सचिन फॅन क्लब

Submitted by फारएण्ड on 27 November, 2013 - 01:49

सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजची बेकरीतील चर्चा

नंद्या च्या या क्लिप च्या लिन्क मुळे सुरू झाली Happy
http://www.youtube.com/watch?v=-ReOv4H1Iw8

फारएण्ड | 27 November, 2013 - 02:10

सही क्लिप्स आहेत नंज्ञा. बहुधा २००९ मधल्या न्यू झीलंड दौर्‍यातील आहेत. जबरदस्त शॉट्स.

हे माझ्याकडून रिटर्न फेवर. क्वालिटी खास नाही, पण केवळ स्ट्रेट ड्राईव्ह्स करता सुद्धा बघावी अशी क्लिप. हवेत स्विंग होता असे कॉमेंटरीवरून वाटते.
http://www.youtube.com/watch?v=diLSgU5cloU

संपादन

फारएण्ड | 27 November, 2013 - 02:22

सशल तुझी पोस्ट आत्ता नीट वाचली. ते न्यूझीलंडचे बोलर्स आहेत. ख्रिस मार्टीन व काईल मिल्स ओळखले मी. एक फ्रंट फूट ड्राईव्ह, एक बॅक फूट ड्राईव्ह, एक कट, एक दोन डिफेन्सिव्ह शॉट्स परफेक्ट "मिडल" केलेले, त्यामुळे पाहायला एकदम मस्त, रिप्ले मधे व नाईटव्हिजन मधे बॉल बरोबर बॅटला जेथे लागायला हवा तेथे लागतोय ई.ई.

एका डिफेन्सिव्ह शॉट मधे नीट पाहिलेस तर रिप्ले मधे दिसेल की आधी पुढचा पाय तो पुढे टाकायला जातोय, फ्रंट फूट शॉट मारायला, पण बाउन्स कळल्यावर लगेच मागे येउन तेथल्या तेथे तटवलाय. स्क्वेअर कट मारतान बॉलच्या वरून बॅट "रोल" केलेली, त्यामुळे लगेच बॉल जमिनीवर पडून जातो, नो रिस्क. ते लेग साईड चे एक दोन शॉट्स म्हणजे भारतीयांची खासियत. लेग ला आलेला बॉल बहुतांश खेळाडू ऑन साईडला तटवतात. अझर, सचिन, लक्ष्मण आणि द्रविडही ते लेगला थोडे मागे फिरवायचे व सहसा फोर्स मारायचे, कारण फील्ड सेटिंग मधे तेथे फिल्डर्स नसत. त्यात अझर आणि लक्ष्मण तर अचाटच.

Man! I could do this the whole day! स्मित नंद्या, तूही सांग असे काही जाणवलेले.

संपादन

नंद्या | 27 November, 2013 - 05:20

पहिला शॉट ... स्क्वेअर ड्राईव्ह [बरोबर ना रे फारेण्डा?] ... डाव्या हाताने दिशा तर उजव्या हाताने ड्राईव्ह. स्लोमोमध्ये बघितले तर बॉल [१३० के च्या वेगाने - २२ यार्ड ~३ ते ४ सेकंदात होतात, म्हणजे १/२ सेकंदात बॉल कुठे टप्पा घेईल, आणि कुठे येईल त्याप्रमाणे तुमचा कुठला शॉट खेळणार त्यानुसार बॅटची बॅकलिफ्ट इ.इ. गोश्टी येतात] हातातून सुटल्यानंतर एका सेकंदात वगैरे सचिनचा शॉट ठरतो, त्याचे पाय, हात, बॅट आपापल्या जागी येतात. ही झाली पूर्व तयारी. [इथे माझे हात आपोआप जोडले वगैरे जातात स्मित ]

बॉल टप्पा घेऊन उडताना बॅट मागून पुढे येते, तिला लागणार मोमेंटम फ्रंट फूट्मुळे मिळतो, बॅटला बॉल लागतो तेव्हा बहुत करून बॅट फिरते, इथे सचिनची ग्रिप [हात] फिरते, बॅट नाही. स्लोमोमध्ये पण बॅट एकदम स्मूथ दिसते. बॉल शेवटपर्यंत पहात रहाण्याचे त्याचे कसब जबरदस्त आहे. त्यामुळे त्याचे एक दोन शॉट्स जागा न मिळूनही झक्कास बसलेले आहेत.

