दाभोळकरांची हत्या आणि आपण

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 20 August, 2013 - 16:26

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो. आपल्या या दोन्ही भुमिका आपण इतक्या सहजतेने पार पाडतो की आपल्या स्वतःच्या या दोन परस्परविरोधी भुमिकांबाबत आपल्या मनात यतकिंचितही प्रश्न उभे रहात नाहीत. बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्‍या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही. कारण तसे प्रश्न उपस्थित करणार्‍या लोकांना इथे जागा नाही, त्यांना मुर्खांच्या आणि माथेफिरुंच्या झुंडीला सामोरे जावे लागते.
मानवी मन हे जिथे जाईल, जे म्हणेल आणि जे करेल त्या सगळ्यामागे त्याचा कम्फर्ट असतोच. ही दुहेरी भुमिका अतिशय कम्फर्टेबल आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते. नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. अनेकांना ती असतेही परंतु माणसाच्या क्रुरपणाला,दडपशाहीला आणि भीतीला शरण गेलेली 'माणसाळलेली माणसं' निमुटपणे या दरवाज्यासमोर रांगा लावतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोर्टामधे, संसदेत/विधानसभेत वगैरे अजुनही कस्ल्यातरी पुस्तक/बाडावर हात ठेऊन वा कुणालातरी/कशालातरी स्मरुन मग "शपथ" घ्यायला लावतात काय हो?
ही "शपथ" म्हणजे नेमके काय असते? कसल्या अज्ञातावरचा (अंध?)विश्वास म्हणजे शपथ असते?
शपथ घेणे/देणे हे "अंधविश्वासाचेच" प्रकार होत नाहीत का?
तरीही सर्रास अफेडेविट वा अन्य माध्यमातुन "शपथपूर्वक" निवेदने/शपथा सर्रास सगळीकडे घेतल्या जात असतातच व ते ही सरकारी कायदेप्रणाली नुसार. हे कसे काय?

आम्ही देवा/धर्माची शपथ घातली, आईबापाची, प्रेमाची वगैरे वगैरे शपथा घातल्या/घेतल्या तर त्या अंधविश्वास/अंधश्रद्धा ठरतात, पण मग सरकारी पातळीवरील "शपथा" वैज्ञानिक कधीपासून झाल्यात?

तुम्ही OMG बघत बसा. तुमची झेप तिथपर्यंतच आहे. > ही वैयक्तिक चिखलफेक नाही तात्विक धुळवड आहे. बरोबर ना?
दुतोंडीपणाची काही सीमा असते. ती आपण कधीच ओलांडली आहे असे आपणास नाही वाटत का. ?

धन्यवाद

शपथ हे वचन दिले यासाठी आहे. त्यासाठी देव पुजा पुस्तक हवेच असे बंधन नाही.

भारतीय न्यायव्यवस्था ही ख्रिस्चन चर्चमधुन विकसित झाली आहे. पुस्तकावर शपथ घेणे हे तिथुन आले आहे.

>>>>शपथ हे वचन दिले यासाठी >>>><<<<
चूक, शपथ व वचन भिन्न अर्थाचे/उद्देशाचे शब्द आहेत.
माझे मूळ प्रश्नांना प्लिज बगल देऊ नका, उत्तर देता येत नसेल तर तसे सांगा, कै जबरदस्ति नैये उत्तर द्यायची! Proud Wink

देव हे सर्व थांबवू शकतो ? जर असेल तर घडव्तोच का ? >>>
हे सगळं देव घडवतो हे कशाच्या आधारावर बोलताय ? जर घडवत नसेल तर थांबवायचा प्रश्न कुठे येतो ?

