हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी

Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21

गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

' बूट पॉलीश ' सिनेमातील " लपक झपक तु आ री बदरीया " हे गाणे कुणी पाहीले आहे का ? नसल्यास जरूर
पहावे तुरून्गातील प्रसन्ग आहे डेव्हिड आणि त्यान्च्या सहकार्यान्वर चित्रित करण्यात आले आहे गाण्याचे बोल आहेत ' लपक झपक तु आ री बदरीया , सरकी खेती सूख रही है " आवाज आहे मन्ना डे यान्चा
गाणे पाहतान्ना सारखे वाटत असते की गाणे अभियनयानुसार म्हटले गेले की गाण्यानुसार अभिनय केला गेला आहे ? माझे अतिशय आवडीचे गाणे आहे " तुनळी " वर हे गाणे मी तर नेहमी पहातोच आणि त्याचा आनन्द घेतो , पण माझ्या कडे कोणी मित्र आला आणि जर गाण्याची चर्चा सुरु झाली कि त्याला हे गाणे मी जरूर दाखवितो.

हो जयंत, माझेही खुप आवडते गाणे आहे ते.
अनेक वेबसाईट्सवर ते गाणे मन्ना डे यांनी गायलेय असेच लिहिलेय. पण माझ्या आठवणीप्रमाणे त्यातले तबल्याचे बोल, पं. पलुस्करांनी गायलेत. एवढ्या थोर कलाकाराने असे गायला तयार व्हावे हीच अप्रुपाची गोष्ट आहे.

रामलीला" मधले "नगाडे संग ढोल बाजे" गाणे मस्त आहे त्याच बरोबर गरबा उत्तम रित्या चित्रीत केलेला आहे.. >>>>

उदयन, याच चित्रपटातलं एक गाण आहे .... लहू मूह लग गया .. अतिशय सुन्दर चाल , नाच , आणि 'beats'.

नगाडे संग ढोल बाजे" इतक ते फास्ट नाही , पण एक एक ठेका आणि त्यावरची स्टेप कानात आणि डोळ्यात भरून घ्यावी.

ह्या आधी कोणि ईथे हे लिहिले आहे का माहिती नाही.....
चित्रपट : अनुभव
गाणे : मेरी जान, मुझे जान ना कहो मेरी जान...............
गीता दत्त चा स्वर्गिय आवाज, गुलजार साहेबांचे शब्द आणि कनु रॉय ह्यांचे संगीत.
Simplyyyyy superb. It is said, की गीता दत्त त्या वेळी Cancer च्या शेवटच्या Stage ला होती, पण बाईंचा काय आवाज लागलाय..uff uff. आणि गुलजार साहेब "जान" ह्या शब्दाशी ज्या प्रकारे खेळले आहेत ना..त्याला काय तोड नाही राव. Happy

www.youtube.com/watch?v=F6FkVPOMtvM

प्रसन्न,

त्या चित्रपटात गीता दत्त गायली ती शेवटचीच.
कोई चुपकेसे आके, सपने सजाके... पण छान आहे. पण तो चित्रपट प्रौढांसाठी होता. त्या काळाच्या मानाने
चित्रीकरण बोल्ड होते.

०००

नगादा संग ढोल बाजे मस्तच चित्रीत झालेय. यू ट्यूबवर आहे तेवढेच आहे का चित्रपटात आणखी मोठे गाणे आहे ?

इथे मी मागे लिहिलय की नाही माहीत नाही.
१) मला स्वत:ला 'चांदनी' मधील श्रीदेवी ऋषी कपुरचं 'तेरे मेरे होठोंपे' हे गाणं खुप आवडतं.
गीतकार आनंद बक्षी, लताचा गोड आवाज, प्रसन्न चेहर्याची श्री, तिला साथ देणारा ऋषी, आणि त्याला साजेसं लोकेशन असं सगळा गोड मिलाप आहे.

२)'सर जो तेरा चकराए' हे कॉमेडी गाणं असलं तरी त्याचं पिक्चरायझेशन मला खुप नॉस्टॅलजीक करतं.

मग त्या गाण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
आपल्याकडे ६ मात्रांचा ताल वापरतात का गरब्यासाठी ( ढाय ढाय ढाय ढम ढम खाली ) ?
केनयात ८ मात्रांचा असायचा.

