निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, मी सांगितलेले अतुल धामनकरांचे अरण्यवाचन पुस्तक घेच. तूला फुलपाखरांबद्दल बरेच काही कळेल.
आणि श्रावणीला पण आवर्जून वाचायला दे ते पुस्तक.

हो दिनेशदा मी ते आमच्या लायब्ररीत पाहीले आहे. नंतर घेउन जाईन म्हणून ठेवले होते मागे आता नक्की आणेन.

जागुले रात्री १२ वाजता काय करते गं कॅमेरा घेऊन? झोपत नाही का? (:स्मित : :दिवा:)
दिनेशदांच्या डिंगर्‍या आणि कोथिंबिरीची फुलं मस्त!

आज एक अतिशय दु:खद गोष्ट बघितली मी. पुण्यात टिळकरोडवर असलेला रतनगुंजेचा वृक्ष वठलाय. Sad
अगदी वाळून गेलाय. माझ्या अंदाजाने पुण्यात याचे अजून एक दोनच वृक्ष असावेत. एरवी या दिवसांत म्हणजे पावसाळ्यात याला अगदी सौम्य पिवळ्या रंगाच्या फुलबाज्या लागलेल्या असतात. पण ह्यावेळी ह्याची मात्र सगळी पानं, फांद्या जळून काळी ठिक्कर पडलीयेत. Sad

आणि दुसरी जरा दिलासादायक गोष्ट अशी की, टिळक स्मारक मंदिराच्या आवारातला मणिमोहर (कॉल्व्हिलिया रेसिमोसा) फुलावर आलाय. तसा हा पावसाळ्या नंतर फुलणारा पण यंदा जरा लवकर फुलावर आलाय. जमले तर नक्की इथे फोटो देईन.

शांकली, रतनगुंजा सहज रुजतात. ( प्रा घाणेकरांच्या मते त्या गरम पाण्यात भिजत घालाव्या लागतात. ) मुंबईत मलबार हिल / बाबुलनाथ भागात बरीच झाडे आहेत आणि झाडाखाली रोपे बघितल्यासारखी वाटतात.
अनेक जण समजतात तसे या गुंजांची पाने मात्र खाण्याजोगी नसतात.

होय दा, या गुंजांची पानं खाण्यायोग्य नाहीयेत. तसंच त्यांची पिल्लावळपण असते. पण पुण्यात इतका उपयोगी आणि सुंदर पानं असलेल्या या वृक्षाची संख्या मात्र अगदी एकाच हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहे.

तेच ते दोघे(कुंडीतले). एका टोमॅटोच्या झाडाला आलेले. त्यातलाही एकच पिकू लागलाय साइजही ओके वाढलाय.
आणि खाली जमिनीत बाकी टोंमॅटोच्या बीया आजिब्बातच रुजल्या नाहीत. आणि जी काही ७/८ रोपं आली होती सगळी गेली. आणि दुधीचेही ५/६ वेल आलेले गेले.(जमिनीतले.) का बरं झालं असेल असं?

व्वा! मानुषी, मला माझं बालपण आठवलं . आमच्याकडे सगळ्या भाज्या घरीच लावलेल्या असायच्या. टोमॅटोची तर बागच केली होती. आत्ताही ते डोळ्यासमोर येतात. Happy

जो_एस,
जास्वदींचा असा टु-इन-वन फुल पहिल्यांदाच पाहायला मिळालं.

जागु,
रात्री काढलेला हा छान फोटो दुर्मिळच म्हणावा लागेल.

दिनेशदा,
घरच्या डिंगर्‍या आणि कोथिंबीर !हे सगळं तुम्ही कधी करता हा प्रश्न पुन्हा पडलाच ..!!

या मुळ्याच्या शेंगा शेतात खुप जोरात वाढतात, एकदा याचा बहर सुरु झाला तर तो तोडणं वेळेवर व्हायला पाहिजे, नाहीतर या शेंगा कडक होतात. हे मुळे खाण्याचे काही खास फायदे आहेत का ?

मानुषी,
टोमेटोला उंदरांचा फार असतो उपद्रव.

