Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लेमन स्क्वॉश

Hitguj » Cuisine and Recipies » पेये » लेमन स्क्वॉश « Previous Next »

Moodi
Monday, January 23, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१ लिटर रस निघेल एवढी लिंबे, २ ते अडिच किलो साखर, १ लिटर पाणी, तीन चतुर्थांश चमचा सोडीयम बेंझॉइट, पाव टीस्पुन पिवळा रंग, पाव टी स्पुन लेमन इसेन्स.

कृती : ताजी व रसाची लिंबे घ्यावीत. धुवुन कोरडी करावीत व १० मिनिटे कोमट पाण्यात बुडवुन ठेवावीत, म्हणजे मऊ होतील.
सर्व लिंबाचा रस काढुन तो स्वच्छ गाळणीने गाळुन घ्यावा. नंतर साखर व पाणी एकत्र करुन gas वर ठेवा. साखर विरघळुन पाक झाला की gas बंद करा. थंड झाला की त्यात लिंबाचा रस ओता. तो चमच्याने ढवळुन घ्या. नंतर कलर व इसेन्स टाकुन परत ढवळुन घ्या. निमुळत्या तोंडाच्या बाटलीत ते भरा. रस व बाटली दोन्ही थंड हवे.
प्रिझर्व्हेटीव्हज वापरायची आवश्यकता नाही. परंतु अधिक महिने टिकवायचे असल्यास पाउण टीस्पुन potassium meta by sulphate घाला.


Veenah
Monday, January 23, 2006 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, एक लिटर रसासाठी पन्नास लिंबे तरी आणावी लागतील नाही ग? की जास्त लागतील? आणि preservative तू वरती एक सांगीतले आहेस आणि नन्तर शेवटी दुसरे तर नक्की कुठले घालायचे? chemical चा वास आलेला आमच्याकडे फारसे आवडत नाही म्हणून मला घरगूती पद्धतीने टिकवायचे आहे. without preservative हे concentrate fridge मधे ठेवले तर टिकेल का?

Moodi
Monday, January 23, 2006 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीणा हो ४० ते ५० तरी मध्यम आकाराची लिंबे लागतील. बाकी ती फ्रिझमध्ये टिकवायची असल्यास आपल्याला दिनेश सांगतील.
प्रिझर्व्हेटीव्हज नाही घातले तर काय घालु शकतो हे दिनेशच सांगु शकतील. अन त्याना आता यायला रात्रीचे १० तरी वाजतील


Dineshvs
Tuesday, January 24, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोठ्या प्रमाणावर करायचे नसले तर प्रिझर्वेटिव्ह घालायची गरज नाही. बाटल्या कोरड्या असाव्यात. पाण्याचा थेंबहि लागु देऊ नये, अशी पथ्ये पाळली तर सरबते टिकतातच.
आणि अशी आपण किती टिकु देतो ? महिनाबहर तर कशीहि टिकतात.
घरचे सरबत म्हणुन जास्तच प्रेमाने प्यायले जाते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators