Submitted by फारएण्ड on 11 December, 2013 - 22:45
ठिकाण/पत्ता:
गंधर्व रेस्टॉरंट. ज्यांना तो भाग माहीत नाही त्यांना सहज सापडण्याकरिता जवळच्या खुणा: बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्व पूल, कॉर्पोरेशन, जंगली महाराज रस्ता. खाली साधारण लोकेशनचा गूगल मॅप आहे.
येत्या रविवारी पुण्यात गटग ठरवले आहे. कोणाला जमू शकेल त्यांनी कळवा व अवश्य या.
गंधर्वची गूगल मॅप लिन्क. साधारण या ठिकाणी आहे.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, December 14, 2013 - 22:30 to रविवार, December 15, 2013 - 01:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटी दुपारच्या टळटळीत १२:३०
शेवटी दुपारच्या टळटळीत १२:३० वाजता गंधर्वच्या कर्मचार्यांनी साश्रू नयनांनी आम्हाला निरोप दिला.

>>>>
सिरिअसली?
मी १२.४५ला डॉट गंधर्व मध्ये होते
काल जरा तब्येत बिघडल्याने सकाळी जागच नाही आली:(
म्हणून मी मिसलं
रिया आम्ही चॉकलेट्स खाल्ली.
रिया आम्ही चॉकलेट्स खाल्ली.
भारतीय अप्रमाण वेळेनुसार मी
भारतीय अप्रमाण वेळेनुसार मी नऊ वाजून दोन मिनिटांनी गंधर्वच्या दारात पोचले. केदार बरोब्बर नवाच्या ठोक्याला पोचला होता आणि संयोजकही मिनिटभराने आलेच त्यामुळे रविवारचं भल्या पहाटे थंडीत कुडकुडत वगैरे ( पूनम, प्लीज नोट
) एकटीला ताटकळत राहावे लागेल असं वाटत होतं तसं काही झालं नाही. काही वेळातच देवा आणि किरणकुमार आले. तोपर्यंत गप्पा मारता मारता पुरेसं डी व्हिटॅमिन खाऊन झालं होतं त्यामुळे मग गंधर्वत शिरलो.
झी मराठीवाले मायबोलीवरच्या चर्चा वाचतात तसं गंधर्वचे मालकही वाचत असावेत अशी मला दाट शंका आहे. सहा-सात लोकं जमलो तरी कुणी ऑर्डर घ्यायलाच येत नव्हतं. त्यांनी बहुतेक फारएण्डने आधीच्या एका पोस्टमध्ये लिहिलेले 'दोन कप चहा- तीन तास गप्पा' भलतेच गंभीरपणे घेतले असावे. शिवाय तीन कप कॉफीबरोबर तीन रिकामे कपही सुज्ञपणे आणून ठेवले त्यावरुन तर त्यांनी गटगच्या ट्रेंडसचा चांगला अभ्यास केलाय ह्यात काही शंकाच राहिली नाही.
ह्यावेळी मी ग्रूपच्या अगदी मधोमध जागा पटकावली होती त्यामुळे बरोबर आणि चुकीच्या किनार्यावरच्या गप्पा ऐकण्यात मधूनच गोंधळ उडत होता. एक्स्प्रेसवे वर गाडी बोगद्यात शिरायला लागली की दोन-तीन रेडियो स्टेशन्सचे क्रॉस कनेक्शन व्हायला लागते तसे मला सारखे वेगवेगळे चॅनल्स ऐकू येत होते. तरीही पराग, केदार, फारएण्ड, शैलजा, अकु, इन्ना, काशी, सहेली, स्वराली, ह्यांच्याशी छान गप्पा झाल्या.
देवा, किरणकुमार, गायत्री१३ आणि हर्पेन ह्यांना भेटून छान वाटले. चिनूक्सने अगदी पाच मिनिटांसाठी उपस्थिती लावली त्यामुळे त्याच्याशी काहीच बोलता आले नाही.
बाकी वजन कमी करण्यावर गप्पा मारतामारता आम्ही एकीकडे चॉकलेट्स तोंडात टाकत होतो. चॉकलेट्स मस्त होती फारएण्ड
त्याच टेबलवर नंतर पनीर पकोड्यांची ऑर्डर दिली गेली. पकोडे ऑर्निश मेथडने खाल्ले गेले असतील अशी आशा आहे
गंधर्व स्पेशल कटलेट छान होते. वेगवेगळ्या भाज्या घातल्याने ते कसे डाएट फ्रेंडली आहे ह्यावरही थोडी चर्चा झाली. एकुणातच आज मॅरेथॉन, सायकलिंग, ट्रेकिंग, डाएट ह्यावर बरेच बोलले गेले त्यामुळे ह्या गटगला 'फिटनेस फ्रीक गटग' असा किताब द्यायला हरकत नाही.
