पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रीजमध्ये ठेवायचे. बरं किती कमी आहे. कैरीचा कीस जितका तितकी साखर असते छुंदयात. आणि गच्चीत तर ठेवला असेलच ना ८-१० दिवस पातेल्याला दादरा बांधून?

मि खुप कमि साख्ररेचा केलाय. अगदि १ वाटि साखर वापरलि ४ वाट्या कैरिला. गोड कैरया होत्या ना.

'Red Lobiya' हे कुठले कडधान्य? सोयाबीन का? तसचं दिसतय! परवा चुकुन आणले गेले. काय करता येइल? नी कसे? उसळ करावी का? कशी?
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

दिनेशदा आणि प्रजक्ता धन्यवाद...
आत्ता दालबाटी शोधली जुन्या मायबोलीवर पण सापडली नाही Sad

नमस्कार Sahi,
तुम्ही दालबाटीची कृती कशी शोधलीत? या पानावर खाली असलेल्या शोध-सुविधेत "दालबाटी" हा शब्द टाकून शोधलेत तर प्राजक्ता यांनी दिलेला दुवा तुमचा तुम्हालाच मिळाला असता.

सध्या "अमुक एक पाककृती सापडत नाही" यासारखे प्रश्न वरचेवर विचारले जात आहेत. हे प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया मायबोलीवरील शोध सुविधेचा वापर करून शोधून पहावे. ही शोध सुविधा प्रत्येक पानाच्या सर्वात शेवटी उपलब्ध आहे. धन्यवाद.

- मदत समिती.

रेड लोबिया म्हणजे लाल चवळी. त्याची केरळीय पद्धतीने उसळ छान होते. ही चवळी थोडी उग्र असते म्हणुन थोडी भाजुन घेउन मग भिजत टाकुन कुकरला शिजवुन नेहेमीप्रमाणे उसळ करता येते.

~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

चुंद्याला इतकी कमी साखर घातली तरी पाक झाला का? अ‍ॅनाने लिहिल्याप्रमाणे उन्हात ठेवले होते का? हे दोन्ही नसेल तर चुंदा टिकणे कठीण.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

सुमेधा हे खुपच कमी प्रमाण झाले १:१ असते त्याऐवजी, उदा. ८ वाट्यांऐवजी ७ घातल्या तर चालेल कदाचित पण १/४ कस चालेल? आणि ऊन्हात ठेवलं होतस की नाही? भारतात असशील तर अजूनही उन आहे, साखर मिसळून उन दाखव. कमी असेल तर खाऊन संपवा पण जास्त असेल तर कायतरी कर.. Happy

मि मुदद्दाम जास्त साखर नाहि घातलि कारण कैर्या गोड आहेत खुप. ऊन दाखवले मात्र. खुप साखर न घालता टिकवता येतिल का?

सुमेधा, टिकवण्याच्या पदार्थात जास्त प्रमाणात साखर किंवा मीठ वापरण्याने, अथवा त्याला उन देण्याने पदार्थाला लवकर बुरशी येण्याची प्रक्रिया लांबवली जाते व तो जास्त टिकतो म्हणून मुरांब्यात, लोणच्यात त्याचे प्रमाण खूप घालावे लागते केवळ चवीसाठीच नाही...... Happy साखर जर कमी वापरायची असेल तर डिपफ्रीझ मधे फ्रीझ करून मग लागेल तेव्हा लागेल तेव्हढेच thaw करून वापरले तर ते टिकू शकेल अन्यथा खराब होण्याची शक्यता आहे. फ्रिजच्या खालच्या कप्प्यात सुद्धा ८ -१५ दिवसानंतर ते हळूहळू खराब होऊ लागतात ....

@karadkar
रेड लोबिया म्हणजे लाल चवळी. त्याची केरळीय पद्धतीने उसळ छान होते. >>> क्रुती कुठे मिळेल?
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

मदत समिती
2 Things
1) Based on the instructions in the first paragraph I had checked both the links...old Hitguj has 'Marwadi' folder which doesn’t have "Daalbati"listed under it. It is under Daal-Aamti
section .I can understand daalbati is a daal related item, but it is not an obvious place to look for a daal-bati recipe.
I had tried using search there but the facility is unavailable .

