पुणे गटग १५ डिसेंबर २०१३

Submitted by फारएण्ड on 11 December, 2013 - 22:45
ठिकाण/पत्ता: 
गंधर्व रेस्टॉरंट. ज्यांना तो भाग माहीत नाही त्यांना सहज सापडण्याकरिता जवळच्या खुणा: बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्व पूल, कॉर्पोरेशन, जंगली महाराज रस्ता. खाली साधारण लोकेशनचा गूगल मॅप आहे.

येत्या रविवारी पुण्यात गटग ठरवले आहे. कोणाला जमू शकेल त्यांनी कळवा व अवश्य या.

गंधर्वची गूगल मॅप लिन्क. साधारण या ठिकाणी आहे.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, December 14, 2013 - 22:30 to रविवार, December 15, 2013 - 01:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करा, करा, मज्जा करा. गंधर्वमधे जाणार असल्याने माझ्या वाटचं काहीतरी खा अज्जिबात म्हणणार नाही! Happy

प्राची, थॅन्क्स. वेळ ठरली आहे. ठिकाण कोणी दुसरे नाही सुचवले तर गंधर्वच धरू.

"कळवा, जळवू नका" अशी टॅगलाईन करावी या गटगची Happy

गंधर्वसाठी गुगल मॅपला पत्ता काय द्यायचा ? एक पिंपरीतलं आणि एक पुणे-नाशिक हायवेवर दाखवतात. पण हे तर गावात आहे ना, नारायणपेठेच्या आसपास कुठेतरी ?

अगो, तू बालगंधर्व चौकातून आलीस की पुलावर वळायचा जो सिग्नल आहे त्याच्या बरोब्बर डावीकडे (म्हणजे पुलाच्या अगदी समोरच) गंधर्व आहे

अरे प्राची मला एक मिनीट खरेच वाटले होते तू येणार. वरदा - पुण्याजवळ एका खेडयात काहीतरी सापडले आहे अशी मेल करू का? Happy

लोकहो गंधर्वचे साधारण लोकेशन असलेला मॅप वरती अपडेट केला आहे.

अर्र्...... मी नेमकी डिसेंबरच्या शेवटच्या रविवारी पुण्यात असणार आहे.

मजा करा लोखो!!

फा Lol
मला एक जरूरीचं/कितीक दिवस डोक्यात घोळत असलेलं फील्डवर्क करायचं आहे (१ दिवसाचं) तरी मी माझ्याऐवजी माझ्यावतीने दुसर्‍यांकडूनच करून घेणारे ते काम. तेव्हा मेल आली तरी काही उपयोग नाही.
नेक्ष्ट टाईम कलकत्त्याला करा गटग, मी होस्ट, प्राची को-होस्ट

हायला गटग चे सीजनच आहे की............छान पण.... Happy

मी येईन......१४ चा हँगओव्हर उतरला तर १५ ला सकाळी नक्की (१४ ला अ‍ॅन्युअल पार्टी आहे आफिसात Wink ).......पण लेकाला (जयला) घेऊन्च येईन....:)

अगो भेटुच मी आले तर Happy

प्राची आणि वरदा होस्ट कराच..... मी येईनच Wink Proud

"कळवा, जळवू नका" अशी टॅगलाईन करावी या गटगची >> करून टाक.. चर्चा तर होणारच Wink

मजा करा लोकहो.. माझ्यावाटणीचे कटलेट खाउन घ्या कोणितरी.. होउ द्या खर्च Wink

Pages