तू तिथे मी

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41

गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता बहुतेक तो दादा होळकर सत्याजितवर सूड उगवण्यासाठी त्याला काहितरी दुखापत करेल. मग सत्यजित मंजिरीचा धोसरा लावेल. मंजिरीच्या बाबांनी स्त्यजितला धमकी दिली असल्यामुळे मंजिरीसकट सर्वांचा हे बाबांनीच घडवून आणले आहे असा समज होईल. म्हणून मंजिरीला गिल्टी वाटेल व ती माहेर सोडून सत्यजितला वाचवण्यासाठी परत त्याच्याकडे जाईल व तिथेच राहील.
मग पुन्हा तेच रडगाणे चालू...अहो पण.. कसंय ना आई....तुम्ही असं का करताय....माझा तुमच्यावर पूर्ण विशास आहे.....वगैरे वगैरे:राग:

अरे तो चिमा स्वतःला फटके कधी मारुन घेणारे? एकदा जाहिरातीत दाखवल होत त्याला स्वतःला फटके मारुन घेताना प्रायश्चित्त म्हणुन.................

ते तांबडे बाबा चं गाणं कुणीतरी टाका ना खुपचं आवडलं मला ते.... !
माझी सौ. गुणगुणत होती सकाळीच... Biggrin

काही न पटणारे संवाद किंवा काही फालतू प्रसंग या मालिकेत असले तर मी मोठ्याने ऑsss करतो उलटी आल्यासारखा!
आणि नंतर 'मस्त चाललंय आमचं' मधील 'श्याss, आण्णा महाराज की जय!' असेही म्हणतो. खुपच रिलॅक्स वाटते. तुम्हीही प्रयोग करून बघा.
Happy

नाही ना ग चैत्राली.... ती जाहिरात होती प्रत्यक्ष घटना अजुन घडायची आहे.
कालच्या भागात सत्यजीत रात्री /पहाटे ३:३० वाजता फोन करतो.... फोनवर बोलता बोलता सरनाइक समोर आल्याने मंजिरी फोन बंद करते. सरनाईक परत सत्यजितला फोन लावतात आणि म्हणतात की "पुन्हा मंजिरीला वेळीअवेळी फोन केलात तर"..... इकडे सत्यजित लगेच "तर काय...... काय कराल..... "अरे काय ही अरेरावीची भाषा. हे म्हणजे गिरा तो भी टांग उप्पर अस झाल. कोल्हापुरकर असला म्हणुन काय झाल? मोठ्या माणसांशी कस बोलायच हे शिकवल नाही वाट्ट कोणी.

रच्याकने, हे मालिकेतील लोक कोणत्याही वेळी जागे कसे असतात? रात्रीची झोप नाही, दुपारची वामकुक्षी नाही.... बर रात्री अज्जिबात न झोपुन पण सकाळी हे फ्रेश. आम्ही तर ८ तासांच्या वर झोपुनही कधी चा घेतल्याबिगर फ्रेश दिसत नाही......

साकेता, मलाही तसंच वाटते आहे.

अरे काय ही अरेरावीची भाषा. हे म्हणजे गिरा तो भी टांग उप्पर अस झाल. >>+१

केली मी चूक, द्या मला शिक्षा...द्या मला शिक्षा. हे काय? शिक्षा नाही जणु खाऊच आहे!!

मंजिरीला फक्त राग काढायचा आहे त्याच्यावर, सत्यजीतला सोडणार असा फक्त आव आणलाय तिने.

ठिकैय. मी लिहीते ते गाणे ( अत्यानंदाने).

नैन तुम्हारे दर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा
तांबडे बाबा, तांबडे बाबा, तांबडे बाबा ( हे कधी तार सप्तकात तर कधी खर्जात म्हणावे), जमल्यास दादासारखा ग्यानबा तुकाराम डान्स पण करावा म्हणजे तांबडे बाबा अती प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. जसा दादा, देखण्या ताई आणी मोतीवाल्या बाईंना दिला तसा.:खोखो:

बाय द वे, त्या दादाला मोतीवाल्या बाईशी लग्न करायचे होते ना, मग त्याने तिच्या लग्नात कुठलेच विघ्न का नाही आणले बरे?:अओ: उग्गाच बिचार्‍या सत्याच्या मागे लागलाय, वात्रट कुठला.

आज सत्यजितने मोठ्ठा पराक्रम करून त्याच्या व मंजिरीच्या बाळाला तिच्या वडिलांच्या घरातून पळवून आणले.
रोज कोल्हापूर पुणे कोल्हापूर असा प्रवास करणे, भांडणं करणे, बायकोच्या माहेरी तिच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खोलीत खिडकीतून गुपचूप प्रवेश करणे, त्या छोट्या बाळाला घेऊन पुन्हा तिथून खाली उतरणे, बाळ व ड्रायविंग दोन्ही सांभाळत परत पुणे कोल्हापूर असा प्रवास करणे आश्चर्यमिश्रित कौतुक वाटत आहे. असे धाडस फक्त सत्यजितच करू जाणे. Lol

ते कोल्हापूर मध्येच आहेत.

