निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.
आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
कळलावी
कळलावी
जागु, कळलावी छान आहे. (मधे
जागु, कळलावी छान आहे. (मधे स्वल्पविराम आहे बर कां! )
कळलावी मस्तच... रंगपण कसले
कळलावी मस्तच...
रंगपण कसले भारी आहेत....
शोभे आहेस कुठे? हल्ली तुझ्या
शोभे आहेस कुठे? हल्ली तुझ्या हाका येत नाहीत.
नायजेरियात खुप मोठ्या
नायजेरियात खुप मोठ्या प्रमाणात बाजारात तुरटी असते. गोगलगायींना फोडून तुरटीच्या पाण्यात अनेकवेळा धुतल्यानंतर त्यांचा चिकटपणा जातो. ( मग त्याचे स्वादीष्ट सूप बनते, परत विचारतोय, रेसिपी हवी का ? )
रेसिपी हवी का ? गावठी मुग.
रेसिपी हवी का ?
गावठी मुग. हे मी लहानपणी अशा शेंगा झाल्यावर चाळा म्हणुन शेंगा सोलून खायचे.
तंबाखु पाण्यात मिसळुन झाडावर
तंबाखु पाण्यात मिसळुन झाडावर फवारल्यावर ही बरीच कीड मरते.. गोगलगाई दिसल्या की त्यावरही हे पाणी शिंपडायचे, खूप उपयोग होतो..
पूर्वी जेव्हा आम्ही बैठ्या
पूर्वी जेव्हा आम्ही बैठ्या घरात राहायचो, तेव्हा या गोगलगायी उंबर्यावर चढून घरात शिरायच्या. लक्ष्मणरेषा (बाजारात मिळते ती) ओढली की गोगलगायी आणि अन्य कीटकांचा उपद्रव टळला.
हॅ: इतक्या सुंदरीला कळलावी हे
हॅ: इतक्या सुंदरीला कळलावी हे नाव?
असो...........आत्ता आमच्या नगरात जहबहरहदहस्तह पाऊस कोसळतोय. अगदी मेघगर्जनेसह!
Its raining cats and dogs! दुपारी १ पर्यंत ऑक्टोबरचं ऊन होतं बाहेर........कडक.
शोभे आहेस कुठे? हल्ली तुझ्या
शोभे आहेस कुठे? हल्ली तुझ्या हाका येत नाहीत.>>>>>>>>>>तू हाकांना "ओ" देत नाहीस म्हणून मी हल्ली हाका मारत नाही
मग त्याचे स्वादीष्ट सूप बनते,
मग त्याचे स्वादीष्ट सूप बनते, परत विचारतोय, रेसिपी हवी का ?
त्यां गिळगिळीत गोगाना हात कोण लावेल?? त्यापेक्षा सुपच करुन पाठवा. मी एकदा ट्रवेल चॅनेलवर पाहिलेले हे सुप.
मानुषीताई नगरला यंदा पाऊस
मानुषीताई नगरला यंदा पाऊस चांगला पडलाना? आमचे स्नेही नगरला रहातात ते सांगत होते.
अरे खाद्य गोगलगायींना नावे
अरे खाद्य गोगलगायींना नावे ठेवू नका मंडळी.निदान एकदा तरी खाउन पहाण्यासारखा प्रकार आहे. माझ्या मुलांचा अतिशय आवडता प्रकार आहे.
फ्रेंच / इटालियन पद्धतीने भरपूर बटर, हर्ब्स घालून किंवा चिनी पद्धतीने आले, सॉय सॉस, ऑल स्पाइस घालून केलेले अगदी आवडीने खातात.
साबुदाण्याला गिळगिळीत, इयू , यक म्हटले तर कसे वाटेल ?
फ्रेंच, इटालियन, अमेरिकन, दक्षिण अमेरिकन लोकांमधे सुद्धा ऑक्स टेल सूप प्रसिद्ध आहे. शेपटापर्यंत व्हर्टीब्रे असतात अन त्यात भरपूर बोन मॅरो असते. ती अतिशय चविष्ट अन नरिशिंग असते.
आपल्याकडे जसं नारळाच्या झाडाच्या सर्व भागांचा वापर होतो तसा अनेक देशात प्राण्यांच्या शरीराच्या सर्व भागांचा वापर होतो. नैसर्गिक रिसोर्सेस वाया घालवू नये या प्रेरणेतून असे वापर करत आले असणार सर्व ठिकाणचे लोक.
