एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो. आपल्या या दोन्ही भुमिका आपण इतक्या सहजतेने पार पाडतो की आपल्या स्वतःच्या या दोन परस्परविरोधी भुमिकांबाबत आपल्या मनात यतकिंचितही प्रश्न उभे रहात नाहीत. बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही. कारण तसे प्रश्न उपस्थित करणार्या लोकांना इथे जागा नाही, त्यांना मुर्खांच्या आणि माथेफिरुंच्या झुंडीला सामोरे जावे लागते.
मानवी मन हे जिथे जाईल, जे म्हणेल आणि जे करेल त्या सगळ्यामागे त्याचा कम्फर्ट असतोच. ही दुहेरी भुमिका अतिशय कम्फर्टेबल आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते. नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. अनेकांना ती असतेही परंतु माणसाच्या क्रुरपणाला,दडपशाहीला आणि भीतीला शरण गेलेली 'माणसाळलेली माणसं' निमुटपणे या दरवाज्यासमोर रांगा लावतात.
दाभोळकरांची हत्या आणि आपण
Submitted by हरवलेल्या जहाजा... on 20 August, 2013 - 16:26
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हार्मलेस अन हार्मफुल यातलं
हार्मलेस अन हार्मफुल यातलं अंतर एवढं कठीण आहे का कळायला?
का उगाच वादासाठी वाद?>>>
बेफिकीर, तुम्ही केलेल्या
बेफिकीर,
तुम्ही केलेल्या अंधश्रद्धेच्या व्याख्येत नारळ फोडणं बसतं की नाही? <<<
मला असे वाटते की नारळ फोडणे ही आहे अंधश्रद्धाच, पण त्यात 'एक नारळ फुटणे' ही उगाचच झालेली सांपत्तिक हानि आहे हे खरे आहे. त्यामुळे, मी केलेली व्याख्या अचूक असायला हवी किंवा मी केलेली व्याख्या मुळातच चुकीची आहे असे म्हणावे लागेल.
पण जोवर अधिक योग्य व्याख्या मला ज्ञात होत नाही तोवर ही व्याख्या स्वतःपुरती योग्य मानणे हा माझा हेतू आहे. याचे कारण नारळ फुटणे ही नेमकी सांपत्तिक हानिच आहे असेही म्हणता येणार नाही कारण नारळाचे कामच फुटणे हे आहे. तो कधीतरी फुटणारच असतो.
वाढदिवसाला 'जिवेत शरद शतम'
वाढदिवसाला 'जिवेत शरद शतम' अशी शुभेच्छा दिल्याने ती व्यक्ती खरेच शंभर वर्षे जगते का?
मग का देतात अश्या शुभेच्छा?
तसंच बर्थ डे ला केक कापून, मेणबत्त्या फुंकून, थोडा केक तोंडाला फासून मग "मेनी मेनी हॅप्पी रिटर्नस ओफ द डे" म्हटले की खरंच त्या बर्थ बॉय्/गर्लला असे अनेक "हॅप्पी बर्थ डे" मिळतील का?
नाही ना? मग मला वाटते नारळ फोडण्यासारखे असे वाढदिवस, बर्थ डे साजरे करणे आणि शुभेच्छा देणे देखील अंधश्रध्दाच आहेत.
अगदी "गुड मॉर्निंग" म्हणणे देखील अंधश्रध्दाच आहे.
बेफिकीर, नाही. मुद्दे क्र. ३
बेफिकीर,
नाही.
मुद्दे क्र. ३ आणि ४सुद्धा या क्रियेला अंधश्रद्धाच ठरवतात.
अहो त्या शुभेच्छा आहेत...
अहो त्या शुभेच्छा आहेत... श्रध्दा नाही
(No subject)
चिनूक्स - मान्य होत आहे तुमचे
चिनूक्स - मान्य होत आहे तुमचे म्हणणे!
पण मान्य करू नये असे वाटणे हा अहं आहे. तो अहं सुखावण्यासाठी प्रतिवाद करावासा वाटत आहे. तो प्रतिवाद असा:
नारळ फोडणे यात कोणत्याही सजीवाला हानि नसेल, नारळ फुटल्यानंतर तो खाल्लाच जाणार असेल, तो या कारणासाठी फुटला नाही तरी कोणत्यातरी कारणासाठी कधीतरी फुटणारच असेल तर त्यात गैर काय?