खिडकीतून गुपचूप प्रवेश करणे, त्या छोट्या बाळाला घेऊन पुन्हा तिथून खाली उतरणे,>>>खिडकीतून आत येणे ठिक आहे पण बाहेर जाताना दार उघडून जाऊ शकतात की...

ते कोल्हापूर मध्येच आहेत.>>ओह ते कोल्हापूरला शिफ्ट झाले आहेत? हे माहित नव्हतं. म्हणजे मी सत्यजितचे केलेले कौतुक फुकट गेलं म्हणायचं.

रश्मी Rofl

बाय द वे, त्या दादाला मोतीवाल्या बाईशी लग्न करायचे होते ना, मग त्याने तिच्या लग्नात कुठलेच विघ्न का नाही आणले बरे?अ ओ, आता काय करायचं उग्गाच बिचार्‍या सत्याच्या मागे लागलाय, वात्रट कुठला.>>>> अग मोतीवाल्या बाई दादा तुरुंगात असताना पटकन लग्न उरकतात ना म्हणुन तो विघ्न आणु शकत नाही त्यांच्या लग्नात......

>>अरे तो चिमा स्वतःला फटके कधी मारुन घेणारे? एकदा जाहिरातीत दाखवल होत त्याला स्वतःला फटके मारुन घेताना प्रायश्चित्त म्हणुन

ही आपण एपिसोड्स बघावेत म्हणून केलेली ट्रीक असणार. चिमांला स्वतःला मारून घेणं जड जात असेल तर आम्ही येतो म्हणावं फटके मारायला.....

काल ते मंजिरीचे बाबा त्या बाळाशी गोड्गोड बोलत होते ते पाहून मला त्या बाळाची कीव आली. आता 'सत्यजितला माझ्या नादाला लागू नकोस म्हणावं' असं त्याच्या आईला सांगत होते मग तेव्हा त्या आशिषचा पूर्ण बिमोड करायचा ना. मग ही वेळच आली नसती.

तसही असेल स्वप्ना....

काल ते मंजिरीचे बाबा त्या बाळाशी गोड्गोड बोलत होते ते पाहून मला त्या बाळाची कीव आली>>>>> का माहित नाही पण रमेश भाटकर हा नट मला कधीच आवडला नाही Sad स्पेशली त्याच ते नाक उडवत बोलण.....

इथे सारख चिमा वाचलं की पुर्वी एक वाक्य गंमत म्हणून बोलायचे ते आठवत. "चिमा काय कामाचि". उलट वाचलं तरी तसच होतं.
ही मालिका पण तशीच आहे तेच ते उलट सुलट चालू असत सारख.

बाप रे, काल अनावधानाने होसूमीयाघ पाहिलं आणि अचानक चिमां दिसला हताश बसलेला. म्हणलं मानसिक अत्याचार सुरू होण्या अगोदर बंद करावा टिव्ही.. खाडकन बंद करून टाकला.

नॉकॉवरच्या रॉगॉला औचद क्कॉय, गॉलावरच्या फुग्यांच म्हॉण्ण तरी क्कॉय>>>अबोली Rofl

आगुदर ही शिरेल मी मासायंबाच्या किरपेने नाईलाजान वैतागत बगायची.. आताशी ही शिरेल कामेडी म्हणून बगतीया... फार म्हणजे फार मोकळं वाटतीया.. ही सगळी तुम्हा सगळ्यांचीच किरपा... किती म्हणून आभार मानू तुमचे Proud

नॉकॉवरच्या रॉगॉला औचद क्कॉय, गॉलावरच्या फुग्यांच म्हॉण्ण तरी क्कॉय>>>अबोली हसून हसून गडबडा लोळण

मी सिरीयल बघत नाही. पण जाहिरातीत बघितलं त्यानुसार मंजिरी सासरी असली की लांबलचक वेणी आणि माहेरी छोटे मोकळे केस असं काही कोडींग आहे का?

दक्षिणा ऑफिसात खूप काम आहे का ग? काहिच अपडेट नाहियेस बघ........ अग तुतिमी नंतर आपली बावरी राधा गळे काढत असते, त्यातच सीमावैनी ओरडत असते, सौरभ इकडे तिकडे करत असतो, केदार धा कत धा कत करत असतो आणि मग जानुतै येतात ६ सासवांना घेउन तारेवरची कसरत करत रोज रोज

Lol माझ्या डोळ्यासमोर हातात काठी घेऊन डोंबार्‍यासारखी कसरत करणारी जान्हवी आली.:फिदी:

काय मुग्धा, अबोली आणी स्वप्ना किती हसवता.:फिदी:

Pages