Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40
आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हसून हसून गडबडा लोळण
हसून हसून गडबडा लोळण
जरा इथे लिहायचं म्हणजे अवघड
जरा इथे लिहायचं म्हणजे अवघड आहे... पण.....
रस्त्याच्या बाजूला श्वानमहाराज सजातीय शिष्येवर अनुग्रह करत होते... (पु.लं.नी काय सोय करून ठेवलीये हे लिहायची :))
"मामू, ते सर्कस करतायत बघ"- इति भाचा.
चैतन्य, रस्त्याच्या बाजूला
चैतन्य,
रस्त्याच्या बाजूला श्वानमहाराज सजातीय शिष्येवर अनुग्रह करत होते... >>
हा धागा मुलं लाजवतात तेव्हा
हा धागा मुलं लाजवतात तेव्हा या विषयावर आहे, हे माहित असूनही इतर काही लोकांनी मांडल्यामुळे आमच्या शाळेतली एक आठवण सांगतो..
इयत्ता आठवीला असताना प्रथम चाचणी परीक्षेत भौतिकशास्त्रात असा प्रश्न होता.
लक्स म्हणजे काय?
आणि मुलांनी जी उत्तरं लिहीलेली होती त्यातील काही प्रातिनिधीक
१. लक्स हा माधुरी दीक्षितच्या अंघोळीचा साबण आहे.
२. लक्स साबणाने अंघोळ केल्यावर खूप छान वाटते.
३. लक्स ही जुही चावलाच्या अंघोळीची साबण आहे.
--
सरांनी सर्व पेपर वर्गात आणून दाखवले आणि प्रत्येक उत्तर वाचून दाखवलं. वर्गातील सगळ्या मुलांची हसून हसून पुरेवाट.
या प्रश्नाचं उत्तर बहुधा असं होतं- लक्स हे प्रकाशकिरणे मोजण्याचे परिमाण आहे.
आता बोला..
टोच्या
टोच्या
आता सगळे सांगतच आहेत
आता सगळे सांगतच आहेत तर...."स्टेशन पे एक घंटा" ह्या विषयासाठी लेकीने घंटेवर निबंध लिहिला होता
सुमेधा, पाचवीत असताना (हिंदी
सुमेधा, पाचवीत असताना (हिंदी ही भाषा शाळेत पाचवीपासून सुरू होत असे) 'रेल्वे स्टेशन पर एक घंटा' हा निबंधविषय जेंव्हा गुरुजींच्या तोंडून पहिल्यांदा ऐकला होता तेंव्हा माझ्याही मनात "अरेच्चा, हिंदीत एवढे सोपे सोपे निबंध असतात म्हणायचे!" असा विचात आला होता.
(No subject)
टोच्या आज ऑफीसमधे मी नि
टोच्या
आज ऑफीसमधे मी नि मित्र दोघेही हा धागा वाचत होतो.. तो फक्त हसुन हसुन वेडा झाला होता..
."स्टेशन पे एक घंटा" ह्या
."स्टेशन पे एक घंटा" ह्या विषयासाठी लेकीने घंटेवर निबंध लिहिला होता >>>
चनस, रिया, दक्षिणा, हा प्रसंग
चनस, रिया, दक्षिणा,
हा प्रसंग आमच्या वर्गातील सर्वांना आजही आठवतो. त्यानंतर भुसे सरांनी (ज्यांना आम्ही अमजद खान म्हणायचो. अगदी अमजद खान इतकेच जाडजुड होते ते ) सगळ्यांना सरसकट छडीचा प्रसाद दिला होता, तोही आठवतोय.
लक्स हे प्रकाशकिरणे मोजण्याचे
लक्स हे प्रकाशकिरणे मोजण्याचे परिमाण आहे. << हे आत्ता कळल मी पण साबणच समजत होतो
लक्स म्हण्जे हे प्रकाशकिरणे
लक्स म्हण्जे हे प्रकाशकिरणे साधन शाळेत शिकवलेले आठवत नाही. त्यामुळे मी ही साबण म्हणजे लक्स हेच समजत होते.
आताचा ताजा किस्सा.
मामेभाउ त्याच्या ३.५ वर्षाच्या मुलीला घेवून आलेला अचानक. मुलगी एकदम बडबडी व कमालीची हजरजबाबी आहे. भावाबरोबर त्याची नवीन लग्न झालेली मेहुणी, तिचे सासरे वगैरे.
आईला बरं न्हवतं व घरात कोणीच न्हवतं की बेदाणे , बिस्किटे आणु शकतो. तिने शीरा केला पण बेदाणे जे होते जरासेच उरलेले ते टाकले.
माझ्या भाचीला प्लेट दिल्यावर आधी ती चमच्याने वर खाली करत होती. आईने विचारले, काय गं, खात का नाहीस?
आजी, ह्याच्यात बेदाणे नाहीयेत. मला नाही आवडत हा शीरा व प्लेट हातात घेवून आईकडे आली द्यायला. तुझ्याकडे बिस्किटे पण नाहीत का? लहान मुलांसाठी तु (घरात) काहीच ठेवत नाहीस का?
आईला एकदमच कसतरी वाटलं. हो ग खरेच तु येणार म्हणून मी आणायला हवे होते. तुझा बाबा मला बोलला नाही तु येणार आहेस हे.
असे म्हटल्यावर, आता पुढच्या वेळी नक्की आण. पुन्हा कारणं नको सांगूस.
सगळे एकदम चाट.
तशीही ती एकदम हे आहे, घरात आली की , आजी तब्येत कशी आहे आता? वगैरे असे प्रश्ण करेल. ती जे काही घरातले मोठे बोलतात तशी बोलते. खूप डेंजर आहे
माझी आई शिक्षिका होती.
माझी आई शिक्षिका होती. त्यामुळे आता नातवंडांना वगैरे ... काय रे काय शिकलास आज शाळेत?' असले प्रश्न हातात लाडु-बिडू ठेऊन विचारतेच.
माझ्या ज्युनिअर किंडीतल्या एका भाच्याने तिला दिलेलं उत्तर... '... आदा मादा कोण पादा ... दामाजीचा घोडा पादा'.
LOL
LOL
(No subject)
:d
धम्माल पोरं आहेत एकेक.
धम्माल पोरं आहेत एकेक.
अर्थात 'आपण'ही तसच होतो म्हणा.
हा किस्सा मी इथेच कुठेतरी आधी टाकला असावा.
मला केजीला असतांना शाळेत बाईंनी विचारले," वाघ कुठे रहातो?"
मला एकच वाघ माहित होते. आमच्या घरी येणारे बाबांचे मित्र वाघ काका!
मी ठामपणे उभे राहुन उत्तर दिले," वाघ ५५० ला रहातो." ( ५५० क्वार्टर्स असे घराच्या क्षेत्रफळानुसार नावं होती आमच्या कॉलनीला-राहुरी कृषी विद्यापीठात)
नंतर किती तरी वर्ष आई घरी येणार्या जाणार्या प्रत्येकाला हा किस्सा ऐकवायची.
म हा न आहेत एकेक नमुने!
म हा न आहेत एकेक नमुने!
रच्याकने, आता कार्टी म्हणत नाहीत का पोरांना कुणी?
रच्याकने, आता कार्टी म्हणत
रच्याकने, आता कार्टी म्हणत नाहीत का पोरांना कुणी? >>> मी माझ्या लेकीला म्हणतो कार्टे, पण मगुन आईचा धपाटा खातो अजूनही
लक्स : अवांतर हे ल्युमिनॉसिटी
लक्स : अवांतर
हे ल्युमिनॉसिटी म्हणजे प्रकाश/उजेड मोजण्याचे मेट्रिक परिमाण आहे. एक एकक पृष्ठभागावर किती प्रकाश पडला याचा हिशोब.
हे पूर्वी कँडल पॉवर मधे मोजत असत. म्हणजे अमुक दिवा १५ कँडल पॉवरचा आहे, ~= १५ मेणबत्त्या एकत्र पेटवल्यावर जितका उजेड पडेल तितका देतो. अशाच प्रकारे (गाडीच्या) इंजिनाची ताकत हॉर्सपॉवर मधे मोजत असत.
लक्स साबणातला लक्स हा लक्झुरी या शब्दातली पहिली तीन अक्षरे घेतलेला पार्ट आहे.
हे ल्युमिनॉसिटी म्हणजे
हे ल्युमिनॉसिटी म्हणजे प्रकाश/उजेड मोजण्याचे मेट्रिक परिमाण आहे. एक एकक पृष्ठभागावर किती प्रकाश पडला याचा हिशोब.>>
इब्लिस, धन्यवाद, पूर्ण माहिती दिल्याबद्दल. मला लक्स म्हणजे प्रकाशकिरणे मोजण्याचे परिमाण एवढेच माहिती होते.
गोष्टीगावाचे, झंपी,
९३ च्या बॅचला मी आठवीला होतो. तेव्हा भौतिकशास्त्रात त्याचा उल्लेख होता. त्याआधीच्या किंवा नंतरच्या अभ्यासक्रमात आहे की नाही माहिती नाही.
आता कार्टी म्हणत नाहीत का
आता कार्टी म्हणत नाहीत का पोरांना कुणी? >> मी म्हणते वैतागून मुलगा खूपच मस्ती करायला लागला की... "बापावर गेलाय कार्टा..." मला धपाटा मारण्याची हिम्मत कार्ट्याच्या बापात नाही

(कोंकणात शिंच्या, कार्ट्या हे जिव्हाळ्याची संबोधने आहेत... नावापेक्षा याच संबोधनांनी संबोधले जाते.. अगदी काय चुरूचुरू बोलते कार्टी असं एखादी म्हातारी कौतुकाने बोलते एखाद्या आगाऊ रत्नाला)
घाटावर राहताना मात्र पोरका ह्या अर्थी हा शब्द वापरतात त्यामुळे चुकून माझ्या तोंडून हा शब्द निघाला की फटके मिळायचे रूमीज चे
बाकी सर्वांचे किस्से एकापेक्षा एक...
आणि मलाही लक्स चा अर्थ समजून घ्यायला शेवटची ओळ वाचावी लागली नाहीतर माधुरीचा नी जुहीचा साबण यात गैर काय असंच वाटलेलं.
माझ्या घरी कोणत्या मुलीने
माझ्या घरी कोणत्या मुलीने त्रास दिलाकी " किती त्रास देते पोट्टी असे म्हणतात " आता माझी ३ वर्षाची लेक मला पण कधी कधी पोट्टी म्हणते
कार्टा शब्दाचा हा अर्थ माहिती
कार्टा शब्दाचा हा अर्थ माहिती नव्हता. आपल्यासाठी मात्र कॉमन होतं हे विशेषण
सई, वापरायला की वापरून
सई, वापरायला की वापरून घ्यायला
मलाही माहीत नव्हता याचा अर्थ... वात आणणार्या पोराला (पोर पण म्हणत नाहीत म्हणे... ) हमखास वापरले जाणारे शेलके विशेषण असंच वाटायचं...
छे, वापरायला कुठलं,
छे, वापरायला कुठलं, आमच्यासाठी वापरलं !!
मी गर्दभ म्हणते! माझं पोरगं फारसा वात आणतच नाही काही मुद्दाम म्हणण्याइतकं, म्हणुन त्यातल्या त्यात...
आपण शाळेत इत्क्या गष्ष्टि
आपण शाळेत इत्क्या गष्ष्टि शिकतो ज्यचा कहि उपयोग होत नाही. त्यामुले विसरतो. टोच्या यन्ना सुधा ़ कदचित या प्रसन्गामुले लक्शात रहिले असेल लक्स बद्दल. दिवे घ्या ह!
किति अवघड आहे इथे टाइप करण? अनुस्वार कसा द्यायचा?
अर्चना, टोच्या यन्ना सुधा ़
अर्चना,
टोच्या यन्ना सुधा ़ कदचित या प्रसन्गामुले लक्शात रहिले असेल लक्स बद्दल. >>
अगदी अगदी. केवळ लक्समुळेच हा प्रसंग लक्षात राहिला. ( अवांतर- आणि हो, आठवीला हिंदीमध्ये ‘किंकर्तव्यविमूढ होना’ असा वाक्प्रचार होता, त्याचा उच्चार सरांनाही जमला नव्हता आणि अर्थही समजला नव्हता. मी आधीच तो गाईडमध्ये वाचलेला असल्यामुळे भर वर्गात सुस्पष्ट वाचून अर्थही सांगितला होता, हेही आठवतेय. )
आर्चना... अनुस्वार द्यायला
आर्चना... अनुस्वार द्यायला इंग्रजी मोठा एम M किंवा .n वापरा...
संत = saMta, sa.nta
आज लेकीचा किस्सा. wild
आज लेकीचा किस्सा. wild stoneची अॅड पहिली असेल ना? दिया मिर्झा च्या उघड्या पाठीची?
त्याचे गाणं नक्की काय आहे, माहित नाही, पण माझी लेक ते म्हणते.
"रंगी"ला ह्या काय झाले रे?
Pages