अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस, हेही बघा :

>>
आम्हीदेखिल कायद्यावर बोट ठेवून कारवाई करू शकतो हे परफेक्ट आहे.
आवडले.
<<

>> आय डिड नॉट ड्रॉ द फर्स्ट ब्लड मॅम
येस, यू डिड. Proud

हं.
त्यातल्या आम्ही मधे भारत सरकार विरुद्ध अमेरिका अभिप्रेत होतं इबा.
इब्लिस विरूद्ध कुणि व्यक्ति असे नव्हे.
पण असो.
सपशेल माघार अन आता हितं लिवणं बंद.
(वर्ल्या पोष्टीत येडीट आहे. त्ये वाचून गोड मानून घ्या)
Proud

सीमा मला नोकरांवर अति अवलंबून असणं हा भारतीय मानसिकतेचा भाग वाटतो.>>> अगदी. Happy

पण त्यांच्याशिवाय इतर देशांतली वर्किंग पेरेन्ट्सची कुटुंबं चालतातच ना?>>>>
हो. चालतात ना गं. इथले मायबोलीकर बघ :). मोस्टली दोघ नोकरी करणारे आहेत. तिच्यापेक्षा कितीतरी जास्त पगार आहे. हार्डली कुणाकडे नॅनी असेल. पण अगं तो कंपलीट वेगळा मुद्दा आहे. मानसिकता लॉ मुळ बदलता आली असते तर मग काय होते.

>> त्यातल्या आम्ही मधे भारत सरकार विरुद्ध अमेरिका अभिप्रेत होतं इबा.
मग माझ्या पोस्टमधे 'इब्लिसांच्या देवयानीबाई' असं म्हटलं होतं की काय! Proud

असो, विषय गंभीर आहे, इथे मस्करी नको. Happy

या सगळ्या गदारोळात एक ठळक बाब विचारात घेतली पाहिजे, ती म्हणजे अमेरिकेत कायद्यासमोर सगळे गुन्हेगार सारखे. अन्लाइक भारत, इथे व्हिआयपी, नेते, उच्चपदस्थ वगैरे लोकांना सुध्दा बेड्या ठोकल्या जातात, त्यात नविन किंवा जगावेगळं काहि नाहि. पण भारतात तसं काहि होत नाहि; म्हणुन हा सगळा सामान्यांपासुन नेतेमंडळींपर्यंतचा आउट्क्राय समजु शकतो. >> +१

सकाळी मायावतीचं खोब्रागडे शेड्युल्ड कास्ट शी बिलाँग करते म्हणुन आम्ही तिचा मुद्दा उचलुन धरतोय अश्या टाईपचं भाषण ऐकलं. साले @#$%^ जातपात सोडुन काही बोलुच शकत नाही का हे लोक? जग कुठे चाललंय? अमेरीकेने ती शेड्युल्ड कास्ट शी बिलाँग करते म्हणुन अटक केली का? शी !!!

आयबीएन लोकमतवर आजचा सवाल "अमेरिकेने ह्या प्रकारात माफी मागावी का?" असा आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल ते बघु शकतात.

स्वाती_आंबोळे,

>> त्यात अमेरिकन कायद्यानुसार अ‍ॅक्शन घेतली जाईल असा स्पष्ट इशारा दिला गेला होता. त्याच वेळी
>> त्याची दखल का घेतली गेली नाही?

नक्की काय इशारा होता आणि कशा प्रकारे दखल घ्यायला हवी होती यावर अधिक प्रकाश पडायला पाहिजे. कारणकी संगीता रिचर्डस् २३ जूनपासून गायब होती. अमेरिकी अधिकार्‍यांना हे कळवलेही होते.

आ.न.,
-गा.पै.

इशारा काय होता हे त्या बातमीत आहे.
>>
She said the US state department had alerted — in writing — the Indian embassy as early as September this year that there were allegations against the diplomat concerning underpayment of minimum wages and non-compliance, and that action could be imminent under US laws.
<<

फ्रॉडबद्दलचा आरोप चुकीचा असेल तर त्याचे पुरावे पाठवता आले असते. देवयानीबाईंना भारतात तातडीने परत बोलावून घेता आलं असतं.

