दाभोळकरांची हत्या आणि आपण

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 20 August, 2013 - 16:26

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो. आपल्या या दोन्ही भुमिका आपण इतक्या सहजतेने पार पाडतो की आपल्या स्वतःच्या या दोन परस्परविरोधी भुमिकांबाबत आपल्या मनात यतकिंचितही प्रश्न उभे रहात नाहीत. बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्‍या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही. कारण तसे प्रश्न उपस्थित करणार्‍या लोकांना इथे जागा नाही, त्यांना मुर्खांच्या आणि माथेफिरुंच्या झुंडीला सामोरे जावे लागते.
मानवी मन हे जिथे जाईल, जे म्हणेल आणि जे करेल त्या सगळ्यामागे त्याचा कम्फर्ट असतोच. ही दुहेरी भुमिका अतिशय कम्फर्टेबल आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते. नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. अनेकांना ती असतेही परंतु माणसाच्या क्रुरपणाला,दडपशाहीला आणि भीतीला शरण गेलेली 'माणसाळलेली माणसं' निमुटपणे या दरवाज्यासमोर रांगा लावतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती पूजा ही ते मशीन नीट चालावं, विजेने सारखं येऊन-जाऊन-फ्लक्चुएट होऊन आपले प्रताप दाखवू नयेत यासाठी करण्यात येत असावी अशी मी आपली मुकाट्याने समजूत करून घेतली फिदीफिदी<<<

आमची प्रयोगशाळा खंडेनवमीला काम करत नाही. मी नव्यानं तिथे काम करायला लागलो, तेव्हा अचानक त्या दिवशी सर्वत्र रांगोळ्या, तोरणं पाहून थक्क झालो<<<

नंतर मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या हातातल्या अंगठ्या दिसल्या, त्यांचं गोशाळाप्रेम दिसलं. चांद्रयान प्रकल्पावेळी फोडलेले नारळही दिसले.<<<

या अनुक्रमे वरदा व चिनूक्स यांच्या विधानांमुळे माझे प्रतिसाद मला द्यावेसे वाटले. या विधानांमागे कोठेतरी 'विज्ञानवादी असूनही हे असे कसे काय' असा सूर आहे. मला इतकेच म्हणायचे आहे की विज्ञानवादी असणे हे निव्वळ ज्ञानाची अजुन एक पुढची पायरी गाठल्याचे निदर्शक ठरू शकेल. श्रद्धेस पात्र असे जगात काहीच नसते किंवा श्रद्धा पाळणे हे अज्ञान असते असा त्याचा अर्थ काढला जाऊ नये, तसे सुचवले जाऊ नये. Happy

हो. विज्ञानवादी असूनही हातात नवग्रहांची अंगठी घालणं, चंद्रावर यान पाठवण्याआधी नारळ फोडणं, गाईची पूजा केल्यास यश मिळतं अशा समजुती विद्यार्थ्यांमध्ये पसरवणं हे माझ्या लेखी अतिशय अयोग्य आहे. ही अंधश्रद्धाच आहे.

लोक भांडतात ह्या मुद्द्यावरून मला आवडते
माझा एक शेर होता..........

देव आहे देव नाही वाद होता
संपला तो ! ...माणसे मेलीत बहुधा !!!!!

जे लोक देव नाही असे म्हणतात ते कशानेतरी घाबरलेले असतात
१)आपण नसणार आहोत नाही आहोत ही माया असते ही खोटे असते देवच एक खरा म्हणे .... इत्यादी
२)व असलो तरी आपण श्रेष्ट नाही आहोत ह्या भावनेलाही ते घाबरतात मग देव नाही असे म्हणतात व त्याचा पाठपुरावा करतात ही देखिल एक मानसिक अवस्थाच असते

खरे तर देव ही घाबरण्याची गोष्ट नाही ती प्रेमाची कहाणी आहे

माणसांनी क्षणभर "मी नाही"ही भावना पूर्णत्वास आणली "मग काय आहे ?" ह्या प्रश्नात त्यानी देव हुडकला (डिस्कवर्ड) जो सर्वव्यापी निघाला माणसाला अस्तित्वाची अतीशय व्यापक नजर मिळाली

इक लफ्ज मुहोब्बत का अदना सा फसाना है
सिमटे तो दिले आशिक फैले तो जमाना है
.

