दाभोळकरांची हत्या आणि आपण

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 20 August, 2013 - 16:26

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो. आपल्या या दोन्ही भुमिका आपण इतक्या सहजतेने पार पाडतो की आपल्या स्वतःच्या या दोन परस्परविरोधी भुमिकांबाबत आपल्या मनात यतकिंचितही प्रश्न उभे रहात नाहीत. बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्‍या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही. कारण तसे प्रश्न उपस्थित करणार्‍या लोकांना इथे जागा नाही, त्यांना मुर्खांच्या आणि माथेफिरुंच्या झुंडीला सामोरे जावे लागते.
मानवी मन हे जिथे जाईल, जे म्हणेल आणि जे करेल त्या सगळ्यामागे त्याचा कम्फर्ट असतोच. ही दुहेरी भुमिका अतिशय कम्फर्टेबल आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते. नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. अनेकांना ती असतेही परंतु माणसाच्या क्रुरपणाला,दडपशाहीला आणि भीतीला शरण गेलेली 'माणसाळलेली माणसं' निमुटपणे या दरवाज्यासमोर रांगा लावतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नास्तिक होण्यासाठी प्रचण्ड डेडिकेशन, ताकत व माज अंगात लागतो,>> कशाला? विचारांची क्लॅरीटीसुद्धा पुरते. माज वगैरेची गरज नाही.

आधी नारळ का फोडत होतो, आणि आता नारळ का फोडायचा नाही?<<<

आधी पृथ्वीभोवती अख्खे आकाश का फिरत होते? तेव्हा तसे काही नसते म्हणणार्‍याला न्यायालयात माफी मागून देश का सोडावा लागला? आता सगळे त्याला महान संशोधक का मानतात?

चिनूक्स, तुम्ही त्या शक्तीचा शोध लावा, तो सिद्ध आणि प्रसिद्ध करा, त्यावर खडाजंगी होऊदेत, मग स्वतःच अभ्यासा, की आपण आधी किती क्षुल्लक जबाबदारीसाठी निवडलो गेलेलो होतो.

व्हाय डोन्ट यू अंडरस्टँड दॅट देअर आर मेनी थिंग्ज दॅट यू डोन्ट अंडरस्टँड?

नास्तिक होण्यासाठी प्रचण्ड डेडिकेशन, ताकत व माज अंगात लागतो,
>> सहमत. (माफक अनुभवावर आधारित).

माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्यांच्यात ते नाही, त्यांना त्यांचा मार्ग निवडु द्या. पण तो अनैतिक, क्रुर, वाईट असेल तर विरोध कराच.

मला सामान्यांच्या मनातल्या श्रद्धाभावांचा अनुभव आहे. परिचयातल्या अनेक व्यक्ती दु:खानं कोलमडून पडल्या असत्या, त्या त्यांच्या श्रद्धेच्या बळावर उभ्या राहिलेल्या बघितल्या आहेत. 'तुमचे बुवाबापू तुम्हांला फसवताहेत' हे सांगण्याची माझी हिंमत नाही. कारण त्यांचं दु:ख फार मोठं आहे. ही श्रद्धास्थानं नसती, तर ती आज जिवंत नसती, असं या व्यक्ती जेव्हा मला सांगतात, तेव्हा तर मी फार घाबरतो. पण म्हणून मला या श्रद्धा मान्य आहेत, असं नाही. मी फक्त या व्यक्ती कोलमडून पडतील, या भीतीनं गप्प बसतो. >> हेच म्हणतेय, हाच सुज्ञपणा जरुरी आहे.

<व्हाय डोन्ट यू अंडरस्टँड दॅट देअर आर मेनी थिंग्ज दॅट यू डोन्ट अंडरस्टँड?>

मी खूप अगोदरच लिहिलं आहे की अनेक गोष्टी विज्ञानाला ठाऊक नाहीत, आणि विज्ञान तसं मान्य करतं.
आता एखादा शेतकरी नारळ फोडत असेल, तर तो का फोडतो? पाऊस पडावा म्हणून. 'नारळ फोडल्यानं पाऊस कसा पडेल?' या प्रश्नाचं उत्तर अर्थातच त्याला देता येणार नाही. 'श्रद्धा' हे उत्तर मग पुढे केलं जाईल. पण ते पुरेसं नाही. उद्या त्या शेतकर्‍याचा मुलगा आजारी पडला, आणि नुसता नारळ फोडला तर चालेल का? नारळ फोडल्यानं एवढामोठासामर्थ्यशाली निसर्ग नमतो, तर आजार लगेच पळायला हवा. पण तसं होत नाही.

आपण एखादी गोष्ट का करतो, हे कळणं म्हणून महत्त्वाचं असतं.

जोवर निसर्गावर विज्ञानाचा अंकुश येत नाही तोवर
<<
बेफी,
नेमका कोणत्या लेव्हलचा अंकुश आला की तो आपण मान्य करणार आहोत?
भारत सोडून समुद्रगमन करण्याचा?
पृथ्वी सोडून अवकाशगमन करण्याचा?
कच्चे मांस शिजवून खाण्याचा, की शिजविण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरण्याचा, की त्या पलिकडे जाऊन पेशंटला "टीपीएन" उर्फ टोटल पॅरा-एंटेरल न्यूट्रीशन : शिरेतून सर्व पोषक द्रव्ये देण्याच्या वैज्ञानिक चमत्काराचा?
तुम्हाला खरा आनंद झाला की दु:ख, हे तुमचा चेहरा पाहून वा तुमच्या शब्दांना ऐकून ठरविण्याचा, की पेटस्कॅनने तुमच्या मेंदूचा नकाशा वाचण्याचा?
डीएनए कोड डिकोड करण्याचा?
कृत्रीम गर्भधारणा करण्याचा?
काँम्प्युटरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बनविण्याचा?
कोणत्या लेवलचा अंकुश हवा आहे?
कम ऑन!
केवळ वेद अपौरुषेय व "विज्ञान" माणसाने सांगितले असे लॉजिक आहे का?

माज वगैरेची गरज नाही.
<<
स्वाती,
तुमची 'अ'श्रद्धा अद्याप एक्स्ट्रीम निकषांवर जोखली गेली नसावी, इतकेच म्हणू शकतो. त्या ठिकाणी नास्तिकता टिकवायला फक्त माज लागतो.

चुकले माकले माफ करा. Happy

अ‍ॅक्चुअली, मी का काही म्हणणे मांडत आहे याचेही माझ्याकडे उत्तर नाही आहे Happy

तुमची 'अ'श्रद्धा अद्याप एक्स्ट्रीम निकषांवर जोखली गेली नसावी, इतकेच म्हणू शकतो. त्या ठिकाणी नास्तिकता टिकवायला फक्त माज लागतो.>> कुठल्याही एक्स्ट्रीम परिस्थितीत आपल्या विचारांवर ठाम असण्याला माज म्हणतात का? म्हणत असतील तर तो माज माझ्याकडे आहे. आमच्याघरी त्याला 'आडमुठेपणा' म्हणतात Proud

कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टच्या सुरूवातीला नारळ फोडणे मला अंधश्रद्धा वाटत नाही. 'क्लोजर' च्या उलटे असेल कदाचित पण तसे केल्याने आपल्याला/बहुसंख्य लोकांना चांगले, प्रसन्न वाटते. प्रोजेक्ट सुरू करायचे एक सेलिब्रेशन असेही असेल. ते करायची एखादी दुसरी सर्वमान्य पद्धत लोकांना आवडली तर तशी करावी.

खंडेनवमीला हापिसात यंत्रांना (यंत्रांचे नुकसान न करता) फुले, कुंकू वाहणे हीसुद्धा मला अंधश्रद्धा वाटत नाही. आमच्या जुन्या कंपनीत नेहमी करत. त्यादिवशी एकदम मस्त वातावरण असे. मात्र लगेच थोड्या वेळात काम सुरू करत. काम बंद करायचे काहीच कारण नाही. हे सर्व सरकारी हापिसांत, प्रयोग शाळांत लोकांच्या पैशाने करायलाही माझी हरकत नाही. कारण बहुसंख्य लोकांना ते हवे असते/आवडते. जर हे नापसंत असणारे लोक जास्त झाले तर ते आपोआप बंद होईल. मला स्वतःला प्रचंड आवडते.

कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टच्या सुरूवातीला नारळ फोडणे मला अंधश्रद्धा वाटत नाही. 'क्लोजर' च्या उलटे असेल कदाचित पण तसे केल्याने आपल्याला/बहुसंख्य लोकांना चांगले, प्रसन्न वाटते. प्रोजेक्ट सुरू करायचे एक सेलिब्रेशन असेही असेल. ते करायची एखादी दुसरी सर्वमान्य पद्धत लोकांना आवडली तर तशी करावी.>> +१.

परवा नारळी पौर्णिमेला जवळजवळ तीन किलोमीटर चालत जाऊन मी समुद्राला नारळ देऊन आले. वडील, भाऊ, मामा, नवरा सर्वच जहाजावर काम करणारे. अवघड प्रसंग कितीवेळा येऊन गेलेत आजवर. मी नारळ दिल्याने समुद्र खुश होइल आणि मला काही खजिना देईल असली अपेक्षा नाही, पण गेले वर्शभर घरात रोजीरोटी आली ती या समुद्राच्या कृपेनेच- तेव्हा माझ्यातर्फे समुद्राला थँक्यु. बास अजून काही नाही. नारळच का द्यायचा हे मला नक्की माहित नाही. पण एरवी घरामधे वीस पंचवीस नारळ पडलेच आहेत, जास्त झाले की दुकानदाराला विकून टाकते. मग एखादा समुद्रात टाकला तर काय बिघडलं? रोज सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावलाच जातो (सकाळी लावला नाहीतरी संध्याकाळी नक्की. आमच्याकडे सहानंतर कधीपण लाईट जातात. अशावेळेला देवापुढचा दिवा त्याबाजूचे काडीपेटी पटकन सापडते)

मला काही देवळांतून जायला आवडतं. काही देवळांत पायदेखील ठेववत नाही. बुवाबापूमाता वगैरे आजवर कधी पटले नाहीत. अमुक एखादी पूजा, उपवास वगैरे कधी केले नाहीत. सणवार माझ्यादृष्टीने खाण्यापिण्याच्या आनंदासाठीच केले जातात. होळी=पुरणपोळी, गोकुळाष्टमी= खोट्टे असली समीकरणं आहेत माझी. पण मी करते म्हणून दुसर्‍याने केलेच पाहिजे वगैरे आडमुठेपणा मात्र माझ्यात नाही. तसे कुणी माझ्याबाबतीत केल्यास तर ते मला बिल्कुल आवडत नाही.

फारएन्ड +१
नंदिनी +१
फरक एवढाच की मला स्वत:हून असं काही करायचं सुचत नाही. लोकांनी खुशीनी केलं अन त्यामुळे कुणाला कसला त्रास नसला तर मलाही आवडतं. अवडंबर आय हेट. आव आणणे आय हेट. (आव श्रद्धेचा अन आव नास्तिकतेचा, दोन्ही).

शेवटी हे सगळे माणसाच्या मनाला उभारी द्यायला, प्रसन्नता आणायला आहे, ह्याचे भान हवे. म्हणजे मग जबरदस्तीच्या रुढी लादल्या जात नाहीत का अंधश्रद्धा म्हणून टोमणे मारले जात नाहीत. ज्याला प्रसन्न वाटण्याऐवजी चिडचिड होते, त्याने करु नये. न केल्याने का ही ही बिघडत नाही.

<शेवटी हे सगळे माणसाच्या मनाला उभारी द्यायला, प्रसन्नता आणायला आहे, ह्याचे भान हवे. म्हणजे मग जबरदस्तीच्या रुढी लादल्या जात नाहीत का अंधश्रद्धा म्हणून टोमणे मारले जात नाहीत. ज्याला प्रसन्न वाटण्याऐवजी चिडचिड होते, त्याने करु नये. न केल्याने का ही ही बिघडत नाही.>

मनाला प्रसन्नता आणायला पाळल्या जाणार्‍या रूढी नक्की कुठल्या? मनाला प्रसन्नता आणायला फोडलेल्या नारळामुळे उपचारांअभावी उद्या एखाद्याचा जीव गेला म्हणजे? ही सीमारेषा नक्की कुठे आखायची?

आणि हे सगळंच मनाला प्रसन्नता आणण्यासाठी आहे? काही मिळवण्यासाठी, कोणाला खूश करण्यासाठी नाही? Happy

मनाला प्रसन्नता आणायला फोडलेल्या नारळामुळे उपचारांअभावी उद्या एखाद्याचा जीव गेला म्हणजे?>>> माणसाचा जीव वाचवणे एवढेच नव्हे तर कोणाला साधी दुखापतही न होऊ देणे याला सर्वोच्च प्राधान्य असायलाच हवे - त्याबद्दल वाद नाहीच. त्याच्याशी तडजोड न करता या गोष्टी करायला हरकत नसावी. हे केल्याने त्या संस्थेचे काम बंद करणे चुकीचे आहेच.

मनाला प्रसन्नता आणायला फोडलेल्या नारळामुळे उपचारांअभावी उद्या एखाद्याचा जीव गेला म्हणजे? ही सीमारेषा नक्की कुठे आखायची?>>> मनाला प्रसन्नता आणलेल्या नारळाचा आणि वैद्यकीय उपचारांचा काय संबंध असेल? वैद्यकीय उपचारांऐवजी नारळ फोडत असेल तर ते मात्र निखालसरीत्या चुकीचे. ती मात्र ठार अंधश्रद्धा आहे.

बरोबर. मग जर नारळामुळे रॉकेट चंद्रावर व्यवस्थित जातं, पाऊस उत्तम पडतो, असा समज असेल आणि म्हणून आजारही बरे होतात, असं वाटलं, तर काय?
मनाला प्रसन्नता = चंद्रावर यानानं व्यवस्थित जाणं.
मनाला प्रसन्नता = पाऊस उत्तम पडणं.

इथे 'प्रसन्नता' काहीतरी मिळवण्याशी संबंधित आहे. काहीतरी साध्य करण्याशी संबंधित आहे. ही प्रसन्नता म्हणजे फक्त 'आनंद' नव्हे. नारळ फोडून जर प्रसन्नता मिळते हे ठाऊक असतं, तर मी 'चेन्नई एक्स्पेस' पाहून आल्यावर डझनभर नारळ फोडले असते. Happy

मला इतकंच म्हणायचंय, की या सीमारेषा आखायच्या कशा?

मी 'चेन्नई एक्स्पेस' पाहून आल्यावर डझनभर नारळ फोडले असते>>> Lol

नाही तशी सीमारेषा सर्वांना मान्य होईल अशी आखता येणारच नाही. कारण प्रत्येकाच्या दृष्टीने ती वेगळी असेल. पण 'सरकारी कार्यालयात खंडेनवमीला पूजा करावी काय?', 'मग त्या दिवशी काम बंद करावे काय?' अशा स्पेसिफिक गोष्टींबाबत ती आखता येइल - तीही त्याच्याशी संबंधित असलेल्या बहुसंख्य लोकांच्या मतावरून आखायला हरकत नाही.

या पुन्हा एकदा, काही गोष्टींचे प्राधान्य गृहीत धरून.

मग जर नारळामुळे रॉकेट चंद्रावर व्यवस्थित जातं, पाऊस उत्तम पडतो, असा समज असेल आणि म्हणून आजारही बरे होतात, असं वाटलं, तर काय?<<< आधी म्हटलं तसं माझ्याबाबतीत तरी नारळ फोडून वरच्यापैकी काहीही होणार नाही. किती लोक असं सीरीयसली मानत असतील मला माहित नाही. पण एक पद्धत असते म्हणून करणारे लोक चिकार असतात.. परदेशात जहाज लॉचिंगला घ्यायच्या आधी शॅम्पेन फोडतात, आपल्याकडे नारळ फोडतात. आपली पद्धत आहे म्हणून. पण नारळ फोडणे आणि बाकी काहीच न करता फक्त नारळाने आपले काम फत्ते होइल असे मानणारे लोक असतील तर त्यांना मी अंधश्राद्धाळू वगैरे अजिबात म्हणणार नाही, मूर्खशिरोमणी असा किताब देइन.