जून २३ला मेड गायब झाली आणि लगेच ८ जुलैला लॉयरकडे गेली ना? त्यावर भारतीय सरकारने काय केलं? खोब्रागडे बाईंच्या पेपर्सची शहानिशा नाही केली, मेडचाच पासपोर्ट रद्द केला! आणि मेडवर extortion, cheating and conspiracy साठी खटला भरून अरेस्ट वॉरन्ट काढलं. धन्य!

संगीता रिचर्ड्स देवयानीबाई आणि भारतसरकार साठी गायब होती. पण तिने कमी पगाराबद्दल तक्रार केल्यावर अमेरीकेतील कायद्याने तिला संरक्षण मिळाले असणार. अशावेळी सगळी चौकशी होईपर्यंत अमेरीकेच्या दृष्टीने ती विक्टीम होते जरी भारताचा दावा ती अबस्कॉडिंग आहे असा असला तरी.

पण त्यांच्याशिवाय इतर देशांतली वर्किंग पेरेन्ट्सची कुटुंबं चालतातच ना?>>>>
हो. चालतात ना गं. इथले मायबोलीकर बघ स्मित. मोस्टली दोघ नोकरी करणारे आहेत. तिच्यापेक्षा कितीतरी जास्त पगार आहे. हार्डली कुणाकडे नॅनी असेल. पण अगं तो कंपलीट वेगळा मुद्दा आहे. मानसिकता लॉ मुळ बदलता आली असते तर मग काय होते. >>>

देवयानी एक डिप्लोमॅट आहे हे विसरु नका. त्यांना नोकरि करणार्‍यांसारखा ८-५ असा जॉब नसतो.
Cooking with Stella हा movie कोणि बघितलाय का?

http://timesofindia.indiatimes.com/india/Timeline-of-Devyani-Khobragade-...

लिंक मधे तारखेनुसार माहिति आहे.

आमच्या स्टेटमधे एक केस झाली. त्या व्यक्तीच्या आईने भारतातून मेड आणली आणि तिला वाईट वागणूक, पगार न देणे वगैरे केले. त्या बाईने पळून जाऊन तक्रार केली. तिला संरक्षण मिळाले. काही महिन्यापूर्वी केस मधील व्यक्तीला शिक्षा झाली. कामवाल्या बाईला कायमचा आश्रय देण्याची तयारी अमेरीकन सरकारने दाखवली.

स्वाती_आंबोळे,

तुम्ही उधृत केलेल्या बातमीवरून असं वाटतं की इशारा मिळाल्यावर ताबडतोब डॉ. खोब्रागड्यांनी अमेरिका सोडायला हवी होती. निदान निशा देसाई-बिस्वाल (सहायक राज्य-सचिव) यांच्या वक्तव्यांवरून असं सूचित होतं.

अमेरिका सोडण्याचे टोकाचे पाऊल उचलावे लागणे कितपत उचित आहे? निशा देसाई-बिस्वाल यांनी कार्यपद्धतीचा आढावा घेण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे.

आ.न.,
-गा.पै.

गापै, औचित्यभंग झाला होताच. फ्रॉड केला होताच. त्यामुळेच त्या इशार्‍याला त्यांना उत्तर देता आलं नसणार.
भारतात परत गेल्या असत्या तर कार्यपद्धतीचा आढावा घेऊन ती बदलेपर्यंत कदाचित अटक टळली असती.
मेडसाठी बिचारीसाठी तोही मार्ग बंदच करून ठेवला आहे तिथे अरेस्ट वॉरन्ट काढून!

स्वाती_आंबोळे,

१.
>> औचित्यभंग झाला होताच. फ्रॉड केला होताच.

डॉ. खोब्रागड्यांकडून औचित्यभंग झाला आहे. पण त्यांनी फ्रॉड केल्याचं वाटंत नाही.

२.
>> मेडसाठी बिचारीसाठी तोही मार्ग बंदच करून ठेवला आहे तिथे अरेस्ट वॉरन्ट काढून!

संगीता पळून गेली होती. पण तिने अमेरिकी सरकारकडे अत्याचाराची तक्रार दाखल केलेली नाहीये. तिने स्वत:हून परतीचा मार्ग बंद केलाय.

आ.न.,
-गा.पै.

मला असे वाटते की जरी चूक झाली असेल तरी ज्याप्रकारे अटक झाली तशी व्हायला नको होती. हिच्या जागी एखादी ब्रिटीश किंवा तत्सम बाई असती तर तिला गुपचुप तिच्या घरी जाऊन अटक झाली असती.