इन्नाने परत येताना घरपोच लिफ्ट दिली म्हणून तिला स्पेशल थँक्स
गटग आणि गट्टग - झकास
गटग आणि गट्टग - झकास अनुभव
माझे माबोकरांसोबत पहिलेच गटग होते, खूप दिवसांनी सकाळी लवकर उठलो आणि सार्थक झाल्यासारखे वाटले.
तसा मी ९.३० ला पोहचलो. केदार, देवा,पराग,फॉरेण्ड,अगो वेळेवर हजर होते, आम्ही गेल्या गेल्या गट्टगचा पहिला राउंड चालू केला , मग काशी आणि त्यांचे चिरंजीव मग हळूहळू जमा झालेले शैलजा, अकु, इन्ना, काशी, सहेली, स्वराली,गायत्री१३ आणि मग हर्पेन आणि थोड्या वेळासाठी चिन्या -- गप्पा अशा रंगल्या होत्या कि वेटर आणि हॉटेल मालक (कधी जातील अशा भावनेने) पुन्हा पुन्हा आमच्याकडे नजर टाकत होते.
माझ्या आयुष्यात मी स्वीमींग सोडून कुठलाच व्यायामप्रकार केला नाही पण मग देवा,पराग आणि हर्पेन यांच्याबरोबरच्या एकंदरीत चर्चेनंतर लिटरली सायकल चालवावीशी वाटली.
साधारण ९.३० ते १२.४५ पर्येंत खूप विषय चघळले गेले (चघळताना फॉरेण्डचे दूबईचे चॉकलेट होतेच),ट्रेकिंग,संस्कार,प्रवास,काम,व्यायाम,मॅरेथॉन,निसर्ग सौंदर्य,बाफ,त्याच्या प्रतिक्रिया वगैरे वगैरे सगळ आठवायच पण नाही आता .......
यानंतर सायकलिंग गटग करु नक्कीच .............................
खूप छान अनुभव
चेहरे आयडी जोड्या जुळवणे, नवे
चेहरे आयडी जोड्या जुळवणे, नवे जुने, तुम्ही कुठले, बदामाचा शिरा ,वजन कसे कमी करावे, गंधर्व फेम कटलेट, ३ कॉफी ६ कप, सायक्लींग, सिंहगड , धावणे, चॉकलेट्स, शाळा , हिमालय, बॅकपॅक, परत चहा, आय डी, नवे चेहरे, टेबलावर्च्यानी कितीही गोंधळ घातला तरी नीट डिशेस आणून. देणारे गंधर्व, मधुनच उगवून गायब झालेला धुमकेतू, पुस्तके, प्रवास .....गटग
लेह, लडाख, स्पिती, सवाई
लेह, लडाख, स्पिती, सवाई राहिले आणि जॉबसाठी सतत प्रवास करायला लागणे हे ब्येष्ट की कंटाळावाणे.
मी पहिल्यांदाच गटगला जात
मी पहिल्यांदाच गटगला जात होते. गंधर्वपाशी पोहोचताना केपी ला फोन केला. तेव्हा तो अजून घरीच आहे असे कळले. मग चिनूक्सला फोन केला. तेव्हा तोही घरीच आहे आणि १५-२० मिनिटात पोहोचेल असे कळले. पण, जिथे मिक्स ग्रूप दिसेल आणि खूप आवाज असेल, तो मायबोलीचा ग्रूप असेही त्याने सांगितले.
आत गेले तर मिक्स ग्रूप दिसला, पण शांततेत गप्पा चालू होत्या. चौकशी केल्यावर, आज पौर्णिमा आणि मीनू नसल्यामुळे आवाज नाहिये असे कळले.
काशी, देवा, फारेण्ड, इन्ना, पराग, अगो, केदार, शैलजा, अकु, सहेली आणि चिनुक्स सगळ्यांना भेटून छान वाटले. पहिलेच गटग होते, त्यामुळे जास्त श्रवणभक्ती केली
तू चुकीच्या बाजूला बसली होतीस
तू चुकीच्या बाजूला बसली होतीस गायत्री. आम्ही बसलो होतो तिथे येऊन बसतीस तर आवाजच आवाज ऐकू आले असते!
प्रापंचिक कामात गंडल्याने
प्रापंचिक कामात गंडल्याने गटगला येणे जमले नाही.
पुढच्या वेळी नक्की.
भारी लिहिलय सगळ्यांनी..
भारी लिहिलय सगळ्यांनी..