एका २ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार झाला विज्ञान थांबवू शकत नाही परंतु ज्याचे सार्या सृष्टीवर नियंत्रण आहे तो तर थांबू शकतो पण का थांबवत नाही?>>>
कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते . देवाने बलात्कार करणार्याला डोकं आणि डोक्यात अक्कल सुधा दिलेली आहे .मग तो स्वताला का थांबवत नाही ? तेव्हा त्याच्या नीच कर्माचे भयानक भोग त्याला भोगावे लागणारच .दुसर्याला जी वेदना तो देतो अगदी तशीच वेदना त्याला भोगावी लागते .देव कुणालाही कर्म करताना थांबवत नाही . सगळ्यांना कर्म करताना थांबवायला लागला तर कशाला अर्थच उरणार नाही . तुम्ही तुमच्या बुद्धीचा , शक्तीचा उपयोग कसा करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे . देव कर्माची फलं देतो

कॉम्पुटर, नेट, मोबाइल ह्या गोष्टी मनसोक्त वापरून वर विज्ञानावर टीका>>>
हे वापरताना आम्ही दुसर्याला त्रास देत नाही . हि यंत्र बनवताना निसर्गात already असलेल्या गोष्टी वापरल्यात . ह्यात नवीन गोष्टींचा अविष्कार नाहीये . तेव्हा विज्ञानाला फुकटच क्रेडीट देवू नका . ह्या गोष्टी नसताना सुधा परस्परांशी contact करण्याची साधनं आहेत .

इथे 'सत्कर्मे' करून, शरीर सुखे टाळून, मग पुढे काय मिळते?>>>
इब्लिस तू इथे पण पचाकलास का ? शरीर सुखे टाळावीत असं मी कुठे म्हणलंय दाखवून दे . तुम्ही खुशाल सुखं भोगा काय भोगाय्चीत ती. पण दुसर्याला कशाला त्रास देता ?

स्वत:च्या जीवाला त्रास देणे म्हणजे धर्माचरण व देवभक्ती होते का>>>
असं तरी कुठे म्हणलंय दाखवून दे . तुला लोक काय म्हणतायेत हे कळत नाही आणि तू काय बोलतोस हे तुझं तुलाच काळात नाही .

तुमचा 'सोल' लवकरात लवकर मुक्त करा.>>
माझ्या 'सोल' चं काय करायचं हे तू सांगायची गरज नहि. माझं मी बघून घेईन काय करायचं ते . तू कोण मला मला जायला सांगणारा ? त्यापेक्षा तूच इथून सटक ना . आमच्या देशातूनच टळ .कशाला भिकार्यागत पडलाय. देशाची फाळणी झाली तेव्हाच ह्या सगळ्या डुकरांना इथून हाकलून द्यायला हवं होतं . म्हणजे अशी घाण पसरली नसती . कुठल्या तरी अतिरेकी समाजाच्या संकेतस्थळावर जावून पड आणि तिथे घाण करत बस .

वाळवंटी पंथांत स्वर्ग म्हणजे सर्वस्व आहे. हिंदू धर्मात आत्मतत्त्व समजावून घेणं हे सर्वस्व आहे.>>>+१११११

'वर' जाऊन जे मिळेल याची खोटी आश्वासने देऊन तुमच्यासारखे ढोंगी लोकांना मूर्ख बनवतात, त्यांची कीव येते.>>>
लोकांना मूर्ख बनवायला कशाला पाहिजे ? ते alredy असतात . Proud म्हणून तर 'वर' जाऊन ते मिळवण्यासाठी काफिरांची मुंडकी उडवतात

नाठाळ >>> तु फक्त फु बै फूच बघत बस . तुला तेवढंच जमतं . त्याच्यापुढे जायची तुझ्या बुद्धीची झेप नाही

तिर्रीला हाणलं तर पैलवानाला झोंबलं>>> काउ ला हान्ल्यावर इब्लिस ला, नाठाळ ला, सचिन पगारे झोंबत तसं (and vice versa)

दुसर्याला जी वेदना तो देतो अगदी तशीच वेदना त्याला भोगावी लागते ..

.......

हे माहीत असुनही तुम्ही इब्लिसना व मला दु:ख देताय !

Proud

एक अभंग म्हणा/गाणे/कविता म्हणा, आहे कैतरी......
"पैलतोगे काऊ कोकताहे......"
नदीच्या पलिकडील तीरावर कावळा ओरडताना ऐकु येतो, अन मग पुढे त्याचे विश्लेषण..... पैलतीरावर असल्याने कावळ्याच्या कर्कश्य ओरडण्याचा (कोकलण्याचा?) आवाज तितकासा त्रासदायक वाटत नाहीये... म्हणून बाकी सुचते आहे.

