निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<दमणजवळ सांजण ( बहुतेक ) या गावी "चालणारे" आंब्याचे झाड आहे. ते सरपटत सरपटत पुढे पुढे जाते.
मिलिंद गुणाजीच्या पुस्तकात फोटोही आहे>>

क्लासच !! Lol नेट वर शोधून पहायला पाहिजे.

खुप दिवसांनी छान गप्पा आणि माहिती.

मितान,
या गोगलगाईंचा दुसरा एक मोठा धोका म्हणजे वेलींची मुळे खातात्,२-३ दिवसात या वेली पिवळ्या पडुन वाळु लागतात, यावर उपाय म्हणुन तंबाखुची पावडर पाण्याबरोबर वेलींना घाला.
पाण्याची मात्रा खुप झाली असेल, पाणी कमी करुन माती थोडी वाळु द्या, माती थोडी खाली-वर (खुरपणी) केली तर पुन्हा वेलींना नक्की जोर मिळेल.

गेल्या ८ महिन्यात कुंडीतल्या झाडांना खत घालायच राहुन गेलं, फक्त २ वेळा माती खालीवर केली,तर सगळी झाडे पुन्हा तरारुन आली.

जो_एस,शशांक
फेसाचा गोळा खुप पाहिले होते,पण त्याबद्दल आज खरी माहिती मिळाली.
हे गोळे गवतावर आणि ऊसावर (खोडावर) खुप बघितला आहे, हे गोळे पाहिले कि ऊस धुवुन खात होतो,या फेसाला थोडा शेवाळासारखा,वास देखील असतो.

जागु,
कळलावी चा फोटो छान आलाय.

लहानपणी शेतातील असे कोवळे मुग,चवळीच्या शेंगा खाण्याच्या सवयीमुळे साहजिकच यांच्या उत्पनात त्यावेळी नक्कीच घट झाली असेल अस आता वाटतं. Lol

शगुन,
छान माहिती.

दिनेशदा,
गोगलगाईची रेसिपी नोट केली आहे, आमच्याकडे दर पावसाळ्यात २-४ पोती गोगलगाई सहज गोळा होतील, इकडे कुणी खाल्ल तर ठिक नाहीतर तिकडे एक्सपोर्ट करु.:स्मित:

येस अनिल मी पण दोन गोणी पाठवते Lol

आता शेवंतीची रोपे नर्सर्‍यांनमध्ये फुलू लागली आहेत. मी आमच्या नर्सरीवाल्याला वेगवेगळ्या रंगाच्य शेवंत्या आणायला सांगितल्यात. माझ्या सगळ्या शेवंत्या पावसात खराब झाल्या आणि राहिलेल्या गड्याने जंगली झाड समजून उपटून फेकल्या.

जागू, तू खात नाहीस ?

लहानपणी मला समुद्रकिनार्‍यावर सापडतात ते गोल शंख म्हणजेच गोगलगाय वाटायची. ( त्यांना मालवणला घुला म्हणतात आणि त्या खातातही. त्यात छान गुलाबी / अबोली रंग असतात. ) मग खर्‍या गोगलगायीचे चित्र शाळेच्या पुस्तकात बघितले. खरं सांगतो, मालाडला त्या बघायलाही मिळत नसत.

चेंबूरला आल्यावर वेगळ्या गोगलगायी दिसल्या. काळ्या आणि जाडसर. मागे चिकट माग सोडणार्‍या. पण
त्यांच्या पाठीवर शंख नसे. या गोगलगायी ब्लेडच्या धारेवरूनही आरामात चालत जात असत. तसे प्रयोग आम्ही करत असू.

या शंखवाल्या मी नायजेरियातच बघितल्या पहिल्यांदा. चांगल्या माझ्या मुठीएवढा शंख असतो. सहा / सहा चे वाटे बाजारात असत. त्या तुरटीच्या पाण्यात धुवून घेतात आणि मग खातात.
आमच्या कंपनीचाही तुरटीचा कारखाना होता. टनावारी खप होता तुरटीचा. ( म्हणजे गोगलागायींचा किती खप असेल तो बघा. )

मेधा, तुमच्याकडे साफसुफ करुन डब्ब्यात पॅकबंद मिळत असतील गोगलगाई. इथे माझ्या दारात त्या फिरत असतात, मातकट रंगाच्या.. मला त्यांच्याकडे नुसते बघितले तरी किळस वाटते. त्यांना खायची कल्पना मी करुच शकत नाहलाउ:( Sad

सुप कोण क् रेल त्यांचे. मी मागे टिवीवर पाहिलेले त्यात त्या शंखासकट अख्ख्याच शिजवल्या होत्या ( सुपातच होत्या) आणि खाणारे टुथपिकसारखी काडी घेऊन आतला माल काढु न खात होते . Sad

त्याच्यावरुन आठवले. मागे तारकर्लीला गेले होते तिथे एक म्हाता-या बाई समु द्र कि नारी जे अतिशय छोटे शंख मिळतात ( त्यांना गोगा म्हणायला हरकत नाही कारण अगदी तसाच आकार असतो ) ते गोळा करत होत्या. मी वि चारले एवढी मेहनत का? तर म्हणाल्या त्याचे कालवण करणार..... आपल्या करंगळीच्या नखाएवड्या आकाराच्या
त्या गोल शंखामधुन निघणार त री काय आणि त्याचे कालवण करणार तरी कसे? मी त्यांआ विचारल्यावर त्या म्हण णाला की उकडुन घ्यायचे मग आतला जिव बाहेर येतो, मग त्याचे कालवण...