..ही असते ती श्रद्धेची कथा ...असेल तर मानणार्‍याच्या मनाएवढे मानलेतर सगळीकडे भरून उरलेले

इश्वरत्व शोधणे म्हणजे हेच व्यापक होणे होय् !! हा आत्मोन्नतीचा स्वताच्या उन्नतीचा मार्ग आहे जो आपोआपच संपर्कातील इतर बाबीनानी तोच गुण प्रदान करतो तो कुणाचेही नुकसान करत नाही

जे केल्याने नुकसान होते ते मात्र टाळायलच हवे जादूटोणा वगैरे करणार्‍याना जरी तेही एक विज्ञान असले तरी पायबंद घालायलाच हवा हे मान्य पण लोक श्रद्धा का नाकारतात व विसरतात की आध्यात्म हेही एक विज्ञान आहे जगात विज्ञान सर्वत्र भरलेले आहे ?

भूक लागली की जेवता भूक खरी असते ना ? भूक आहे असे म्हणणे ही त्या बाबीवर ठेवलेली श्रद्धा होय .

मी आहे - तो मी आहे (सोहंSS जिथे मी असे म्हणण्यात अहं नाही !!!!) ही श्रद्धा आहे जी कमवावी लागते आपल्यात असतेच ती शोधावी लागते !!!

जे जे लोक अंधश्रद्धेला श्र्द्धा व श्रद्धेला अंध करतात ते सर्वच शिक्षेस पात्र आहेत

देव असलाच तर व माणूस (हा असतोच ही एक श्रद्धा ) एकस्मेकास पूरक आहेत मारक नव्हेत
असो

मला एकच कळते ...............
देव नाही नाही म्हणणे ही एक छान कविता आहे देव आहे म्हणणे ही नितांत सुंदर गझल !!!

चांद्रयान मानवनिर्मीत असले तरी त्यासाठी लागणारे सर्व धातू निसर्गनिर्मीत आहेत. हे तर वेगळेच की खुद्द चंद्र निसर्गनिर्मीत आहे. नारळ आणि माणूसही निसर्गनिर्मीत आहे.

मग चांद्रयान पाठवण्याआधी निसर्गाने ते सर्व सुरळीत करावे अश्या भावुकतेने एक नारळ फोडला तर 'बिघडले' काय?

'निसर्ग' अशी एखादी व्यक्ती आहे, आणि तिला खाऊपिऊ घातले की ती सर्व व्यवस्थित करते, यावर माझा विश्वास नाही. कारण तसा पुरावा उपलब्ध नाही. आणि तसा जर कोणाचा विश्वास असेल, तर मग तिथे माझी मदत का घेतली जावी उत्तम नॅनोकोटिंग बनवायला? नारळ कशाला, नारळाचं झाड, उकडीचे मोदक, बोकड, कोंबडी असं काहीही वाहून निसर्गाला खूश करता येईल की. Happy
ज्या गोष्टींमागची कारणं माहीत नाहीत, तिथे शास्त्रज्ञ 'आम्हांला हे अमूकतमूक माहीत नाही' असं मान्य करतात.

हो. विज्ञानवादी असूनही हातात नवग्रहांची अंगठी घालणं, चंद्रावर यान पाठवण्याआधी नारळ फोडणं, गाईची पूजा केल्यास यश मिळतं अशा समजुती विद्यार्थ्यांमध्ये पसरवणं हे माझ्या लेखी अतिशय अयोग्य आहे. ही अंधश्रद्धाच आहे.<<<

तुमच्यालेखी ही अंधश्रद्धाच आहे म्हणूनच म्हणालो की स्वतःचा पैसा आणि स्वतःचा वेळ खर्चूनही तुम्ही राखी बांधून घ्यायला नकोत, मंदिरात जायला नकोत. (या विधानासाठी क्षमस्व!)

नवग्रह अस्तित्वात आहेत. चंद्रामुळे समुद्राला भरती ओहोटी येते हे विज्ञानाला पहिल्या मानवाच्या निर्मीतीनंतर कित्येक शतकांनी समजलेले आहे. गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो हे विज्ञानाला समजायला पहिल्या मानवाच्या निर्मीतीनंतर अनेक शतके जावी लागली. गर्भातील मुलाचे लिंग ठरवण्याचे स्वातंत्र्यही सजीवाकडे नाही. मग श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी करताना जरा दबकायला हवे ना चिनूक्स? Happy

ज्या गोष्टींमागची कारणं माहीत नाहीत, तिथे शास्त्रज्ञ 'आम्हांला हे अमूकतमूक माहीत नाही' असं मान्य करतात.<<<

हे ते उत्तमच करतात. फक्त जे शास्त्रज्ञ नसतात ते इतकेच 'अ‍ॅड' करतात की 'हे आम्हाला माहीत नसले तरी ज्याअर्थी हे होते आहे त्या अर्थी ते ज्यामुळे होते आहे ती बाब श्रद्धेस पात्र आहे'! (यात संशोधकही श्रद्धेस पात्र ठरू शकतात - एफ वाय आय)