आधी ० ० ० १ ० ० ० १
मग १ १ १ ० १ १ १ ०
आणि शेवटी १ १ १ १ १ ० ० ०

असे काहीतरी असायचे.

हो दिनेश दा,

त्या मधे गीता दत्त शेवटची गायली.....मेरा दिल जो मेरा होता पण अप्रतिम होते....मुळात मी गुलजार साहेबांचा पंखा असल्याने मला एकंदर च त्यांची शब्द्कळा फार आवडते....

मेरा दिल जो मेरा होता, पलकों से पकड़ लेती
होठों पे उठा लेती, हाथों में खुदा होता

सूरज को मसल कर मैं, चंदन की तरह मलती
सोने सा बदन लेकर, कुंदन की तरह जलती
इस गोरे से चेहरे पर, आईना फिदा होता

बरसा हैं कई बरसो, आकाश समंदर में
एक बूँद हैं चंदा की, उतरी ना समंदर में
दो हाथों की ओस में ये, गिर पड़ता तो क्या होता
हाथों में खुदा होता ...

आणि तनुजा ला चक्क गीता दत्त चा आवाज suit झाला आहे Happy वर उल्लेखलेल्या मेरा दिल जो मेरा होता गाण्याच्या interlude मधे संतूर चे pieces आहेत....निव्वळ अप्रतिम !!

गीता पण आशासारखीच जीव ओतायची गाण्यात. तिचा आवाज कुणाला सुट झाला नाही असे वाटलेच नाही कधी. अगदी साहब बीबी मधल्या मीनाकुमारीच्या बाबतीत पण ( पिया ऐसो जिया मे, कोई दूरसे आवाज दे, न जाओ सैंया ).
एरवी मीनाकुमारीला नेहमी लताचाच आवाज असे तरी छोटी बहू साठी गीताच योग्य होती. ( कोई दूरसे नंतर लताने पण गायले. ते सुंदर आहेच पण तरीही चित्रपटातल्या प्रतिमेसाठी मला गीताच आठवते. या गाण्यात मला वाटतं मीनाकुमारीचा चेहराही दिसत नाही. तरीही.. )

व्हेरी ट्रु दिनेश दा,

हे सगळे चित्रपट रीलीज झाले तेव्हा तर माझ्या पिढी चा जन्म ही झाला नव्ह्ता, पण ह्या गाण्यांनी जनमानसावर जी मोहिनी घातली आहे, त्याला तोड नाही. >>गीता पण आशासारखीच जीव ओतायची गाण्यात. तिचा आवाज कुणाला सुट झाला नाही असे वाटलेच नाही कधी>>> प्रचंड अनुमोदन !! Happy

टिव्हीवर गाणी हॅमर करायची पद्धत पहिल्यांदा कस्मेवादे पासून सुरु झाली. त्या काळात कधी कधी त्या गाण्यांचा उबग येतो. आता परत बघून ते गाणे आवडायला लागते.

असे एक गाणे. तक्षक मधले तब्बूवर चित्रीत झालेले, मुझे रंग दे. आशाने गायलेही सुंदर आणि तब्बू नाचलीयही छान

http://www.youtube.com/watch?v=r7cBeLtiG3w

या गाण्यातले सहनर्तक, त्यांचे कपडे आणि हावभाव अजिबात आवडत नाहीत. पण तब्बू एवढी ग्रेसफूल दिसतेय कि तिकडे लक्षच जात नाही.

त्यातलेच बूंदोंसे बाते पण माझ्या खास आवडीचे. नायिका भिजत नाही तरी प्रेक्षक चिंब होतो.. अशी किमया
ओ सजना बरखा बहार आयी ने पण केली होती.

http://www.youtube.com/watch?v=LGZIYhR5-VQ

नौ दो ग्यारह, तेरे घर के सामने ह्या गाण्याच्या चित्रीकरणात विजय आनंद ऊर्फ गोल्डीचा मोठा वाटा आहे.
त्याचीच जॉनी मेरा नाम मधले वादा तो निभाया, पल भर के लिये कोई हमे प्यार कर ले ही गाणीही. त्यातले पल भर च्या वेळेस असंख्य खिडक्या असणारे घर ही एक अशक्य वाटणारी कल्पना पडद्यावर मस्तच दाखवली आहे. चुप चुप मीरा रोये हे गाणे पण उत्तम चित्रित. एकंदरीत ह्या सिनेमात हेमा मालिनी खरोखर ड्रीम गर्ल दिसते.

