निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु,
ही रानभाजी पहिल्यांच पाहायला मिळाली. दोडका वर्गातील वाटते.

माझ्यासारखे १२ वाजता फोटो काढायला बाहेर जाणारे निशाचर पण दुर्मिळच असतील ना
कित्येकांना दिवसा फोटो काढणं जमत नाही आणि त्यामुळे रात्री फोटो काढणार्‍यांच कौतुक केलच पाहिजे. Lol

मला मदत हवी आहे.
दोन महिन्यांपूर्वी नव्या जागेत रहायला आलो. घरा एवढेच टेरेस गार्डन आहे. ९०० स्क्वे फूट. त्यात नीट माती टाकून घेतली. फुलवेली लावल्या. बहुतेक सगळ्या आल्यात. गुलाबही वाढताहेत. पपई, केळी छान वाढताहेत. काही भाजीपाला पण आहे. चुका, मेथी, अळू छान आलेत. वाल, दोडका अशा वेली ७-८ फूट उंच गेल्यासुद्धा.
पण सध्या सगळ्या झाडावेलींची पानं कुरतडलेली दिसत आहेत. गुलाबाच्या कळ्या खाल्ल्या. जरबेराची फुलंच्या फुलं खाल्ली. नीट बघितले तर पावसाळ्यात पैसा नावाच्या अळ्या निघतात त्या अळ्या ही पानं खाताहेत. बहुतेक माती सोबत या पण आल्यात. गोगलगायी पण पुष्कळच आहेत. शिवाय आम्ही टाकलेली भरपूर गांडुळं, फुलपाखराच्या अळ्या या ही आहेत. मला प्रश्न पडलाय की मित्रकीटकांना त्रास होऊ न देता शत्रुकीटकांचा नायनाट कसा करावा ?
जागूताई, दिनेशदा आणि इतर अनुभवी मंडळी, प्लीज मदत करा.

बर्‍याच दिवसांनी इथे आले आणि पोस्ट्स वाचून धन्य जाहले... Happy

हे फूल कोणते? फोटो अजिबात क्लियर नाहिये, चांगला काढून टाकेन नंतर. याचं आत्ता रान माजलंय सगळीकडे.. इन्सुलिनच्या झाडासारखे दिसते हे झाड.
Rut6134.jpg

रानभेंडी
Rut6127.jpg

गोव्यातील जायांच्या पूजेत जाईच्या फुलांनी सजवलेला हा रथ. म्हार्दोळचे महालसेचे संपूर्ण देऊळ जायांनी सजवतात या दिवशी.
Rut6099.jpg

मितान,

गोगलगाईंच्या नावावर जाऊ नको. त्यांच्या बाबतीत गोगलगाय आणि पोटात पाय ही म्हण अगदी योग्य आहे.

त्यांना नष्ट कर आधी. त्या महाभयानक असतात. माझ्या बागेतही आहेत. मी सरळ पाय ठेवते त्यांच्यावर. नो दयामाया. माझ्याकडेही सगळी पाने खाताहेत.

पैसे निरुपद्रवी आहेत , ते झाडाचे कुजलेले भाग खातात, पाने खायच्या भानगडीत पडत नाहीत.

बाकी काही रोग नसेल तर काहीही फवारण्याह्ची गरज नाही.

तुझ्याकडे जागा आहे आणि इच्छा आहे तर अम्रुतमिट्टी तयार कर. ती बनवताना जे पाणी बनवले जाते त्याची फवारणीही खु प चांगली असते.

पिशी अबोली. ते पहिले फुल मायबोलीवर आहे. गोल गोल जीन्यासारखी वनस्पती असते. नाव तोंडावर आहे पण आता आठवत नाही Happy

रथ मस्त.. किती फुले लागत असतील ना? आणि किती जण ओवत असतील हे गजरे...

अबोली, ते पेवाचे झाड आहे.

मितान,

एखाद्या झाडावर भरपूरच अळ्या असतील तर ते झाड उपटून नष्ट करावे लागेल. पण निसर्गात त्यांचेही शत्रु आहेतच. पक्षी, सरडे वगैरे येऊन त्यांना खातील. त्या किटकांच्या अळ्या असतील तर कोष करतील.
अळ्या घरात येणार नाहीत याची काळजी घेतली, तर निसर्ग त्याचे काम चोख करेलच.

पेव फुटणे याचीही आठवण झाली सांगलीसाईड्ला हळद साठवण्याकरिता जमीनीतल्या कणग्यांना
पेव म्हणतात.