शेवटचे म्हणजे त्याचे अनेक शॉट्स जेव्हा बसतात, तेव्हा तो त्याच्या चवड्यावर असतो. महान बॅलंस लागतो असे शॉट खेळायला, बॅकफूट पंच त्यामुळेच अफलातून आहे त्याचा. तसेच स्ट्रेट ड्राईव्ह [ड्राईव्ह कसला, नुस्ता पुश वाटतोय]

विशेष म्हणजे यातला एकही बॉल खराब बॉल नाही आहे.

*मला क्रिकेटचे प्रशिक्षण नाही आणि खेळायचा अनुभवही कमीच आहे. त्यामुळे चुभूद्याघ्या.

फारएण्ड | 27 November, 2013 - 05:48

त्याचे ड्राईव्हज जनरली पुशच वाटायचे. त्यामुळेच बॉल एवढा वेगात कसा निघून जातो याचे नेहमी आश्चर्य वाटायचे. त्याच्या बॅलन्स बद्दल तर तज्ञ लोक कायम सांगत असतात. आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या दृष्टीकोनातून सहज दिसणारी गोष्ट म्हणजे शॉट मारताना किंवा नंतर तो कधीही ऑकवर्ड दिसत नाही. बहुतांश ग्रेसफुलच असायचा तो. आउट ऑफ फॉर्म असतानाचे काही अपवाद.

मी वरती ती ९५ ची लिन्क दिली होती त्यात तो कोणत्याही दुखापतीपूर्वीचा सचिन जबरी आहे. जड बॅट ने कट्स, पुल्स, हुक्स मारताना कसलीही अडचण दिसत नाही.

सचिन ऑसीज, इंग्लिश व आफ्रिकन समालोचकांना पहिला जाणवला तो त्याच्या बॅकफुट वरच्या पंचेस, ड्राईव्ज व कट्स मधून. हेच फटके आपले बरेचसे लोक तेव्हा मारू शकत नसत. भारतीय उपखंडात पाटा पिचेस वर बहुतेक बॉल्स (अगदी शॉर्ट पिच सुद्धा) फ्रंट फूट वर किंवा आहे तेथेच उभे राहून मारता येतात. परदेशात बॅक फुट गेम सॉलिड असावा लागतो - कारण खेळपट्ट्या बाउन्स् ला सपोर्ट करत असल्याने बोलर्स तसे बॉल टाकतात व अशा वेळी बॅक फुट वरूनच खेळावे लागते. आणि बॅक फूट वरून खूप शॉटस मारले की नाईलाजाने बोलर ला लेन्थ बदलावी लागते.
(हे आमचे अफाट तांत्रिक नॉलेज गोड मानून घ्यावे व चुभूद्याघ्या)

संपादन

भास्कराचार्य | 27 November, 2013 - 05:59

क्रिकेटवरचं तुमचं बोलणं पाहून राहवत नाही. वरच्या लिंक्स खरंच खूप सुंदर आहेत. robelinda चा tribute video पाहिला का तुम्ही? त्यातदेखील खूप छान फटके आहेत. ( http://www.youtube.com/watch?v=GzjVDaRFLzg )

मला सचिनचा अजून एक खूप आवडणारा शॉट म्हणजे पॅडल स्वीप. दुसरा कोणी तसा मारताना मी क्वचितच पाहिला असेल. हमखास रन्स आणि झकास बॅलन्स (मी स्वतः तसा मारायचा प्रयत्न करून पडून झालंय) ... Efficient and beautiful at the same time!

नंद्या | 27 November, 2013 - 06:19

भास्कराचार्य. नाय ओ तो विडीओ दिसत नाय ना.

पॅडलस्वीप बद्दल खरे आहे तुमचे. बॅट फेस डाउन आणि बॅट फेस साईडवेज (आउटसाईड ऑफ बॉल्ससाठी) असे दोन प्रकारे तो वापरायचा.

बाप माणूस !!

भास्कराचार्य | 27 November, 2013 - 06:43

अर्रर्र ... काही दिवसांपूर्वी दिसत होता की! फारएण्ड ह्यांनी म्हटल्याप्रमाणे नुसत्या स्ट्रेट ड्राईव्जसाठीसुद्धा बघायला हवा तो. जस्ट मिसिंग ऑफ आणि जस्ट मिसिंग लेग असे दोन्ही आहेत त्यात. माझ्याकडे आहे तो. संपर्कातून वगैरे देता येईल का?

तुम्ही म्हणता त्यातला बॅट फेस डाऊन वाला माझ्या फार आवडीचा. Immaculate! बांग्लादेशविरुद्ध २०१० मध्ये खेळताना शकिब अल हसनच्या स्लो लेफ्ट आर्म बोलिंगविरुद्ध त्याने खूप छान वापर केला होता.

त्याचं उभं राहणंही खूप हुशारीचं असतं असं वाटतं. कधीकधी तो कव्हर्सकडे toe करून असतो तर कधी थोडे स्क्वेअरिश असतात point कडे असं मला वाटतं. बहुधा बाउन्स असला की स्क्वेअरिश. पण ह्यावर कधी कुणाला बोलताना फार ऐकलं नाहीये. (त्यामुळे चुकीचंही असू शकेल.) तुमचं काय मत?

वैद्यबुवा | 27 November, 2013 - 07:32

Man! I could do this the whole day! >>>> हाहा I bet you could!
एकदम दर्दी लोकांची मैफिल जमली की इथे! भारी! वेळ मिळाला तर थोडा माझाही दर्द पाजळेन उद्या. स्मित

नंद्या | 27 November, 2013 - 10:09

त्याचा स्टान्स दुखापतीनंतर बदलला. जाणीवपूर्वक आठवायचं झालं तर वॉर्नला लेगस्टंप बाहेर उभा असलेला हीच एक आठवण आहे. एवढा बारीकसा बदल मी नोटीस केला नाही कधी.

>>अफाट तांत्रिक नॉलेज
तांत्रिकबाबा की जय. तू लिही रे स्मित

बुवा जरूर लिही.

फारएण्ड | 27 November, 2013 - 10:12

त्याच्या उभ्या राहण्यातला बदल (स्टान्स मधला सोडला तर) मीही नोटिस केलेला नाही कधी. पण आता हे माहीत असताना बघितल्यावर लक्षात येइल कदाचित.

बुवा, दर्द पाजळा जरूर.

आणखी एक पॅटर्न म्हणजे जेव्हा तो अ‍ॅग्रेसिव्ह असायचा तेव्हा बॉल टाकताना त्याची मूव्हमेण्ट वेगळी जाणवायची. तो फ्रंट फूट पुढे वरती म्हंटलो तशी. नाहीतर थोडा जखडल्यासारखा वाटायचा.

संपादन

भास्कराचार्य | 27 November, 2013 - 10:45

टोजचे नक्की काय ते माहीत नाही (माझी नजरभूल असेल) पण तो बर्‍याच शॉट्सच्या वेळी चवड्यांवर असायचा ह्याचे कारण बहुधा बॅकफूट प्लांटेड नसला की फीट मूव्ह्मेंट चांगली होते हे असावे. तो त्या वेळी ग्रेसफुल असायचा (हाय दैवा! भूतकाळात बोलायचे दिवस आले - हा आमचा दर्द) हे केवळ तोच आणि तोच करू जाणे! ____/\____ अप्रतिम बॅलन्स आणि अतिशय फ्री मूव्ह्मेंट! फारएण्ड म्हणतात ते बरोबर आहे. अ‍ॅग्रेसिव्ह असताना आणि दडपण नसताना रूम घेणे हे फार पटकन व्हायचे त्याच्याकडून. Free his arms अशी काही वेगळी अ‍ॅक्शन आहे असे वाटतच नसे.

