एक रात्रीच्या...

Submitted by पल्ली on 31 May, 2009 - 04:44

एक रात्रीच्या किती कथा अन
कितीतरी अर्ध्या गोष्टी!
किती उसासे किती उमाळे,
किती स्वप्नांच्या ओळी ...
विणल्या धाग्यात निसटते,
सरुन जाते नि:शब्द.
पानसळही उगाच जागी,
होउन हलते गप्प.
मिटल्या खुणा जोजवीत
पहाट होउन जाते
दिवस पुन्हा तोच तसा
जणु काहीच ना विपरीत . ..
कुशीवर नाजुक सुरकुत्या
डोळाभर स्वप्नांची मेहफील
एक रात्रीच्या किती आठवणी
किती सारे क्षण गाफिल.
ओंजळभर हसु,
अश्रु गळलेले अन...
उशीवर भिजुन वाळलेली
एक जुनी आठवण.
भिंतीशी मारलेल्या गप्पा
कधी मूक तक्रार
दूर चांदण्यांचा लपंडाव
पाठमोरा एक नकार.
एकट्या चंद्राची एकटी रात्र
कशी त्यानं सोसावी,
अंगारलेले गात्र गात्र
अंधाराला काजळी.
एक रात्रीचा अनुभव रिक्तसा
अपुर्ण भारी गहनसा.

गुलमोहर: 

डॉ.मुजफ्फर सलीम शेख
बच्च्नन जींची 'रात आधी हो गई है !' आठ्वली.
रात आधी हो गई है,
जागता मै, आंख फाडे,
आज सुधियों के सहारे,
जब के दुनिया स्वपन के,
जादु भवन मे खो गई है,
रात आधी हो गई है,
दे रही कितना दिलासा,
आ झरोखे से जरा सा,
चांदनी पिछले पहेर की,
पास में जो सो गई है,
रात आधी हो गई है!

सुरेख.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

सुंदर मुक्तक.
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

एक रात्रीचा अनुभव रिक्तसा
अपुर्ण भारी गहनसा..... अर्थपूर्ण ओळी.

मुक्तक चांगले आहे.

पल्ले, झोपत जा गं कधी कधी. जागरण बरी नाहीत.
अशी निशिगंधा फुलत असेल तर गोष्ट वेगळी.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

Happy
झोपेन हो झोपेन, तरिही एक कविता झाडुन इथे पोष्टल्याशिवाय नाही.

पल्ले, तू लै म्हणजे लैच भारी लिहितेस. मस्त.
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

सुंदर ! आवडली

आईशप्पथ! सगळ्यांचे छान छान प्रतिसाद म्हणजे दूधात साखर आणि वैभव जोशीं सारख्या गुरुंचा छोटासा गोड प्रतिसाद म्हणजे अमुल्य असं थोडंसं केशर.

भारी लिवलंय हो पल्ले Happy
************
To get something you never had, you have to do something you never did.

पल्ली चालु दे... जागत जा... थोडीशी कमी तरी होशील! Wink

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

सुंदर !
आणि, ही झोपेच काय ऐकतोय ? शब्दच पापणीवर फेर धरून नाचत-बागडत असावेत तुमच्या !

२ कविता कर .. एका वेळी येवढ पचवायची माझी ताकद नाही....

अरे व्वा पल्ली ! अभिनंदन! आवडली गं..खुप आवडली.

पल्ले
खूप छान
पानसळही उगाच जागी,
होउन हलते गप्प.
आणि
दूर चांदण्यांचा लपंडाव
पाठमोरा एक नकार.
ह्या ओळी विषेश करुन आवडल्या

व्वा क्या ब्बात है ! मस्त कविता आहे.