फारेण्ड, माझा आणि चिनूक्सचा सुरुवातीचा मुद्दा खूप स्पेसिफिक होता. की आंतरराष्ट्रीय पातळीवर वैज्ञानिक संशोधन, तत्संबंधी कामं करणार्‍या लोकांनी हे असलं करणं बरोबर नाही. शास्त्रज्ञांनाच जर स्वतःच्या उपकरणांची पूजा करावीशी वाटत असेल तर त्यांच्या विचारसरणीत काहीतरी गडबड आहे असं नाही का वाटत? म्हणजे तेच वैज्ञानिक दृष्टीकोन मानत नाहीयेत असं दिसतं...

होळी=पुरणपोळी, गोकुळाष्टमी= खोट्टे <<<<
नंदिनी +१
मीही आषाढी एकादशी आजवर केवळ उपवासाचे पदार्थ आवडतात म्हणून केली आहे Happy

उपचारांअभावी उद्या एखाद्याचा जीव गेला म्हणजे<<<<<
उपचार म्हणजे फक्त अ‍ॅलोपॅथिक उपचार !!!! Proud बाकीची शास्त्रे शास्त्रे नाहीतच म्हणे !!
कोकणात एक वैद्यकीय डॉक. असल्याचे ऐकले नक्की महीत नाही पण ते विंचवावर उतारा देतात म्हणे वर्ल्ड फेमस आहेत वगैरे ...१००% गूण येतोच म्हणे तोही लग्गीच पण ते झाडपाल्याचे औषध देतात म्हणे मग त्याना मांत्रिक म्हणायचे की कसे ? Uhoh

पाशिमात्य शास्त्रे हेच विज्ञान आहे असा व्हिजन असतो लोकांचा ..... त्यांचा विरोध मुळात सत्यनारायणाला नसतो त्याच्या नावाने भरमसाठ दक्षिणा मिळवण्याला व मिळवणर्याना असतो !!!

माझा सत्यनारायणावर विष्वास नाही कारण ते करून मला काहीही फायदा झाल्याचे मी पाहिले नाही

एक शेर तेवढा केलेला.............

मला माहीत आहे सत्यनारायण शिरा देतो
तरीही वाटते ...'पूजेतली खारीक मागू मी ?'

खोट्टे = नाव इन्ट्रेस्टिंग दिसते आहे लवकरच पाककृती येवूद्या नंदिनी

चिनुक्स,
माझी आत्ता १.३० तासाने फ्लाइट आहे, त्यामुळे किती वेळ उत्तर देऊ शकेन माहीत नाही. तरी लिहिते.

प्रसन्नता वाटावी म्हणून काय करावे हे प्रत्येकावर अवलंबून नाही का?
कुणाला कॉफीचा अरोमा प्रसन्न करेल कुणाला देवपुजेची फुलं, उदबत्त्या. मला त्या सुवासाची अ‍ॅलर्जी असेल तर त्याने चिडचिड होईल (होतेच), पण म्हणून दुसर्‍याला त्यानं बरं वाटतंय, हे सत्य मी कसं नाकारु? मारुतीस्तोत्र म्हणून कुणाला धीर मिळत असेल तर मी का नाही म्हणावे? विशेषत: अशा हार्मलेस रुढींविरुद्ध? स्तोत्र/उदबत्त्या लावून कुणाचा जीव जातोय? का कसलं नुकसान होतंय? का नाडल्या जातोय तो माणूस?

हार्मलेस अन हार्मफुल यातलं अंतर एवढं कठीण आहे का कळायला?
का उगाच वादासाठी वाद?
मी स्वत: कुठल्याही रुढी पाळत नाही, पण इतरांवर माझी कसलीही जबरदस्ती नाही.