कवि/कवियत्री जर २०१४-१५ मध्ये मायबोलीवर फिरकले अस्ते, तर मात्र लिहीले अस्ते....
"जिथेतिथे काऊ कोकताहे..."
अन कावळ्याच्या त्या कर्णकर्कश्य कटू किचक्या आवाजामुळे पुढचे काहीच सुचले नस्ते लिहायला....

प्पौरोहित करुन दमड्या मिळवायला ज्ञआनोबांच्या रचना कुचकामी अस्ल्याñ लिंब्याल त्या पाठ नाहित.

Proud

लिंब्या , त्या अभंगात ज्ञानोबा काउला प्रेमाने बोलावत आहेत. तु विठुरायाचा संदेश आणलास का असे विचारत आहेत.

आणि तुला मी कर्कश्य वाटतो?

कु फे हे पा ?

दिनेश्क,

१.
>> तुम्ही OMG बघत बसा. तुमची झेप तिथपर्यंतच आहे. > ही वैयक्तिक चिखलफेक नाही तात्विक धुळवड आहे.
>> बरोबर ना?

मला अतिरेकी संबोधून तुम्हीच सुरुवात केलीये. तुम्हीच सांगा.

२.
>> दुतोंडीपणाची काही सीमा असते. ती आपण कधीच ओलांडली आहे असे आपणास नाही वाटत का. ?

मी हजारतोंड्या आहे.

३.
>> आपल्याला विज्ञान मधील नोबल पुरस्कार मिळाला आहे.

अरेवा. तुम्हाला बरीच अक्कल दिसतेय. त्यापैकी थोडी खर्ची घालून शांततेचं नोबेल मिळवा आणि शांतता पाळायला शिका. उपकार होतील समस्त मानव जातीवर!

आ.न.,
-गा.पै.

नमस्कार,

आपल्यासारख्या वैचारीक दिवाळखोरीचे धुळवड उडलेल्या लोकांकरीता तो शब्द वापरला होता. आपल्या प्रतिसादांवरुन तो आपल्याला अचूक लागलेला आहे हे कळले. आणि मी काय करावे हे आपल्यासारख्या धर्मांधांनी शिकवू नये. आपला वेडेपणा लवकर कमी होईल ही इश्वरचरणी प्रार्थना करु इच्छितो.

शांतता ही धर्मांध अतिरेकी लोकांनी पाळली तरच विश्वशांती निर्माण होईल.

धन्यवाद

झाला, या 'नेहेमीच्या यशस्वी' आयडीज्/ड्युआयडीजनी याही धाग्याचा इस्कोट केला. माबोवर कुठलाही धागा उघडला तरी तेच.

वरदा,
नाईलाज आहे. दाभोळकरांच्या हत्येबद्दलचा धागा उघडून या सरिता नामक प्राण्याने घाण केली तिथे.
यांना झाडलं नाही तर कसं चालेल?

दिनेश्क,

१.
>> आपल्यासारख्या वैचारीक दिवाळखोरीचे धुळवड उडलेल्या लोकांकरीता तो शब्द वापरला होता.

तुम्ही परत माझं नाव न घेता टीका करत आहात. कारण नसतांना मला अतिरेकी म्हणालात, आता नाव घ्यायला का घाबरता?

२.
>> आपल्या प्रतिसादांवरुन तो आपल्याला अचूक लागलेला आहे हे कळले.

आहेच मुळी. आधुनिक विज्ञानात किंचितही गती नसलेले लोकं विज्ञानावर भलंथोरलं व्याख्यान खुशाल झाडतात. अशांना थांबवून चर्चा रूळावर आणायला हवी असं माझं मत आहे.

३.
>> मी काय करावे हे आपल्यासारख्या धर्मांधांनी शिकवू नये.

काय करावं ते तुम्ही कुठून शिकून येत ते मला माहितीये.

४.
>> आपला वेडेपणा लवकर कमी होईल ही इश्वरचरणी प्रार्थना करु इच्छितो.

आता कशाला ईश्वराचं नाव घेताय? विज्ञानवादी ना तुम्ही!

५.
>> शांतता ही धर्मांध अतिरेकी लोकांनी पाळली तरच विश्वशांती निर्माण होईल.

हे मात्र बरोबर बोललात. सीरिया, इराक, येमेन, गांधार, पाकिस्तान इथल्या लोकांनी शांती पाळली तर खरोखरंच विश्वशांती निर्माण होईल.