अबोली, तो जायांचा रथ बघायचे खुप मनात होते. आज खुप छान वाटले. खरच! किती सुगंधित
वातावरण असेल.
मितान,
१ भाग गोमूत्र व ३ भाग पाणी मिसळून फवारणी करावी.

पण सध्या सगळ्या झाडावेलींची पानं कुरतडलेली दिसत आहेत. >>>> गोगलगायी याला कारण आहेतच, सुरवंटही कुठलीही पाने खाण्यात फार तरबेज असतात. त्याकरता फार जालीम नसलेली कीटकनाशके फवारा. पैसा मात्र निरुपद्रवी आहे.

साधना, गोगलगायी खूप आहेत.
अमृतमिट्टीची रेशिपी ? :))

येळेकर, गोमूत्र + पाणी फवारते आज. त्याने अपाय नक्की होणार नाही.

दिनेशदा, अळ्या एकाच झाडाला नाहीत. सगळीकडे थोड्या थोड्या आहेत.

शशांक, गोमूत्राने काम नाही झाले तर सौम्य की ना फवारेन.

पिशी अबोली, कित्ती सुंदर फोटो आलाय. केवढी जाईची फुलं !!!

गोगलगायींनी माझ्या कमळांची वाट लावली होती. आता कमळाचं टा़कं रिकामं..........कसंतरी वाटतंय बघायला.
हे काय आहे?........

मिरचीच्या झाडाला भरपूर फुले आली होती.त्यानंतर मुंग्यासदृश किड्यांचे घोस लागले. आज करु उद्या करु म्हणत
पाण्यात हळद घालून फवारले. आता मुंग्या नाहीत.पण फुले सर्व गळून गेली आहेत.नवीन कळ्या लागल्या. पण
देठ पिवळे पडून गळून जात आहेत.खत हवे असेल का? प्लीज उपाय सांगा.

येळेकर, बाजारात दाणेदार खत मिळते. ते थोडे थोडे वापरा. एका कुंडीला एक चहाचा चमचा पुरते.
मानुषी, ते तरवड ना ? तुमच्या नगरची खासियत !

या गोगलगायींना खाणारे पक्षी नाहीत का ? उघड्या चोचीचा एक बगळा असतो, तो या फोडून फोडून खातो.
पण तो आपल्याकडे नसावा. या गोगलगायी एवढ्या संख्येने गेल्या १०/१२ वर्षातच दिसायला लागल्या आहेत.

( नायजेरीयात या चवीने खातात, स्नेल सूप म्हणजे त्यांची डेलिकसी आहे. रेसिपी हवी का ? )

स्नेल सूपची रेसिपी??? Lol

दा, तरवड अशी दाट वाढते? मी इतकी दाट वाढलेली तरवड पहिल्यांदाच पाहिली. पुण्यात एकेकटे असते याचे झुडुप. अर्थात नगरच्या हवामानात वाढत असेल. (पण मला हे झुडुप कॅशिया युनीफ्लोराचं वाटलं.)

शांकली तेही असेल.
पण नगर भागात काही झाडे जरा वेगळ्या तर्‍हेने वाढतात. कडुनिंब, शिरीष, रामकाठी यात अगदी जाणवण्याएवढा फरक असतो.
पण मी अर्थातच पुणे-नगर रोड आणि कालव्याच्या आसपासचा भागच बघितलाय.

हो शांकली,
पेप्पे सूप ( मिरचीचे सूप ), काऊ टेल सुप ( अक्षरशः गायीच्या शेपटीचे सूप ) या पण तिथल्या डेलीकसीज आहेत.

थोडा फरक असू शकेल. तरवडाची पानं या फोटोतल्यांपेक्षा थोडी रुंद आणि आकार जरासा मोठा असतो. शिवाय तरवडीला ज्या शेंगा येतात त्या जरा हिरव्या आणि लांब असतात.

पेव. छानच आहे नाव.. Happy

दिनेशदा, यंदा जाईच्या पूजेचं १०० वं वर्ष होतं. पण एका बायपासच्या कामात काही मळे गेल्यामुळे फुलं मात्र कमी होती... Sad

आणि साधनाताई, त्या गावच्या जाया विशेष प्रसिद्ध आहेत. या पूजेच्या आदल्या दिवसापासून गावात कुणीही जाई विकत नाही (म्हणजे अक्षरशः एक जाईसुद्धा नाही) सगळी फुलं देवळात येतात. आणि पूजेच्या दिवशी सजावटीपासून पूजेपर्यंत सगळं फुलकार समाज करतो. हा समाज केवळ या पूजेच्या उद्देशाने बनला आहे आणि त्यात अजूनही कसलेही राजकारण नाही. १०० वर्षांपूर्वी गावात कसलीशी साथ आली होती म्हणे म्हणून या पूजेची सुरुवात झाली..

