थँक्स फॉर एव्हरी थिंग

Submitted by अज्ञात on 17 May, 2009 - 21:15

थँक्स फॉर एव्हरी थिंग..!!

मात्र आज ती आधीसारखी
मनमोकळी, खळखळून
आत-बाहेर बोलली नाही

लिंगातीत-वयातीत मैत्रीच्या
वास्तवाची जाणीव झाली असावी का तिला ?
की त्याच्या वागण्यात आपलेपणाचा
नकोसा अतिरेक झाला असेल ?
तो अगंतुक होता का ?
की ती स्त्रीसुलभ संशयाची बळी ?

कुणास ठाउक

असेल किंवा नसेलही

पण तिच्या म्हणण्याप्रमाणे,
खरं प्रेम हृदयात चिरंजीव असतं
त्यासाठी,
वारंवार भेटण्याची अथवा बोलण्याची गरज नसते

असेल, तसंही असेल

तसंच असो.

थँक्स फॉर एव्हरी थिंग !!...

..............अज्ञात

गुलमोहर: 

अज्ञात, सुरेख कविता!
अनघड वयातल्या प्रेमाचा हा एक हमखास टप्पा असतो Happy

आपलेपणाचा नकोसा अतिरेक >> मस्त!!

कविता आवडली.

मस्त !! आवडली Happy

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" वाह...! "

आठवणी ताज्या केल्यात अज्ञात...छान कविता.

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

क्या बात है ! मस्त. थँक्स Happy

मस्त!!
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

अरे वा अज्ञातजी ,

तुमचा हा अवतार नवा आहे आणि अधिक भावणारा. ह्याचा अर्थ मला आपल्या बाकी कविता सोळा आणे नव्हत्या असे नक्कीच नाही पण मला ही कविता खूपच आवडली.

.

सर्व सहृदांना माझे मनःपूर्वक धन्यवाद.
..................अज्ञात

you may meet me in details at ....... www.layakari.com

दिपु, काय एडिटलंस रे..... Happy

अरे वा अज्ञातजी ,

तुमचा हा अवतार नवा आहे आणि अधिक भावणारा. ह्याचा अर्थ मला आपल्या बाकी कविता सोळा आणे नव्हत्या असे नक्कीच नाही पण मला ही कविता खूपच आवडली.

वैभव,
एक मोठा वेगळाच दिलासा दिलात पामराला. आपले आणि सर्व दात्यांचे अंतःकरणपूर्वक आभार Happy

.........अज्ञात

you may meet me in details at ....... www.layakari.com

वा ! आवडली.

    ***
    Finagle's Second Law : No matter what the anticipated result, there will always be someone eager to (a) misinterpret it, (b) fake it, or (c) believe it happened to his own pet theory.

    वय ओलांडुन जेंव्हा कवि उतरतो तेव्हा... नाही कविला वय नसतच मुळी Happy जन्माला येणार्‍या बाळा पासुन ते हजारो वर्षापुर्वी जग सोडलेल्या तृप्त आत्म्या प्रमाणे तो कधीही काहीही होतो...

    अजुन एक निसटलेली...कविता Sad

    अ‍ॅड्मिन टीम- निवड समितीचे अज्ञाताच्या वतीने मनःपूर्वक आभार तसेच सर्व प्रतिसादकर्त्यांना कृतानेक धन्यवाद. व्यक्त संवेदनेला पुरस्कर्त्यांकडून भरभरून खत्-पाणी मिळाल्याने कविता अजून डंवरते. Happy

    ......................अज्ञात

    खरच छान
    सहज सुन्दर कविता

    Pages