दाभोळकरांची हत्या आणि आपण

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 20 August, 2013 - 16:26

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो. आपल्या या दोन्ही भुमिका आपण इतक्या सहजतेने पार पाडतो की आपल्या स्वतःच्या या दोन परस्परविरोधी भुमिकांबाबत आपल्या मनात यतकिंचितही प्रश्न उभे रहात नाहीत. बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्‍या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही. कारण तसे प्रश्न उपस्थित करणार्‍या लोकांना इथे जागा नाही, त्यांना मुर्खांच्या आणि माथेफिरुंच्या झुंडीला सामोरे जावे लागते.
मानवी मन हे जिथे जाईल, जे म्हणेल आणि जे करेल त्या सगळ्यामागे त्याचा कम्फर्ट असतोच. ही दुहेरी भुमिका अतिशय कम्फर्टेबल आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते. नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. अनेकांना ती असतेही परंतु माणसाच्या क्रुरपणाला,दडपशाहीला आणि भीतीला शरण गेलेली 'माणसाळलेली माणसं' निमुटपणे या दरवाज्यासमोर रांगा लावतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनुक्स
<सर्वांत महत्त्वाचं. कारखाना आणि प्रयोगशाळा यांत फरक आहे. प्रयोगशाळेत काम करणार्‍यांनी रॅशनल असावं, अशी अपेक्षा असते. >
???

नविन यंत्राची पुजा करणे हा श्रद्धेचा भाग. यातुन अनेकांना आनंद (आणि प्रसाद) मिळतो, त्यामुळे आनंदाने काम करण्याची प्रवृत्ती असते. जर नविन यंत्राची पुजा न करता काम सुरु केलं तर काही लोकांच्या मनात उगाच धाकधुक असु शकते. त्याचा परिणाम कामावरही होवू शकतो. शेवटी यंत्र आपोआप कसं चालेल? त्याला चालवणारा तंत्रज्ञ मनानेही तितकाच सबल आणि आनंदी हवा. मग ही कुणालाही त्रास न देणारी (बोकड वगैरे सारखी) क्रिया समजा हवं तर. शेवटी कंपनी काय किंवा प्रयोगशाळा काय, माणसे आनंदी असतील आणि त्या ५-१० मिनिटांच्या सोहळ्याने आनंदाने काम करणार असतील, तर त्यांच्या श्रद्धेला (अंध नव्हे) उगाच का डिवचावे.

तसही प्रयोगशाळेत काम करणारी मंडळींना हे माहीती असतेच की काम त्याला करायचे आहे, यंत्र आपोआप चालणार नाहीच. Happy

राहिला प्रश्न नारळाचा. ती एक पद्धत म्हणा हवं तर किंवा एक शुभकामासाठी ज्याने सुरुवात केली असेल, त्याला नारळाच्या वड्या आवडत असतील :). तसही हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला कुठल्या न कुठल्या फळाशी, पानाशी किंवा झाडाशी जोडलेले आहे. प्रत्येक मनुष्य चिकित्सक होउन विचार करु शकत नाही म्हणुन ही psychological trick समजा हवं तर. बाकी त्यादिवशी काम न करणे हा चुकारपणाच.

मला सामान्यांच्या मनातल्या श्रद्धाभावांचा अनुभव आहे. परिचयातल्या अनेक व्यक्ती दु:खानं कोलमडून पडल्या असत्या, त्या त्यांच्या श्रद्धेच्या बळावर उभ्या राहिलेल्या बघितल्या आहेत. 'तुमचे बुवाबापू तुम्हांला फसवताहेत' हे सांगण्याची माझी हिंमत नाही. कारण त्यांचं दु:ख फार मोठं आहे. ही श्रद्धास्थानं नसती, तर ती आज जिवंत नसती, असं या व्यक्ती जेव्हा मला सांगतात, तेव्हा तर मी फार घाबरतो. पण म्हणून मला या श्रद्धा मान्य आहेत, असं नाही. मी फक्त या व्यक्ती कोलमडून पडतील, या भीतीनं गप्प बसतो. >>
सहमत.

वाचले. लॉजिकली कितीही पटले तरी मनुष्यप्राणी हे सर्व बाजूला ठेवून आचरण करु शकत नाही अ‍ॅज अ समाज असे मला वाटते.
जगात सगळीकडे धर्माचे स्तोम हळूहळू वाढत चाललेय का काय असा मला प्रश्न पडतो. विज्ञाननिष्ठ समाजात हे कसे काय होऊ शकते याचे मला उत्तर मिळत नाही. आणि जगातल्या कितीतरी धार्मिक म्हणवल्या जाणार्‍या संस्था खूप चांगले चॅरिटी काम करतात हे मी या डोळ्याने पाहिले आहे.