अगोचं पहिलच गटग होतं त्यामुळे ती विचारत होती की हे टिपिकल गटग आहे का ? मी तिला सांगितलं आज बरीच अनटिपिकल लोकं आहेत त्यामुळे ते तसं नसेल..
एक बहुउद्देशीय कापड व त्याचे विविध रूपात उपयोग (करून) दाखवले. >>
ते कापड भारी होतं ! त्याच्या शेपकडे बघून ते नक्की कुठे बांधायचं असा मला प्रश्न पडला पण हर्पेनने अगदी डीटेलमध्ये डेमो देऊन तो सोडवला.. !
प्रत्येक टेबलावर बर्याच वेगवेगळ्या चर्चा समांतर पातळीवर व वेगाने होत असल्यामुळे त्यांचा गोषवारा देणे अशक्य आहे! >>>> मी, हर्पेन, इन्ना आणि किकू जनरेशन ग्यॅप, पळणे, संस्कार, लॉयला वि. ज्ञानप्रबोधिनी, लॉयलाच्या मागच्या डोंगराचा होणारा विविध प्रकारे उपयोग, मुलांच्या कपड्यांच्या आणि बुटांच्या किंमती, उत्तराखंडातली ढगफुटी अश्या नानाविध विषयांवर गप्पा मारत असल्याचं ऐकून केदार आणि फारेंडाने विचारलं की तुम्ही नक्की कोणत्या विषयावर बोलताय म्हणजे आम्ही ठरवतो चर्चेत उडी घ्यायची की नाही !!
यानंतर सायकलिंग गटग करु नक्कीच >>>> येस ! ठरल्याप्रमाणे सायकलिंग गटगला झेंडा दाखवयला अरुंधती आणि मधेमधे पाणी , गेटरेड, लिंबू सरबत, उकडलेली अंडी, केळी वगैरे पुरवायला सहेली येणार आहेत.. बाकी अजून काही पदार्थ सहेली तिच्या इच्छेनुसार आणणार आहे..
आणि एक सिंहगड गटगपण करायं आहे..
भारी वृत्तांत आहेत
भारी वृत्तांत आहेत सगळे.
गंधर्वच्या कट्लेट्चा इत्का उल्लेख का? बरे नसते का? पुढल्या खेपेला काय खायचं ते ठरवता येईल.
मी मल्टीस्पाइस ला गेलेले एका गटगला, ते प्रशस्त होते एकदम.
मल्टिस्पाइसात व्यवस्थित गप्पा
मल्टिस्पाइसात व्यवस्थित गप्पा मारता बसता येते इत्यादी इत्यादी
@फारेण्ड... सगळ्यांचे
@फारेण्ड...
सगळ्यांचे वृत्तांत वाचले, आणि 'ग-ट-ग' चुकल्याचि रुख-रुख लागुन राहिली... तुझे निमंत्रण स्विकारले होतेच, पण तरी देखिल हजर राहणे शक्य झाले नाही... त्याबद्दल खरंच सॉरी...
शुक्रवारी दुपारी मुंबईतली कामं आटोपून पुण्यात आलो. पुण्यातली कामं आटोपून रात्री कुडाळला (माझ्या गावी) निघालो. शनीवार पूर्ण दिवस कुडाळमधे होतो. रात्री पुनः कुडाळहुन निघुन काल सकाळी साडे-आठला पुण्यात परतलो. 'ग-ट-ग' आहे हे लक्षात होतं, पण झालेल्या धावपळी मुळे 'मरगळलेल्या' चेहर्याने हजेरी लावण्या पेक्षा, घरीच राहण्याचा निर्णय घेतला... असो, पुढच्या 'ग-ट-ग'ला निश्चीत हजर राहीन...

पराग सायकल गटगला झेंडा
पराग
सायकल गटगला झेंडा म्हणून कोणते कापड वापरणार ते येथील चतुर वाचक आता नक्की ओळखतील
लेह, लडाख, स्पिती, सवाई राहिले आणि जॉबसाठी सतत प्रवास करायला लागणे हे ब्येष्ट की कंटाळावाणे.>> हो हे विषयही जोरात होते. कोणालाही शास्त्रीय संगीताचा जाणकार रसिक कसे बनवायचे यावर सुद्धा एक चर्चा झाली.
आता इतक्या सगळ्यांनी
आता इतक्या सगळ्यांनी हर्पेनच्या त्या कापडाचा उल्लेख केलाच आहे तर इथे पण फोटोतून डेमो द्या त्याचा.
चिनुक्सा, तु एकतर दर्शन देत
चिनुक्सा, तु एकतर दर्शन देत नाहीस किंवा क्षणात अंतर्धान पावतोस, तुला काय गंधर्व आणि काय मल्टीस्पाइस
दिवे घे रे!
कोणालाही शास्त्रीय संगीताचा जाणकार रसिक कसे बनवायचे यावर सुद्धा एक चर्चा झाली. >>> याचे मायन्युट्स पाठवा जरा
ही कापड चर्चा आणि डेमो मी मिस
ही कापड चर्चा आणि डेमो मी मिस केलेले दिसते.
खरच डेमो द्या.
अगो एकदम शांत आहे, सहेली आणि गायत्रीही शांत वाटल्या एकदम.
>>अगो एकदम शांत आहे, सहेली
>>अगो एकदम शांत आहे, सहेली आणि गायत्रीही शांत वाटल्या एकदम.
हो ना, गटग मध्ये अगो, सहेली, गायत्री, काशी आणि किरणकुमार पेक्षा मी जास्त बोलत होतो.
हो शैलजा, तू गेल्यानंतर बहुधा
हो शैलजा, तू गेल्यानंतर बहुधा ही चर्चा झाली असावी. कारण हर्पेन ने तुझ्या जागी बसून डेमोज दिले.
विवेक देसाई - मरगळलेल्या चेहर्याने गटग ला यायला काहीच हरकत नव्हती. पण पुन्हा भेटूच. मागे आपण बहुधा गंधर्व मधेच भेटलो होतो.
ज्ञाती - गंधर्वचे कटलेट्स सहसा चांगले असतात. काल मला मीठ जास्त वाटले त्यात.
जनरेशन ग्यॅप, पळणे, संस्कार, लॉयला वि. ज्ञानप्रबोधिनी, लॉयलाच्या मागच्या डोंगराचा होणारा विविध प्रकारे उपयोग, मुलांच्या कपड्यांच्या आणि बुटांच्या किंमती, उत्तराखंडातली ढगफुटी >>> ही सगळी चर्चा माझीही हुकली. संस्कार सोडून.
देवा सवाई कसे झाले? हो
देवा
सवाई कसे झाले?
हो अमोल, मी निघतानाच हर्पेन येऊन पोहोचले होते थोडे लवकर निघावे लागले ह्याची चुटपुट लागलीच.
सहेली आणि गायत्रीही शांत
सहेली आणि गायत्रीही शांत वाटल्या एकदम. >>> हो हो, मी फारच शांत मुलगी आहे
हर्पेन, त्या कापडाच्या डेमोचे फोटो देणारा एक बाफ काढ आता. त्यातच विविध हेडगिअरची चर्चा करू.
फारेण्ड... मागे आपण बहुधा
फारेण्ड...

मागे आपण बहुधा गंधर्व मधेच भेटलो होतो...>>>... हो, हो... बरोबर... वैभव जोशीचा पुण्यातला कार्यक्रम झाल्यावर दुसर्याच दिवशी 'गंधर्व' मधे सकाळिच ब्रे.फा. ग-ट-ग होतं, त्याला आपण भेटलेलो...
बाप रे इतके
बाप रे इतके प्रतिसाद....
अशक्य भार्री लिहिलय सगळ्यांनी...
माझे पहिलेवहिले अधिकृत गटग.. फारच मस्त वाटले सग़ळ्यांना भेटून...
मी खरेतर तब्बल २ तास उशीरा कसे जायचे म्हणून टाळणार होतो. मला, सकाळी ६ वाजता, विद्यापीठात माझ्या धावऱ्या मित्रांना, ते ३३ किमी अंतर धावत असताना, पाणी पाजायला, सायकलवर जायचे होते आणि त्यामुळे साडेदहा तिथेच वाजणार होते.
त्यामुळे इथल्या हिशोबाने भल्या पहाटे ९ वाजता गंधर्व मध्ये यायला मला जमणार नव्हते; पण फारेण्डाच्या 'उशीर झाला तरी ये, आम्ही ११ पर्यंत नक्की तिथेच असू' ह्या दिलासादायक आश्वासनावर विसंबून जायचे ठरवले.
आणि, अशा रीतीने ४०एक किमी
आणि, अशा रीतीने ४०एक किमी सायकल चालवून मी जेव्हा 'गंधर्व' मधे पोचलो तर चिनूक्स आणि काही माबोकर जायच्या बेतात दिसले. जाणाऱ्या मंडळींमध्ये देवा आणि शैलजा यांची तोंड ओळख झाल्याचे आठवते आहे पण (पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांच्या आवाजाकडे जास्त लक्ष जात असल्याने असेल) गायत्री भेटल्याचे आठवत नाहीये. माफी असावी.
