पुणे गटग १५ डिसेंबर २०१३

Submitted by फारएण्ड on 11 December, 2013 - 22:45
ठिकाण/पत्ता: 
गंधर्व रेस्टॉरंट. ज्यांना तो भाग माहीत नाही त्यांना सहज सापडण्याकरिता जवळच्या खुणा: बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्व पूल, कॉर्पोरेशन, जंगली महाराज रस्ता. खाली साधारण लोकेशनचा गूगल मॅप आहे.

येत्या रविवारी पुण्यात गटग ठरवले आहे. कोणाला जमू शकेल त्यांनी कळवा व अवश्य या.

गंधर्वची गूगल मॅप लिन्क. साधारण या ठिकाणी आहे.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, December 14, 2013 - 22:30 to रविवार, December 15, 2013 - 01:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची, एकदा तू आणि मी पूर्व भारतातल्या पुपुकरांचं गटग करून टाकूयात
नेक्ष्ट टाईम कलकत्त्याला करा गटग, मी होस्ट, प्राची को-होस्ट
>>>>> त्यात मला पण घ्या. Happy

पूर्व भारतातल्या गटगसाठी मी एलिजिबल असेल का? >>>>> हो हो... येणारे सगळेच एलिजिबल असतील.
गटगला शुभेच्छा. सविस्तर वृत्तांत येऊन द्यात >>> +१११

हो, सॉरी - तुझं नाव विसरलेच घालायला, धारा Happy
आपण गुवाहाटीतच करूयात गटग. मला आणि प्राचीला सेन्ट्रल पॉइंट पडेल Proud

आपण गुवाहाटीतच करूयात गटग. मला आणि प्राचीला सेन्ट्रल पॉइंट पडेल >>>> अगदीच पळेल... नॉर्थ-इस्टात फिरवून आणू सगळ्यांना. Happy

नाव नोंदवुन नाही आले तर..??? >> सगळ्यांच्या शिव्या खाव्या लागतात Proud
आणि नाव न नोंदवता आले तर.... >> सगळ्यांचे बील द्यावे लागते Wink

तेव्ह ठरव तुला कुठले पर्वडेल Lol

रवि सकाळी दहा-साडेदहा पर्यंत यायला जमेल असं वाटतंय.

गंधर्वला पर्याय : हॉटेल समुद्र (नळस्टॉप), हॉटेल आर्यन (वैशालीसमोर, ब्रिटिश लायब्ररी शेजारी, फर्ग्युसन कॉलेज रोड), हॉटेल शर्वरी (चैतन्य पराठा शेजारी, फर्ग्युसन कॉलेज रोड)

मला थोडा उशीर होईल यायला, तर चालेल का? मी रवीवारी बहुतेक पळून / सायकलींग करून यायच्या विचारात आहे आणि परस्पर यायच्या विचारात आहे तर पाळलेच पाहिजे असे काही पोशाख संकेत / निर्बंध नाहीत ना Happy

पाळलेच पाहिजे असे काही पोशाख संकेत / निर्बंध नाहीत ना >>. अजिबात नाही. फक्त कुठलातरी पोशाख हवा असा मात्र संकेत आहे. परस्पर आलात तरी चालेल. इनफॅक्ट सायकल सुद्धा गटग करता येईल. व्हॉट से पग्या?

हर्पेन - संपर्कातून मेल पाठवली आहे. रिया - नो प्रॉब्लेम्स.

अकु - थॅन्क्स. दोन कप चहा आणि तीन तास गप्पा असे प्रमाण या रेस्टॉ मधे चालते का? Happy आपल्याला तसे ठिकाण हवे.

शैलजा - एकदा चेक कर येथे रविवारी सकाळी किंवा किमान शनिवारी रात्री. बदलले तर उद्यापर्यंतच बदलू. नाहीतर गंधर्व "tried and tested/tasted" आहेच Happy

फा, जर फक्त चहाच (आणि खारी) चालणार असेल तर डेक्कन वरील रानडे इन्स्टिट्युटच्या ओपन कॅन्टिन गटग ठरवता येईल. (वाडेश्वर समोर) तिथे आम्ही एका चहावर चारचार तास काढले आहेत. Happy आणि स्पेशल चहा. अ हा हा काय ती चव, काय ते कळकट भांडे, निव्वळ सोहळा हो.

केदार, चालले असते, पण लोक ९-१२ बसणार तर रेस्टॉच चांगले. मी चहा गमतीने म्हंटले, लोक ब्रेफाही करतील (आणि मला गंधर्वचे कटलेटही आवडते Proud )

@फा, माहित नाही Proud

आर्यन, शर्वरी, समुद्रला आतापर्यंतच्या गटगंचा (माबोची नव्हेत!) अनुभव बरा आहे.

गंधर्व पण ओक्के आहे.

मीही चक्कर मारणारे. फक्त आय्डीपेक्षा प्रत्यक्ष ओळखीच्या माबोकरांची संख्या वाढवायची आहे. Wink

मलाही असेच वाटते. त्यात आता एक दोन दिवसच राहिल्याने लोकांचा गोंधळ व्हायला नको, म्हणून गंधर्वच नक्की करू. वरती तसे लिहीतो.

यायची इच्छा आहे. ९ ते १२ आहे ना? यायचा प्रयत्न करेन. कुणी कोथरूड वारजे कधून येणारेय? पराग, are you guys going cycling before meet ?

विद्या.

Pages