(व्हेअरअॅज - बोकड किंवा कोंबडी मारली जाणे ही सजीवाला पोहोचवलेली हानि आहे, ते प्राणी मारले नसते तर ते पुढे कधीतरी मारलेच गेले असते असे नाही)
मग तो नारळ घरी फोडून त्याच्या
मग तो नारळ घरी फोडून त्याच्या वड्या कराव्यात आणि मला द्याव्यात.

वड्या करण्यासारख्या श्रद्धायुक्त कामासाठी विशिष्ट वेळ आणि स्थळ कशाला?
नारळ फोडून केलेल्या वड्या उत्तम होतात, हे सिद्ध करणारे भरपूर पुरावे आहेत.
नारळ फोडल्यावर संकटं येत नाहीत, याला पुरावे नाहीत. संकटं येऊ नयेत म्हणून फोडलेल्या नारळाच्या वड्या करणं, हे सेकंडरी झालं. यंत्रासमोर, वाहनासमोर फोडलेल्या नारळाच्या वड्या जास्त चविष्ट असतात, यालाही पुरावा नाही.
तुम्ही हेतूंमध्ये गल्लत करत आहात. हेतू काय? संकट येऊ न देणं. मग नारळ किंवा कोंबडी यांपैकी काहीही वापरलं तरी फरक काय पडतो? नारळ फोडण्यामागची कृती ही बळी देण्याचीच आहे.
अहो त्या शुभेच्छा आहेत...
अहो त्या शुभेच्छा आहेत... श्रध्दा नाही >>
माहिती आहे मला कि त्या शुभेच्छा आहेत.
जसं नारळ फोडून पाऊस पडत नाही, यंत्र बिघडत नाही, रॉकेट उडत नाही, तसे शुभेच्छा देऊन कोणाचे शुभ होते काय? केक कापून, बर्थ डे ची गाणी म्हणून कोणी शतायुषी होते काय?
मग का अश्या वायफळ क्रिया करायच्या?
नारळ फोडणे हीच मुळात बळी
नारळ फोडणे हीच मुळात बळी देण्याऐवजी केलेली तडजोड आहे.
मूळ संकल्पना बळी देणे हीच आहे.
आक्षेप नारळ फोडून खाण्यावर वा बोकड कापून खाण्यावर अजिबात नाहिये. माणूस इतर सजीवांनाच खाऊन जगू शकतो.
आक्षेप हा आहे, की माझे काम चांगले व्हावे, म्हणून मी 'बळी' देण्याची संकल्पना राबवावी का?
आपल्या श्रद्धेत देवाचे अस्तित्व असलेच, तरी बळी रूपी लाच त्याला देणे हे श्रद्धेत बसते, की अंधश्रद्धेत?
*
मशिनला फुले कुंकू वाहण्याबाबत.
१६ लाख रुपये किमतीच्या लेझर मशीनला वाहिलेला ओला गंध ओघळून आत गेल्याने त्या मशीनच्या रिपेरिंगला आलेला ४ लाख रुपये अतिरिक्त खर्च, तो ही शासकीय कार्यालयात मी पाहिलेला आहे. 'अॅक्सिडेंटल वॉटर स्पिलेज' अशी कारणमीमांसा तयार करावी लागली होती.
यात त्या मशिनला फुले वाहणार्या एकाही महान माणसाला त्या लेझरच्या वापराची काडीचीही माहिती नव्हती. सगळे उत्साही कार्यकर्ते. आले नवे मशीन, कर पूजा. या नुकसानाची जबाबदारी या गाढवांवर निश्चित केली असती, तर इथल्या सारखे मठ्ठ भगवे आलेच अस्ते बोंबलायला. "पूजा करण्याच्या आमच्या श्रद्धेवर घाला घालताय" म्हणून.
आपणच माफ करून टाकायचे यांच्या 'श्रद्धेचे' कोलॅटरल डॅमेज..
आय वंडर.
रैनांनी तिकडे डुकराचे पिलु कापण्याबद्दल लिहिलेय. असल्या गमतीदार अंधश्रद्धा इतर देशांत आहेत का? हे वाचायला आवडेल. आखाती देशांत नव्या मशिनबद्दल काय करतात? युरोपात?
असल्या गमतीदार अंधश्रद्धा इतर
असल्या गमतीदार अंधश्रद्धा इतर देशांत आहेत का?>> १३ वा मजलाच गायब करणे. त्याला १२ ब नाव देणे. फ्रायडे द १३, आणखी डेंजरस. वगैरे वगैरे.
वाचतांव हां! >>>>तुम्ही
वाचतांव हां!
>>>>तुम्ही हेतूंमध्ये गल्लत करत आहात. हेतू काय? संकट येऊ न देणं. मग नारळ किंवा कोंबडी यांपैकी काहीही वापरलं तरी फरक काय पडतो? नारळ फोडण्यामागची कृती ही बळी देण्याचीच आहे. <<<<<
ओके,
पण हेतूचाच केवळ विचार करायचा तर नारळ न फोडता, अतिसंकटकाळी, मदतीची कुठलीच भौतिक अपेक्षा दिसत नसताना/मिळत नसताना, मी जर "अरे देवा, आता तू तरी माझ्याकडे बघ, अन सुधरव ही परिस्थिती - वा आता अजुन नव्याने संकट येऊ देऊ नकोस" अशी प्रार्थना केली तर ती देखिल अंधश्रद्धाच ठरेल ना?
कारण प्रार्थनेमागिल हेतू ज्या देवाला बघितले नाही/दिसला नाही, ज्याचे अस्तित्व प्रयोगशाळेत सिद्धही झालेले नाही, अशाकडून "काहीतरी मिळविण्याचाच आहे", तेव्हा ही देखिल तुमच्या विवेचनाप्रमाणे अंधश्रद्धाच मानायला हवी ना?
लिंबूभौ, हे मला सुचले नव्हते.
लिंबूभौ, हे मला सुचले नव्हते. चांगला मुद्दा!
यात वेगळा मुद्दा
यात वेगळा मुद्दा कुठला?
याबद्दल लिहिलं आहे अनेकांनी अगोदर. संकटकाळात आपला आधार आपण शोधावा. तसा आधार प्रत्येकजण शोधतो. कोणी देवात, कोणी कामात.
चिनुक्स , लिंबुभाउ
चिनुक्स , लिंबुभाउ इत्यादी.........
.
.
व्याख्या सारखी..काळ देश वेळ प्रकार ... यामुळे सारखी बदलत राहते का ?
कारण प्रार्थनेमागिल हेतू ज्या
कारण प्रार्थनेमागिल हेतू ज्या देवाला बघितले नाही/दिसला नाही, ज्याचे अस्तित्व प्रयोगशाळेत सिद्धही झालेले नाही, अशाकडून "काहीतरी मिळविण्याचाच आहे", तेव्हा ही देखिल तुमच्या विवेचनाप्रमाणे अंधश्रद्धाच मानायला हवी ना?
<<
कर्रेक्ट @ लिंबाजीराव.
मी म्हटलंय ना? नास्तिक बनायला काय काय लागतं ते
>>>>>> यात वेगळा मुद्दा
>>>>>> यात वेगळा मुद्दा कुठला?
याबद्दल लिहिलं आहे अनेकांनी अगोदर. संकटकाळात आपला आधार आपण शोधावा. तसा आधार प्रत्येकजण शोधतो. कोणी देवात, कोणी कामात <<<<<
अनेकांचे सोडून द्याहो. माझा प्रश्न सु:स्पष्ट आहे. संकटकाळात (वा एरवीही) अधिक संकट येऊ नये म्हणून मी नारळ फोडला काय किंवा देवाला हाकारले काय, तुमच्या व्याख्येप्रमाणे/विवेचनाप्रमाणे/उदाहरणाप्रमाणे मी देवाला हाकारणे/आळवणे ही अंधश्रद्धाच ठरते. हो ? वा नाही ?
(केवळ निवडक मजकुर ठळक करण्यासाठी संपादीत)
हो. आणि हे माझंच मत मी पूर्वी
हो.
आणि हे माझंच मत मी पूर्वी याच धाग्यावर नोंदवलं आहे. तुम्ही ते वाचावेत याच इच्छेने सांगितले.
चिनूक्स, जर तुमचे उत्तर हो
चिनूक्स, जर तुमचे उत्तर हो असेल, तर आपल्या विचारांत जमिनअस्मानाचे अंतर आहे.
>>>> पुढील नविन ठळक केलेल्या वाक्याची भर घालण्याकरता संपादीत <<<<
अन जर तुमचे वरील प्रश्नास असलेले "हो " हे उत्तरच अन्निसवाल्यान्चेही (अर्थातच) असेल, तर अंनिस ने तत्काळ आपल्या संस्थेचे "अंधश्रद्धा निर्मुलन समिती" हे नाव बदलून "(हिंदूधर्म)श्रद्धा निर्मुलन समिती" असे करवून घ्यावे कारण जे "देवच" मानत नाहीत त्यांचे करता कसल्या श्रद्धा अन कसल्या अंधश्रद्धा? श्रद्धा व अंधश्रद्धा यातिल फरकाची वास्तपुस्तही घेण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही.
अन जर तुमचे वरील प्रश्नास असलेले "हो " हे उत्तरच अन्निसवाल्यान्चेही (अर्थातच) असेल, तर त्यान्चे "देव न मानण्यास" व समाजावर हलके हलके त्या आधारित कायदेकानुन बसविण्यास समाजातून पराकोटीचा विरोधही होणारच याची खात्री बाळगा.
अन आधीही उल्लेख केला होता कुणाचे तरी निमित्ताने, तर पुन्हा करतो, की पंढरीची पूजा करणारे व देवाजवळ काय प्रार्थना केली हे सांगणारे मुख्यमंत्री (आजवरचे जे कोणी तेव्हा तेव्हा असतील ते ते) व त्यांच्या प्रार्थना या देखिल "अंधश्रद्धा" म्हणूनच गृहित धराव्या लागतील (तुमचे मताप्रमाणे) नै का?
चांगलय! चालूद्यात.
[आदी शंकराचार्यांना बहुधा केवळ एकाच चार्वाकाला तोंड द्यावे लागले, आज जर पुन्हा तेच शंकराचार्य जिवित होतील, तर किती कितीक चार्वाकांना त्यांना तोण्ड द्यावे लागेल?
असो ]
<चिनूक्स, जर तुमचे उत्तर हो
<चिनूक्स, जर तुमचे उत्तर हो असेल, तर आपल्या विचारांत जमिनअस्मानाचे अंतर आहे.>
बरं, मग?
तसं ते असण्यास कोणाचीच काही हरकत नाही. तुम्ही संकटकाळी कोणाचं स्मरण करावं, हे मी सांगत नाहीये.
<अन जर तुमचे वरील प्रश्नास असलेले "हो " हे उत्तरच अन्निसवाल्यान्चेही (अर्थातच) असेल, तर त्यान्चे "देव न मानण्यास" व समाजावर हलके हलके त्या आधारित कायदेकानुन बसविण्यास समाजातून पराकोटीचा विरोधही होणारच याची खात्री बाळगा.>
अंनिसची कार्यपद्धती समजून घ्या, पुस्तकं वाचा, कायद्याचा मसुदा वाचा कृपया. तुमच्या या विधानाला काहीएक अर्थ नाही. भारताच्या घटनेनं प्रत्येकाला आपापला धर्म पाळण्याची परवानगी दिली आहे. या परवानगीविरुद्ध देशातला कुठलाही कायदा असू शकत नाही. त्यामुळे या कायद्यामुळे धर्माचरण करता येणार नाही हे एकतर अज्ञानातून किंवा खोडसाळपणे पसरवलेलं असत्य आहे.
>>>> कर्रेक्ट @
>>>> कर्रेक्ट @ लिंबाजीराव.
मी म्हटलंय ना? नास्तिक बनायला काय काय लागतं ते <<<<< तुमचे बरोबरच आहे हो, पण माझ्या डोक्यात पुन्हा किडा वळवळतोय....
माझ्यामते;
नास्तिक बनायला केवळ पंचेंद्रियांवर आधारीत भौतिक शक्याशक्यतांवरचे शहाणपण लागते!
कुंडलीमधे नास्तिकतेचे योग काय अस्तात यावर जरा अधिक अभ्यास केला पाहिजे.
>>>> कायद्याचा मसुदा वाचा
>>>> कायद्याचा मसुदा वाचा कृपया. <<<<
मी आधीच दुसर्या एका धाग्यावर विचारणा केली आहे, अन मिळवु पहातोय की अंनिसचा मूळ १४ (की अजुन कितीक) वर्षांपुर्वीचा मसुदा, व सध्याचा वटहुकुमातील मसुदा काय आहे. तो नेमका वाचून मगच त्यावर बोलेन, म्हणण्यापेक्षा माझे मत बनविन.
लिंबू भाऊ, देवा-धर्माच्या
लिंबू भाऊ,
देवा-धर्माच्या नावाखाली चाललेल्या चुकीच्या गोष्टी / प्रथा बंद करा हे सांगायला सुरुवात केली,
की ते लोक कसे 'इस्लाम खतरेमेऽ' अशी आरोळी ठोकतात,
तशीच आरोळी, 'या निमित्ताने हे लोक आता हळू हळू हिंदू धर्मच बुडवणार', अशी ठोकणे हे तमाम हिंदुत्ववाद्यांचे आद्यकर्तव्य आहे. तुम्ही त्यांतल्या आद्य लोकांपैकी एक आहात.
यामागे हिंदू धर्माची किंवा हिंदू धर्मियांची भलाई हा विचार कधीच नसतो. (जसा मुसलमानांचे भले व्हावे हा विचार कधीच "इस्लाम खतरेमे"वाल्यांच्या मनात नसतो.)
या निमित्ताने या धर्मातील लोकांचे मतासाठी ध्रुविकरण व्हावे. ("एकी" नव्हे.) व 'त्यांच्या' सारखीच एकगठ्ठा मते मिळून आम्हाला सत्तेचे लोणी मिळावे हाच एकमेव विचार असतो.
तेव्हा हे असले बुद्धीभेद थांबवा.
अन हो.
तुम्ही काऽय पण काळजी करू नका,
काय धर्म बिर्म बुडणार नाही.
आम्ही आहोत इथे. तसले काही होऊ देणार नाही
रच्याकने :
भोंदू तात्रिकांना शिक्षा केल्याने तुमच्या ज्योतिष सांगण्याच्या छंदावरही टाच येणार नाही, असे आश्वासन माझ्याकडून देतो.
नास्तिक या शब्दाचा मूळ अर्थ =
नास्तिक या शब्दाचा मूळ अर्थ = वेदप्रामाण्य न मानणारा
चिनूक्सच्या १३:२५ च्या पोस्टला संपूर्णतया अनुमोदन
बापरे.. हे सगळे वाचुन माझी
बापरे..
हे सगळे वाचुन माझी कल्पनाशक्ती जरा जोरातच धावायला लागली आणि वाटायला लागले की हाच मुद्दा अजुन खुप जोरात ताणला तर माणसातले नातेसंबंध मानणे आणि त्याप्रमाणे वर्तन करणे ही सुद्धा काही कालाने अंधश्रद्धा वाटायला लागेल.
हा माझा भाऊ/बहिण/आई/बाप, त्यामुळे लग्न इ. गोष्टी ह्या नातेसंबंधांत व्यर्ज हेही आपल्या मानण्यावर आहे, प्राणी कुठे पाळताहेत हे भेदाभेद?? मानव विकसित होत होता तेव्हा कुठे होते हे असले भेद? हे भेद, श्रद्धा, अंधश्रद्धा हे सगळे हळुहळू मानवाबरोबर विकसित होत गेले.
आज श्रद्धा, अंधश्रद्धेवर प्रश्न निर्माण होताहेत, उद्या नातेसंबंधांवर प्रश्न निर्माण होतील (काही लोकांमध्ये आताच झालेही असतील, कोण जाणे) .
कसलीच नाती नसलेला, कसल्याही श्रद्धा, अंधश्रद्धा नसलेला हा उद्याचा मानव.... याच्यात आणि पृथ्वीवरील इतर सजिवात फरक असलाच तर इतकाच असेल की याला माहित असेल त्याने कुठुन कुठे प्रवास केलाय. अर्थात इतर सजिवांना हे माहित नाहीय ही माझी अंधश्रद्धा आहे. त्यांना कदाचित मानवाच्या आधीच हे सगळे कळले असेल.
साधना, अचूक दुसर्या शब्दात,
साधना, अचूक
दुसर्या शब्दात, पशूपासून किन्वा एक पशू म्हणून बदलुन मानवाचे माणसात रुपांतर घडणे, व परत पुन्हा पशुत्वाक्डे जाणे असे हे वर्तुळ पूर्ण होण्याचे एक अंग आहे, असे मला वाटते.
>>>>> या निमित्ताने या धर्मातील लोकांचे मतासाठी ध्रुविकरण व्हावे. ("एकी" नव्हे.) व 'त्यांच्या' सारखीच एकगठ्ठा मते मिळून आम्हाला सत्तेचे लोणी मिळावे हाच एकमेव विचार असतो. <<<<<
माझे आजचे वय, माझे शिक्षण, माझे आर्थिक कर्तॄत्व बघता इथुन पूर्वीची २० वर्षे व इथुन पुढे जितका काळ जगेन तितक्या काळात मी कोणत्याही राजकीय अभिलाषेने "सत्तेचे लोणी" वगैरे मिळवायच्या मागे नाहीये. सबब हे सल्ले तुम्ही ज्यान्च्या सत्ताकाळात या विधेयकावर जाहिर राहूदेच, विधीमंडळातदेखिल चर्चा घडवून आणली गेली नाही त्यान्ना द्या!
>>>>> तेव्हा हे असले बुद्धीभेद थांबवा. <<<<
आम्ही मुद्दा मांडला तर तो बुद्धिभेद, अन तो थांबविण्याचा आदेश, असे का? तुमचे विचार मांडा की! नै कोण म्हणलय.
>>>> रच्याकने :
>>>> भोंदू तात्रिकांना शिक्षा केल्याने तुमच्या ज्योतिष सांगण्याच्या छंदावरही टाच येणार नाही, असे आश्वासन माझ्याकडून देतो. <<<<
यावर माझे अधिक भाष्य मूळचा मसुदा अन आताचा मसुदा अभ्यासून मगच करीन. तोवर तुमचे आश्वासन तुमच्यापाशीच जपुन ठेवा, कदाचित त्यामुळेच तोन्डघशी पडायची वेळ येईल.
असो.
>>>> भारताच्या घटनेनं
>>>> भारताच्या घटनेनं प्रत्येकाला आपापला धर्म पाळण्याची परवानगी दिली आहे. <<<<< माझ्या जिवितकाळातील परिस्थिती बघता यावर माझा विश्वास बसत नाही.
>>>> या परवानगीविरुद्ध देशातला कुठलाही कायदा असू शकत नाही. <<<<< याचेवरही माझा विश्वास नाही, पण मूळ परवानगी, व त्याला अनुलक्षुन पूर्वपरवानगीने छेद देणारे कायदे कोणकोणते यावर माझा सूक्ष्म/ढोबळ अभ्यास नसल्याने तत्काळ उदाहरणही देता येत नाहीये, पण अभ्यासाअंती यावर भाष्य करता येईल.
>>>>>> त्यामुळे या कायद्यामुळे धर्माचरण करता येणार नाही हे एकतर अज्ञानातून किंवा खोडसाळपणे पसरवलेलं असत्य आहे. <<<<< हे असत्य आम्ही पसरवित नाही आहोत.
व यावरही मूळ मसुदा वाचल्यानंतर, तसेच वर उल्लेखिल्याप्रमाणे अंनिसचे मतप्रणालीप्रमाणे देवाला हाकारणे/मानणे ही देखिल अंधश्रद्धाच असेल, तर खरे तर कायद्याचे परवानगीअंतर्गत धर्माचरणाचा हा मुद्दाच अत्यंत गांभिर्याने घ्यायची वेळ आली आहे असे मला वाटते.
माझ्या तोकड्या माहितीप्रमाणे भारताचा कोणताही सद्य परिस्थितीतला कायदा हिंदु धर्मशास्त्रावर जशाचातसा आधारीत नाहीये अपवाद केवळ मुस्लिम पर्सनल लॉ हाच आहे.
>>>>> आज श्रद्धा,
>>>>> आज श्रद्धा, अंधश्रद्धेवर प्रश्न निर्माण होताहेत, उद्या नातेसंबंधांवर प्रश्न निर्माण होतील (काही लोकांमध्ये आताच झालेही असतील, कोण जाणे) . <<<<<
नातेसंबंधामधिल "श्रद्धा" सातत्याने निरनिराळ्याप्रकारे बुद्धिभेद करत केव्हाच घालविण्यात आल्याने, त्याचे दु:ष्परिणाम केव्हाच दिसू लागलेत.
१. दोन्/चार दिवसांपूर्वीची पुण्यातील बातमी, मुलगा व सुनेच्या छळास कंटाळून सासुने शनिवारवाड्याजवळच्या पुलावरुन नदीत आत्महत्येकरता उडी मारली (दोघांनी तिला वाचवले)
२. इथे देशात घरात कोणीच नाही, आप्त परदेशात, म्हणून हवितितकी रक्कम मोजुन वृद्धाश्रमाची सोय व्हावी अशा आश्यची चर्चा इथेच माबोवर कुठेतरी झाली आहे. मात्र त्याव्यतिरिक्तही, अनेकानेक सबबी/कारणे सांगत आजारी/वृद्ध सख्या नातेवाईकांना वृद्धाश्रमात उपचार/वा नुस्ते रहाण्याकरता सोडणारे अनेक चिरंजीव/अपत्ये व त्यान्ची सुना/नातवंडे माझ्या पहाण्यात आहेत. ज्यांनी जन्माला घातले त्यांचेविषयी काडीचीही श्रद्धाभाव नसण्याचीच ही लक्षणे आहेत. (मी मुद्दामहून "प्रेम" हा शब्द वापरत नाहीये)
३. साधे रस्त्यावरुन जाताना, वाहन चालविताना, नियम पाळण्याचे वा दुसर्यास अवधी देण्याचे किमान औचित्यदेखिल हाच समाज श्रद्धाहीनतेमुळे गमावुन बसला आहे, कारण लहानपणापासूनच कसलेच पापपुण्याचे संस्कार नाहीत.
४ याच पापपुण्याच्या संस्कारांच्या अभावामुळे गेल्या २०/३० वर्षातच पूर्वी कधी नव्हती इतकी भ्रष्टाचाराची बजबजपुरी सर्व देशभर यच्चयावत सर्व सरकारी कार्यालयात माजली आहे.
याव्यतिरिक्तही असंख्य दृष्य परिणाम शोधले तर सापडतील, ज्यामागे कुणाबद्दलच कसलीच निष्ठा वा श्रद्धा ठेवण्याचे अतिबुद्धिप्रामाण्यवादामुळे अशक्य होऊन बसल्याने बेलगाम वर्तन दिसून येईल.
वरील मते माझी वैयक्तिक मते आहेत.
लिंटीं १००००००००००% अनुमोदन
लिंटीं
१००००००००००% अनुमोदन !!
साधे रस्त्यावरुन जाताना, वाहन
साधे रस्त्यावरुन जाताना, वाहन चालविताना, नियम पाळण्याचे वा दुसर्यास अवधी देण्याचे किमान औचित्यदेखिल हाच समाज श्रद्धाहीनतेमुळे गमावुन बसला आहे, कारण लहानपणापासूनच कसलेच पापपुण्याचे संस्कार नाहीत. >> यात पाप-पुण्याचा काय संबंध आहे? दुसर्या माणसाबद्दल , नियमांबद्दल आदर ठेवला तरी हे सर्व होउ शकते. मला पाप लागेल म्हणून मी नियम पाळले पाहिजेत हे कसलं लॉजिक? मला आणि बाकि कोणाला त्रास होउ नये म्हणून मी नियम पाळिन असं का नाही?
भ्रष्टाचाराबद्दलपण तेच. हे माझं काम आहे ते मी करीन एवढंच बास आहे. मला पाप लागेल म्हणून मी करीन असं कशाला पाहिजे? मी काम केलं नाही आणि मला पाप लागलं तर पुजा घालून, गंगेत न्हाउन पापं धुवायची सोयपण होइलच की.
Pages