अनिल,
इथे माझा प्रवासात अजिबात वेळ जात नाही. संध्याकाळी सहा, साडेसहाला मी घरी. मग काय वेळच वेळ. त्यात जेवण शिजवणे, जेवणे, पुस्तके वाचणे, खेळणे, फिरणे, व्यायाम, साफसफाई, सिनेमा बघणे, लहान मुलांशी खेळणे आणि बागकाम.. एवढेच तर असते करायचे Happy

मुळा ( शक्यतो कच्चा ) पचनासाठी चांगलाच. न कापता तसाच खायचा. शिवाय किडनी स्टोन्स वर पण उपचार
म्हणून देतात.

एवढेच तर असते करायचे..
दिनेशदा,
तुमचं हे 'एवढेच' आमच्या साठी 'एवढ' ?? वाटत...!
Happy

या मुळ्याच्या शेंगाबद्दल (डिंगर्‍याबद्दल) विकिपिडियावर माहिती दिसत नाही.

दिनेशदा, सध्या तुमचा मुक्काम कोणत्या देशात आहे. आज सकाळ मधे वाचले की केनयात काहीतरी बरीच गडबड चालू आहे.

मी सध्या अंगोलात आहे.
केनयात झाले ते भयंकर होते. तो मॉल माझ्या घरापासून जवळच होता. तो फारसा मोठा नाही पण जरा पॉश वस्तीमधे असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी असायची.
सोमाली लोक तसे तिथे बरेच आहेत. भरपूर पैसा राखून आहेत. व्यापारातही आहेत. वाणी मिठ्ठास असते. ते लोक असे काही करतील, याची तिथल्या लोकांना कल्पनाही नसेल.

दिनेशदा, सध्या तुमचा मुक्काम कोणत्या देशात आहे. आज सकाळ मधे वाचले की केनयात काहीतरी बरीच गडबड चालू आहे.
आमची शंका मिटली....

दा, तुम्ही सुखरुप आहात हे वाचून आनंद झाला. त्या भागातच तुम्ही रहात होतात म्हणजे तुम्हाला तिथल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

रात्री काढलेला हा छान फोटो दुर्मिळच म्हणावा लागेल.

माझ्यासारखे १२ वाजता फोटो काढायला बाहेर जाणारे निशाचर पण दुर्मिळच असतील ना Lol

जागू,
आम्हाला शाळेत धडा होता, " आणि त्यांचा दिवस सुरु झाला". जंगलातील प्राण्यांच्या रात्रीच्या हालचाली त्यात टिपल्या होत्या... आता हे तूला उद्देशून का लिहितोय, ते मात्र विचारू नकोस Happy

दा.......:हाहा:

जागुडे........... अं... नक्की काय प्रकार आहे???? Wink

मी केलं बाई मतदान..

जागू, त्या आशयाचा एक संस्कृत श्लोक पण आहे. या निशाचरांना... अशी सुरवात आहे.
जेव्हा सामान्य लोकांचा दिवस संपतो, तेव्हा त्यांचा दिवस सुरु होतो.. असा काहीसा अर्थ आहे. शशांक /शांकलीला माहीत असणार बहुतेक.

असं काहीसं आठवतंय!.....................................
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥
म्हणजे सगळे झोपतात तेव्हा संयमी..........बहुतेक ऋषी मुनी असणार ..........जागतात, ज्ञान प्राप्तीसाठी असा काहीसा अर्थ असावा!
आणि उलट.........म्हणजे सगळ्यांचा जो दिवस......तेव्हा मुनी ध्यान लावून समधिस्थ होतात म्हणजे ती त्यांची रात्र!
चूभूदेघे!

हो मानुषी, हाच तो श्लोक.
म्हणजे मी जागूचा गौरवच केला कि !

आपल्याकडे सलाड लीफ म्हणून फिक्कट पोपटी रंगाची पाने असलेली भाजी मिळते ती मी लावली होते. बिया अगदी बारीक जिर्‍यासारख्या होत्या.
त्याची पाने तोडण्याचा धीर झालाच नाही मला. आता त्याला पण तुरा येईल अशी चिन्हं दिसताहेत.

येस, जागूचा गौरवच केलाय दा तुम्ही....:स्मित: आणि मानुषी, श्लोक आणि त्याचा अर्थ एकदम बरोबर सांगितलास.

दा, त्या पानांचा आणि तुर्‍याचा फोटो इथे नक्की द्याल हं...

Pages