Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54
आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.
तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नविन
नविन मायबोलिवर हितगुजची लिंक का नाही?( का आहे आणी दिसत नाहिये!!)
मला नविन मायबोलिवर मराठित लिहता येत नाहिये..टायपायला लागल की विंग्रजीच उमटतय..
अस malaa maraathi lihataa yet naahiye ..
(या आधि हा problem नव्हता)
मायबोलीच्
मायबोलीच्या पहिल्याच पानावर मध्यभागी हितगुजची लिंक आहे.
नविन मायबोलीच्या प्रत्येक पानावर मधे top ला हि लिंक आहे.
त्याच पानावर वर उजवीकडे परत हितगुजची लिंक आहे.
मायबोलीचे पहिले पान हा नवीन मायबोलीचाच भाग आहे. किंबहुना हितगुज सोडले तर सगळेच नवीन मायबोलीचा भाग आहे.
नमस्कार.
नमस्कार. नवीन मायबोलीवरच्या मुख्यपृष्ठावर सर्वात खाली रंगीबेरंगी, गुलमोहर आणि संवाद असे तीन स्तंभ दिसतात. त्यांचे शीर्षक हे त्या त्या विभागाच्या मुख्यपृष्ठाकडे नेणारा दुवा करता येईल का ? उदा. रंगीबेरंगी या शीर्षकावर टिचकी मारली की रंगीबेरंगीच्या मुख्य पानाकडे जाता येईल, जिथे सर्व रंगीबेरंगी लेख दिसतात. नवीन मायबोलीवर या विभागांच्या मुख्य पानाकडे जाणारा दुवा log in झाल्यावरच दिसतो. आता जुन्या मायबोलीवरून log in न होताही या सर्व विभागांच्या मुख्य पानावर जाता येते, तशी सोय नवीन मायबोलीवरही करता येईल का ? तसे झाले तर पहिल्यांदा भेट देणार्यांसाठी access आणखी सहजसोपा होईल. शिवाय, नोंदणीकृत सभासदांनासुद्धा केवळ वाचनासाठी प्रत्येक वेळी log in व्हायची गरज नाही (किंवा, परवलीचा शब्द न्याहाळकात साठवून ठेवण्याची गरज पडणार नाही).
छान आणि
छान आणि अंमलात आणायला सोपी सूचना.
तुमची इच्छा पूर्ण झाली आहे
Admin
Admin अनंताक्षरी वर गाणी लिहिताना मधे कडव्यातली मोकळी जागा सोडली तरी शेवटी ती गायब होते. असे का होते ?
फक्त
फक्त अंताक्षरी नाही तर इतर ठिकाणीही हा प्रश्न आहे. शोध चालू आहे.
नवीन
नवीन मायबोलीवर दोन भावचित्रांचे tags शेजारी शेजारी टाकले की फक्त पहिल्या tag चंच रुपांतर चित्रात होतं, पुढचा tag तसाच दिसतो. त्या tags मध्ये white space सोडली तरीही तसेच होते. उदा. :+):+) किंवा :+) :+) असे लिहीले तर पहिल्याच्या जागी चित्र दिसते, दुसरा मात्र :+) असाच दिसतो. यावर काही करता येईल का ? [: आणि ) यामधल्या + कडे कृपया दुर्लक्ष करावे.]
दुसरे म्हणजे, या tags चं रुपांतर होऊ द्यायचे नसेल तर काही सोय आहे का ? उदा. वर ':' आणि ')' हे शेजारी लिहीले की त्यांचं चित्रात रुपांतर होतंय. जे लिहीले आहे ते जसेच्या तसे दिसण्यासाठी काही सोय आहे का ?
btw , त्या rofl चे स्मितचित्र टाकण्यासाठी आवश्यक ते लिहायला गेलो कि हसू फुटतंय
ही सोय खास आहे 
जुन्या
जुन्या मायबोलीत जसा cancel post चा ऑप्शन होता तसा इथेही देता येईल का?जेणेकरून ते पोस्ट cancel करून त्या पेजवर परत जाता येईल...