2) The 'Search box' location on the page is not ideal; the user has to scroll all the way in the bottom first to see/notice it and then use it. If the user is logged in, it is the last thing displayed on the screen .It should be available at the top .. may be if you make it more visible by putting right next to 'Kanokani' that way people will not miss it and you will not get 'Can't find it ' sort questions

वेळ कमी होता म्हणुन इन्ग्लिशमधे लिहिले आहे त्याबद्ल माफी असावी

धन्यवाद Sahi, तुमच्या सूचनांचे स्वागत आहे. तुमची सूचना आम्ही प्रशासनाला कळवत आहोत. या व इतर सूचना तुम्हालाही प्रशासनाला http://www.maayboli.com/node/2070 इथे कळवता येतील.

- मदत समिती.

मिश्र भाज्यांचे लोणचे कसे करायचे? या मधे कोणकोणत्या भाज्या वापरता येतील? माझ्याकडे गाजर, आल, लसुण,फ्लॉवर या भाज्या आहेत. करता येईल का लोणचे? कसे करायचे?

मला५० जणांच्या डिनरपार्टीसाठी (non-veg) डेझर्ट करायचे आहे. काय करता येईल कोणी सुचवाल का? एकटीलाच करायचे आहे. मदतीला कोणी नाही.

Sharmila_72

Friday, December 08, 2006 - 12:26 am:
भाज्यांच लोणचं कसं करायचं? फ्लॉवर,मटार,गाजर,तोंडली,हिरवी मिरची अस सर्व असलेल.? रुचिरामधल सोडुन. मी आतापर्यन्त जितके प्रकार टेस्ट केलेत त्यातल एक मला खूप आवडलेल. त्यात भाज्या छान करकरीत लागत होत्या. बारीक बारीक तुकडे होते भाज्यांचे. आणि वर छान लाल तवंग होता तेलाचा. आह! लवकर द्या बरं रेसिपी.
Prarthana

Friday, December 08, 2006 - 1:10 am:
ज्या भाजीचे लोणचे करावयाचे आहे ती भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. त्यात तिखट मीठ चवीप्रमाणे साखर घालावी. लोणच्याचा मसला १ चमचा व लिंबाचा रस २ चमचे घालावा व वरून नेहेमीप्रमाणे फ़ोडणी द्यावी

मी कालच गाजराचे लोणचे केले होते छान झाले
फ़्लाॅवर व वाटाणा एकत्र करायचे असल्यास एक वाफ़ देऊन केले तरी छान होते

Dineshvs

Friday, December 08, 2006 - 11:15 am:

शर्मिला, आपल्याकडच्या लोणचे घालायच्या जा पद्धति आहेत त्यात लोणचे मुरणे म्हणजे फोडी मऊ होणे अपेक्षित असते.
फोडी करकरीत राहण्यासाठी भाज्या व्हीनीगरमधे बुडवुन घेणे आवश्यक आहे. भाज्या साधारण चार तास व्हीनीगर मिश्रीत पाण्यात बुडवुन फ़्रीजमधे ठेवल्या तर त्या करकरीत होतात. या पाण्यात मीठहि घालावे.
ईथे व्हीनीगर वर बरीच चर्चा झाली होती. खुप जणानी पर्याय विचारला होता. जर लोणचे टिकवायचे नसेल तर अर्धा लिटर पाण्यात पाव कप लिंबाचा रस घालुन त्यात भाज्या बुडवुन फ़्रीजमधे ठेवायच्या. याने भाज्या करकरीत होतील. पण हे लोणचे फार टिकणार नाही.
मसाले, तेल वैगरे आपल्या आवडीप्रमाणे.
वरच्या यादीत, बीट, शलजम, मुळा, छोटे कांदे, आवळे असे बरेच काहि add करता येईल.

प्रियास, बॉईल्ड एग्जच सलॅड किंवा अंड्याच पुडींग करुन पहा.
*************************************************
मित्रांचा भार होत नाही म्हणून त्यांचे आभार मानायचे नसतात.

