अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो,

>> जिनेव्हा कन्व्हेन्शनबद्दलची अतिशहाणा यांची पोस्ट इग्नोर मारण्यात आलेली दिसते आहे

अमेरिका या संघटनेची स्वीकृत सदस्य आहे का ते पहायचं राहून गेलं होतं. ती सदस्य आहे असं दिसतं. मात्र तरीही दूतावास संहितेच्या (Vienna convention on Consular relations) कलम ४७ अन्वये डॉ. देवयानी यांना संरक्षण का मिळालं नाही हा प्रश्न आहे.

कदाचित असंही असू शकेल की डॉ. देवयानींनी संगीताला चुकीच्या व्हिसावर आणलं. पण असं का केलं हेही एक कोडंच आहे मग.

आ.न.,
-गा.पै.

मला समजलेल्या एका बातमीनुसार हे प्रकरण पूर्णपणे वेगळेच आहे व अतिशय गंभीर असून त्याची शहानिशा गुप्तपणे केली जात आहे.

लोकसत्ताचा अग्रलेख आवडला.
गा. पै. कुठल्या लेवलच्या व्यक्तीला कुठल्याप्रकारचे संरक्षण याचे संकेत्/नियम आहेत. आपण काय कॅटेगिरीत आणि किती सुरक्षित आहोत हे या अधीकर्‍यांनी आधीच जाणून घ्यायला हवे होते. सद्य
परीस्थीतीत जी घाईघाईने बदली केली ती योग्य संरक्षण मिळवण्या साठीच.
भारत सरकारने अ‍ॅलर्ट मिळाल्यावर चुकीची पावले उचलली, देवयानी बाईंना प्रोटेक्ट करण्यासाठी योग्य ती कारवाई केली नाही म्हणून ही वेळ आली. आता स्वतःचा नाकर्तेपणा झाकायला स्ट्रीप सर्च वगैरे स्टॅडर्ड प्रोसिजर्सना भडक रंग देऊन लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यावरुन उडवणे सुरु आहे. बाईंना जे सोसावे लागले त्याचे कारण अमेरीका नसून बाई स्वतः आणि जोडीला त्यांना योग्य संरक्षण न देणारे भारतीय सरकार आहे. अमेरीकन अधीकार्‍याच्या बाबत काही विपरीत झाले तर इथे हिअरिंग होऊन झाल्या प्रकरणाला किती लोकांच्या नाकर्तेपणामुळे कसा हातभार लागला याचे जाहीर वाभाडे निघतात. त्यात कुणाचीही गय केली जात नाही. दोन भारतीय अधीकार्‍यांच्या बाबतीत आधी अशाच प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण झाले होते त्यावरुन काहीही धडा न घेता परत चूक करुन प्रकरण ओढवून घेतले. अगदी हे काहीतरी वेगळे प्रकरण आहे असे गृहित धरले तरीही फॉरीन सर्विसेस सारख्या महत्वाच्या खात्यातील मंडळींनी स्वतःला असे दुबळे ठेवणेच अतिशय चूकीचे आहे. शरमेची बाब स्ट्रीप सर्च नसून भारताचे हे दुबळेपण आहे.
ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विक्टिम्सच्या कुटुंबीयाना संरक्षण देणे हे अतिशय कॉमन आहे त्यामुळे मेडच्या नवर्‍याला आणि मुलाला अमेरीकेने विसा दिला यात नवल वाटण्यासारके काही नाही. पीडित व्यक्तीच्या मूळ देशातील लोकांनी तिच्या कुटुंबीयांना त्रास देऊन पीडित व्यक्तीला केस मागे घेण्यासाठी दबाव आणू नये म्हणून हे केले जाते. मेक्सिकन रेस्टॉरंटमधे , फार्म्सवर कुणी असे पीडित असेल तरीही हेच केले जाते.