'निसर्ग' अशी एखादी व्यक्ती आहे, आणि तिला खाऊपिऊ घातले की ती सर्व व्यवस्थित करते, यावर माझा विश्वास नाही. कारण तसा पुरावा उपलब्ध नाही. आणि तसा जर कोणाचा विश्वास असेल, तर मग तिथे माझी मदत का घेतली जावी उत्तम नॅनोकोटिंग बनवायला?<<<

तुमचा विश्वास नाही हे ठीक आहे, पण जमीनीला खतपाणी घातले नाही तर पीक उगवले नसते यावर शेतकर्‍यांचा अजून विश्वास आहे हे उत्तम आहे. Happy

तुमची मदत का घेतली जावी - कारण तुमचे ज्ञान त्या विशिष्ट बाबीबाबत इतर सामान्यांपेक्षा अधिक आहे इतकेच!

<नवग्रह अस्तित्वात आहेत.>
चूक.

<गर्भातील मुलाचे लिंग ठरवण्याचे स्वातंत्र्यही सजीवाकडे नाही.>
हेही चूक. दुर्दैवानं.

<तुमच्यालेखी ही अंधश्रद्धाच आहे म्हणूनच म्हणालो की स्वतःचा पैसा आणि स्वतःचा वेळ खर्चूनही तुम्ही राखी बांधून घ्यायला नकोत, मंदिरात जायला नकोत. >
या वैयक्तिक गोष्टी आहेत. माझ्या निर्णयावर अवलंबून असलेल्या. मी दिलेली उदाहरणं ही सार्वजनिक आहेत. राखी बांधून घेणं, मंदिरात जाणं या गोष्टी माझ्या कामाच्या आड येत नाहीत. मी माझ्या प्रयोगशाळेत ही कामं करत नाही (मी या गोष्टी करतो, असं गृहीत धरून आपण बोलू Happy )
राखी बांधल्यानं, मंदिरात गेल्यानं माझं काही भलं होईल, यावर माझा विश्वास नाही. मी मंदिरात जातो ते मला तिथलं सौंदर्य, स्थापत्य भावतं म्हणून. किंवा प्रसाद आवडतो म्हणून.

<पण जमीनीला खतपाणी घातले नाही तर पीक उगवले नसते यावर शेतकर्‍यांचा अजून विश्वास आहे हे उत्तम आहे. >

जमिनीला खतपाणी घालावंच लागतं ना? जमीन नांगरावी लागतेच ना? का फक्त नारळ फोडून पिकं उगवतात?

नारळ फोडून श्रद्धा व्यक्त होते, की मी खतपाणी घातलेले आहे, पण पाऊअसही पडेल आणि पीक उगवेल Happy

या वैयक्तिक गोष्टी आहेत<<< मशीनला फुले वाहणे, चांद्रयान पाठवण्याआधी नारळ फोडणे, नवग्रहांची अंगठी घालणे या सार्वजनिक बाबी नाहीत. वैयक्तीकच आहेत.

<नवग्रह अस्तित्वात आहेत.>
चूक.<<<

हम्म्म! आता राहू आणि केतू हे ग्रह नाहीत, प्लुटो आपला नाही, चंद्र उपग्रह आहे हे सगळे मान्य! पण अंगठी नेमकी याच नावाच्या ग्रहांसाठी असते Happy

<गर्भातील मुलाचे लिंग ठरवण्याचे स्वातंत्र्यही सजीवाकडे नाही.>
हेही चूक. दुर्दैवानं. <<<

ओक्के, विधान मागे घेतो. 'लार्जली' हे स्वातंत्र्य सजीवाकडे नाही, हे विधान टेक्निकली करेक्ट ठरत असेल तर कृपया स्वीकारावेत Happy

बहुतेक, मला जे म्हणायचे होते ते यथोचित म्हणून झालेले आहे. यापुढे माझ्याकडून फक्त शाब्दिक प्रतिवाद होईल असे वाटते. तेव्हा मी थांबतो. चु भु द्या घ्या

एकुण, या निमित्ताने झालेली ही चर्चा मला तरी खूप आवडली.

<नारळ फोडून श्रद्धा व्यक्त होते, की मी खतपाणी घातलेले आहे, पण पाऊअसही पडेल आणि पीक उगवेल>
पण पाऊस कसा, का, कधी पडतो, हेही विज्ञानाला ठाऊक आहे. त्यात 'नारळ फोडणं' हे कारण अंतर्भूत नाही.