धन्यवाद सर्वांना !! छान कृती आहेत लोणच्याच्या !!

इंडिअन स्टोर मध्ये जे black cumin seeds मिळतात ते म्हणजेच कारळे का ?

ढोकळ्याचे तयार सुके पीठ बरेच उरले आहे. ढोकळा सोडून इतर काय करता येईल त्याचे ?

डोरेमेसा,
गुजराथी हांडवो करुन पहा.
रवा + दही + बेसन/ ढोकळ्याचे पीठ + मिक्स भाज्या (बारीक चिरुन) + मीठ + फोडाणी (जिरे मोहोरी हिंग हळद कढीपत्ता हि. मिरची तुकडे) हे सर्व सरसरीत कालवा आयत्या वेळेला इनो / सोडा
ची चिमूट घाला आणि केकसारखा बेक करा. t-time snacks

प्रिया,
पार्टी non-veg आहे का desert non-veg च करायचय??
सोप्प म्हणजे चोकोलेट ब्राउनी आणा, चोकोलेट sauce आणा vanilla ice cream आणा
आयत्या वेळेला सिझलर प्लेट मध्ये ठेवून सर्व्ह करा sizzling brownie!!
कमी श्रमात व एकटीने करता येइल.

हाय प्रिया,

पार्टीला देशी आहेत की गोरे?

देशी असतिल तर ट्रायफल पुडिंग करु शकतेस आणि गोरे असतिल तर पायसम विथ भरपुर सुकामेवा...किवां आंब्याचा रस

सध्या थंडी आहे आपल्याकडे त्यामुळे फार गार पण डेझर्ट ठेवता येणार नाही.

अजुन एक ऑप्शन... जेलीफ्रुटस विथ व्हीप्ड क्रीम...

अमृता,
thanks, पार्टी non-veg आहे. त्यासाठी डेझर्ट करायचे आहे. म्हणजे शक्यतो दूध न वापरता.

लाजो,
thanks, आमंत्रित देशीच आहेत. तु नमूद केलेल्या पदार्थांच्या रेसिपी (ट्रायफल पुडिंग व जेलीफ्रुटस विथ व्हीप्ड क्रीम) देता येतील कां?

प्रिया,
ट्रायफल पुडिंगची आणि जेलीफ्रुटस ची रेसिपी लिहीली आहे.

कोणाला potato salad च्या veg कृती माहीती आहेत का?

आदिती तुला पोटॅटो सॅलड ची व्हेज कृती म्हणजे मेयॉनीज शिवाय हवी आहे का?

प्रकार १ - मेयॉनीज ऐवजी तु ग्रैन मस्टर्ड आणि ऑलिव्ह ऑईल घालु शकतेस.

प्रकार २ - बटाट्याच्या फोडी करुन त्यात पातळ उभा चिरलेला कांदा/पातीचा कांदा, चिरलेला टोमॅटो, मीठ, मीरेपुड आणि क्रीम घलायचे. आवडत असेल तर चीज घालता येइल.

प्रकार ३ - बटाटे उकडुन कुस्करायचे, त्यात फेटलेल दही, वाटलेली हिरवी मिरची/लाल तिखट, चवीला मीठ, साखर आणि वरतुन मोहरी, कढीपत्ता व हींगाची फोडणी द्यायची(हिरवी मिरची नाही घातली तर फोडणीत लाल मिरची घालता येइल).

प्रकार ४ - बटाटे उकडुन कुस्करायचे त्यात फेटलेल दही, दाण्याचे कुट, वाटलेल हिरवी मिरची-आलं, मीठ, साखर आणि वरतुन जीर्‍याची चरचरीत फोडणी - उपासाला पण चालेल.

हा का ना का... Happy

अजुन एक potato salad चि कृती :
५-६ बटाटे उकडुन फोडी करुन घे. एक छोटा कान्दा बारीक करुन. मीरेपुड, २ चमचे vinegar, २ चमचे olive oil, मीठ. सगळे एकत्र करुन घे. आणि १०-१५ मिनिटे Freeze मधे ठेव.
potato salad तयार.

Pages