हा एक इंटरेस्टिंग पॉइंट - सी एन एन वर एकाने लिहिलेला:
(हा व्यु पॉइंट मिस झाला का पहायचा? ..कदाचित त्या मोलकरणीला वाटले असावे कि डॉ. देवयानी काहीतरी करुन हे मिटवतील..तिला हा एवढा हल्लागुल्ला होइल असे वाटले नसेल?. कोणालाही दोषी/निर्दोष समजण्याआधी सगळे पर्याय पडताळुन पहायला हवेत हे नक्की)

The point about exploitation and coercion is yet to be proven in all fairness. On the other hand, there is a motivation on the maid's part to be in the US and not go back to India after her contract. She seems to have been going for the "trafficked person status" to help her obtain the rights to bring her family in with her as well.

There is also another point raised by the diplomat's lawyer that there is documentation that proves that part of the maid's salary was wired to her family back in India as per the maid's wishes. So, if it turns out that the diplomat indeed paid her what was due but that the actual amount paid to her in hand was less - the total being the cash paid to her plus to her family back in India - then the whole case doesn't stand up, does it?

---------------------------------------
Defrauding the US Govt? Did you consider whether the maid defrauded the US Govt? Some facts that seem to have eluded you are the following:

1) From what I've read, apparently the maid tried to extort and blackmail the diplomat after going missing to which the diplomat filed a case, but the NYPD did nothing.
2) Seems like the maid wanted to get "trafficked person" status which she seems to have gotten. The US flew her and her family out of India on ASAP basis within 2 days before the diplomat was arrested. So, if she was seeking to come to the US and be here, she's got what she was looking for. So, who got conned here?
3) An Indian court has a non-bailable warrant for the maid, so why was she flown with such urgency before the due law in India could sift fact from fiction? Did she claim her life was under threat to get the US to flow her to the States?
4) Seems like the maid requested that a majority portion of her income be wired to her family back in India. So, if it turns out that she was indeed paid the minimum wage, but that the majority was paid to her family as per her wishes, who would be embarrassed by that fact?

सोसावं लागलं वगैरे म्हणून देवयानीबाईंना अगदीच 'बिचारं, केविलवाणं' दाखवायची अजिबातच गरज नाही. त्यांनी जे केलं त्याला त्याच जबाबदार आहेत. ह्यापुढे कॉन्सुलेटची लोकं काही शिकतील अशी आशा.

>>भारत सरकारने अ‍ॅलर्ट मिळाल्यावर चुकीची पावले उचलली, देवयानी बाईंना प्रोटेक्ट करण्यासाठी योग्य ती कारवाई केली नाही म्हणून ही वेळ आली. आता स्वतःचा नाकर्तेपणा झाकायला स्ट्रीप सर्च वगैरे स्टॅडर्ड प्रोसिजर्सना भडक रंग देऊन लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यावरुन उडवणे सुरु आहे.>> अतिशय सहमत. 'हम करे सो कायदा' टाईप मुजोर वर्तन भारतात चालत असेल, बाहेरच्या देशात नाही हे या निमित्ताने कळलं तर उत्तम.

मयेकर, अग्रलेखाच्या लिंकबद्दल धन्यवाद. अतिशय पटला.

हे सगळं अमेरिकेचंच कारस्थान आहे...दुसरं काही नाही...अमेरिकन व्हिसा सहजासहजी कधीच दिला जात नाही असे आम्ही नेहमीच ऐकत आलोय मग त्या भारतीय नागरिक बाईला न्याय देण्याचे नाटक करून तिच्या नवर्‍याला-मुलाला ताबडतोब व्हिसा देऊन कसे काय आणि का म्हणून अमेरिकेत आणले गेले? त्या बाईवर भारतीय कोर्टात खटला चालू असतांना आणि तिचा पासपोर्ट भारत सरकारने रद्द केलेला असतांना अमेरिकेने अतिशय शहाजोगपणे तिला आसरा देऊन उलट भारतीय न्यायव्यवस्थेचाही अपमान केलाय...भारताच्या अंतर्गत कारभारात ही सरळ सरळ ढवळाढवळ आहे...आणि हे सगळं करण्याचं कारण म्हणजे निश्चितच ती बाई आणि तिचे कुटुंब सीआयएचे एजंट असणार ...कुठे तरी ते उघड होतंय अशी शंका येताच अमेरिकेने असा कांगावा केला असण्याची दाट शक्यता आहे.