१.
>> औचित्यभंग झाला होताच. फ्रॉड केला होताच.

डॉ. खोब्रागड्यांकडून औचित्यभंग झाला आहे. पण त्यांनी फ्रॉड केल्याचं वाटंत नाही.
----- फ्रॉड का नाही वाटत?
कागदावर एक साग्नायचे आणि परवडत नाही म्हणुन कमी पगार द्यायचा... ते पण किमान वेतनाच्या १/३ ? याला काय म्हणायचे?
किती $ पगाराचे आश्वासन दिले होते ? आणि प्रत्यक्षात किती $ दिलेत हे प्रशासनाला सहज रित्या कळते...

कमी वेतनावर कामाला ठेवणे आणि ४० तासापेक्षाही (OT overtime वा अन्य मोबदला द्यावाच लागतो) जास्त काम करायला लावणे हा अत्यन्त गन्भीर गुन्हा आहे.
भारतीय माणसाला चालते पण अमेरिका/ कॅनडात असल्या निच मानसिक प्रकाराची घृणा आहे. याचा अर्थ सर्वत्र आलबेल आहे असे अजिबातच नाही...

किमान वेतन मिळणे हा प्रत्येकाचा मुलभुत हक्क आहे... तोही देता येत नसेल तर नोकरीवर ठेवायचा अट्टाहास कशाला करायचा ? भारताची आणि वकिलातीत काम कराणार्‍यान्ची समस्या वेगळीच आहे... पण त्या समस्यान्चा त्या गरिब मेडला कशाला भुर्दण्ड ?

२.
>> मेडसाठी बिचारीसाठी तोही मार्ग बंदच करून ठेवला आहे तिथे अरेस्ट वॉरन्ट काढून!

संगीता पळून गेली होती. पण तिने अमेरिकी सरकारकडे अत्याचाराची तक्रार दाखल केलेली नाहीये. तिने स्वत:हून परतीचा मार्ग बंद केलाय.
----- सर्व राजकीय आणि शक्तीमान अशी IFS लॉबी तिच्या विरुद्ध आहे....

>> पण तिने अमेरिकी सरकारकडे अत्याचाराची तक्रार दाखल केलेली नाहीये.
अहो, ८ जुलैला अटर्नीकडे गेली होती ना? त्यातूनच हे पुढचं सगळं उद्भवलं ना?

भरपूर चर्चा झालीये , स्वातीने लिहिलय बरचह्सं , तरी.

काहीवेळा खरंच अवक व्हायला होतं! दीपांजलींचा वरील प्रतिसाद या पातळीपर्यंत नक्कीच पटला की आजवर जे अमेरिकन 'गे' असल्याचे जाहीर करून येथे वास्तव्य करत होते त्यांना आता निव्वळ देवयानी खोब्रागडे प्रकरणाचा काही अंशी सूड म्हणून कारवाईला सामोरे जावे लागणे अयोग्य आहे

<<<<हे एवढच बरोबर आहे बेफिकिर ,बाकी जे समाजावर उपकार -किव वगैरे लांबच लांब पोस्ट आहे तुमचे त्यातल्या कशाचा काही संबंध नाही माझ्या पोस्टशी.

नंदिनी,
मुद्दा प्रत्येक गे पिसफुल आहे कि नाही हा नाहीच , गुन्हे करणारे गे-स्ट्रेट कोणीही असोत ते गुन्हेगार आहेत!
पण अता मात्रं जे पिसफुल आहेत त्यांनाही कोर्टाने ' गुन्हा' असे शिक्का मोर्तब केल्याने आणि त्याच वेळी हे देवयानेद प्रकरण घडल्याने 'गे रिलेशिप ' असणे या एवढ्या कारणाने टार्गेट केलं जाणार हे चुकीचं वाटतय ( हा कोर्टाचा निर्णयही ही नेमका याच वेळी आलाय दुर्दैवानी .)
बाकी स्वातीने जी सीएनेन ची न्युज दिलीये त्यात देवयानीला शाळे समोर किंवा मुली समोर अरेस्ट केल! नाही हे क्लिअर केलय , शाळे जवळच्या एरीयात अरेस्ट केलं आणि कोर्टात आणे पर्यंत हातकडी नाही घातली असं म्हणलय!
असो,
पूर्ण प्रकरण बाहेर येइ पर्यन्त देवयानीच्या केस बाबत यापेक्षा जास्तं मत देउ शकत नाही , सध्या तरी वाटतय कि high level politics or something else which we are unaware of/ unable to imagine !

संगीता बेपत्ता झाली आणि तिने भारत सरकारच्या दृष्टीने काही गुन्हा केला असे धरून चालले तरी राजनैतीक अधिकार्‍यांनी पगाराची रक्कम एक आणि व्हीसा पेपर्स करताना दुसरीच रक्कम असे करुन स्वतःला अमेरीकन कायद्याच्या कक्षेत दुबळे केले. हे असे वारंवार होणे भारतासाठी हीतावह नाही. आज कामवालीने तक्रार केली उद्या कुणी दुसर्‍या देशाचे हेरखाते तुम्हाला यावरुन अडचणीत आणू शकते. आत्ताही असेकाही घडले असेलही. एवढा खर्च एरवी मंत्र्यांच्या सुरक्षेवर वगैरे करतात तर अधिकार्‍यांना मेडचा खर्च का देत नाहीत?

आमचा एक मरिन मित्र म्हणायचा " अंकल सॅम इज नॉट युर फ्रेंड, अन्टिल यु हॅव नो फ्रेन्डस लेफ्ट"
मला याचा इथे प्रत्यय बरेचदा येतो पण ह्याची सवय नसेल तर हीच वृत्ती दांभिक आणि उद्दाम वाटु शकते.
मला तरी असाच प्रकार इथे झालेला जाणवतो. इथे आतुन संगिताला मदत करण्यावर सरकारवर दबाव असणार तर दुसरीकडुन इतक्या छोट्या व्यक्तिकरता इतका रोष का ओढवुन घ्यावा म्हणुन दबाव.

व्हिएन्ना कराराबाबत

The nanny was employed in India, on Indian wages and was given a visa on her official passport, not an ordinary passport. The Vienna conventions state that consular officials and personal staff are not subject to work permits, labor laws etc. of the host country. The diplomat in question herself earns less than the US minimum wages - she gets paid Indian wages + supplement for living in NYC and perks that help her maintain her lifestyle while living in the US. Similarly, the nanny was paid Indian wages + a supplement for living in NYC + perks (which included all her living expenses taken care of by the Government, over and above her wages). The nanny's Indian wages, taking into account the Purchasing Power Parity multiplier for India, was well above the minimum wages of the US, even though there is no obligation for consular staff to comply with US minimum wage regulations, just as it is not required for US consular staff in other countries to adhere to local labor laws and regulations.

The final point is that there are at least a hundred countries, whose diplomats earn less than US minimum wages, and consequently employ domestic and office staff from their home countries and without being subject to US labor laws. This is the practice around the world, including by the US, which does not adhere to local labor laws for staff employed for the US for their missions abroad.

Here are the quotes from the Vienna convention on Consular relations 1961 that are pertinent to this case

http://legal.un.org/ilc/texts/instruments/english/conventions/9_2_1963.pdf

Article 40: The receiving State shall treat consular officers with due respect and shall take all appropriate steps to prevent any attack on their person, freedom or dignity.

Article 41
Personal inviolability of consular officers
1.Consular officers shall not be liable to arrest or detention pending trial, except in the case of a grave crime and pursuant to a decision by the competent judicial authority.
2.Except in the case specified in paragraph 1 of this article, consular officers shall not be committed to prison or be liable to any other form of restriction on their personal freedom save in execution of a judicial decision of final effect.

[Note that there is no grave crime in this instance - only a misdemeanor offense even if it were proven right, and also note that restriction on personal freedom, i.e. arrest, is only allowed after a judicial decision of final effect.]

Article 47 Exemption from work permits
1.Members of the consular post shall, with respect to services rendered for the sending State, be exempt from any obligations in regard to work permits imposed by the laws and regulations of the receiving State concerning the employment of foreign labour.
2.Members of the private staff of consular officers and of consular employees shall, if they do not carry on any other gainful occupation in the receiving State, be exempt from the obligations referred to in paragraph 1 of this article.

[Note that the Vienna conventions specifically exempt private staff of consular officers from the work permit related laws and regulations of the host country]

खोब्रागडेंवरचे चार्जेस. यात इम्म्यूनिटीबद्दलही सविस्तर लिहिलं आहे.