आ.न.,
-गा.पै.

त्यांच्याबरोबर तुमच्यासारखे बिनडोक देखील
तुमच्यासारखे लोकच धर्माला बदनाम जास्त करतात.
देव करो असे लोकांच्या मनात सद्भावना निर्माण हो.
तुमच्याकडून अपेक्षा नाही. धागा भरकटवण्याचे काम चालू द्या
.
धन्यवाद

इब्लिस आता माझेच डायलॉग ढापायला लागला . Proud

आधुनिक विज्ञानात किंचितही गती नसलेले लोकं विज्ञानावर भलंथोरलं व्याख्यान खुशाल झाडतात. >>>
त्यांना विज्ञानांध म्हणतात .

आपला वेडेपणा लवकर कमी होईल ही इश्वरचरणी प्रार्थना करु इच्छितो.>>>
शेवटी प्रार्थना ईश्वर चरणीच करावी लागली . विज्ञान चरणी नाही Lol

शेवटी प्रार्थना ईश्वर चरणीच करावी लागली . विज्ञान चरणी नाही >> Rofl

आणि प्रार्थना करायची म्हणजे श्रद्धा ठेवणे आले. नैका?

नमस्कार,

विज्ञानवादी असणे हे इश्वराविरुध्द असल्याचे मानून काहीजण स्वतःची बेअक्कल प्रतिभा दाखवत आहे. अशा लोकांना गृहित धरणे हा मी इश्वराचा अपमान मानत आहे.

धन्यवाद

विज्ञानवादी असणे हे इश्वराविरुध्द असल्याचे मानून काहीजण स्वतःची बेअक्कल प्रतिभा दाखवत आहे.>>

लेखामध्ये exactly हेच लिहिलेलं आहे . बघा न खालच्या ओळी

विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले>>

जात पात नष्ट होणं हि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे . विज्ञानाचा वापर योग्य गोष्टींसाठी होणं हि सुधा आनंदाची बाब आहे . अविवेकी - मूर्खपणा हा धर्मामध्ये किवा विज्ञानामध्ये नसून लोकांच्यात आहे . तुमच्या मूर्खपणाला देव किवा धर्म जबाबदार नसून तुमचं त्याबाबतीतलं अज्ञान जबाबदार आहे . विज्ञानाचा दुरुपयोग करणारे काय कमी आहेत का ?(सगळ्यात पुढे अतिरेकी समाज) . मग विज्ञानालाच नष्ट करून टाका असं म्हणता येईल का ? मग देव - धर्माचा दुरुपयोग होत असेल तर देवा धर्मालाच नष्ट करा म्हणणं चुकीचं आहे . उलट त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे आणि स्वताचा उत्कर्ष साधून घेतला पाहिजे

गुरुचरित्र नवव्या अध्यायात दिले आहे.

सुख हवे असेल तर खुशाल ** धर्म सोडुन * स *मान व्हा.


तुष्टवावया इंद्रियांसी । तुवां जन्मावें म्लेंछवंशी ।

Proud

https://books.google.co.in/books?id=dht3BAAAQBAJ&pg=PT77&lpg=PT77&dq=%E0...

हे तर त्यातल्या त्यात जुन्या धर्मात पण चालते की ... न्हाई म्हणजे त्येंच्या आधी इथ सुख प्राप्ती वगरे लोक्स करत नव्हते का :P?

आणि हे तुम्ही ** वगरे नका वापरत जाऊ! घाबरता कशाला नाव घ्यायला! आपण विज्ञाननिष्ठ धाग्यावर चर्चा करू नाही का राहिलो? लिहा की नाव!

धर्म बदल हा अत्यंत योग्य उपाय आहे ..धर्म माणसासाठी असतो माणूस धर्मासाठी नसतो . जर एखाद्या धर्मात प्रगती करायला वाव नसेल. माणसाचे अवमूल्यन होत असेल अशी जर व्यक्तीची खात्री पटली तर खुशाल धर्म बदलावा. नि खरे म्हणायचे तर धर्मावाचून काही कुणाचे अडत नाही मी ह्या धर्माचा मी त्या धर्माचा अश्या संकुचित विचारापेक्षा मी भारतीय आहे हि भावना महत्वाची....

Pages