पूजेच्या दिवशी घमघमाट असतो नुसता..

पिशी अबोली.........रथ सुंदरच! पूर्ण गाव जाईच्या सुवासाने घमघमत असेल! माझ्याकडे जाई गेटपाशी आहे तर पूर्ण गल्ली घमघमते!
दिनेशदा........कधी कधी डोकं कसं काम करतं.........काऊ टेल सूप म्हटल्यावर आधी कावळ्याच्या शेपटाचं सूप असंच वाटलं. Biggrin
दिनेशदा शांकली........हे तरवड तिकडे अरणगावला मेहेरबाबा ट्रस्टच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात लावलं आहे. मध्यंतरी पाऊस नव्हता तेव्हा त्यांच्या इतर सगळ्या फुलझाडांच्या आणि (इतरही )मोठमोठ्या वाफ्यात मुळांशी याच्या फांद्या व्यवस्थित दाबून लावलेल्या दिसल्या. म्हणजे मुळं झाकली जाऊन त्याची आर्द्रता पुढील पावसापर्यंत टिकावी.( अर्थातच हा माझा अंदाज)

गोगलगायी फारच भयंकर असतात. त्यांचीं संख्या वाढ तर झपाट्यानी होते की नाहीश्या करणं अवघड होऊन बसतं. मध्यंतरी मला दिड दोन इंची गोगलगाय सापडली माझ्या झाडांमधे.

सध्या सुरवंट आणि आळ्या, ओहम सारख्या आळ्या बर्‍याच झाल्या आहेत आणि झाडांची वाट लावत आहेत.

परवा तुळशीच्या एका पानाला फेसाळ गोळा लागला होता, असे मी वेताळ टेकडीवर पाहिले होते, अस करणारा कोणता किडा असतो माहित आहेका?

परवा तुळशीच्या एका पानाला फेसाळ गोळा लागला होता, असे मी वेताळ टेकडीवर पाहिले होते, अस करणारा कोणता किडा असतो माहित आहेका? >>>> त्याला स्पिटलबग किंवा फ्रॉगहॉपर म्हणतात - या नावाने गुगलून पहा - सर्व माहिती मिळेल - (खालील फोटो आंतरजालावरुन साभार.......)

strawberry_spittle1_01_zoom.jpgspittlebug.jpg

तो फेस मी सगळीकडे बघितलाय. आधी वाटायचे कुणीतरी थुंकलय !
मानुषी, नायजेरीयात खास करून पोर्ट हारकोर्ट मधे पक्षी खुपच कमी दिसतात. सगळे सुपात गेले. आपल्याकडे पूर्वाचलात पण पक्षी दिसत नाहीत, त्यालाही हेच कारण.

मानुषी, नायजेरीयात खास करून पोर्ट हारकोर्ट मधे पक्षी खुपच कमी दिसतात. सगळे सुपात गेले. आपल्याकडे पूर्वाचलात पण पक्षी दिसत नाहीत, त्यालाही हेच कारण.>>>>>>>
काय सांगता काय दिनेशदा? म्हणजे मी फारसं चुकीचं वाचलं नाही क्काय!(काऊच्या शेपटाचं सूप!!) :स्मित :

गोमूत्राने काम नाही झाले तर सौम्य की ना फवारेन. >> हळद आणि हिंग पाण्यात मिक्स करुन फवारुनही सुरवंट आणि इतर बर्‍याचशा किडी जातात. घरात बाल्कनीत असले तर त्यांचा फार त्रास होतो. बागेत ठिके.

घरी ब्राम्ही आणली आहे. तीला अगदी बारिक निळ्या रंगाची फुले येतात.

गोगलगायींना कसे हाकलणार? छोट्या वडाच्या झाडात अगदी बारीक गोगलगाई आहेत. त्या वडाची बाहेरुन वाढलेली मुळं खाऊ न टाकतात.

गोगल गायींवरुन आठवल. पूर्वी आमची जेव्हा शेते लावली जायची तेंव्हा बर्‍याच गोगलगाई शेतात यायच्या. तेंव्हा कातकरी लोक गोणी घेउन यायचे त्या गोगलगाई पकडायला. शेतातून पकडून ते कुठेतरी विकायला न्यायचे, स्वतःही खायचे.

Pages