ह्यूमन ट्रॅफिकिंगबद्दल प्रश्न असणार्‍यांसाठी :
>>
One thing notable about this announcement: “Manhattan U.S. Attorney Bharara thanked the Department of Justice’s Human Trafficking Prosecution Unit for playing an integral role in this investigation, and for providing ongoing support in this prosecution.”
<<

त्यांना अगोदर वॉर्निंग मिळालेली. त्यांनी ती इग्नोअर केली. खरच इथे अशावेळी अजिब्बात सहानुभुती दिली जात नाही. >> ह्यानंतर अर्धी अधिक arguments समाप्त व्हायला हवीत.

हिच्या जागी एखादी ब्रिटीश किंवा तत्सम बाई असती तर तिला गुपचुप तिच्या घरी जाऊन अटक झाली असती. >> IMF director ची गोष्ट आठवतेय का ?

असामी | 18 December, 2013 - 10:18
हिच्या जागी एखादी ब्रिटीश किंवा तत्सम बाई असती तर तिला गुपचुप तिच्या घरी जाऊन अटक झाली असती. >> IMF director ची गोष्ट आठवतेय का ?

>>
हो रे असाम्या तो फ्रेन्च राष्ट्राध्यक्षाच्या स्पर्धेत उमेदवार होता ना. त्याला तर विमानातुनच लॉक्स घालुन काढले होते.

स्वाती_आंबोळे,

तुम्ही दिलेल्या खोब्रागडेंवरचे चार्जेसच्या दुव्यात तिसर्‍या पानावर मार्क स्मिथने (फिर्यादी) एक अमेरिकेच्या एका नियमाचे कलम उधृत केले आहे.

5.a. : Diplomats and consulate officers may obtain A-3 visas for their personal employees, domestic workers, and servants if they meet the requirements set out in in 9 Foreign Affairs Manual ("FAM") 41.22.

(इंग्रजीच्या चुका मुळातून उधृत!)

तर माझ्या माहितीप्रमाणे या प्रकरणात संगीता रिचर्डस् ही खाजगी नोकर नव्हती. हे कलम कितपत लागू पडते याची शंका आहे.

आ.न.,
-गा.पै.

मला काही कळलं नाही तुम्ही काय म्हणता आहात.
ती डोमेस्टिक वर्कर म्हणून A3 व्हीसावर आणली होती, कॉन्ट्रॅक्टवर एक रक्कम नोंदवून प्रत्यक्ष मोबदला निराळा दिला होता, कामाचे तासही कॉन्ट्रॅक्टनुसार पाळले गेले नव्हते. आता खाजगी नोकर नव्हती म्हणजे काय?

अहो गा पै, तुम्ही काल विनाशर्त माघार घेतली होतीत ना? मग आता? डोळा मारा
----- त्यान्नी काल नम्र माघार घेतली होती.... आज नवीन माहिती पुढे आल्यावर त्याच्या आधाराने युक्तिवाद करत आहेत...

चौथ्या पानापर्यंतचे रिप्लाईज वाचून इब्लिसांशी पूर्ण सहमत!

गंमत म्हणजे, अमेरिकेच्या बाजूने वाद घालणारे येथून तेथे गेलेले आहेत, भारतीयच आहेत.

ओह, ओह्हो, अच्छा अच्छा, चला चला, म्हणजे त्यांचे म्हणणे असे आहे की तेथे गेल्यावर तिथले कायदे पाळले पाहिजेत ना? मग कॅव्हिटी सर्च केला की नाही केला ह्याबाबत काही ठोस पुरावा देत आहेत का ते, की इथल्यांसारख्याच कुठेतरी छापून आलेल्या बातम्या डकवत आहेत?

१०५ - हे वाचून कधी नव्हे ते मनःपूर्वक समाधान झाले.

चुकली असेल ती देवयानी खोब्रागडे, नसतील झाले कॅव्हिटी सर्च, पण आम्हाला इथल्या अमेरिकन दूतावासातील भारतीय कायदे न पाळणार्‍यांना धडा शिकवायचा आहे. गो टू हेल!

देवयानीबाईंना पुर्ण इम्युनिटी मिळावी म्हणून आता ट्रान्सफर केली ते आधी लेखी अ‍ॅलर्ट मिळाल्यावर केले असते तर हे सगळे त्रास वाचले असते.

Pages