मे २००९ - लक्षवेधी कवितांचे दालन

Submitted by Admin-team on 11 June, 2009 - 01:14

निवड समितीने सर्वोत्तम कवितेबरोबरच इतर काही लक्षवेधी कविताही निवडल्या आहेत. त्या कवितांचे दालन आपल्या आस्वादासाठी.

शब्दात जितके गुंतावयाचे- http://www.maayboli.com/node/7663
एक बेदम गजल !! पहिल्या ओळीपासूनच प़कड घ्यायला सुरवात करते.

कविता - http://www.maayboli.com/node/7955
सुरेख गजल!
उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
राहील काय त्याही नंतर जगात कविता ??

रीअर व्ह्यू - http://www.maayboli.com/node/7714
लक्षवेधी कविता. लोकं का, कशाकडे किंवा कशापासून इतकी वेगाने पळत असतात हे 'रीअर व्ह्यू'मधल्या मुलाला कसं कळावं ! बुंगाट वेगात जात असताना रिअर व्ह्यू मधला मुलगा आपल्यालाकडे कुतुहुलाने पाहतो की आपण त्याच्याकडे ? तो तरी असतो का खरचं की, ती थरथरणारी वेगाने मागं जाणारी प्रतिमा नुसताच आपल्या कल्पनेतला खेळ ?

थँक्स फॉर एव्हरी थिंग - http://www.maayboli.com/node/7864
ओघवती, सुलभसुंदर कविता. 'आत-बाहेर बोलली नाही' सारखा लगेचच भावणारा भाषाप्रयोग. पुरूष-स्त्री मैत्रीतून फुलणार्‍या मैत्रीपेक्षा गहिर्‍या नात्याचे सूचन करणारी वाटते. पण खोच अशी की 'जे काय आहे ते नक्की काय आहे, कशामुळे आहे' हेच त्याला स्पष्ट होत नाहीये... अशा दोलायमान स्थितीत माणूस स्वतःची समजूत घालतो, स्वतःच्या आणि इतरांच्या वर्तनाचे rationalisation करण्याचा प्रयत्न करतो... ते इथे इतक्या सहजपणे मांडले आहे की कविता प्रत्येकाची होते.

एक रात्रीच्या... - http://www.maayboli.com/node/8156
दोघांमधील रात्र आणि रात्रीमधले दोघे अशी दोन्ही चित्रे उभी करते. विखुरलेल्या तुकड्यातुकड्यांमधून एक सलग चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असे वाटते... 'विणल्या धाग्यात निसटते, सरुन जाते नि:शब्द'... 'मिटल्या खुणा जोजवीत पहाट होउन जाते'... अशा सुंदर कल्पनांची रेलचेल असूनही कल्पनांची भाऊगर्दी वाटत नाही. अशा तुकड्यांमधला सलगतेचा अध्याहृत अभाव या कवितेत लगेच जाणवतो आणि काही राहून गेल्याची, निसटल्याची एका रात्रीची व्यथा वाचकाला आणखी जास्त भिडते. कवितेच्या आकृतीबंधाचा वापर करून काव्यभाव आणखी ठळक करणे हे सुरेख जमलेले.

सावर - http://www.maayboli.com/node/7667
नेहमीचाच विषय असूनही सुंदर फुलवलेली कविता. हे एक मोठे अवघड काम. शिवाय 'अबोलीशी पाठमोरी'... 'चोरुनीया लालसर ओलावल्या मेघकडा'... यासारख्या एकदोनच पण अभिजात कल्पनांमुळे कविता उच्चबिंदूकडे जाते. तो प्रवासही सहज झाला आहे, हे सुरेखच.

लावारिस - http://www.maayboli.com/node/7662
कल्पना वेगळी, शब्दं आणि मांडणीही खास. चंद्रमौळी गटार ह्या साठी खास!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निवड समितीचे मनापासुन आभार. आमच्या कवितांची दखल घेऊन अशी सुंदर पावती दिल्याबद्दल Happy आणि अ‍ॅडमीनचेही आभार Happy

पल्ली,
हे काम निवड समितीने केले आहे तेव्हा तुमचे धन्यवाद त्यांच्याकडे पोचवतो. Happy

सर्व कविता खरेच छान आणि unique आहेत.
मनःपूर्वक अभिनंदन सर्व कवींचे .

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

निवड समितीचे धन्यावाद आणि सर्व कवींचे मनापासुन अभिनंदन सर्वांनी खुपच सुंदर कविता लिहिल्या आहेत.............!

निवड समितीचे मनापासून आभार. सर्व सोबत्यांचे अभिनंदन Happy

.................अज्ञात

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy