निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या गज-यात दोन प्रकार असतात - हे मी ट्रेनमध्ये निरिक्षण करुन मिळवलेले ज्ञान आहे. Happy

एका प्रकारात हातात दोरा घेतात आणि मग वर जागुने टाकलाय तसा गाठी मारत कदंबा बनवायला सुरवात करतात. हा गजरा अग्दी पातळ होतो. कागडा वगैरे फुलांचे कदंबे असतात. बायका विकायला गोल बॉल करुन ठेवतात आणि ब्लेडने दोरा कापत कापत विकतात.

दुस-या प्रकारात गजरा जेवढा लांब हवा तेवढा लांब दोरा दोन-चार गुंडाळ्या करुन जरासा जाडसर करुन घेतात. मग वरुन सुरवात करुन त्या दो-यावर एक फुल ठेवायचे आणि एक गुंडाळी मारायची, मग परत एक फुल, एक गुंडाळी .... असे दोरा संपेपर्यंत. हा गजरा अगदी भरगच्च होतो. मस्त वासवाल्या टपो-या मोग-याचे असे भरगच्च गजरे असतात.... (मग लांब वेणीवर तो माळायचा आणि मस्त सिल्कची साडी नेसायची आणि मग 'ह्यां'च्या सोबतीने मराठी संगीत नाटक बघायला जायचे, मध्यंतरात कॉफी प्यायची अशी जुन्या काळी पद्धत होती इती आईसाहेब Wink )

मी दोन्ही प्रकारचे प्रयत्न अनंत वेळा केलेत (म्हणजे गजरे बनवायचे प्रयत्न हो..... लांब वेणीवर तो माळून... वगैरे पुराण वगळा, उगीच गैस नको. )

आणि ते अनंत वेळा फसलेत. जागु तु आता ऑनलाईन शिकव.

पहिल्या प्रकारचा गजरा अगदी झटपट उभ्या उभ्या करतात ह्या बायका. पण दुसरा करताना त्यांची जी तंद्री लागते आणि त्या तंद्रीत त्या कशा झुलत असतात ते अगदी बघण्यासारखे असते.

दिनेशदा डबलच्या मधुमालतीचा फोटो टाका प्लिज. आणि त्याची वेल मिळाली तर मला द्या.

अन्जू लाज काय वाटायची त्यात????? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावे असतात. आता मालवणात ज्याला वळेसर म्हणतात त्याला आमच्याकडे पिळायचा गजरा म्हणतात. म्हणजे साधनाने दोन नंबरचा सांगितला तो. मला तो ही येतो.

साधना हा बघ तो पिळायचा गजरा. आमच्याकडे हे लग्नात वाटावे लागतात ३००-४०० नग ची ऑर्डर द्यावी लागते.हे माझ्या नणंदेच्या लग्नात आणलेले.

मला हवेत हे गजरे, एकदम ३००- ४०० घालीन म्हणते Proud कसले भारी दिसताहेत, घमघमले,मस्त. पळाली माझी अर्धशिशी Happy

जागु, सुगंध इथपर्यंत पोहोचला. Happy

अशी जुन्या काळी पद्धत होती इती आईसाहेब >>>>>>>>>>>>हे कशाला सांगितलस. मी तुलाच पहात होते. Proud

मला हवेत हे गजरे, एकदम ३००- ४०० घालीन म्हणते फिदीफिदी कसले भारी दिसताहेत, घमघमले,मस्त. >>>>>नृत्याच्या कार्यक्रम सादर करणार आहेस का? Wink
पळाली माझी अर्धशिशी स्मित>>>>>>>>>आली होती कधी?????????? Happy

सध्या अवल अर्धशिशीने त्रस्त होती म्हणूनच तिला इथे फेरी मारायला सांगितली तर म्हणते मला गजरे हवे. आधी मासे हवे म्हणून हट्ट झाला आता गजरे हवे म्हणून आता हिला हे दोन्ही दिल्याशिवाय तिची अर्धशिशी जाणार नाही बहुतेक Lol

ही अबोलीची वेणी.

जागू, तो वेल मुंबईतच मिळेल. आल्यावर बघतो.

तूला वेण्या आठवताहेत का ? सोनचाफा, गुलाब, गुलाबी करवंदे, झिपरीची पाने, कलाबूत, पांढरी / पिवळी शेवंती... भरदार आंबाडे घालणार्‍या बायका दिसत नाहीत तशा या वेण्याही आता दिसत नाहीत. या वेण्या मजबूत विणलेल्या असत. अर्धगोलाकार सुकल्यावरही कायम असे.

जुन्या काळातल्या नट्यांचे असे फोटो असायचे.

सीतेची वेणी अशी एक ऑर्किड असते. तो तर निसर्गाने विणलेला गजराच असतो.

पळाली माझी अर्धशिशी स्मित>>>>>>>
हे दोन्ही दिल्याशिवाय तिची अर्धशिशी जाणार नाही बहुतेक हाहा>>>>>>>>>>जागु, गेली, गेली. म्हणजे तिची अर्धशिशी गेली. येवढा सुगंध घेतल्यावर राहिलच कशी? Proud

ही पण वेणी छान दिसतेय. Happy

झिपरीची पाने, कलाबूत, पांढरी / पिवळी शेवंती...>>>>>>>>>>आमची आई झेंडूच्या मोठ्या फुलांच्या थोड्या थोड्या पाकळ्या काढुन, पायाच्या अंगठ्या दोरा अडकवून, आणि त्यात झेंडूची पाने आणि कलाबुत घालून वेण्या करायची. आम्हालाही असा वेण्या करायला तिने शिकवल्या होत्या. Happy

हो दिनेशदा आमच्याकडे अजुनही काही जुन्या बायका घालतात. पुढच्या वेळी माझ्या कामवालीच्या वेणीचा फोटो काढेन. सणाला ती १०० ते २०० रु. वाली वेणी घालते. Happy ती पुर्ण पेचक, रंगित कागदाच्या गुंडाळ्या, सॅटीनचे गुलाब ह्यांनी भरलेली असते.

पूर्वी रिबीनचे तुकडेही लावायचे वेणीत. हल्ली लोकरचे धागे टाकतात. (अवलने आयडीया दिली असेल:हाहा:)
नंतर झिपरी काही वर्षांपुर्वी तो इंग्लिश पाला, झेंडू घालून केत्तीतरी प्रकारे ह्या वेण्या गजरेवाल्या करायच्या.

गुलाबी करवंदाचे नुसते झुपकेही घालायच्य बायका.

हे १००० पोस्ट झाल्याबद्दल.

आता मला अवल सारखा फुले विणायचा ब्लॉग चालू करावा लागेल Lol

आता मला अवल सारखा फुले विणायचा ब्लॉग चालू करावा लागेल>>>>>>>>>>>जागु, दे टाळी! काल तुला " स्टेप बाय स्टेप फ़ोटो टाक ". असं आर्याने सांगितल तेव्हा तुला हेच सांगण्याच माझ्या मनात आलं होत.:स्मित:
अग ह्या पाच आता: १) मी २)अवल ३) आर्या, ४)साधना(तिला तर हवीच. सगळ आवरून संगित नाटकाला जायचय. :फिदी:) आणि एक कोणाला देऊ? Happy

अरे व्वा! वेण्याच वेण्या! Happy
मला पण शोभीसारखाच प्रश्न पडला होता.. कदंबा म्हणजे काय हा!
अच्छा, म्हणजे या वेण्या नुसत्या गाठींवरच असतात ना? सुईचा अजिबात वापर नाही?

