शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले

Submitted by मृण_मयी on 8 May, 2009 - 02:23

शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले
दे अर्थ आता जगण्यास; पुष्कळ झुलवून झाले

तुजवीण हाती काही न उरले माझे म्हणाया
बाकी जगावर केव्हाच पाणी सोडून झाले

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले

अद्याप आहे अंतर जरासे, तृष्णा जरासी
अद्याप कोठे लज्जित कळीचे उमलून झाले?

नाहीतरी ते पाऱ्याप्रमाणे निसटून जाते
उधळून यौवन टाकावयाचे ठरवून झाले

हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
दोघात सारे समजून झाले, उमजून झाले...

गुलमोहर: 

सुंदर.
कुठला एक शेर असं सांगता येणार नाही पण तरीही

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले

..... अगंगंगंगं !!! तुफान आहे .

छ्या ! पेज बंद करून पुन्हा ओपन केलं मी. कैच्याकैच घुसला तो शेर.
गझलियत गझलियत बोलून घसा कोरडा झाला पण साला असा एखादा शेर सुचला नाही उदाहरण म्हणून सांगायला.

काय म्हणायचं आहे
कसं म्हणायचं आहे
सहज सोपे शब्द
आणि
अंदाज-ए-बयां

हा शेर गझल बीबी वर मॅक्सिमम फाँट मधे लावा

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले

व्वा!!
हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
दोघात सारे समजून झाले, उमजून झाले...

मस्त!!

शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले - अनुपम, खुप सुंदर, खुप खुप आवडली....

सगळे शेर एकापेक्षा एक सुंदर...

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले

हा शेर खुप आवडला...

गझल खुप आवडली, पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटली.
आशयातला सोपेपणा स्तुत्य....

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

सुरेख. समजून झाले, उमजून झाले !!!!

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले... सुभान अल्लाह! खासच!

हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
दोघात सारे समजून झाले, उमजून झाले... विकेट काढलीत! किती सहज लिहिणार अजून...

गजल आवडली पूर्ण!

हर शेर कहर आहे अगदी ! कितीदा वाचले तरी तृष्णा मिटेचना !

खूप सुंदर...जिय्यो!

पर्याय... अफाट !!

    ***
    लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
    खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)

    मृण्-मयी, सुंदर गझल!
    विशेषत: मतला, 'पर्याय नाही..' आणि शेवटचा शेर - हे फार आवडले.

    वाह वाह.... किती सहज आणि तरिही किती मनमोहक....
    या गझलेच्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दच सुचत नाहियेत. जियो!

    गझल आवडली. मस्त आहे. सर्वच शेर अर्थपूर्ण.

    कळीचे उमलून झाले? येथे प्रशचिन्हाची जरूरी वाटते नाही.
    दोघात सारे समजून झाले, उमजून झाले... रचना अप्रतिंम.
    येथे झालेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अर्थ न बदलता दुसरे काय करता येईल असे वाटले.
    उमजून आले/ गेले, समजून झाले ..?

    -सविनय.

    ..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

    वाह !! म्रूण्मयी

    पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
    लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले

    खल्ल्लास शेर आहे !!

    पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
    लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले

    हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
    दोघात सारे समजून झाले, उमजून झाले...

    खल्लास. पार राडा करुन टाकला तुम्ही. लै खास.

    सुंदर आहे. 'पर्याय' आणि शेवटचे दोन खूप आवडले.

    संपूर्ण ग़ज़ल मस्त आवडली.
    "पर्याय नाही...", "हा दोष नाही ..." तर अप्रतिम!!

    शरद
    .............................
    "तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
    बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
    ............................

    नाहीतरी ते पाऱ्याप्रमाणे निसटून जाते
    उधळून यौवन टाकावयाचे ठरवून झाले

    हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
    दोघात सारे समजून झाले, उमजून झाले...

    वावा... एकदम सहज आले आहेत(असे भासते)...

    *********************
    वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
    मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!

    छान गझल.
    सगळ्याच ओळी आवडल्या..:)

    --
    उत्कट-बित्कट होऊ नये.. भांडू नये-तंडू नये;
    असे वाटते आजकाल, नवे काही मांडू नये..!

    मिल्याशी सहमत.
    लक्षात राहील अशी गझल.जियो

    जयन्ता५२

    खुप छान !
    सह्हीच !

    पर्याय नाही प्रतिसाद देण्यावाचून Happy

    सुंदर गझल.

    देशप्रेम, गरीबांचा कळवळा, विरह, प्रेमभंग अशा ठळक विषयांवर बटबटीत कवितांचा रतीब पडतोय आजकाल. तुमच्या गझलेत सूक्ष्म न्युआंसेस टिपलेत ते फार हृद्य वाटले. शब्द योजना पण चपखल आहे.

    प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

    "किती मृण्मयीने सजवावे मातीला ह्या तुजसाठी ?
    दोन घडी तुज रिझवायाला किती जन्म शृंगार मला ?"

    पाचवा शेर वगळता बाकी सहज वाटली.
    __________________________
    ***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
    अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

    नाहीतरी ते पाऱ्याप्रमाणे निसटून जाते
    उधळून यौवन टाकावयाचे ठरवून झाले

    हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
    दोघात सारे समजून झाले, उमजून झाले...

    >>> भन्नाट!!!'

    --------------
    नंदिनी
    --------------

    Pages