अमेरिकेइतका मुजोर देश दुसरा कोणता नसेल...नेहमी ते करतील तेच बरोबर आणि न्याय्य असतं असं नेहमी उच्चरवाने त्यांनी कितीही सांगितलं तरी जागतिक राजकारणात त्यांचा खोटारडेपणा कैक वेळेला उघड झालाय...पण ज्याला मनाचीच लाज नाही त्याला जनाची लाज कशी वाटेल?

आणि हे सगळं करण्याचं कारण म्हणजे निश्चितच ती बाई आणि तिचे कुटुंब सीआयएचे एजंट असणार ...कुठे तरी ते उघड होतंय अशी शंका येताच अमेरिकेने असा कांगावा केला असण्याची दाट शक्यता आहे.>>>>>>
मोलकरीण?? सी आय ए ची एजंट????

मला पडलेले काही प्रश्न:
१. संगीता रिचर्डस जूनपासुन आत्तापर्यंत कुठे होती?
२. भारतातून घरकामासाठी आलेल्या बाईमधे, कुठलाही लागाबांधा नसताना निघून जाण्याचे गट्स असू शकतात? याबाबतीत मला आठवतात माझे भारतातून आलेले पाव्हणे. साधं चालायला जायचं तर रस्त्यांची नावं, फोन इ. माहिती जवळ ठेवण्यासंबंधी तेच नाही तर मी सुद्धा किती काळजी करायचे.
३.हे प्रकरण घडण्याआधी २ दिवस तिच्या नातेवाईकांना अमेरिकेत का आणलं ?
४. एरव्ही व्हिसाच्या बाबतीत एवढ्या कटकटी करणारं अमेरिकन सरकार अशा लोकांना बिनबोभाट व्हिसा कसं देतं?

गुमास्तेंनी दिलेली लिंक वाचून या प्रकरणात बरंच काहीतरी फिशी आहे असं वाटतं.

अहो, चार घरात काम करणार्‍या मोलकरणीकडे त्या त्या कुटुंबियांची जेवढी इत्यंभूत माहिती असते तेवढी ती शेजारणीलाही नसेल...हे कुणालाही पटायला काही हरकत नसावी...ही मोलकरीण तर चांगली सुशिक्षित आहे आणि वर एका दुव्यात तिच्या अख्ख्या खानदानाचा इतिहास आहे...तोही वाचा म्हणजे कळेल की ती कुणी अनपढ गँवार बाई नाहीये....
दुसरं असं की हेरगिरीसाठी माणसं जेव्हा पेरली जातात तेव्हा ती अशाच वेगवेगळ्या भूमिकेत पेरली जातात...ज्यांच्याबद्दल कुणालाच सहसा संशय येणार नाही...त्यांच्याकडे एक सामान्य नोकर म्हणूनच त्यांचा मालक पाहात असतो.
दुसरी व्यक्ती म्हणजे ड्रायव्हर...ह्या व्यक्तीलाही त्याच्या मालकांचे सगळे आत-बाहेरचे धंदे नीट ठाऊक असतात...
अजूनही बर्‍याच भूमिकांमधून हेर पेरले जातात ज्याची सर्वसामान्यांना कल्पनाही येत नसते...
असो. तो विषय खूप मोठा आहे...उत्सुकता असेल तर गुगलून पाहा..हवी तेवढी माहिती मिळेल.