जागु, ती अबोलीची वेणी काय सुर्रेख दिसतेय! Happy
हम्म, आता तसे केसही राहिले नाहीत. अंबाडा येत नाही. Sad
मी विचार करतेय माझ्या स्टेप विथ लेअर कटला ती वेणी कशी दिसेल. Proud

गजरा रे गजरा रे...
आमच्या कुटुंबातील बायकांची 'गजरा कॉन्फरन्स' झाली अनंत चतुर्दशीला... Happy
मीपण लुड्बुडून घेतलं... इथे आता नवीन काही शिकायला मिळालं तर मला अजून शाईन मारता येईल पुढच्या वेळी... Happy

मला अजून शाईन मारता येईल पुढच्या वेळी... स्मित>>>>>>>>>जागु आता क्लास सुरु करणार आहे. नाव घाल ग क्लासला. Happy

पण दुसरा करताना त्यांची जी तंद्री लागते आणि त्या तंद्रीत त्या कशा झुलत असतात ते अगदी बघण्यासारखे असते.>>>>>>>>> हो चाटच्या गाडीवर गर्दी झाली की चाटवाला पण असाच झुलतो. हातातल्या प्लेटवर चाटचे वेगवेगळ्या भांडयातले वेगवेगळे इन्ग्रेडिअन्ट्स डावाने घालताना!
असो........वा छान आहे गजरापुराण!

जागू, धन्य आहेस तू, किती किती प्रकारचे गजरे येतात तुला आणि कितीतरी छान गोष्टींची सखोल माहिती असते तुला, ग्रेट. तुला --^--.

सुमंगल, नक्की भेटू. कदाचित एअरपोर्टवरच भेटावे लागेल. इथे मी लिहित राहीनच..

--

केसातील फुले यावरून मला बसंत बहार चित्रपटातला एक सुंदर प्रसंग आठवला.
भारत भूषण देवळात असताना तिथे निम्मी येते. देवीसाठी म्ह्णून ठेवलेली फुले तो तिला देतो. पण तेवढ्यात
पुजार्‍याची चाहूल लागल्याने, ती केसातील फुले घाईघाईने ताटात टाकते आणि निघून जाते.

पुजार्‍याला त्या फुलात एक केस दिसतो. तो कुणाचा आहे असे तो भारतभूषणला विचारतो. तर तो देवीचा आहे, असे उत्तर तो देतो. अर्थातच पुजारी शंका घेतो.

मग मन्ना डे च्या आवाजात, " भयभंजना वंदना सुन हमारी, दरस तेरे मांगे ये तेरा पुजारी " असे एक सुंदर गीत आहे. ते गीत संपता संपता, देवीच्या मूर्तीचे दगडात कोरलेले केस खरे होतात. गाणं, चाल ( राग : तोडी) गायन
सर्वच सुंदर आहे.

केसात झोकदार वेणी माळायची फ्याशन शहरात पुन्हा सुरू व्हायला हवी !

मी अबोलीची वेणी करायचा प्रयत्न केला. पण ती अगदीच पिळपिळीत विळविळीत झाली ! केविलवाणी Sad
तेथे पाहिजे जागूचे| येरा गबाळ्याचे काम नोहे |

काय सुरेख चर्चा चाललीये. जागू, हार, कदंबा बद्दल किती छान लिहिलंयस. माहेरी आमच्याकडे घरची चमेली, मरवा आणि अबोली मिळून आम्ही करायचो कदंबा. आम्ही त्याला मद्रासी गजरा म्हणत असू. Happy

जागू यावर एक सुरेखसा लेख नक्की लिही.

त्या गुलाबी करवंदाचं झाड शिवाजी पार्कला माझ्या बहिणीच्या शेजारच्या कंपाउंडमध्ये आहे. चिक्कार करवंद लागलेली असतात. पण वर असतात. बहिणीच्या कंपाउंडात लाल गुंजांचं आणि कैलाशपतीचं झाड आहे.

या कदंबा म्हणतात होय! हा प्रकार येतो मला (काहीतरी येतं म्हणून खूश होणारी बाहुली.
)

तो दोन नंबरचा, पिळून करायचा, मुंबईची खासियत असणारा शिकायचाय. कधी टाकणारे स्टेप-बाय-स्टेप?

अग ह्या पाच आता: १) मी २)अवल ३) आर्या, ४)साधना(तिला तर हवीच. सगळ आवरून संगित नाटकाला जायचय. फिदीफिदी) आणि एक कोणाला देऊ? >>> मला दे. मी साडी पण ठरवलीय कोणती नेसायची ते Wink

Pages