ब्लॅकमेलमधले पल पल दिल के पास हे एक गाणे अप्रतिम आहे. त्याचे बरेचसे बोल आणि चित्रीकरण हे विजय आनंदचेच. हे दोन्ही अनेक दिवस त्याच्या मनात घोळत होते पण ह्या सिनेमात कल्याणजी आनंदजींनी ते साकार केले. सिनेमा चालला नाही पण हे गाणे अविस्मरणीय आहे आणि चित्रीकरणही (त्यातली राखी मला विशेष आवडली नाही तरी!)

विजय आनंद दिग्दर्शक असताना गाण्याचा अत्यंत बारकाईने विचार करायचा. आणि पुन्हा पुन्हा टेक घेऊन आपल्या मनासारखे चित्रीकरण झाल्यावरच थांबायचा. त्यावरुन विविध कलाकारांशी त्याचे खटके उडालेले आहेत. उदा. ज्वेल थीफ : वैजयंती माला.
प्रेम पुजारीच्या वेळेस देव आनंदने आपल्या ह्या भावाची साथ सोडली आणि त्यामुळे त्यातली गाणी इतकी अप्रतिम असून चित्रीकरण तितके जमलेले नाही असे मला वाटते. उदा. रंगीला रे.

अजून एक गाणे ज्यातील संगीत आणि चित्रीकरण मला आवडते ते म्हणजे हंसते जख्म मधले तुम जो मिल गये हो. त्यातील प्रिया राजवंश एक सोडा. पण मुंबईतला तो जोरदार पाऊस आणि त्याला साजेसे संगीत आणि स्वर्गीय आवाज. एकदम जबरदस्त जुळून आले आहे.

गाईडमधली गाणी ( नुसती गाणीच नव्हे तर वहीदाचा तो नागिन डान्स ) आठवली कि त्याचे दृष्यरुपही आठवते, तसे प्रेमपुजारी मधल्या गाण्यांच्या बाबतीत होत नाही खरे. रंगिला रे गोल्डीने केले असते तर तिचे
बहकलेपण चित्रीकरणात नक्कीच दिसले असते.

त्यातल्या त्यात मला शोखिंयोमे घोला जाय... चांगले वाटते.

http://www.youtube.com/watch?v=zXl2OGVRD0c

देव आनंद आणि वहिदा रेहमानवर चित्रित झालेले हे काला बाझार मधले गाणे.

वेगळेपण म्हणजे यात देव आनंदला, मन्ना डेचा आवाज आहे. गाण्याचे शब्द "सांझ ढली, दिल की कली "
सुंदरच आहेत. मन्ना डे आणि त्याहून आशाचे गायन तर अप्रतिम आहे.

गाण्याचा भाव नेहमीपेक्षा वेगळा आहे हे खरेय. वहीदा आवडती असली तरी या गाण्यात मधुबाला असती तर आणखी मजा आली असती.

http://www.youtube.com/watch?v=ihTP_arJSIo

सुनो सजना, पपीहेने... हे लताचे, आये दिन बहार के मधले गाणे. लताच्या गायनाबद्दल म्या पामराने काय लिहा वे ? या गाण्याला सुंदर अशी लय आहे आणि ती लय त्या चित्रीकरणातल्या झोपाळ्याने पकडलीय असे वाटते.
खास करून एका क्षणी तो झोपाळा आडवा झुलू लागतो ते खासच.

मोसम फिल्म मधील दिल ढुन्ढ्ता हे फिर वही, आणि
इजाजत फिल्म मधील कतरा कतरा, छोटी सी कहानी से ह्या गाण्यान्चे चित्रीकरण खुपच सुन्दर

अजून एक गाणे ज्यातील संगीत आणि चित्रीकरण मला आवडते ते म्हणजे हंसते जख्म मधले तुम जो मिल गये हो. त्यातील प्रिया राजवंश एक सोडा. पण मुंबईतला तो जोरदार पाऊस आणि त्याला साजेसे संगीत आणि स्वर्गीय आवाज. एकदम जबरदस्त जुळून आले आहे.>>> +१ अगदी अगदी

स्नेहनिल >>> इजाजत फिल्म मधील कतरा कतरा हे माझे ही अत्यंत आवडिचे गाणे आहे.

