Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाज्याचे
भाज्याचे लोणचे - फ्लॉवर्,गाजर्,आल, मटार्, हिरवी मिरची आवङत असल्यास मुळा. हे सगळ साधारण सारख्या सायीज मधे चिरुन मीठाच्या पाण्यात १ दिवस ठेवावे, मग ते उपसुन त्यातील पाणी काढुन टाकावे , त्यात मोहरीची डाळ, थोडी मेथीची पावडर,थोड मिठ, हळद घालुन बरणीत भरावे. थोड तेल गरम करुन,परत गार करुन त्यात घालावे, शिवाय लिबाचा रस काढुन तो पण घालावा. हे लोणचे जास्त टि़कत नाही.
रव्याच्या
रव्याच्या केकचं मिश्रण ४/५ तास तसच ठेवुन मग केक करायचा असतो. मिश्रण जरा जास्त वेळ ठेवले तर चालेल का? म्हणजे ८-९ तास? एक प्रोब्लेम आहे. मला शुक्रवारी रात्री केक करायचाय. तर सकाळी ऑफिसला जाताना मिश्रण बनवले व ऑफिसमधुन आल्यावर केक केला तर कसा होइल?
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
दुध जास्त
दुध जास्त उरल तर खीर सोडून काय करता येईल?
१. दुधाचे
१. दुधाचे दहि, दह्याचा चक्का, चक्क्याचे श्रीखन्ड/ श्रिखन्ड वडि
२. पनीर
३. दहि वडे/ कढि
४. बासुन्दि
अरे माझ्या
अरे माझ्या प्रश्नाचे कोणीतरी उत्तर द्या रे! किती ठिकाणी विचारु??
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
माधवी, मी
माधवी, मी आत्ता सिन्गापूरच्या विमानतळावरुब लिहितोय. हे केकचे मिश्रण जास्त वेळ ठेवले तर ते आम्बायची शक्यता आहे तसेच रवा जास्त्य बिजल्याने केकला हवी तशी जाळी पडणार नाही
मला
मला कोणीतरी मदत करा प्लीज. या वीकांताला गाजर हलवा बनवायचाय दहा लोकांसाठी. नेहमी मी पारंपारिक पद्धतीने करते दूध आटवून वगैरे पण यावेळी वेळ फार थोडाय माझ्याकडे. तेव्हा तासन तास दूध आटवत बसण्याऐवजी रिकोटा किंवा दूध पावडर घालीन नि मायक्रोवेव्ह मधे करून पाहीन म्हणते. कोणी केलाय का? रिकोटा बरे की दूध पावडर? इथे मी फक्त फॅट फ्री दूध पावडरच बघितलीय. तर त्याने चांगला होईल का? जरा साग्रसंगीत रेसिपी टाका प्लीज कोणीतरी...
------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सुमॉ मी
सुमॉ मी कन्डेन्स्ड मिल्क घालून करते गाजर हलवा. पटकन होतो. अगदी थोडं दूध घालायचं गाजर शिजायला हवं म्हणून आणि मग एकदा गाजर शिजलं की कन्डेन्स्ड मिल्क घालुन हवी असेल तर साखर घालायची.
सुमा, हो ग
सुमा, हो ग होतो चांगला फॅट फ्री दूध पॉवडर घालून. रिकोटा माझे फेव नाहीये कारण मला ती चव काही आवडत नाही आपल्या मराठी अॅटममध्ये.
१)काय कर दोन वाटी दूधी\गाजर किस मस्त आधी तूपात जरासा शिजवून परतला की त्यात दूध पॉवडर टाक मग पाव वाटी कंडेन्स्ड मिल्क टाक. वर थोडे दूध टाक किंचित. मंदाग्नी वर झाकून ठेव मस्त आपोआप खवा होवून छन हलवा होतो. इथे साखरेची सहसा गरज नाही पण तुला गोड किती लागते तसे टाक.
२)जर कन्डेन्स्ड मिल्क नसेलच टाकायचे तर हरकत नाही. भरपूर दूध पॉवडर(पावूण वाटी) टाकून किंचित दूध घालून झाकून ठेव. मग शेवटी साखर टाक.
धन्स मनु,
धन्स मनु, फुलपाखरू.
सांगते कसा झाला ते. शनिवारी करीन.
------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
माधवि! रवा
माधवि! रवा चांगला भाजला असेल तर पाऊण ते एक तास मिश्रण भिजले तरि केक चांगला होईल.
सुमॉ, मी
सुमॉ,
मी झटपट गाजर हलवा करायचा असेल तर जेव्हा वेळ असेल तेव्हा गाजर किसुन कुकर मधे शिजवुन घेते. त्यातले पाणी काढायचे आणि शिजलेला किस शीतकपाटात ठेऊन द्यायचा. जेव्हा हलवा करायचा असेल तेव्हा किस किंचित माय्क्रो मधे गरम करायचा, पातेल्यात तुप घालुन हव असेल तर थोडासा परतायचा. वरतुन कंडेन्स्ड मिल्क्/मिल्क पावडर + दूध घालुन एकजीव करायचा, आवशय्क तेव्हढी साखर, सुकामेवा इ.इ घालुन थोडा घट्ट करायचा. झाला हलवा तय्यार (हे तु मायक्रोत पण करु शकशिल). गाजर आधीच शिजलेले असल्यामुळे हलवा व्हायला वेळ लागत नाही. अर्ध्या-पाऊण तासात तयार होतो.
हाय, फ्रेंच
हाय,
फ्रेंच बीन्स ची ग्रेव्ही वाली / क्रीम घातलेली भाजी ची क्रुती माहित आहे का कुणाला?
जुन्या हितगुजवर बघितल... सगळे प्रकार करुन झालेत. काहीतरी वेगळं हवय...