मला तरी अशी शंका आहे की त्या मोलकरणीच्या स्किनखाली एखादी चिप लावली असणार अमेरिकन सरकारने. आतापर्यंत भारताची सगळी टॉप सिक्रेट्स त्या चिपमध्ये जाऊन बसली असणार. आता त्या चिपचं काही काम नाही. म्हणून संगीताला संरक्षण देऊन चिप काढण्याचं काम सुरू आहे. संगीताचा नवरा दुसरा तिसरा कुणी नसून एजंट ००७ आहे. त्या चिपमधला एनक्रिप्टेड डेटा फक्त त्याच्याचकडे असणार्‍या खास लाल रंगाच्या चष्म्याने वाचता येतो म्हणून त्याला घाईने इथे बोलावण्यात आलं आहे. तो चष्मा सुद्धा इतका हायटेक आहे की तो घातलेला फक्त एजंट ००७ आणि सीआयएचे काही खास लोकं यांनाच दिसतो. मॅन धिस अमेरिका इज अप टु नो गुड!

शुगोल,
>> संगीता रिचर्डस जूनपासुन आत्तापर्यंत कुठे होती?>>
सरकारी संरक्षणात असणार हे उघड आहे.
भारतातून घरकामासाठी आलेल्या बाईमधे, कुठलाही लागाबांधा नसताना निघून जाण्याचे गट्स असू शकतात?
>>आमच्या स्टेट्मधल्या केसमधे बाई गरीब, पंजाबमधल्या चोट्या गावातली, तिला घरकामासाठी आणून कोंडून ठेवलेले तरी ती एक दिवस पळून गेली अणि तिला न्याय मिळाला. या केसमधे तर ही बाई फॉरीन सर्विसमधल्या बाईसाठी काम करत होती म्हणजे अडाणी नक्कीच नाही. तीला सगळीकडे ग्रोसरी इतर कामासाठी फिरायची सवय असणारच ना.
.>>हे प्रकरण घडण्याआधी २ दिवस तिच्या नातेवाईकांना अमेरिकेत का आणलं ?
४. एरव्ही व्हिसाच्या बाबतीत एवढ्या कटकटी करणारं अमेरिकन सरकार अशा लोकांना बिनबोभाट व्हिसा कसं देतं?
>>ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विक्टिम्सच्या कुटुंबीयाना संरक्षण देणे हे अतिशय कॉमन आहे त्यामुळे मेडच्या नवर्‍याला आणि मुलाला अमेरीकेने विसा दिला यात नवल वाटण्यासारके काही नाही. पीडित व्यक्तीच्या मूळ देशातील लोकांनी तिच्या कुटुंबीयांना त्रास देऊन पीडित व्यक्तीला केस मागे घेण्यासाठी दबाव आणू नये म्हणून हे केले जाते. मेक्सिकन रेस्टॉरंटमधे , फार्म्सवर कुणी असे पीडित असेल तरीही हेच केले जाते.

समजून चालू हे हेरगीरी प्रकरण आहे तरी त्यात भारताचेच दुबळेपण दिसून येते ना. त्या बाईला कामावर ठेवताना तिची ही कौटुंबीक माहीती का नाही लक्षात घेतली?अजून किती मुर्ख चूका ही मंडळी करत असतील कुणास ठाऊक.

मोलकरीण?? सी आय ए ची एजंट????

छे , छ, ती कशी असु शकेल एजंट,

तीचा नवरा मोझांबिक अँबसी मध्ये ड्राईव्हर आहे, ह्या मोलकरणीचे सासरे दिल्लीतील अमेरीकन
अँबसी मध्ये काम करतात. सासू अमेरिकन रा़जदुताच्या घरी काम करत होती.

ह्या लफड्याच्या फ क्त दोन दिवस आधी संगीता मॅडमचा नवरा आणि दोन मुले अमेरीकेला एअर ईंडीयाच्या विमानाने पोहोचली सुद्धा. संगीताच्या नवर्याला टी-व्हीसा दिलेला आहे.

भारताने ह्या अमेरीकेची पाळ मूळ उकरून काढावीच. मित्र म्हणून पाठीत खंजर खुपसणारे लोक आहेत हे.

स्नोडेनला बोलावून त्याच्या करवी काही माहिती मिळते का ते पहावे लागेल.

प्रमोद देव यांच्या शंकेवर सिंडीने दिलेलं उत्तर जोडलं तर एक भारी हिंदी पिक्चर निघू शकेल. देवयानीच्या भूमिकेत फ्रिडा पिंटो (साभार- अगो) शोभेल.

ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विक्टिम्सच्या कुटुंबीयाना संरक्षण देणे हे अतिशय कॉमन आहे त्यामुळे मेडच्या नवर्‍याला आणि मुलाला अमेरीकेने विसा दिला यात नवल वाटण्यासारके काही नाही.

ते एकदा अमेरीकेत पोहोचले की मग लगेच देवयानीला बेड्या ठोकायला मोकळे ?

स्वाती२, तू म्हणतेस तसं असेल तर फॅमीलीला जून मधेच का नाही आणलं? शिवाय अमेरिकन सरकार व्हेस्टेड इंटरेस्ट असल्याशिवाय कुणाला सहा-सहा महिने आसरा देईल हे शक्य वाटत नाही. असो.

>>मित्र म्हणून पाठीत खंजर खुपसणारे लोक आहेत हे>>
च्च! आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणीही कुणाचे कायमचे शत्रू नाही आणि मित्रही नाही.

आसरा न द्यायला काय झालंय. असायलम केस मधे व्हिसा मिळणे काही आश्चर्यकारक नाही. तसेही लेकी सुनांच्या बाळंतपणासाठी आलेल्या इतक्या हजरो आई-बाबा, साबा साबू कंपनीला मल्टिपल एन्ट्रीचे व्हिसे दिलेले असतात की.
सिंडे Lol
एकूणात अशी हेरगिरी वगैरे हाय लेव्हल केस असेलच तर आपल्याला खरं काय ते कळणे शक्य नाही. आतापर्यन्त जे समोर आलेय त्यावर - लोकसत्ताचा लेख पटण्यासारखाच आहे. सकाळ ने पण संयमित कव्हरेज दिले असे वाटले. सगळ्यात भडक आणी अतिरंजित म्हणजे महाराष्टृ टाइम्स !! अत्यंत चीप. बर्‍याच राजकारण्यांच्या रिअ‍ॅक्शन्स पण तसल्याच. अत्यन्त उथळ.

शुगोल, इथे ३-४ डिपार्टमेंट्स एकत्र सखोल चौकशी करुन मग सप्टेमधे भारतीय अधिकार्‍यांना अ‍ॅलर्ट करुन हालचाल करायला पुरेसा अवधी देऊन मगच सेफ पॅसेज दिला गेला. तिच्या कुटुंबीयांना भारतात अटक केल्यावर हे झाले.
इथे वेठबिगारीत अडकलेल्या मजूरलाही असेच संरक्षण मिळते. रीहॅब साठी सेवाभावी संस्था काम करतात. हे सगळे फार कॉमन आहे. मध्यंतरी पुर्व युरोपातील मुलींची सुटका केली तेव्हाही असेच सर्व प्रकारचे संरक्षण दिले गेले.

>>ते एकदा अमेरीकेत पोहोचले की मग लगेच देवयानीला बेड्या ठोकायला मोकळे ?>>
सप्टे. ते डिसें. वेळ भारत सरकार ने फुकट का घालवला याचा जाब खरे तर देशभक्तांनी भारत सरकारला विचारावा. का नाही पूर्ण इम्युनिटी असलेल्या ठिकाणी वेळेतच बदली केली?

उत्तरोत्तर हा धागा अधिकाधिक मनोरंजक करत चालल्याबद्दल सगळ्या भारत आणि अमेरिकाप्रेमी जनतेचे खूप खूप आभार.

स्वाती२, मस्त पोस्ट्स आणि अनुमोदन. Happy

लोकसत्तेचा अग्रलेख वाचला, काल इथे काथ्याकूट केलेलेच मुद्दे त्यात आलेले दिसतायत. परखड अग्रलेखासाठी लोकसत्तेचं अभिनंदन.

सिंडे Lol

Pages