मला, मी घातलेले हेल्मेट व सायकल चालवण्यायोग्य कपडे, आणि पितृऋण बाफावर टाकलेले माझे फोटो यामुळे बहुतेक सगळ्यांनीच ओळखले.
अकू, काशी, चिनूक्स, इन्ना सहेली या माबोकाराना आधीच भेटलो असल्याने, आम्ही एकमेकांना नमस्कार करते झाल्याने असेल,
किंवा टिपिकल माबोकर गैरहजर असल्याकारणाने असेल,
किंवा मी यायच्या आधीच 'आयडी ओळखा' हा खेळ खेळून उपस्थित माबोकर मंडळी कंटाळल्यामुळे असेल,
पण माबोचा तो सुप्रसिद्ध खेळ माझ्याबरोबर कोणीच खेळला नाही.
कापडाचा डेमो मी पण मिस
कापडाचा डेमो मी पण मिस केला.
इथेच वाचून वाचून , ह्यवेळी गंधर्व मधे कटलेटच खायच ठरवल होत. ते खाल्ल एकदाच, छान होतं.
पलिकडल्या गायत्री, काशी, सहेलीशी जास्त गप्पा होउ शकल्या नाहीत , पण आय्डीला चेहेरा मिळाला ,हे ही नसे थोडके. गप्पा पुढल्या वेळेला. अगो एकदम शांत आहे, सहेली आणि गायत्रीही शांत वाटल्या एकदम.>> शैलजा , आपण बिघडवू त्यांना पुढल्यावेळी.
मग ऑर्डर येईपर्यंत समोर
मग ऑर्डर येईपर्यंत समोर आलेल्या चॉकोलेटसच्या रॅपरच्या रंगांवरून ३ प्रकार असावेत असे भासत होते, सगळ्या प्रकारची एकेक चॉकोलेटस् खावी असे म्हटले आणि असॉर्ट्मेंट्ची रेंज फार वाईड असल्याने व सगळीच चॉकोलेट्स फार भारी असल्याने फार नाही पण १०-१२ तरी चॉकोलेट्स खावी लागली.
चॉकोलेट्स खूपच छान होती. विशेष धन्यवाद फारएण्ड
मग खावून झाल्यावर मनसोक्त आणि
मग खावून झाल्यावर मनसोक्त आणि भरपूर गप्पा मारत असताना लक्षात आले की काही माबोकरांचे लक्ष माझ्या मनगटाला गुंडाळलेल्या हेडबॅण्ड्कडे (पक्षी इथल्या भाषेत कापडाकडे) आहे. माझेही पोट भरले असल्याने, माझे लक्ष त्याकडे (म्हणजे त्यांचे लक्ष माझ्या मानगटाभोवती गुंडाळलेल्या हेडबॅण्ड्कडे पक्षी इथल्या भाषेत कपड्याकडे जातेय ह्याकडे) गेले. मग समस्त उपस्थित मायबोलीकरांना ते कापड म्हणजे विविध प्रकारे पण प्रामुख्याने डोके झाकण्यासाठी वापरता येण्याजोगा हेडबॅण्ड् आहे हे सांगीतले आणि ते पटावे म्हणून मी साग्रस्म्गीत प्रात्यक्षिकच करून दाखवले.
आणि आज इथे बघतो तर काय, मॅरॅथॉन, ट्रायलेथॉन, सायकलिंग, ट्रेकिंग असे मी बोललेलो सगळे विषय सोडून कापड कापडचा करताहेत माबोकर....;) नाका पेक्षा मोती जड झाला की राव.
आता खरोखरच एक बाफ काढावा लागेल असे दिसतेय
सहेली आणि गायत्रीही शांत
सहेली आणि गायत्रीही शांत वाटल्या एकदम. >>> हो हो, मी फारच शांत मुलगी आहे,>>> अगं सहेली वाक्य नीट वाच, "अगो एकदम शांत आहे", सहेली आणि गायत्रीही शांत वाटल्या
अरे हो, त्या 'वाटल्या'लाच
अरे हो, त्या 'वाटल्या'लाच अनुमोदन देतेय.
सहेली, अकु, बाहीपेक्षा लहान
सहेली, अकु, बाहीपेक्षा लहान मुलांचा कापलेला टी-शर्ट किंवा बनियन असा प्रकार वाटला मला. फिदीफिदी अस्सं काय, आता तुझ्यासाठी अजीबात आणणार नाही तो हेडबॅण्ड, फारच झाले तर माझ्या मुलांचा लहानपणचा टीशर्ट / बनियन देतो, घे कापून तुला पाहिजे तसा, हाकानाका.
Pages