ऍडमिन, नविन
ऍडमिन,
नविन मायबोलीत लिहिलेली पोस्ट ही ब्लॉक मधे घुसमटलेली दिसते, त्यापेक्षा ती जुन्या मायबोलीवरील पोस्ट ह्या जास्त सुटसुटीत शिवाय वाचनीयही वाटतात. पोस्टचे डिजाईन जुन्या सारखेच नाही ठेवता येणार का?
नमस्कार.
नमस्कार. 'पारिभाषिक'मधला 'रि' पहिला आहे आणि शब्दप्रयोग हा सामासिक शब्द आहे. त्यामुळे 'पारिभाषिक शब्दप्रयोग' असे नाव पाहिजे त्या बाफचे. त्या बाफचे नाव व्याकरणदृष्ट्या चूक असणे हे जास्त खटकते म्हणून...
*** The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine, and probably not necessary. ***
limbutimbu, तो
limbutimbu,
तो प्रॉब्लेम सर्वांनाच आहे. इथे लिहीले आहे-
http://www.maayboli.com/node/1552#comment-22868
ओक्के
ओक्के मदत_समिती, तुमच्या लक्षात आलेला हे ना तो प्रॉब्लेम्! मग झाल तर!
असेल काही तरी लोचा कोड मधे झालेला, तेवढा काढला की सुधारेल!
आपल्याला काय घाई गडबड नाही, अन त्यावाचून महत्वाचे अडत नाही!
नमस्कार.....
नमस्कार.....
मायबोलिचे हे नवीन रुप बिल्कुSSSSSSSSSSSSSSSSल आवडलेले नाही.
गोबू,
गोबू, नमस्कार,
हे सगळे बदल करण्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे मायबोली बंद पडू नये. कुठल्याही इतर संकेतस्थळासारखे करायचा हा उद्देश नाही.
एखादे वाहने खूप जुने झाले, सारखे बंद पडायला लागले, त्याचा दुरुस्तीचा खर्च हा नवीन वाहन घेण्याइतका वाढला की नाईलाजाने का होईना ते टाकून नवीन घेतल्याशिवाय पर्याय नसतो. आणि नवीन वाहन घेतले तर त्या वेळेस बाजारात प्रचिलित असणार्या सेवा सुविधा त्यात दिसणार हे ओघानेच आले. तसे हे काहिसे आहे. ऍडमीन टीम ने प्रयत्नपूर्वक या अडचणी तुम्हाला दिसून नयेत म्हणून आतापर्यंत कष्ट घेतले पण याचा अर्थ काही problems नव्हतेच असा नाही.
तुमच्या सुटसुटितपणाच्या मुद्याशी सहमत आहे. आणि त्यावर काम चालू आहे.
ऐडमीन, तुम्
ऐडमीन,
तुम्ही अतिशय समंजसपणे तुमची बाजु सांगितलीत... मनापासुन खुप खुप आभार...
असो,
change is the only permanent thing....
नवीन सुधारणा करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना अगदी मनापासुन दाद!
नवीन जागेत
नवीन जागेत स्थिरावायला वेळ लागतोय..
पण चाळीतून फ्लॅट मधे गेल्यावर वाटावं तसं होतय.. चांगल्या लांब रुंद भिंती आहेत पण मोकळेपणा मिळत नाहीये, नाक्यावर उभं राहून गप्पा टाकायची, चाळीतल्या कॉमन नळावर भांडण करायची, गॅलरीत उभे राहून सामूहीक पेपर वाचन करायची सगळी मजा हरवल्यासारखी वाटतेय. ब्लॉक मधे वेगळी मजा उद्या वाटू लागेलही पण अत्ता तरी मनात चाळीतून बाहेर पडल्याची हूरहूर आहे
बरं दोन गोष्टी प्रकर्षाने सांगाव्याशा वाटतात --
१. पोस्ट करताना वरचे जास्तीत जास्त मेसेज दिसले तर बरं होईल. म्हण्जे एकाच पोस्ट्मधे एकापेक्षा जास्त पोस्ट्शी संवाद साधणं सहज शक्य होतं.
२. एकूणच नवीन मायबोलीवर व्हाईट स्पेस जास्त दिसतेय. त्यामूळे नको तितकी मोकळी जागा असल्यासारखं वाटतय.. स्क्रोल सुद्धा कमी करता आला तर उत्तमच होईल. थोडं टेम्ल्पेट बदलून व्हाईट स्पेस कमी केली तर खूप बरं होईल असं वाटतं..