वैशाली. | 27 November, 2013 - 11:18

प्लीज्..हे असच चालु ठेवलत तर नंतर बहरात हलवा....

नंद्या | 27 November, 2013 - 11:44

>>(हाय दैवा! भूतकाळात बोलायचे दिवस आले - हा आमचा दर्द)
+१ मगाशी भूतकाळाचे लिहीताना हेच्च मनात आले होते.

नंद्या | 27 November, 2013 - 11:52

भास्कराचार्य लिंबो कट कधी सुरू केला असावा त्याने ?

फारएण्ड | 27 November, 2013 - 12:17

माझ्या आठवणीत यशस्वीरीत्या २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात. तेथे बाउन्स व कॅरी मुळे बॉल बाउंड्रीसुद्धा पार करू शकतो कधी कधी.

दोन तपे खेळून झाल्यानंतर एखाद्या दिग्गजाच्या शैलीत एक नैसर्गीक सहजता येते. फलंदाजाला पूर्वी जे शॉट्स मारण्यासाठी पुस्तकात सांगितल्याप्रमाणे विशिष्ट स्नायूंचा वापर करून, विशिष्ट फूटवर्क सांभाळून अचूक टायमिंग सांभाळावे लागते, तेच शॉट्स इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर एखाद्या सहज स्फुरलेल्या काव्यासारखे प्रवाहीपणे येऊ लागतात.

अलीकडे, सचिन हाफ व्हॉलीवर येऊन षटकार मारण्यापेक्षा बॅटला मुक्त बॅकस्विंग देऊन मग मनगटाच्या बळावर फुल फॉरवर्ड स्विंग देऊन मोठा फटका मारताना दिसू लागला. बघणार्‍याला असे वाटेल की किती सहज शॉट मारला, पण बहुधा त्यामागे प्रदीर्घ साधना हेच कारण असू शकेल. रिचर्ड्सला ही सहजता किंचित आधीच गवसली असावी असेही वाटते. मध्यंतरी आय पी एल मध्ये एका फलंदाजाने नुसते ढकलल्यासारखे करत स्ट्रेट ड्राईव्हवर चौकार घेतला होता. गावसकरही कमेंट्री करताना अवाक झाला होता.

ही सहजता सचिनच्या ठायी येण्यापूर्वी सचिनने पुस्तकातील आणि पुस्तकाबाहेरील सर्व शॉट्सवर मास्टरी मिळवलेली होती, हे मात्र क्वचितच कोणा फलंदाजाला जमले असेल. जसे, मोहिंदरलाच हूक जमायचा आणि विश्वनाथला स्क्वेअर कट, पण सगळे शॉट्स एकालाच अगदी ठाम पुस्तकीपणेही आणि वेळ पडली तर कसेही जमणे हे सचिनमुळे पाहायला मिळाले असे वाटते.

(गावसकर तंत्रबाह्य अगदीच क्वचित खेळला आणि द्रविड आवश्यक असताना तंत्रबाह्य खेळलाही पण त्याने सचिनइतका प्रदीर्घ कालावधी काढलेला नाही फील्डवर)

धाग्यासाठी आभार फार एन्ड!

सचिन विरूद्ध मॅग्राथ. त्याच्या करीयरमधली सर्वात टफ फाईट. वेळोवेळी मॅग्राथने सचिनला लौकर उचललाय, तर तशाच अनेक वेळा सचिनने त्याला धुतलाय तरी किंवा त्याला सहज खेळून मोठी धावसंख्या रचली आहे. सचिन वरच्या जबाबदारी मुळे त्यात कसा फरक पडला त्याचे उदाहरण देतोयः

१९९९ मेलबोर्न कसोटी. सचिनला या सिरीज च्या आधी माहीत सुद्धा नसलेले काही लोक घेऊन तो गेलेला होता. टीमचा कप्तान म्हणून स्वतःचा आक्रमकपणा गुंडाळून ठेवलेला सचिन सावध खेळताना. येथे एक जबाबदार, मॅच्युअर सचिन दिसतो. मॅग्राथ त्याला शॉर्ट बॉल टाकून उचकवायचा प्रयत्न करतो. स्लेजिंग यात दिसत नाही, पण फॉलो थ्रू मधे त्याच्या जवळपर्यंत जाऊन खुन्नस देत त्याच्याकडे बघणे ई. टीपिकल फास्ट बोलर टॅक्टिक्स.
http://www.youtube.com/watch?v=8xeUgAMAdXs

नंतर सुमारे एक वर्षाने पुन्हा मॅग्राथ ला तोंड देताना. मध्यंतरी कप्तानपद सोडलेला व "मोकळा" झालेला सचिन. त्याने मॅग्राथ ला धुवायचे ही टीम स्ट्रॅटेजी. अशीच पद्धत आपण २००१ च्या वन डे सिरीज मधेही वापरली होती.
http://www.youtube.com/watch?v=iK46ndO66yY

टेस्ट आणि वन डे मधल्या फलंदाजीचा फरक लक्षात घेतला, तरी बॉडी लॅन्ग्वेज मधला फरक सहज जाणवतो.

नंद्यानी दिलेल्या लिंक मधला शेवटचा शॉट जबरी आहे.. जनरली टेस्ट मध्ये तो शॉट मारला जात नाही.. ऑफसाईडचा बाउन्सर सोडला जातो.. पण सचिननी अगदी आरामात त्या बॉलला नुसती दिशा देऊन सिक्स मारली आहे.. आणि नंतर हॉटस्पॉट मधे तो बॉल कुठे लागला बॅटवर ते पण दाखवले आहे.. तेव्हाच कळत की तो बॉल की बरोबर पद्धतीत मारला आहे ते.. बॅटच्या मधोमध घेऊन मारलाय तो बॉल

मस्त धागा! काल मास्टरक्लास या स्टार क्रिकेट वरच्या कार्यक्रमात शेन वॉर्न आला होता. त्याच्या आवडत्या सचिनविकेट्स बद्दल बोलताना त्याने http://www.youtube.com/watch?v=F3I_LMlMiuA या एलबीडबल्यूची चर्चा केली.
त्याच्या मताप्रमाणे तोपर्यंत (सचिन ५२वर आहे) सचिन स्पिन पूर्ण ओळखून अगदी व्यवस्थित खेळत होता त्यामुळे एखादा 'स्ट्रेटवन' टाकायचा त्याने विचार केला आणि विकेट काढली. पण हे सगळे सांगताना,त्याच्या बोलण्यात 'माझा स्ट्रेटवन त्याला कळला नाही' याचे आश्चर्यच जास्त जाणवत होते. सचिनची विकेट काढायला किती विचार करावा लागतो याचे उत्तम उदाहरण.
हा एपिसोड मिळाला तर लिंक नक्की देईन

त्याच्या मताप्रमाणे तोपर्यंत (सचिन ५२वर आहे) सचिन स्पिन पूर्ण ओळखून अगदी व्यवस्थित खेळत होता त्यामुळे एखादा 'स्ट्रेटवन' टाकायचा त्याने विचार केला आणि विकेट काढली. पण हे सगळे सांगताना,त्याच्या बोलण्यात 'माझा स्ट्रेटवन त्याला कळला नाही' >> तो अजूनही ९८ चा दौरा विसरला नाहिये हे कारण. चेन्नईमधली दुसरी इनिंग पूर्णपणे परत बघता आली पाहिजे.

नंद्या, 'त्या' शॉटला लिंबो कट म्हटलेले मी फक्त त्या वेळीच ऐकले आहे. सहसा त्याला रॅम्प शॉट असे काहीतरी म्हटले जाते. सचिनने खेळलेला माझ्या माहितीतलाही तो ०७/०८ चाच पहिला. २००३ च्या आधी He would have looked to pull. हा शॉट खेळताना डोके बरेच स्थिर हवे. बोलरने बॅट्समनला फॉलो केल्यास आउट होण्याची शक्यता असते.