चला. नवीन मुद्दा मिळाला. धन्यवाद चिनूक्स! तुमच्या कम्युनिटीने तर अजितदादांना फारच धारेवर धरायला हवे होते.

>>>पण पाऊस कसा, का, कधी पडतो, हेही विज्ञानाला ठाऊक आहे. त्यात 'नारळ फोडणं' हे कारण अंतर्भूत नाही.<<<

ओह रिअली? मग विज्ञान पाऊस हवा तेव्हा पाडत का नाही??????

<ओह रिअली? मग विज्ञान पाऊस हवा तेव्हा पाडत का नाही???>

देऊच का याचं उत्तर? Proud

पाऊस हवा तिथे, हवा तेव्हा पाडणं विज्ञानाला शक्य नसलं, तरी नारळ फोडून तो हवा तेव्हा, हवा तिथे पडत नाही, हे विज्ञानाला ठाऊक आहे.

पाऊस हवा तिथे, हवा तेव्हा पाडणं विज्ञानाला शक्य नसलं, तरी नारळ फोडून तो हवा तेव्हा, हवा तिथे पडत नाही, हे विज्ञानाला ठाऊक आहे.<<<

माफ करा, गिरे तो भी टांग उपर स्वरुपाचे उत्तर आहे.

तेव्हा विज्ञान निरुत्तर झाल्याचा (तुमच्यालेखी निखालस खोटा व स्वप्नील) आनंद मनात नांदवत थांबतो.

<माफ करा, गिरे तो भी टांग उपर स्वरुपाचे उत्तर आहे.

तेव्हा विज्ञान निरुत्तर झाल्याचा (तुमच्यालेखी निखालस खोटा व स्वप्नील) आनंद मनात नांदवत थांबतो.>

हरकत नाही. Happy नारळ फोडल्यानं हवा तिथे, हवा तेव्हा पाऊस पडल्याचं उदाहरण दाखवलंत तर आनंदानं माघार घेईन. Happy

नताशा, मी दैव, नशीब इ. विषयांवर गेलेच नाहीये. मी फक्त एकच स्पेसिफिक उदाहरण दिलंय. त्यात कुठलेही आउट ऑफ कन्ट्रोल व्हेरिएबल्स नाहीयेत.
आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शास्त्रज्ञाला जर त्याच्या लॅबमधलं मशीन (जे कसं काम करतं आणि का करतं ते माहित आहे, त्याच्या हाताखालच्या टेक्निशियन/इंजिनीअरला प्रत्येक स्क्रू सकट कसं बनलं आहे हे माहित आहे) काम करण्यामधे कुठलं नशीब/दैव वगैरे आहे असं वाटत असेल तर मग माझं बोलणंच खुंटलं.

माधवी आणि इतर..
आयुधांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे? का? ती मानवनिर्मित आहेत. करायचीच असेल कृतज्ञता व्यक्त तर ती तयार करणार्‍या त्यांच्या शास्त्रज्ञ्/तंत्रज्ञ जनकांबद्दल करा ना.... त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून वाटल्यास हात जोडा. ते जास्त सयुक्तिक ठरेल!

तुम्ही माघार घ्यावीत असा संकुचित हेतू नाही आहे चिनूक्स! विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू संशोधक, नेमक्या अज्ञात शक्तीचा शोध लागल्याचे ऐकिवात नसल्याने सामान्याच्या मनात श्रद्धाभाव निर्माण होणे फारच साहजिक आहे असे म्हणण्याचा माझा प्रयत्न होता. Happy

व्यक्तीशः म्हणाल तर तुमच्या ज्ञानापुढे मी वचवच करावी इतकी माझी पात्रता नाही Happy

वरदा,

आयुधांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे? का? ती मानवनिर्मित आहेत. करायचीच असेल कृतज्ञता व्यक्त तर ती तयार करणार्‍या त्यांच्या शास्त्रज्ञ्/तंत्रज्ञ जनकांबद्दल करा ना.... त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून वाटल्यास हात जोडा. ते जास्त सयुक्तिक ठरेल!
>>
हे वाक्य टेक्निकली बरोबर आहे पण सामान्य माणूस एवढा विचार करत नाही.
जनरली ज्या गोष्टींमुळे आपल्याला रोजीरोटी मिळते त्यांच्याबद्द्ल बर्‍याच लोकांच्या मनात आदराची भावना असते, ते ती व्यक्त करतात असे मला वाटते.