पाककलेच्य
पाककलेच्या बीबीवर मेन्यु काँबिनेशन्स च्या थ्रेड मध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत ,त्यांच्यावर क्लिक केल्यास त्या कल्चर आणि सोसायटीवर घेउन येतात
उदा. लालुने दिलेली नोव्ह. ०८, २००५ ची लिंक आणि अशा बर्याच...
ऍडमिन जरा बघणार का? धन्यवाद.
-प्रिन्सेस...
पाककला
पाककला बीबीचं लवकरच नवीन मायबोलीत स्थलांतर होणार आहे तेव्ह ह्या सर्व दुरुस्त्या करण्यात येतील
ऍडमिन,
ऍडमिन, गुलमोहरातला गेल्या चोवीस तासांच्या लिखाणाच्या पानावर, प्रत्येक विभागाच्या दुव्यावर टिचकी मारल्यावर त्या-त्या विभागातील ताजं लेखन किंवा प्रतिक्रिया दिसतात. तेथे त्या स्तंभांची रुंदी फारच कमी आहे. (http://www.maayboli.com/node/968) आणि नवीन / बदललेल्या लिखाणासाठी 'नवीन' आणि 'बदलून' शब्द दिसतात, तेथे पूर्वीसारखाच या दोन शब्दांचा पार्श्वरंग लाल न ठेवता अक्षरांचा रंग लाल ठेवता येईल का? ते बरं दिसत होतं.
http://www.maayboli.com/taxon
http://www.maayboli.com/taxonomy/term/226
या पानावर लेखकचे नाव पन देता येइल का? कथेच्या नवापुढे.
उमा२७,
उमा२७, तुम्ही माझ्या मनातलेच लिहिलेत. लेखक/लेखिकेचे नाव इथे दिले तर खरंच फार सोयिस्कर होईल.
उमा
उमा यांच्या सूचनेला माझेही अनुमोदन.
भाषा आणि शब्दोत्पत्ती हे दोन ग्रुप्स वेगळे का आहेत ? शब्दोत्पत्ती हा ग्रुप 'भाषा'मध्ये पाहिजे ना ?
***
The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.
जी वाहून
जी वाहून जाणारी पानं नाहीयेत त्या पानांचा सिक्वेन्स उलट्या क्रमाने लावला तर, नविन पोस्टस आधी वाचता येतील. आत्ता आधीच वाचून झालेल्या पोस्ट्स स्क्रोल करुन मग पुढच्या पानावर जाऊन मग नविन पोस्ट्स वाचाव्या लागतात, त्यापेक्षा जर त्या उलट्या क्रमाने अरेंज करता आल्या तर ........
==============
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
दिमडूशी
दिमडूशी सहमत.... मी आत्ता हेच लिहायला इथे आले होते.
जुन्या
जुन्या मायबोली मध्ये जसे Last 1 Days सारखे नविन मायबोली वर काही सोय आहे का ? ( काही वर्षा पूर्वी १, ३ आणि ७ दिवस असे पोस्टिंग्स पण बघता यायचे).
- कीर्ति
केलेल्या
केलेल्या रिक्वेश्टीची तातडीने अंमलबजावणी
ठांकु हो ऍडमीन
==============
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
’गृप्स’
’गृप्स’ वाचतांना इंग्रजी शब्दात ऋषीतला ’ऋ’ बघून खटकतं. ते ’ग्रूप्स’ नाही का करता येणार?
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/
अजूनही
अजूनही वाहून न जाणार्या पानांवरचा नविन प्रतिसाद उघडताना पहिलं पानच उघडतंय... उदा. 'एकापेक्षा एक' चं पान.
>http://www.maayboli.com/taxo
>http://www.maayboli.com/taxonomy/term/226
>या पानावर लेखकाचे नाव पन देता येइल का? कथेच्या नावापुढे.
उमा यांची सूचना अंमलात आणली आहे.
वा! धन्स
वा! धन्स ऍडमिन! अगदी पहिल्यापासूनची मागणी होती ती. मनापासून धन्यवाद.

----------------------
The cheapest face-lift is a SMILE
Pages