सुपर मार्केटातून स्किनलेस - बोनलेस चिकन ब्रेस्ट , तयार पाकीटबंद खिमा किंवा माशाचे फिले आणण्याच्या जमान्यात हे सर्व 'ई, यक' इत्यादी वाटायला लागले आहे.
सिगरेटमधील तंबाखू काढून त्याचे पाणी आम्ही पण गुलाब, कढीपत्ता अशा झाडांवर फवारत असू. घरातल्या, अंगणातल्या झाडांकरता इतर रसायनिक कीटकनाशकांपेक्षा हे सेफ .
ग्लोरिओसा ( कळलावी ) चा फोटो एकदम भारी. ८० च्या दशकात भारतीय टपाल खात्याने यांचे फार देखणे स्टँप्स काढले होते. मुंबैच्या घरी अजून एखाद्या बॉक्स मधे असतील . पुढच्या खेपेस आठवले तर शोधून फोटो काढायला हवे त्यांचे पण.
जागूतै, याला हळदी-कुंकवाची
जागूतै, याला हळदी-कुंकवाची फुलंपण म्हणतात ना?
आमच्याकडे कोंकणीत तर याला चक्क 'वागाची नाकटां' (वाघनखे) म्हणतात...
साधना, त्यांची सुपाची रेसिपी
साधना,
त्यांची सुपाची रेसिपी म्हणजे पाण्यात उकळणे, त्यात हिरवा पाला घालणे आणि मग त्याला भोपळ्याच्या बिया
आणि सुकवलेली अख्खी कोलंबी याचे वाटण लावतात. फोडण्या वगैरे नसतात.
हे वाटण मात्र खुप हेल्दी आहे. तूम्ही लोक वापरू शकाल. त्यांचा भोपळा जरा वेगळा असतो. मोठा असतो पण त्याला शिराळ्यासारख्या धारा असतात. आत गर नसतो जास्त, बियाच असतात. तिथे बाजारात बायका पोत्यापोत्याने बिया सोलत बसलेल्या असतात. या भोपळ्याची पाने त्रिशूळासारखी असतात. ती पण खातात. मी खाल्ली आहे त्याची भाजी. छान लागते.
पाला मात्र भरपूर खातात. सुगंधासाठी सेंट लीफ वापरतात. त्याला ओव्यासारख्या वास येतो. पण ती खर्या ओव्याची पाने नसतात आणि आपण भजी करतो ती पण नसतात. मला शंका आहे कि ती माईनमूळ्याची ( गरमर ) ची पाने असावीत.
हो अंजू यंदा भरपूर पाऊस! अगदी
हो अंजू यंदा भरपूर पाऊस! अगदी आत्ताही जोरात चालू आहे. संध्या. ७पासून लाइट गेलेत.
पिशी अबोली माझ्या फुलांचा
पिशी अबोली माझ्या फुलांचा फोटो दिलात
आभार्स
( मग त्याचे स्वादीष्ट सूप
( मग त्याचे स्वादीष्ट सूप बनते, परत विचारतोय, रेसिपी हवी का ? )>>>>>
शेवटी एकदाची दिली बाई रेसिपी....
जागुडे, कळलावीचा फोटो (चे फोटो) सुंदर आलेत. अग्दी ज्या दिवशी उमलली त्याच दिवशी फोटो काढता आला असं वाटतंय.
अबोली, ही फुलं खरंच वाघनखांसारखी दिसतात हं.
जायांची पूजा म्हणजे नक्की काय ते कुणी समजावून सांगेल का?
दा, अवल ला तुम्ही पाठवलेल्या
दा, अवल ला तुम्ही पाठवलेल्या सूपच्या रेसिपी मधलं वाटण आवडलं (तिला ती रेसिपी वाचायला सांगितली) पण गो गा नक्को म्हणाली! (शिवाय तिला विचरलंय की काऊ टेल सूप ची रेसिपी पाठवायला सांगू का म्हणून!! ....पण त्यावर तिने काही इंटरेस्ट् दाखवला नाही!) जाउंद्या ज्याचं करायला जावं भलं.... :डोमा:............ शिवाय मी पण जास्त मागे लागले नाही तिच्या कारण न जाणो रागावली बिगावली तर माझी शिकवणी बंद व्हायची!!
http://www.goadoot.in/archive
http://www.goadoot.in/archives/sep/21/6.jpg
यात मधे 'गोमंतकातील पुष्पसंस्कृती' हा छान लेख आहे. यात जायांची पूजा आणि एकूणच गोव्याच्या पुष्पभक्तीबद्दल माहिती सापडेल.