कनुप्रिया नामक माझ्या सारख्याच एका गुलजार प्रेमी व्यक्ती ने ह्या गाण्याविषयी लिहिलेली हि वेबसाईट जरूर बघा.
http://gulzar101.blogspot.de/2011/11/katra-katra-milti-hai-ijaazat.html

ह्या गाण्याचा भावार्थ खूप छान उलगडुन दाखविला आहे.
दिनेशदा...तुम्ही पण जरुर वाचा Happy

प्रसन्न,

छान आहे तो भावानुवाद.

गुलजारच्या शब्दांतून काढावे तितके अर्थ काढता येतात. पहिल्यांदा ऐकताना वाटतं काय विचित्र लिहिलय.
मग जसजसं गाणं मनात मुरत जातं तसतसं आपणही त्या शब्दांशी रिलेट होत जातो.

>>सुनो सजना, पपीहेने... <
दिनेश. +१ या गाण्यासाठी. सॉलिड भट्टी जमली आहे त्यात. लताबाई, लक्ष्मी-प्यारे, पं. हरिप्रसाद चौरसिया आणि उस्ताद अल्लारखां. बिगडा हुआ मुड बनाने कि ताकत है इस गानेमे... Happy

श्री. प्रसन्न हरणखेडकर.. अनुभवमधल्या ' मेरी जाँ ' गाण्यावरच्या तुमच्या पोस्टीचे अनुमोदन.. मी गीता दत्त च्या आवाजाची पंखा आहे..पण हे गाणं ऐकलंच नव्हतं कधी. या गाण्याचा शोध मला 'चुकून' लागला.
४-५ वर्षांपूर्वी एका रविवारी दुपारी घरात सगळे वामकुक्षी करत असताना रिमोटचा 'ताबा' मिळाला तेव्हा कुठल्याशा चॅनलवर अजय देवगण आणि ऐश्वर्या राय चा 'रेनकोट' नावाचा सिनेमा चालू होता. फक्त ५ मिनिटे पाहिला पण तेवढ्यात ऐश्वर्या अजय देवगणला बाहेर बसवून आत काहीतरी करायला गेली तेव्हा हे गाणं गुणगुणत होती. तेव्हाच त्या गाण्याची चाल इतकी भिडली की शोध घ्यायलाच लागला. २-३ वर्षांपूर्वी तूनळीवर सापडलं, तर गीता दत्त च्या आवाजात..... अजून व्हिडिओ चित्रीकरण पाहिलं नाही, पण गाण्याची चाल अजब आहे.

जुनी ब्लॅक अँड व्हाईट बहुतेक सर्वच गाण्यांचं चित्रीकरण भावतं.
देव आनंदचं...
१)तु कहां ये बता, इस नशिली रात में ...
२)खोया खोया चांद, खुला आसमां
राजकपुर, नुतनचं अनाडी मधील
१)वो चांद खिला, वो तारे हंसे...
२) मेरा जुता है जापानी
दिलीपकुमारचं
नैन लड गए वे..
सुहाना सफर और ये मौसम हंसी
ही गाणी पहायला खुप आवडतात.

<<कुठल्याशा चॅनलवर अजय देवगण आणि ऐश्वर्या राय चा 'रेनकोट' नावाचा सिनेमा चालू होता. << अवांतरः खुपच सुंदर आहे हा सिनेमा. माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक.

अबोलीजाह्नवी....

