पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्ड्पे पोहे करायला पातळ पोहे लागतात. आधी कादा बारीक चिरुन घे, त्यात टोंमॅटो, कोथीबिर आणी ओल खोबर घाल, आता तेलाची फोडणी करुन दाणे तळुन घे ही फोडणी वरील मिश्रणावर घाल, त्यात पातळ पोहे घालून कालव आणी थोडावेळ झाकण ठेउन दे. १०-१५ मिनटानी खा.

धन्यवाद जोगळेकर !!

दडप्या पोह्यांमधे आलं घालावं. किसुन. खुप छान लागतं. नी गाजर पण बारिक किसुन घातलं तर अजुन छान. नी बारिक शेव वरुन!
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

दडपे पोह्यात आवडत असल्यास हिरवी मिरची चिरुन घालतात. आम्ही पापड भाजून कुक्सरुन घालतो. टोमॅटो नसेल तर लिंबु पिळला तरी चालतो.

माझ्या कडे green lentils (whole ) आहे त्याला मराठित काय नाव आहे व त्याचे काय करता येइल.

बेक कचोरि ची रेसिपि कोनि सागेल का( sour cream use करुन)

मी आजच खस्ता कचोरी बनवतेय बेक करून्च. रात्री घरी लिहिते. Happy

धन्यवाद दिनेश आणि मनिषा लिमये.
मी अळीवाचे लाडू करुन बघितले, छान झाले.फ्रीजमधे आठवडाभर टिकले.
दोन आठवड्यापूर्वी मला मुलगा झाला.त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला वेळ लागला.
मोडाच्या मेथीची उसळ पण मस्त लागली, विशेष म्हणजे माझ्या ५ वर्षाच्या मुलाने देखील आवडीने खाल्ली.(मटकी समजून).
दिपा

दिपा खुप खुप अभिननंदन!!! Happy
.......................................................................

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

दिपा तुमचे खुप खुप अभिनंदन.

दिपा तुमचे खुप खुप अभिनंदन.

तुमची 'विचारपुस' चालु नाहीय, म्हणुन इथे.. Happy

साधना..

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

पाकातली पुरी किंवा पाक-पुरी ची रेसिपी कोणी सांगू शकेल का? माझी आई फक्त रवा दह्यात भिजवून पुर्या करते. पण भारतात मिळतो तसा बारिक रवा मला इथे कुठे दिसला नाही. कुणी अमेरिकेत पाकातली पुरी करून बघितली आहे का?

सोहा! 'सेमोलिना' मिळत असल्यास तो वापरुन बघा.

दिपा

धन्यवाद मनीषा, जागु आणि साधना

दिपा

अभिनन्दन दीपा. बाळ कसे आहे?

मी काल समुद्रमेथी की कयसं म्हणतात ती भाजी आणली आहे. [म्हण्जे १० रु. ला ५ बरीक बारीक जुड्या मिळतात ती] मागे एकदा तेलावर कांदा परतुन ही भाजी केली होती पण आणखी कोणत्या प्रकारे करता येइल ती? कोणाला महीत असेल तर प्लिज सांगा.
.......................................................................

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

मनिषा, त्याचे घावन खूप सुंदर होतात. देठांसकट बारीक चिरून घावनाच्या पीठात घाल आणि घावन घाल. किंवा थालिपीठात पण घालू शकतेस.

इडली बरोबर नारळाच्या चटणी शिवाय अजुन कुठल्या चटण्या करता येतात. म्हणजे सोप्या अशा. नारळ
खवण्याचा कधी कधी कंटाळा येतो. :). डाळींची कुठलीतरी चटणी करतात ना, तिची कृती कुठे मिळु शकेल?
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

२ मुठ शेंगादाणे , २ चमचे डाळे , मिरची , मीठ, साखर चवीला हे सगळं मिक्सर मधुन फिरवुन लाल मिअरची, कडिपत्त्याची फोडणी द्यायची.

२ मुठ डाळे, २ पाकळ्या लसुण, दहि, मीठ, मिरची सगळं मिक्सर मधुन फिरवुन लाल मिअरची, कडिपत्त्याची फोडणी द्यायची.

कॅव्हियर बरोबर मूळ्याचा किस पण घेतात म्हणे !!!

धन्यवाद अश्विनी . बाळ मजेत आहे.
मेथी पाउडरचे लाडू शिवाय अजून काय करता येईल?कणीक मळताना मिसळली तर चालेल का?

दिपा

जोशी किन्वा प्रिया ची रेडीमेड मिळते. त्यात तेल किन्वा दही घालायचे.किन्वा वरून मोहरी कडीपत्ता फोड्नी द्यायची. अर्थात हा सोपा पर्याय झाला.

मनिषा समुद्री मेथीच्या भाजीत बटाटा ही घालता येतो.
आमटीत चिरुन टाकता येते.
पराठा करता येतो.
मेथीच्या वड्या, मुटके करता येतात.

जोशी किन्वा प्रिया ची रेडीमेड मिळते. त्यात तेल किन्वा दही घालायचे.किन्वा वरून मोहरी कडीपत्ता फोड्नी द्यायची. अर्थात हा सोपा पर्याय झाला. >>> अश्विनीमामी तुम्ही हे चटणीबाबत म्हणत आहात का?

-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

व्हय जी.

बेक मटरि चि रेसिपि कोनि सागेल का?

घरात खूप सुका मेवा(खजूर्,बदाम,काजू,बेदाणे,आक्रोड वगैरे) शिल्लक आहे. फार दिवस ठेवले तर खराब होईल का? कोणी खात पण नाही आहे.हे वापरून कोणी काही रेसिपी सांगू शकेल का?

Pages