पुणे गटग १५ डिसेंबर २०१३

Submitted by फारएण्ड on 11 December, 2013 - 22:45
ठिकाण/पत्ता: 
गंधर्व रेस्टॉरंट. ज्यांना तो भाग माहीत नाही त्यांना सहज सापडण्याकरिता जवळच्या खुणा: बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्व पूल, कॉर्पोरेशन, जंगली महाराज रस्ता. खाली साधारण लोकेशनचा गूगल मॅप आहे.

येत्या रविवारी पुण्यात गटग ठरवले आहे. कोणाला जमू शकेल त्यांनी कळवा व अवश्य या.

गंधर्वची गूगल मॅप लिन्क. साधारण या ठिकाणी आहे.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, December 14, 2013 - 22:30 to रविवार, December 15, 2013 - 01:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो , त्याला हेडबँड म्हणायचे .......... त्याचे काही नविन आणि स्टायलिश प्रकार कुठे मिळतील हर्पेन , आता सायकलिंग सुरु केलय ,

तो सुगम संगीताचा रसीक बनन्याबद्दलची चर्चा छान वाटली मलाही अजून त्यातल फारसे कळत नाही पण नाट्यसंगीतातली गोडी निराळीच.चर्चा झाल्याप्रमाणे ते कस ऐकाव याचही एक वेगळ गटग होईल,त्यातल्या जाणकारांसोबत.

प्रत्येकाच्या टेबलवरच्या चर्चेचा सूर वेगळा होता आणि आपल्या गोंधळात तो वेटर पुन्हा पुन्हा ओर्डर विचारत होता .

"हो ना, गटग मध्ये अगो, सहेली, गायत्री, काशी आणि किरणकुमार पेक्षा मी जास्त बोलत होतो"
देवा बरोबर आहे , तुझा आवाजही मोठा असल्याने तु सुरु केलेले विषय सर्वांच्या कानापर्येंत सहज पोहचत होते.
त्यामुळे त्यातच आम्हीही जॉईन होत होतो .

मी... शांत... अओ:
अरे माझ्या बरोबर आलेल्या माझ्या पार्सलामुळे मला काहीच बोलता येत नव्हते.... चिन्मय उशिरा आला त्याला मी काय करु... आपण काशा बद्द्ल काय बोलतोय हे सगळ सांगत बसायला लागत होते..

आणि मी समजत होतो, चिनूक्स पहाटे ९ पासून आलेला आहे आणि मग २ तासांनी चाललाय.

देवा जाताजाता मी आलो त्यामुळे मलाही देवा शांतच वाटलेला...;)

मायबोलीवरचे गटग-वृत्तांत, हे 'आंधळे आणि हत्ती' या गोष्टीतील आंधळे, हत्तीचे वर्णन आपापल्या दृष्टी(?)कोनातून करतात, तसेच असते हे प्रकर्षाने जाणवते आहे. Happy

आणि म्हणूनच उर्वरित (अर्थातच गटगला उपस्थित असलेल्या) माबोकरांनी आपापले गटग वृत्तांत / वर्णने / व्हर्जन्स इथे टाका बरे...

माबो वर कसं ललित, गझल ,कविता, कथा, वाद्विवाद, माकाचु , आहारशास्त्र, आरोग्य, भविष्य, राजकारण गुण्यागोविंदाने नांदते, तस्सच गटग होत. Happy
रच्याकने उखाळ्यापाखाळ्या नाही झाल्या Wink

मस्त झालं की गटग. वृतांत वाचायला मजा आली.

>>>> एक बहुउद्देशीय कापड व त्याचे विविध रूपात उपयोग (करून) दाखवले. >> हाहा प्रत्यक्ष घटना मजेदार होती. हे एखादी बाही वरून खालून कापली असता जशी आरपार होते त्या प्रकारातले कापड होते [फक्त डोक्याच्या घेराचे व स्ट्रेचेबल प्रकारातले] - होजियरी टाईपमधले. त्याचा उपयोग बहूद्देश टोप्या / शिरस्त्राण / कानटोपी / नाकटोपी/ गळाटोपी, हाताला गुंडाळायचा [व घाम टिपायचा] बँड असा होतो हे हर्पेनकृपेने लक्षात आले आहे.

>>>>> ते Thneed असणार.

मामी ते नाही, माझ्याकडे आहे तो प्रकार Tube Headband / headgear नावाने ओळखला जातो.

तर मंडळी, स्कायशॉप जाहिरात मोड ऑन

मी खूप परेशान होतो... माबोचे गटग झाल्यादिवसापासून सगळ्यांनी माझे जीवन हराम केले होते. माझ्याबरोबर मेळघाट-मैत्री, मॅरॅथॉन, प्रिमियर फोटो वृत्तांत या सगळ्यांबद्दल बोलायचे सोडून सगळे माबोकर माझ्या हेड्बँड विषयीच बोलू लागले होते... वर त्याला कापड कापड असेही म्हणत होते....नशीबच माझे की अगदीच फडके नव्हते म्हणत... असो...