मला पण या गाण्याचा शोध 'चुकूनच' लागला Happy
www.youtube.com/watch?v=F6FkVPOMtvM...तुम्ही येथे ह्य गाण्याचे चित्रीकरण बघु शकता.
बासुदांचे Direction तर अप्रतिम च पण नंदो भट्टाचार्यांची cinematography पण सुरेखच !!
जरुर बघा. काही काही गाणी अशी असतात ना की, अप्रतिम नक्की कश्याला म्हणावे हा प्रश्न पडतो....शब्द, संगीत, picturization, गायन कि direction... हे गाणे त्या मधील च एक Happy

shendenaxatra >>

ब्लॅकमेलमधले पल पल दिल के पास गाण्यावरच्या तुमच्या पोस्टीचे प्रचंड अनुमोद Happy Happy
गोल्डी खुप चांगले visualiser होते. पल पल दिल के पास मधेच एका कडव्याच्या वेळी..राखी पत्र वाचता वाचता पलंगावर आडवी होते आणि तिच्या जवळ अंधार दाखविला आहे (partial black out) आणि पलिकडे प्रकाशात धरमपाजी पत्र लिहिताना दिसतो.....मला हमखास नाटकाची आठ्वण येते...नाटकांमधे दोन scenes असेच दाखवतात.

अनुभवचे संगीतकार कनु रॉय हे गीता दत्तचे बंधू. त्याआधी ९-१० वर्षे ती हिंदी चित्रपटसंगीतापासून दूरच होती.

गीताची लता आणि आशा, दोघींशी घनिष्ठ मैत्री होती असे सांगतात. लतानेच तसा उल्लेख केलाय.

लता आणि गीताचे, सुंदर चित्रीकरण असलेले गाणे. http://www.youtube.com/watch?v=3tpPpD8fSVA

मेरी छोटीसी बहन, देखो गहने पहन, ससुराल चली रे.. चित्रपट : तूफान और दिया. पडद्यावर नंदा आणि डेझी इराणी. बहीणभावांची छेडछाड असलेले हे गाणे पडद्यावरही छान आहे. ( या चित्रपटात लताची अनेक उत्तमोत्तम गाणी आहेत. )

गीता आणि आशाचे असेच एक छान गाणे.. http://www.youtube.com/watch?v=pk0xuD6KSdo

जानू जानू रे काहे खनके है.... दोन मैत्रिणींची छेडछाड... मधुबाला आणि मिनु मुमताज. दोघींच्या अदा मस्तच.

पंचम आर्डीच्या स्मृतिदिनानिमित्त त्याचे एक अतिशय सुंदर गाणे: संगीत, शब्द, चित्रीकरण सर्वार्थाने एखादे गाणे किती 'रिच' असू शकते याचे उदाहरण. वाहत्या/धावत्या गोष्टींना अनुरूप संगीत हे आर्डीची (व एसडीचीही) खासियत असावी. सुरूवातीलाच गाडीत बसणारा राजेश खन्ना (कानावर केस म्हणजे तोपर्यंत तो 'सुपरस्टार' ई झाला होता हे ही आपल्या लक्षात येते Happy ) दाखवल्यावर हळुहळू गाडीप्रमाणेच वेग घेणारे संगीत सुरूवातीपासूनच पकड घेते.
नीट लक्ष दिलेत तर एक जाणवेल - गाडी जेव्हा स्टेशनामधून जाते तेव्हा एरव्हीचे आवाज बदलून तेवढ्यापुरता रूळांचा व स्टेशनातील इतर गोष्टींमुळे येणारा आवाज वेगळा येतो. येथे ती गाडी फलाटाच्या बाजूने जाताना साधारण तसाच इफेक्ट दिलेला आहे, आणि मग पार्श्वसंगीत पुन्हा 'पिक अप' घेते. दुसर्‍या कडव्याच्या वेळी मुमताज दाखवताना सगळीकडे हिरवेगार तर राजेश दाखवताना एकदम भकास. ते देवळाजवळचे शॉट्स व त्यावेळचे संगीताचे पिसेस अप्रतिम आहेत.
यू ट्यूब वरची ही लिन्क - खूप चांगल्या क्वालिटीची आहे.
http://www.youtube.com/watch?v=nyZ6mv5y5mE

झुटी मुटी मितवा....

चित्रपट.. "रुदाली"
संगीत, शब्द, चित्रीकरण अफलातून !!
संगीत भुपेन हजारिका साहेबांचे, शब्द अर्थात गुलजार सारख्या शब्दप्रभू चे आणि पडद्यावर आनंदाने बेभान होउन नाचणारी शनीचरी च्या भुमिकेतली डिंपल.....अप्रतिम combo आहे.

Pages