नारळ फोडल्याने यान चंद्रावर गेलं अस्तं तर आजवर करोडो यानं पोचली नसती का? इतकं न कळण्याइतकं मूर्ख इथे तर जाऊचदे, जगात तरी कोण आहे? पण जर नारळ फोडल्याने "ज्ञात, आवश्यक सर्व योग्य ते केल्यानंतरही उरलेले ते uncontrolable unknown variables (written in my 1st post) घात करणार नाहीत अन सगळं नीट होईल" अशी कुणाची श्रद्धा असेल तर त्यात काय चूक?

वरदा,
त्या वैज्ञानिकांना सगळं सायन्स माहीत असुनही ते जर पुजा करतात तर त्यांना तुमच्यापेक्षा/माझ्यापेक्षा काहीतरी कमी उमजलंय असं का समजायचं? उलट त्यांना काहीतरी अधिकही उमजलं असु शकतं जे तुला/मला कळत नाहिये.
Probability/combinatorics शिकल्यावर मला जाणवलं की जेव्हा प्रोबेबल आउटकम्स लाखात असतील अन फेवरेबल केवळ एक, अन पुन्हा तो फेवरेबल आउटकम आपल्याला हव्या तितक्या वेळेत यायला हवा, तर मग तुम्ही काय कराल? आपलं काम/ कर्म केल्यानंतरही बरंच काही आपल्या हाताबाहेरचं राहातं हे मूळात लक्षात येतंय का?
हेच तुझ्या (मला उद्देशून) पहिल्या पोस्टचंही उत्तर आहे.

वैवकु,

डॉ. हिम्मतराव बावस्करांचं 'बॅरिस्टरचं कार्टं' कृपया वाचा. एकदोन दिवसांत मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध होईल. Happy

नताशा,
मी वादासाठी वाद घालतोय, असं वाटत असेल, तर यापुढे उत्तर दिलं नाही तरी चालेल. Happy

कॉफीचा वास आणि नारळ फोडणं यांत नक्की फरक आहे. खंडेनवमीला यंत्रांसमोर कॉफीचा मग कोणी ठेवत नाही.
मी श्रद्धाही नाकारत नाही. देवाला हात जोडले की वाटत असेल कोणाला बरं, तर त्याला कोणी का हरकत घ्यावी?
मी वर लिहिलंय ते वेगळं. नारळ फोडल्यामुळे काहीएक गोष्टी साध्य होतात, असं जर वाटत असेल, तर अमूक एक गोष्ट साध्य होते, आणि अमूक एक होत नाही, हे कोणी ठरवायचं?

बाकी, शास्त्रज्ञांनी नारळ फोडणं ही माझ्या मते हार्मलेस रूढी नक्की नाही.

ओक्के चिनुक्स धन्यवाद
पण मी अजून गझलसंग्रहांचेच वाचन करण्याचे ठरवले आहे मला गझलेत रस आहे तरीही हे पुस्तक मोफत असेल तर वाचेनही केवळ आपण वाचा म्हणता आहात यास्तव !!!
धन्यवाद Happy

शास्त्रज्ञांनाच जर स्वतःच्या उपकरणांची पूजा करावीशी वाटत असेल तर त्यांच्या विचारसरणीत काहीतरी गडबड आहे असं नाही का वाटत? म्हणजे तेच वैज्ञानिक दृष्टीकोन मानत नाहीयेत असं दिसतं...>> वरदा मुद्दा कळाला पण मला तसे वाटत नाही. हा अशास्त्रीय दृष्टीकोण त्यांच्या कामात दिसू लागला तर ते चुकीचे आहे - म्हणजे संशोधनाबद्दलचे जे नियम आहेत, संशोधन त्यानुसारच व्हायला हवे. पण कामाच्या बाबतीत कट्टर शास्त्रीय असलेली व्यक्ती एरव्ही धार्मिक असू शकते, मला त्यात काही गैर वाटत नाही. आणि उपकरणांच्या पूजेच्या बाबतीत तो वैयक्तिक धार्मिकपणा प्रकट होतो.

अशी व्यक्ती धार्मिक असू शकते कारण १. त्याची मुळात आवड असू शकते आणि/किंवा २. त्या गोष्टींची चिकित्सा करायची इच्छा नसेल

आणि यात एक 'सेलेब्रेटरी अँगल' आहे तो वेगळाच.

नारळ फोडून यंत्र सुरळीत चालू शकते यान उडू शकते हे मला पटते बुवा पण ते कसे करायचे ह्याचे शास्त्र मला अवगत नाही !!!

तंत्र मंत्र नक्कीच काहीतरी चीज आहे त्याचा लोक वापर चुकीचा करत असतील असे वाटते !!!

आपल्याला नारळ फ्दोडून यान उडवता येत नाही म्हणून जे उडवून दाखवतील ते खोटे आहेत असे सरसकट मानणे ही देखील चुकीची व अज्ञानी प्रवृत्ती आहे हा बुद्धीप्रामाण्यवाद नक्कीच नव्हे

जाताजाता :मला नारळ फोडून यान उडवण्यात पाऊस पाडण्यात जराही रस नाही हे आवर्जू नमूद करतो गै न

dara-obrian-doesnt-it-get-on-my-nerves-when-people-say-science-doesnt-know-everything-science-knows-it-doesnt-know-everything-otherwise-it-would-stop-just-because-science-doesnt-kno.jpg

चिनुक्स,
मुळात मला खंडेनवमी हा सणच माहीत नाही.
मला काही गोष्टीत तुझं मत सांग-
१. सायकॉलॉजी हे सायन्स आहे ना?
२. काही गोष्टींनी मनाला प्रसन्न/बरं वाटतं तर काहींनी दु:खी/उदास. यात काही अनसायंटिफिक आहे का?
३.कुणाला कशाने प्रसन्न वाटावं अन कशाने उदास हे तू ठरवू शकतोस का?
४. मुख्यत्वे लोकांचं (जगभर) कंडिशनिंग असं झालं असतं की त्या त्या कल्चरप्रमाणे काही गोष्टी त्यांना प्रसन्न करतात, हे तू नाकारु शकतोस का? जसं आपल्याकडे शुभ कामाआधी नारळ फोडणे.

याचं उत्तर दे मग सांग की तू "शुभ कामाआधी नारळ फोडू नका" असं कोणत्या आधारावर फोर्स करु शकतोस? त्याने इतर काही नाही तरी लोकांचं मनोबल वाढतं हे ही सायंटिफिकली प्रुव्ह करता येईल. अन मनोबल वाढलेल्या टीमचं काम यशस्वी होणं हे जास्त पॉसिबल हे ही.

मग या लॉजिकनुसार आपण एरवीही नारळ फोडायला हवेत. म्हणजे कामवाल्या मावशी आल्या नसतील तर, किंवा सिनेम्याचं तिकीट मिळालं नाहीतर वगैरे.

शुभकामाआधी नारळ का फोडायचा? काम व्यवस्थित व्हावं म्हणून. 'आपण नारळ फोडला म्हणजे आता काम व्यवस्थित होणार' हे समाधान मिळत असेल काहींना. पण म्हणजे नारळ फोडून तुम्ही कोणाकडूनतरी कशाचीतरी अपेक्षाच करत आहात ना? असंच समाधान गंडेदोरे बांधून, बळी देऊनही लोक मिळवतात. मग शुभकामाआधी नारळ फोडणं आणि आजार बरा व्हावा म्हणून कोंबडीचा बळी देणं, यात फरक काय, एवढाच माझा प्रश्न आहे मघापासून. Happy

<"शुभ कामाआधी नारळ फोडू नका" असं कोणत्या आधारावर फोर्स करु शकतोस? >
मी कोणालाही असं फोर्स करू शकत नाही. आपण तसं करू नये, हे मला कळतं फक्त. पण मी फोर्स करत नाही, म्हणजे मला मान्य आहे, असं नव्हे. माझी नाराजी फक्त मी व्यक्त करतोय. जाणवणारा थोडाफार धोका दाखवून देतोय.

Pages