सावर

Submitted by shuma on 8 May, 2009 - 04:20

मोरपंखी घन कसा
उफाळत फुटू पाही
पसरुनी पंख मोर
त्याला उतराई होई
फिसकटे उन्हा कसा
सरींसह धावू पाही
हिरवळी वर दूर
पसरत निळी शाई
रेंगाळते एक छटा
उगा चुकार सोनेरी
मिसळते निळाईत
अबोलीशी पाठमोरी
चोरुनीया लालसर
ओलावल्या मेघकडा
आवरुन घेत जातो
सूर्य आपुला पसारा

शमा

गुलमोहर: 

फिसकटे उन्हा कसा
सरींसह धावू पाही >> इथे लय तुटते आहे... बा़की.. शमा आहे Happy

अहाहा... पावसाची चाहुल लागली अगदी ... खुप सुंदर..!
------------------------------------------------

प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
माझ्या कविता...इथे बघा..
http://www.destiny-kavyanjali.blogspot.com
----------------------------------->>

सुंदर !!

~ प्रकाश ~
---------------------------
उन्मळण्याआधी, वृक्ष असावं लागतं
कोसळण्याआधी, खूप उंच जावं लागतं
असा जावू नकोस 'मीच असेन वेडा' म्हणुन, जगाशी पाठ फिरवून.
वेडं होण्याआधी ....शहाणं असावं लागतं !
-अज्ञात

आवडली.
चोरुनीया लालसर
ओलावल्या मेघकडा >>> सही !

    ***
    लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
    खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)

    '' छान'' शेतावर फिरायला गेलेलीस की काय ? मस्त लिहिलीस .

    शमा, सुरेख वर्णन. Happy

    >> पसरुनी पंख मोर
    >> त्याला उतराई होई
    हे फार आवडलं.

    मस्त!!

    *******************
    सुमेधा पुनकर Happy
    *******************

    >चोरुनीया लालसर
    ओलावल्या मेघकडा
    आवरुन घेत जातो
    सूर्य आपुला पसारा

    शुमा, किती आरपार लिहून गेली आहेस...
    आणि किती सूचक आणि अचूक शब्द वापरले आहेसः
    >उतराई होई
    >फिसकटे उन्हा कसा
    >रेंगाळते एक छटा
    >अबोलीशी पाठमोरी

    प्रतिभेला सलाम आहे!

    ही कविता खरच पावसावर असेल तर मी "रसग्रहणाच्या" बिगारी यत्तेत जावूनच बसतो Happy
    __________________________
    ***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
    अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

    रेंगाळते एक छटा
    उगा चुकार सोनेरी
    मिसळते निळाईत
    मस्त निसर्गवर्णन.
    ..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

    सुंदर. आवडली. Happy

    --
    उत्कट-बित्कट होऊ नये.. भांडू नये-तंडू नये;
    असे वाटते आजकाल, नवे काही मांडू नये..!

    सगळ्यांचे मन:पूर्वक आभार.

    निसर्गाच्या सार्‍या रंगात थोडे भाव मिसळले तर कसं चित्र तयार होईल ते शब्दात चितारायचा एक थोडा प्रयत्न केलाय जमला न जमला तुम्हीच ठरवायचं
    सत्या चित्र ह्या द्रुष्टीकोनातून पाहिल्याने मी (रंग) फिसकटे हा शब्द वापरला. खटकत असेल तर..

    झाकोळत किंवा उसवत उन्हा कसा
    सरींसह धावू पाही
    हिरवळी वर दूर
    पसरत निळी शाई

    हे कसं वाटेल?

    योग Happy भा. पो. बद्दल आभार..
    पावसाही पलिकडचं काही लिहायचा प्रयत्न केलाय खरं

    एकदम सुरेख आणि सुरेल.
    .............................................................................
    किती पायी लागू तुझ्या
    किती आठवू गा तुते
    किती शब्द बनवू गा
    अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)

    खूप सुंदर वर्णिलंय... अनुभवता येतेय... त्यामुळे अर्थ पटकन वेध घेतो मनाचा... आवडली.

    वार्‍याची बात !
    वार्‍यावरची नाही !! ---
    " पिसारा छान फुललाय. "

    रेंगाळते एक छटा
    उगा चुकार सोनेरी
    मिसळते निळाईत
    अबोलीशी पाठमोरी

    हे खुप आवडलं.

    अप्रतिम ... एक चांगली कविता वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद

    सुरेख!! 'सावर' आवडली.
    ---------------------------------
    देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

    एक अप्रतिम निसर्ग-कविता! अभिनंदन!
    बापू करंदीकर

    Happy
    पुन्हा एकदा सर्वांचे आभार!

    अरे ही कशी मिसली..
    शुम्स मस्त गं..
    ----------------------
    हलके घ्या, जड घ्या
    दिवे घ्या, अंधार घ्या
    घ्या, घेऊ नका
    तुमचा प्रश्न आहे!

    रेंगाळते एक छटा
    उगा चुकार सोनेरी......
    व्वा!

    आहा .... !!!!!!!

    परागकण

    Happy मी वाचली होती .. चला... अयुष्यात सगळचं निसटत नाही.. Happy

    शमा.. सुरेख....आवडली..:)

    Pages