मी बीन्स आधीच गोल चिरुन ठेवल्यात त्याचे दुसरे काही करता येइल का?...
@prajaktad, रवा
@prajaktad, रवा भाजुन घ्यायचा? मला वाटले उलत न भाजताच घेतला तर केक छान होतो!
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
लाजो
लाजो फ्रेंच्बीन्स खूप बारीक चिरल्या आहेत का? तर बटर मधे परतून वर व्हाईट सॉस व मिरीपूड घालून छान लागतात. जरा मोठेसे एक इंचाचे तुकडे असतील तर झटपट माखनवाला स्टाईलने भाजी करता येईल.
लाजो,अनानी
लाजो,अनानी धन्यवाद. एका गेतटुगेदरचा इटालीयन मेनु ठरतोय्,त्यासाठी पाहीजे होते.
अजून एक प्रश्न. हा पार बॉइल्ड राइस काय प्रकार आहे. आपला साधा तांदुळ चांगला की हा उकडा तांदुळ?
कुणाला
कुणाला माहित आहे का कि इंडिअन स्टोर मध्ये जे Black Cumin Seeds मिळतात ते म्हणजेच कारळे का?
मला कारळाची चटणी करायची आहे.
Black Cumin Seeds -
Black Cumin Seeds - शहाजीरे
खुप लिंब
खुप लिंब आणली आहेत. अर्ध्यांच लोणच घातल. बरीच उरली आहेत. आणखीन काय करता येईल? सरबत केल तर काय preservative घालता येईल?
धन्यवाद
धन्यवाद मृणमयी !!
माधवी !
माधवी ! खालिल लिंक पुर्ण वाचा.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/117889.html?1160993202
धन्स
धन्स सुपर्णा,
काल गाजर, कॉर्न आणि कांदा/टॉमॅटो/आलं/लसुण पेस्ट घालुन केली भाजी. चांगली लागली. तुझी पोस्ट आधी वाचली नव्हती पण पुढच्या वेळेस करुन बघेन.
माश्यांच्
माश्यांच्या अंड्यांची भाजी कशी करतात? बहुतेक caviar processed असते, तर त्याची भाजी बनवता येते का?
सिझलर्स ची
सिझलर्स ची रेसिपी कोणी देईल काय?? सोबत जे वेगवेगळॅ सौसेस त्यांची रेसिपी मिळाली तर चांगले. मी नेटवर पाहिले पण चांगली रेसिपी मिळाली नाही.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
प्राजक्ता,
प्राजक्ता, मी रव्याचा केक केला आजच पण रवा भाजला नाही. आधी एकदा केला होता तेव्हा भाजुन घेतला होता. काही फारसा फरक जाणवला नाही. रात्री मिश्रण भिजवुन सकाळी केला. छान झाला.
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
amayach>>>> इथे
amayach>>>> इथे पहा लेमन स्क्वॉश वर बर्याच पोस्ट्स आहेत.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/102339.html?1138120363
माणसा दुका
माणसा
दुकानात कव्हिआर नावाने बाटलीत किंवा छोट्या डब्यात मिळणारी अंडी तशीच खायची असतात.
चांगला पांढरा ब्रेड, पातळ स्लाइसेस, त्यावर चांगलं फ्रेश क्रीम बटर ( लॅंड ऑफ लेक्स नव्हे ) अन त्यावर थोडी थोडी कॅव्हियार. सोबत शँपेन किंवा चिल्ड व्होडका बर्फावर.... यम्मी यम्मी. खास सोबत पाहिजे पण हे खाताना
अजून पण कृती सापडतील गूगलवरून.
बाकी पारंपारिक पदार्थात माशांच्या अंड्यांना गाभोळी किंवा गाबोळी म्हणतात. त्याची ' भाजी' करत नाहित, माशांच्याच आमटीत घालतात नाहीतर तवा फ्राय करतात. जुन्या माबोवर सापडेल कृती.
इथे स्पेशल्टी सी फूड दुकानात शॅड रो, किंवा ब्लू फिश रो नावाने गाभोळी मिळते- ती चांगली लागते.
बाकी भारतात सुरमई किंवा कर्ली मासे घेतले की त्यात पुष्कळदा मिळते गाभोळी.
धन्यवाद
धन्यवाद शोनु... सापडली http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/113014.html
आणि caviar चे काय करायचे ते सांगीतल्याबद्दल देखील धन्यवाद
माणूस माशा
माणूस
माशाची अंडी म्हणजे गाबोळी असेल तर त्याची भाजी करता येते. ही गाबोळी एका फडक्यात बांधायची आणि हे बांधलेले फडके टोपात पाणी घालुन उकळवुन घ्यायचे त्यामुळे गाबोळी फुटून पाण्यात पसरत नाही. नंतर बांधलेले फडके पाण्याबाहेर चाळणीत ठेवायचे म्हणजे पाणी निथळून जाते. मग लसूण ठेचून फोडणीला टाकायचा आणि हिंग, हळद, मसाला घालुन ही फडक्यातली गाभोळी सोडून घालायची. परतवुन थोडी वाफ आणायची मग मिठ, थोडे आंबट कोकम किंवा लिंबू पिळला तरी चालेल. आणि वरुन कोथिंबीर पेरुन पर्त एक वाफ आणुन गॅस बंद करायचा.
ही गाबोळी न उकळवता मिठ मसाला हळद मिठ लाऊन तळताही येते. पण तळताना ही बर्याच वेळा फुटते. म्हणून मंड गॅस वर तळायची किंवा तांदळाच्या पिठाचे किंवा बेसनच्या पिठाचे सुके कोटींग लावायचे.
दड्पे
दड्पे पोह्याची कृती कोणी सांगेल का?
Pages