चेन्नई मधली पूर्ण इनिंग कुठे मिळेल का माहीत नाही, पण हे हायलाईट्स - http://www.youtube.com/watch?v=otPZnUJWf5g

फारएण्ड, सचिन विरुद्ध मॅग्राथ च्या लिंका छानच. चेन्नई २००१ च्या वेळेसदेखील मजा आलेली! ह्यावर तुम्ही अजून लिहिलेले वाचायला आवडेल.

धाग्यासाठी धन्यवाद. Happy

नंद्या, 'त्या' शॉटला लिंबो कट म्हटलेले मी फक्त त्या वेळीच ऐकले आहे. सहसा त्याला रॅम्प शॉट असे काहीतरी म्हटले जाते. > अरे हेन्री ब्लोफिल्ड होता त्याने वापरलेला तो शब्द. सचिनच्या खेळासाठी होता ते आठवत नाहि..

१९९७ च्या SA tour मधे zim.विरुध्द बेनोनी इथे सहेबांनी ब्रांडीस का स्ट्रिक (नक्की आठवत नाहीये) ला yorker वर सिक्स मारला होता.मिड्ल स्टंप वर yorker होता. साहेबांनी थोडे स्टंप्स uncover करत अगदी सरळ बॅट ने अक्षरश: लहानशा खड्ड्यातून बॉल उचकटावा तसा बॉल उचकटून तो सिक्स मारला होता.निव्वळ अविश्वसनिय असा शॉट होता तो.आपल्याला फायनल ला क्वालीफाय व्हायला ६ च्या सरसरिने ४० ओव्हर्स मधेच टारगेट गठायचं होतं. साहेबांची सेंचूरी..
कुणाकडे ह्या वीडीओ ची लिंक असेल तर शेअर कराल का प्लीज?
या शॉट नंतर मी आणि मित्राने T.V. समोर सरळ डोकं टेकवलं होतं. Happy

लोकहो, तुम्ही फॅन आहात हे सिद्ध करा. एखादे स्कोअरकार्ड, क्लिप किंवा मॅच चा संदर्भ देऊन त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते लिहा. ते वस्तुनिष्ठ, बॅलन्स्ड ई. असायची येथे गरज नाही. आपण फॅन्स आहोत Happy

श्रीयू - ही कॉमेण्ट तुमच्याबद्दल नाही. तुमची पोस्ट आवडलीच.

भास्कराचार्य, चेन्नई २००१ बद्दल मी आधी एका लेखात लिहीलेले आहे. सचिन चेन्नईला कायमच चांगला खेळलेला आहे, त्याबद्द्लच्या. तेथे क्लिप्स ही आहेत.
http://www.maayboli.com/node/4835

श्रीयू, हा घ्या बेनॉनीचा व्हिडीओ. जिथे तो सिक्स आहे तिथूनच सुरु होणारी लिंक आहे. ह्यामध्येही साहेबांचे बरेच फटके दिसून येतात. repertoire झकास! कव्हर्समधून गोळीसारखा सूं सूं करत जाणारा खास! आणि फारएण्डनी म्हटल्याप्रमाणे working the ball on the on side पण फार सही!

www.youtube.com/watch?v=E4IOUpMu9WI&t=6m7s

फारएण्ड, धन्यवाद लिंकबद्दल. छान लिहीले आहे तुम्ही. वाचून सगळ्या आठवणी जाग्या झाल्या, म्हणून पुन्हा एकदा इनिंग बघून घेतली. Happy

आपण सगळ्यांनी एक गोष्ट मार्क केली असेलच. आपल्या हेल्मेट वर बी. सी. सी. आय. च्या लोगो खाली भारताचा छोटासा तिरंगा सचिन लावायचा. माझ्या मते टीम मध्ये तो एकटाच असा होता जो हे करायचा. त्या साठीही साहेबांचं अप्रूप आणि प्रचंड कौतुक वाटयचं . Happy Happy त्याचं एकट्याचं असं स्पेशल हेल्मेट होतं की तो स्वत: असं स्टीकर लावायचा कोण जाणे. नंतर सेहवाग पण असं करायला लागला. याबद्दल फ़ारसं कुठे वाचायला नाही मिळालं.

Pages