निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी, काय सुंदर रांगोळी काढलियेत तुम्ही! खूप आवडली! अजून काही असतील तर मा बो वर द्या.

रश्मी खरंच त्यांची ती शंका आजमितीला खरी ठरतिये Sad

अश्विनी, छानच आहे रांगोळी.

मुंबईत खुप वर्षांपासून शिवाजी पार्कच्या मागचा ( महापौर निवासाच्या मागचा ) समुद्र कुणी बघतोय का ?
मला दर भेटीच्या वेळी तो तिथे अतिक्रमण करतोय असे वाटतंय.
१९८१/८२ च्या दरम्यान मी तिथे ऑडीटला जात असे. त्यावेळी ओहोटी असताना आम्ही खुप आत जाऊन शिंपले गोळा करत असू. आता ओहोटीच्या वेळीदेखील पाणी फार आत जात नाही.
बांद्रा रेक्ल्मेशन त्या काळातलेच. नंतर तर माहीमच्या खाडीचा गळाच आवळला गेला.

पण मी निराशावादी नाही. पुथ्वीवर अशी हिमयुगांची मालिकाच येऊन गेलीय. नवे भूभाग, नवे समुद्र निर्माण
होतात आणि जुने नष्ट होतात. आपण जूने झालो, असे म्हणू या.

साधना, वर्षू नील धन्यवाद
हल्ली गोकर्णालापण दोन मोठ्या पाकळ्या असलेली फुलं येत आहेत अधून मधून, फोटो काढायचा रहातोय.

दिनेश खरंच. माहिमची खाडी इतका मागे गेलीय की आता दिसत नाही. गेल्याच आठवड्यात तिथुन येत होतो तेव्हा ऐशुला दाखवली, तिच्या एवढी मी होते तेव्हा समुद्र रस्त्याच्या बाजुला होता. आता तिथे इमारती आहेत. इथुन त्याला मागे ढकललाय म्हणजे तो कुठुनतरी उसळी घेऊन येणार पुढे.

माझ्या घरी मी हौसेने पांढरे मुळे लावले होते. त्याची पाने तोडायचा, मुळे उपटायचा मला धीरच झाला नाही.
आता तर त्याला डींगर्‍यापण धरल्यात !

वा मस्त मुळा आणि कोथिंबीर .
माझ्या कडे कोथिंबीर काही नीट येत नाही . थोड़ी उगवली की लगेच फुलं येऊ लागतात पान जास्त वाढत नाहीत. Sad

आज मला घरातून खाली उतरताना परत एक चिमणी दिसल! चिमण्या परतू लागल्या की काय ? (आशाळभूत बाहुली )>>>>> माझ्या घरी (ग्रिल मधे) सुमारे ९-१० दिवसांपूर्वी चिमण्याचे जोडपे जागेची टेहळणी करीत असताना आढळले. एका कुंडीतल्या झाडाला वाट मिळावी म्हणून मी त्यावर असणारी कुंडी जराशीच
हलवली.कुठलीही काडी पडली नाही की घरट्याचे निशाणही दिसले नव्हते .पण दुसर्‍या दिवशी सकाळी ६.३० पासून दुपारी ३.३० पर्यंत जोरजोराने कलकलाट चालू होता की मलाच विनाकारण अपराधी वाटत राहिलं. एवढासा मूठभर
जीव पण कान बधीर झाले.त्यांच्यालेखी मी घुसखोर असेन.अजूनही ते लक्ष्मीनारायण येत आहेत.पण मी मात्र
पाणी,कणीकेचे गोळे,ब्रेड इ.लांब ठेवतेयं.पण चिमण्या आल्यावर खरच छान वाटते.नाहीतर लठ्ठंभारती आहेतच
उपद्रव द्यायला!

जुळी जास्वंद! मस्तच गं!! Happy

दा, घरच्या डिंगर्‍या आणि घरची कोथिंबीर!! मजाय न काय! Happy

चिमण्यांची exchange offer !! Lol

सुदुपार.

हा रात्री काढलेला फोटो आहे जवळ जवळ ११.३० ते १२ च्या आसपास. फोटोत डाव्या बाजूला फुलपाखरू आहे. बहुतेक फुलातली मध ओढत आहे. म्हणजे फुलपाखरे रात्रीही जागी असतात?

हे पत्र वाचा नक्की. http://www.maayboli.com/node/45311

Pages