sad

बाकी प्रीत भराराचा मागचा रेकॉर्ड बघता पुरावे असल्याशिवाय हा माणुस काही करणार नाही असं दिसतय.

when she was brought into the U.S. Marshals' custody, but this is standard practice for every defendant, rich or poor, American or not, in order to make sure that no prisoner keeps anything on his person that could harm anyone, including himself. This is in the interests of everyone's safety.
>>> देहचाचणीवरुन जो काही गदारोळ उठवलाय त्याचं अतिशय लॉजिकल उत्तर आहे हे.
तुरुंगात ठेवणार असतील तर तिच्याकडे शस्त्र किंवा इतर काही हानीकारक वस्तू नाही ना हे पाहण्यासाठी देहचाचणी केली तर त्यात आक्षेपार्ह काय आहे ? ( असण्याची शक्यता नसली तरी ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे आणि सगळ्याच कैद्यांच्या बाबतीत पाळली पाहिजे हे न पटण्याचे काही कारण दिसत नाही. ) त्यात उच्चपदस्थ असण्याचा किंवा तिचा गुन्हा छोटा आहे की मोठा ह्याचा काय संबंध ?

देहचाचणी म्हणजे बलात्कार असल्याच्या थाटात मिडिया कव्हरेज चाललंय आणि इथल्या काही पोस्टसही !

when she was brought into the U.S. Marshals' custody, but this is standard practice for every defendant, rich or poor, American or not, in order to make sure that no prisoner keeps anything on his person that could harm anyone, including himself. This is in the interests of everyone's safety.
>>> देहचाचणीवरुन जो काही गदारोळ उठवलाय त्याचं अतिशय लॉजिकल उत्तर आहे हे.
तुरुंगात ठेवणार असतील तर तिच्याकडे शस्त्र किंवा इतर काही हानीकारक वस्तू नाही ना हे पाहण्यासाठी देहचाचणी केली तर त्यात आक्षेपार्ह काय आहे ? ( असण्याची शक्यता नसली तरी ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे आणि सगळ्याच कैद्यांच्या बाबतीत पाळली पाहिजे हे न पटण्याचे काही कारण दिसत नाही. ) त्यात उच्चपदस्थ असण्याचा किंवा तिचा गुन्हा छोटा आहे की मोठा ह्याचा काय संबंध ?

देहचाचणी म्हणजे बलात्कार असल्याच्या थाटात मिडिया कव्हरेज चाललंय आणि इथल्या काही पोस्टसही !
<<
अगो ++११११
स्ट्रिप चेकचं हेच रिझन कालच्या स्वातीने दिलेल्या सी एन एन लिंक मधेही सांगितलय कि ही स्टँडर्ड प्रोसिजर इतरांच्या सेफ्टी साठीही आहे !
पण लुक्स लाइक मिडीयाला फक्त याच न्युज ला चुकीच्या पध्दतीने एन्कॅश करण्यात रस आहे !
बाकी सी एन ए. न्युज वर देशी प्रोटेस्ट करणार्या दिलीच्या क्राउड च्या हतात ' रिस्पेक्ट वुमन' टाइप पोस्टर्स दिसली .. ते पाहून त्या घोळक्यातले किती स्त्रीयांना रिस्पेक्ट देणारे खरच किती असतील हा विचार आलाच मनात !

देहचाचणी म्हणजे बलात्कार असल्याच्या थाटात मिडिया कव्हरेज चाललंय आणि इथल्या काही पोस्टसही !
>>>>>>>.
खरचच....आपण अगदी मॉल मध्ये जाताना... मुव्ही थिएटर ला जाताना पण पुर्ण कपड्यांची तपासणी होते... मग आपण काय खिशात कपडे घेउन आत जाउन विकणार असतो की बंदुका लपवुन घेउन आलेलो असतो... नहिच .. पण प्रोसिजर आहे म्हणुन सामोरे जातोच ना..

मोलकरणीचे वेतन ते थेट देहचाचणी आणि अंमली पदार्थ बाळगणार्‍यांसहित कारावास ही काहीच्या काही रेंज असून ती तेथील स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे असे म्हणणे कल्पनातीत आहे असे मनात येत आहे. असे मनात येण्यावर येथील कायदे, त्यांची कठोरता, त्यांची अंमलबजावणी व एकुणच न्यायव्यवस्था या सर्वांचा प्रभाव असू शकतो.

मॉल, चित्रपट गृह व गुन्हेगार म्हणून बेड्या ठोकल्यानंतर होणार्‍या देहचाचणीत काही फरक असतो की नसतो? की चित्रपटगृहात जाताना स्ट्रीप सर्च, कॅव्हिटी सर्च वगैरे प्रकार होतात? विमानतळावर केला जाणारा सिक्युरिटी चेक आणि देवयांनी खोब्रागडेंची तपासणी अश्या प्रकारची तुलना झाली ही!

<मोलकरणीचे वेतन ते थेट देहचाचणी आणि अंमली पदार्थ बाळगणार्‍यांसहित कारावास ही काहीच्या काही रेंज असून ती तेथील स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे असे म्हणणे कल्पनातीत आहे >
सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असू शकते. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलामांना तपासणीसाठी जोडे उतरवावे लागले होते. भारताच्या राजदूत मीरा शंकर यांचीही शारीर तपासणी झाली होती.
नियमांची काटेकोर अंमलबजावणी हे भारतात कल्पनातीत असले तरी सगळ्याच देशांत तसे नसते.

< असे मनात येण्यावर येथील कायदे, त्यांची कठोरता, त्यांची अंमलबजावणी व एकुणच न्यायव्यवस्था या सर्वांचा प्रभाव असू शकतो.> हे कळलेच आहे. प्रश्न मिटला.

पोलिसांच्या ताब्यात असेपर्यंत कोणीही इतराला/ स्वतःला इजा करु नये म्हणुन ही standard procedure आहे. ती भारतात (अशीच्या अशी) नाही म्हणुन अनावश्यक/ अति वाटू शक्ते, पण अमेरिकेच्या दृष्टिने ती योग्य असेल.
आपण (मी/मिडिया) उगाच विरोध किंवा विपर्यास करतोय की काय असं वाटतय. Sad

आणि देवयांनी खोब्रागडेंची तपासणी अश्या प्रकारची तुलना झाली ही!
>>>>>>>>
तुलना नाही छोटे उदाहरण होते.. हे प्रकरण उदाहरणाच्या मानाने खुपच मोठ आहे... हे मान्य
पण मॉल्/चित्रपट गॄह इथला तपास ही काहींना अपमानास्पद वाटतो ... मनोवृत्तीचा फरक ..

एअर पोर्ट सिक्योरिटीत फुल बॉडी स्कॅनिंग पण काहींना अपमानास्पद वाटते पण यु एस. लॉज प्रमाणे ते सुरक्षेसाठी स्ट्रिक्ट आहे , प्रेग्नंट महिलांना सवलत देतात फक्त .

अरे रे रे......भारत सरकार चे चुकलेच.. उगाच इतके काही केले... देवयानी बरोबर जे काही केले ते बरोबरच होते .. असेच घडायला हवे होते.. उगाच नाक खुपसले...
नाही खुपसले असते तर इथल्या प्रतिक्रिया वाचण्यास मज्जा आली असती..

Pages