उत्तर लिहायचेय वरदा, पण आत्ता खरंच वेळ नाही. अजून ३-४ आठवड्यानंतर हा बाफ चर्चा करण्याच्या स्थितीत राहिला तर नक्की लिहीन.

बेफी,
पाऊस पाडण्याचे तंत्र थोडेफार जमायला लागले आहे. पण ते होमहवन करून वा बेडकाची लग्ने लावून वा कमरेला लिंबाचा पाला बांधून धोंड्या धोंड्या पाणी दे करीत फिरण्याने शक्य होत नाही, हे पब्लिकच्या डोक्यात उतरवणे हे विज्ञानाचे काम आहे.
पाऊस पडण्यासाठी यज्ञ किंवा बेडकाचे लग्न अ‍ॅरेंज करणे व त्यांची पाठराखण 'निसर्गाप्रति श्रद्धा व्यक्त करणे' अशी करणे हा तद्दन भोंदूपणा व अंधश्रद्धा आहे असे माझे मत आहे.

<नेमक्या अज्ञात शक्तीचा शोध लागल्याचे ऐकिवात नसल्याने सामान्याच्या मनात श्रद्धाभाव निर्माण होणे फारच साहजिक आहे असे म्हणण्याचा माझा प्रयत्न होता.>

मला सामान्यांच्या मनातल्या श्रद्धाभावांचा अनुभव आहे. परिचयातल्या अनेक व्यक्ती दु:खानं कोलमडून पडल्या असत्या, त्या त्यांच्या श्रद्धेच्या बळावर उभ्या राहिलेल्या बघितल्या आहेत. 'तुमचे बुवाबापू तुम्हांला फसवताहेत' हे सांगण्याची माझी हिंमत नाही. कारण त्यांचं दु:ख फार मोठं आहे. ही श्रद्धास्थानं नसती, तर ती आज जिवंत नसती, असं या व्यक्ती जेव्हा मला सांगतात, तेव्हा तर मी फार घाबरतो. पण म्हणून मला या श्रद्धा मान्य आहेत, असं नाही. मी फक्त या व्यक्ती कोलमडून पडतील, या भीतीनं गप्प बसतो.

पण म्हणून कोणी चंद्रावर यान नीट पोहोचावं म्हणून नारळ फोडत असेल, किंवा नारळ फोडल्यानं पाऊस चांगला पडतो, असा दावा करत असेल, तर ते मला मान्य असावं, असं नाही.

नास्तिक होण्यासाठी प्रचण्ड डेडिकेशन, ताकत व माज अंगात लागतो, अशी कुठे तरी पोस्ट लिवलि आहे मी, माबोवर कुठेतरी.

निसर्गाप्रति श्रद्धा व्यक्त करणे' अशी करणे<<<

याला मीही अंधश्रद्धाच मानत आहे असे माझ्या आधीच्या प्रतिसादांवरून (बोकड कापणे वगैरे) लक्षात यावे.

निसर्गाप्रती श्रद्धा म्हणून नारळ फोडणे ही अंधश्रद्धा ठरू नये (जोवर निसर्गावर विज्ञानाचा अंकुश येत नाही तोवर) असे म्हणण्याचा माझा प्रयत्न आहे डॉक्टर

मला सामान्यांच्या मनातल्या श्रद्धाभावांचा अनुभव आहे. परिचयातल्या अनेक व्यक्ती दु:खानं कोलमडून पडल्या असत्या, त्या त्यांच्या श्रद्धेच्या बळावर उभ्या राहिलेल्या बघितल्या आहेत. 'तुमचे बुवाबापू तुम्हांला फसवताहेत' हे सांगण्याची माझी हिंमत नाही. कारण त्यांचं दु:ख फार मोठं आहे. ही श्रद्धास्थानं नसती, तर ती आज जिवंत नसती, असं या व्यक्ती जेव्हा मला सांगतात, तेव्हा तर मी फार घाबरतो. पण म्हणून मला या श्रद्धा मान्य आहेत, असं नाही. मी फक्त या व्यक्ती कोलमडून पडतील, या भीतीनं गप्प बसतो. >>>> याला खूप खूप अनुमोदन.

बेफिकीर,
निसर्ग ही फार व्यापक संज्ञा आहे. यातले अनेक घटक, त्यांच्यातला संबंध विज्ञानाला ठाऊक आहे. या घटकांवर अंकूश ठेवण्यासाठी नारळ फोडून काय उपयोग? आणि समजा उद्या विज्ञानानं निसर्गावर ताबा मिळवला, तर लगेच नारळ फोडणं बंद करायचं? आधी नारळ का फोडत होतो, आणि आता नारळ का फोडायचा नाही?

Pages