अबोली, खरंच खूप मस्त लिंक आहे
अबोली, खरंच खूप मस्त लिंक आहे ही. मस्त माहिती मिळाली. फुलं कित्ती विविध पद्धतीने गुंफतात ना! आणि प्रत्येकाचं नावही वेगळं! इतक्या छान लिंक बद्दल मनापासून धन्यवाद.
हे वाचलंत का? चीनमध्ये
हे वाचलंत का?
चीनमध्ये किटकांच्या हल्ल्याने ४१ ठार, हजारों जखमी http://maharashtratimes.indiatimes.com/international/Swarms-of-hornets-k...
सुप्रभात.
सुप्रभात.
आणि अवल म्हणे, आम्ही
आणि अवल म्हणे, आम्ही मांसाहारी.. नायजेरियात जाऊन बघा म्हणावं.
राहुल, ते किटकांच्या हल्ल्याबद्दल याहू वर वाचले. भयानकच आहे.
अबोली, गोव्यातील बायकांनीच प्रेम करावे फुलांवर.
नमस्कार लोकहो !! हे इथे आधी
नमस्कार लोकहो !!
हे इथे आधी बघून/बोलून/चर्चून झालं असेल तर स्वारी (सॉरी) !!
इंग्लंडातल्या एका शेतकर्यानी एकाच झाडावर २५० जातीची सफरचंद घेतली (पिकवली) आहेत.
(dailymail.co.uk मधली बातमी आणि तिथलाच फोटो)
राहुल भायानकच आहे न्युज.
राहुल भायानकच आहे न्युज.
कळलावी - (Gloriosa superba )
कळलावी - (Gloriosa superba ) (सर्व माहिती विकिपीडीयावरुन साभार....)
किती विषारी आहे पहा ही -
This plant is poisonous, toxic enough to cause human and animal fatalities if ingested. It has been used to commit murder, to achieve suicide, and to kill animals. Every part of the plant is poisonous, especially the tuberous rhizomes. As with other members of the Colchicaceae, this plant contains high levels of colchicine, a toxic alkaloid. It also contains the alkaloid gloriocine. Within a few hours of the ingestion of a toxic amount of plant material, a victim may experience nausea, vomiting, numbness, and tingling around the mouth, burning in the throat, abdominal pain, and bloody diarrhea, which leads to dehydration.
आणि हीच कळलावी अतिशय औषधीही - (सगळ्यात शेवटी जे म्हटले आहे त्यामुळेच याचे नाव कळलावी असे पडले आहे )
The alkaloid-rich plant has long been used as a traditional medicine in many cultures. It has been used in the treatment of gout, infertility, open wounds, snakebite, ulcers, arthritis, cholera, colic, kidney problems, typhus, itching, leprosy, bruises, sprains, hemorrhoids, cancer, impotence, nocturnal emission, smallpox, sexually transmitted diseases, and many types of internal parasites. It is an anthelmintic. It has been used as a laxative and an alexiteric. The sap is used to treat acne and head lice. In a pregnant woman, it may cause abortion. In parts of India, extracts of the rhizome are applied topically during childbirth to reduce labor pain.
शकुन मी नव्हते ऐकले. खुप
शकुन मी नव्हते ऐकले. खुप मस्त.
शकुन, हे नव्हते
शकुन, हे नव्हते वाचले.
आपल्याकडे उत्तर प्रदेशमधे एकाच झाडावर अनेक कलमी आंबे घेण्याची बातमी वाचली होती.
दमणजवळ सांजण ( बहुतेक ) या गावी "चालणारे" आंब्याचे झाड आहे. ते सरपटत सरपटत पुढे पुढे जाते.
मिलिंद गुणाजीच्या पुस्तकात फोटोही आहे.
राहुल भयंकर आहेत ते किडे
राहुल
भयंकर आहेत ते किडे
शशांक
काल मी तो फेसाचा गोळा काडीनी डिस्टर्ब केला तर तो आणखीन वेगळा प्रकार होता. तो पुर्ण घट्ट तंतूंचा होता आणि आत अनेक पांढरी अंडी होती.
Pages