(मी गरीबी मुळे बाई असे करतेय की हा प्रकार खरेच डेलिकसी आहे याचा विचार करत होते, पण सरळ विचारणे बरोबर दिसणार नहई म्हणुन टाळले)

दिनेश तुमची शेवटची पोस्ट आता वाचली. मी वर जे लिहिलेय ते घुल्यांबद्दलच आहे. त्याना घुले म्हणतात हे माहित नव्हते.

प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आवडली पाहिजे असं नाही. आणि तसं म्हणायला काहीच हरकत नाही, पण मला असं वाटतं, आणि मेधाचाही हाच मुद्दा आहे की मागील पानावर कोणीतरी त्याला 'घाण' म्हणालं आहे तसं करु नये. आपल्याला न आवडणारा पदार्थ दुसरा कोणीतरी खाऊ शकत असेल. तर तो 'घाण' या सदरात जमा करु नये. याचं अजून एक उत्तम उदाहरण आहे मश्रूम्स.

सगळ्यांनी गोगा खावी असं मेधाचं म्हणणं नसणारच.

राहुल, ती न्यूज फारच भयानक आहे. मागे एक इंग्लिश फिल्म आली होती 'Bees' म्हणून त्यात पण मधमाशांकडून झालेले हल्ले दाखवले आहेत.

शकुन, मस्त लिंक. हे माहित नव्हते.

दा, चालणार्‍या आंब्याच्या झाडाबद्दल आजच कळाले. गंमतच आहे!

आज सकाळी सगळी झाडं बारकाईने 'वाचली'. नवीन कुरतडकर मंडळींनी नवे काही खाल्ले नाही. गोमूत्र + पाणी फवारून झालंय. गंमत म्हणजे या आठेक दिवसात गो गायी पण कमी दिसताहेत. या पावसाळ्यातल्या पाहुण्या होत्या का ? ( दिनेशदांच्या 'गो गा सूप ' ची रेसिपी बागेत मोठ्याने वाचावी का ??? मग बाकीच्याही जातील ! ) :))

काही झाडांना पाणी जास्त झालंय. झालं असं की, आम्ही रहायला येण्यापूर्वी बागेत जी माती होती ती एकदम दगडासारखी टणक झाली होती. भरपूर नवी माती घातली. वर जुनी पसरवली. ती ढेकळे फोडूनच. पण ती भुसभुशीत व्हायला वेळ लागेल असं वाटतंय. त्यात एका कृषी तज्ञ मित्राने सांगितलं की वरचा थर कोरडा होऊ द्यायचा नाही. म्हणून रोज पाणी घालतेय. शिवाय माती भुसभुशीत होण्यासाठी ' ऋषी कृषी' मधली अमृत मिट्टी, शेणखत, गांडुळखत आणि १५०-२०० गांडुळं मातीत सोडली आहेत. मातीचा कस कधी सुधारणार अंदाज नाही. सुरुवातीला पेरलेल्या भाजी बिया तुरळक उगवताहेत.
इति मम बाग पुराणम् संपूर्णम् ! Happy

जागुतै, हळदीकुंकवाची फुलं खासंच !

धन्स मितान.

आमच्या ऑफिसमध्येही मोठ्या मोठ्या गोगलगाई भिंतींवर फिरत असतात पावसाळ्यात. मी एकदा पावडर पफ च्या छोट्या झाडावर ह्या गोगलगाइंची मिटींग चालू असलेली पाहीली.

साधना, त्या घुला उकडून सूईने त्यातला जीव काढून त्याचे कालवण करतात. किचकट काम असते ते.

आमच्याकडे जमीन पोखरण्याचे काम वाळवी करत असणार कारण गांडूळे फारशी दिसत नाहीत. ( नाहीतच )
पण वाळवी जिवंत झाडे खात नसावी, किंवा झाडाचा जिवंत भाग खात नसावी.

शांकली, ते झाड एका पारशी फॅमिलीच्या मालकीचे आहे पण ते पुढे पुढे जात असल्याने ती जमीन पण त्यांना घ्यायची आहे. पुस्तक लिहिले त्या काळात त्या झाडाचा आंबा ५० रुपये प्रति नग, या दराने ते विकत असत.

त्या पुस्तकात महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणच्या अनेक नैसर्गिक चमत्कारांबद्दल लिहिले आहे. या सर्वांचा अनुभव त्याने स्वतः घेतला आहे.

जागू, तू खात नाहीस ?

नाही दा. जर आमच्याइथे हे खाण्याची परंपरा असती किंवा मार्केटमध्ये वाटे लागले असते तर कदाचीत खाल्ले असते. तसे ह्यासारखे कितीतरी गुळगुळीत प्रकार खाण्यात येतात. जसे खुबड्या, खुबे, कालव.

किती पाऊस कोसळतोय अजून...कंटाळा आणला...आणि आता छान झालेल्या भाताच्या पिकांची वाट लागणार... Sad

दसर्‍याला नवीन भात तयार असला पाहिजे. कोजागिरीला तर खळ्यात पडला पाहिजे.
पावसाला सांगायला पाहिजे.

जागू,
मला पण असंच वाटतय. हि गोगलगाय आपल्याकडे अलिकडेच दिसायला लागली आहे. पुर्वीपासून असती
तर लोकांच्या खाण्यात असती.

मस्त फोटो जागु..

मी गोगा (स्नेल्स ना?) खाल्लेत एका फ्रेंच रेस्टॉरेंट मधे.(बटर गार्लिक सॉस मधे बेक केलेले). अवाच्यासव्वा किम्मत होती म्हणून आवडले असतील कदाचित Wink

शकुन, मलाही नव्हती माहिती ही बातमी.. इंटरेस्टिंग!!!

खरच्,खुपच सुन्दर महिती आणि फोटो बघायला मिळाल्यामुळे मनाची प्रसन्नता नविन माहितीकडे वळ्ते.

माझ्या घराची एक बाल्कनी उत्तरेला तर एक पश्चिमेला आहे. आता आता पर्यंत उत्तरेच्या बाल्कनीत दिवसभर उन असायचे काल बघितले तर दिवसभर सावली. मग सगळ्या कुंड्या पश्चिमेला हलवल्या. दुपारी १ नंतर तिथे उन असणार आता.

हे उत्तरायण / दक्षिणायन भारतात एवढे लक्षात यायचे नाही, आफ्रिकेत मात्र ठळकपणे जाणवते.

जागु, ह्या फ़ोटोंनी धागा हिरवा केलास.>>>>> अगदी अगदी..:स्मित:

दा, तुम्ही द. गोलार्धात ना....

आता शरद ऋतू जाणवायला लागलाय. आकाशमोगरा ऊर्फ गगनजाई (बूच) फुलू लागलाय. तळाशी फुलांचा खच पडलेला असतो.....इतका की फुलं चुकवून चालताच येत नाही. आणि त्या स्वर्गीय सुगंधाबद्दल काय बोलावं?? आहाहा...ह्या अगदी गगनचुंबी वृक्षाची फुलं मात्र एकदम डाऊन टू अर्थ असतात नाही? उमलतात पण धरतीकडे बघत आणि नंतर झेपावतात पण तिच्याच कडे. फक्त इतर फुलांसारखं कोमेजून नाही तर अगदी टवटवीत असतानाच!

फुलं मात्र एकदम डाऊन टू अर्थ असतात नाही? >>>>>>>>मस्त कल्पना ! खरंच असंच आहे.
आणि हा वास नवरात्राशी निगडित आहे.

सुदुपार! काय सुंदर कलर आहे जागु या फुलाचा! Happy

गोगांबद्दल वाचत होते. आमच्याही बागेत खुप झाल्यात. शंखातल्या नाही. मातकट कलरच्या आहेत. इतका वैताग आणलाय त्यांनी की बस्स! जर्रा दारं-खिडक्या उघड्या राहिल्या की घरात शिरतात. अगदी बाथरुमच्याही खिडकीतुन आत येउन भिंतींवर, फ्लोअरवर फिरतात. सध्या बाथरुमच्या भिंती चमकताहेत त्यामुळे. Sad

हो ना, आम्ही दक्षिण गोलार्धात. सध्या सगळीकडे बाळकैर्‍या धरल्यात.

आर्या, साधे मिठाचे / साबणाचे पाणी टाकले तर त्या मरतात.

शांकली, मस्कतमधल्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी ही झाडे आहेत. तो रस्ताच सुगंधी होतो. तिथे काही रस्त्यावर बकुळीची पण झाडे आहेत. उष्ण हवामानात सुगंध जास्तच तीव्र असतात आणि त्या लोकांना तसेही सुगंधाचे वेड असते. बँकेतही काऊंटरवर ओंजळभर मोगर्‍याची / बकुळीची फुले ठेवलेली दिसतात.

सप्तपर्णी पण फुलते आहे सध्या...काय मस्त वास्..तिखट..गोड्...बुचाच्या झाडांकडे जायला हव...

तिचा गजरा कसा करतात कुणी सांगेल का?

धन्स आर्या.

हे कसले झाड आहे. पाने चिंचेसारखी बारीक. पाठी काटेरी. आणि ही फुले येतात. आमच्या ऑफिसच्या समोर आहे.

Pages