हा तर मी खूप परेशान होतो.

आणि तर आणि, मला सांगण्यात येत होते की गटग ला नसलेल्या माबोकरांसाठी एक बाफ उघड म्हणून....

मला सांगा हेड्बँड हा बाफ-विषय होऊ शकायला गाईचे तूप आहे का?.... बर मी लिहिलेही असते, पण तो बाफ कोणी वाचलाच नसता तर.... त्याचीही सवय आहे खरेतर त्यामुळे तेही ठीकच होते,
पण जर का सगळ्यांनी वाचले असते आणि माझा बाफ भरभरून वाहयाला लागला असता तर... तर मग मोठाच धोका माझ्यासमोर होता... काही निष्काळजी माबोकर माझ्यावर निष्कारण नाराज झाले असते ....

कुठून घातला गटगला मी तो हेड्बँड; असे झाले मला, तो हेड्बँड घालून मी डोक्याला हात लावून बसलो होतो इतक्यात एक चमत्कार झाला... मला मिळाली गुगलबाबांची साथ

असता साथ गुगल बाबांची, मुक्ती मिळते बाफ काढण्यापासूनची

तर गुगल बाबांच्या कृपेने खालील लिंका पहा आणि हेड्बँड बद्दल आणि तो किती प्रकारे वापरता येतो हे आपण स्वत: जाणून घ्या....

http://yongfeizhenzhi.en.alibaba.com/productshowimg/616239909-213684839/...

http://dfound.en.made-in-china.com/productimage/tSoQkzYKOAcU-2f1j00oSOaZ...

जाहिरात समाप्त टिंगटाँग Happy

असता साथ गुगल बाबांची, मुक्ती मिळते बाफ काढण्यापासूनची>>> अशी कशी सहजासहजी मुक्ती मिळेल? Proud आता हे मुंबई/पुणे/ठाणे इ. ठिकाणी मिळेल का? मिळेल तर कुठे? किती किमतीला? ते बी सांगा. तो गुगलबाबा ते सांगत नाहीये नीट Proud

कविन, मी, पुण्यातल्या कॅम्पातल्या फॅशन स्ट्रीट मधून घेतले होते आणि नंतर ते दुकान अतिक्रमण विभागाने पाडले, सध्या परत ती दुकाने हळूहळू चालू होत आहेत. काही दिवसांनी पुण्यात परत मिळायला सुरु होईल असे वाटते.

ठाण्याला स्टेशन समोरच्या दुकानातपण हे मिळते, नक्की कुठल्या / दुकानाचे नाव वगैरे आत्ता लगेच सांगता नाही येणार... नंतर सांगेन...पण मिळते नक्की Happy

पौर्णिमा, तू पण एक पोस्ट टाक आता 'मला साधारण समजलेल्या गटग घडामोडी आणि ते टिपीकल / अधिक टिपीकल व्हावे म्हणून सूचना' अशी Happy

typical gtg mhanje kaay? >> जे अनटिपिकल नाही ते प्राची Proud

पुणेकर मंडळींनो, माझ्याकडे असलेल्या हेड्बँडसारखा हेड्बँड ('तोच तो गटग-प्रसिध्द हेड्बँड') कॅम्पातल्या फॅशनस्ट्रीट्मधल्या दुकानात परत मिळू लागला आहे हो...

ठाण्यामधे स्टेशनच्या जवळ स्टॉर्बी नावाच्या दुकानात देखिल तो मिळतो आहे...

किंमत रुपये दीडशे मात्र ('बडे काम की चीझ', 'व्हॅल्यु फॉर मनी' या भावना मराठीत कशा प्रकट करायच्या?)

तळटीप - हेड्बँडच्या खरेदी विक्री व्यवहारामधे माझे कुठलेही वैयक्तिक अथवा व्यावसायिक हितसंबंध यात गुंतलेले नाहीत व ही पोस्ट केवळ जनहितार्थ टाकत आहे याची नोंद घेण्यात यावी. कृपया. धन्यवाद Happy

पुण्यातल्या फॅशनस्ट्रीट मधे गाळे आहेत. त्या गाळ्यांना नावे नाहीत. आत गेल्यावर गळ्यातल्या माळा, मनगटावर बांधायचे चामड्याचे बँडस् आणि टोप्या वगैरे तत्सम वस्तु मिळणार्‍या गाळ्यावर चौकशी करायची. आत शिरल्यावर उजव्या बाजूला तो गाळा आहे. मी त्या दुकानवाल्याचे नाव आणि / सेल नंबर देण्याचा प्रयत्न करतो.

Pages