मोठे निर्णय तर जाऊच दे, पण छोटे निर्णय घेतानाही माझी त्रेधा उडते
उदाहरण १) कंपनीचे फिलॅनथ्रॉफी बजेट असते. तीत धार्मिक संघटनांना सर्पोट करायचा नाही असे धोरण असते सहसा. मी स्वत: मिशनरीज ऑफ चॅरिटीचे काम डोळ्यांनी पाहिले आहे, त्यांचे ऑडिटेड अकाउंट्स पाहिले आहेत. माझी मुलगी मी तिथुन दत्तक घेतली आहे, त्या संस्थेबाबत मला अतिशय आदर आहे, मी ख्रिश्चन नाही. त्यांना विदर्भातील उन्हाळ्यात ४७ डिग्रीमध्ये प्रीमॅच्युअर बेबिज साठी कुलर्स हवेत. कंपनीकडे पैसे आहेत, पण देऊ शकत नाही. त्या ऐवजी कंपनी कसल्या कसल्या माझ्यामते फाल्तू ईवेंट्स स्पॉन्सर करते. मी आमच्या मिळकतीतून पैसे देऊन त्यांची त्यावेळेसची गरज भागवली.
उदाहरण २) सत्यसाईबाबा कल्टबाबत माझे मत फारसे चांगले नाही. त्यांच्या कामासाठी एक प्रस्ताव कंपनीकडे आला. त्याला वरील धोरण वापरून नाही म्हणताना मला काही वाटले नाही.
उदाहरण ३) डिपार्टमेंटची जागा बदलली म्हणून छोटे डुक्कर कापुन मुंडके आणि डोळ्यांसकट त्याचे मास वाटणे प्रसादासारखे हे इथे या देशात अनुभवले. ते मला खरं सांगते फार क्रुर वाटले. इथे लोकांनी भक्तीभावाने आणि आनंदाने, चवीने खाल्ले.
उदाहरण ४) इकडे छत्री अशुभ मानली जाते. एक माणूस दुसर्‍याच्या हातात छत्री दिली तर घेत नाही. छोट्या पोराटोरांनी समजा पावसातून येऊन छत्री उघडली क्लासरुममध्ये तर त्यांना दम भरतात. मला अर्थातच ते फालतू वाटते.
उदाहरण ५) ४ हा आकडा (units' place मध्ये) अशुभ मानला जातो इकडे. म्हणून उदाहरणार्थ २४,३४,४४, असे मजले नसतात. २३ नंतर थेट २५
उदाहरण ६) फेंगशुई हा प्रकार मला मॅड वाटतो. वास्तुशास्त्रही. तर इकडे लोकं वार्षिक फेगशुई भविष्यानुसार आपल्या जागेची, क्युबची, ऑफिस (म्हणजे केबिनची) शुद्धी करुन घेतात. कधी ऑफिस बदलून मागतात, छोटे किंवा मोठे करुन मागतात, दिशा बदलून मागतात. ती एक प्रचंड मोठी डोकेदुखी आहे.
तसे केले नाही तर धंद्यात खोट येईल असे मानतात
उदाहरण ७) भारतात ट्रेडिंग फ्लोअर्स वर लक्ष्मीची मूर्ती नाही म्हणुन धंद्यात खोट येते म्हणणारे कमी नाहीत. कंपनीचे धोरण सर्वधर्मसमभाव आहे. अशा वेळेस कंपनीने काय करावे?
उदाहरण ८) वसाहतींसाठी तोडतोड जंगलतोड केली. मग वृक्षारोपण केले. स्थानिक पक्ष्यांचा, पर्यावरणाचा विचार न करता फराफरा वाढणारी ऑस्ट्रेलियन वृक्षसंपदा लावली. आता पक्षी त्याला तोंड लावत नाहीत. नुसतेच हिरवेगार दिसते. उपयोग शून्य. य अमेरिकन कंपनीचा फिलॅनथ्रॉपी मंथ असतो. का तर त्यांच्या फाऊंडर्सचा हॅप्पिबर्थडे अर्थात पुण्यतिथी मंथ असतो. त्यांना त्याच महिन्यात पैसे खर्च करायचे असतात. पण टायफुन्चे दिवस आहेत, आता वृक्षारोपण केले तरी ते नुसते उडुन जाणार. पुढल्या महिन्यात केले तर नाही का चालणार? उत्तर येते नाही. भावनिक कारणे. वृक्षारोपण होते, श्रमदान होते ठरल्याप्रमाणे. किती झाडे जगतात, किती मरतात? रोज टायफुन येतोय सध्या, उरलेला वेळ ऊन.

आयुष्य कोष्टकात बसत नाही. लॉजिकमध्ये तर नाहीच नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन चालणे फार अवघड आहे. बहुसंख्यांना कसलेच प्रश्न पडत नाहीत, ते मजेत वाटचाल करत असतात.
रॅशनल वाट चालू पाहणारा माणूस एकटा पडत जातो हळूहळू किंवा तर्ककर्कश्श होत जातो. दोन्ही वाईटच.

>>> नास्तिक होण्यासाठी प्रचण्ड डेडिकेशन, ताकत व माज अंगात लागतो, <<<< अचूक इब्लिसा! कधीकधी तुझ्या मतांशी एकमत होते.

पण माज या शब्दा ऐवजी अहंकार हा शब्द नाही का चालणार? माज हा शब्द वैषयिक वासनेतून उद्भवणार्‍या शारिरीक क्रियांविषयी आहे व अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने कुठेही कसाही वापरला जातो आहे.
अहंकार हा शब्द मला इथे अधिक चपखल वाटतो.

बेफिकीर्/नताशा, तुमचे मुद्दे पटले, नंदिनी, रैना तुमच्याही पोस्ट आकलन झाल्या Happy

चिनूक्स | 23 August, 2013 - 01:42

इब्लिस,
तुमच्या बोलण्याचा रोख कळला नाही, पण माझ्या समजूतीप्रमाणे तुम्ही शेंडीचं लिहिलेलं बरोबर आहे. उद्या तपासून अधिक लिहितो
<<

लिहा.
पण. 'शुभ' कार्याआधी वा कार्यसिद्धीची अपेक्षा बाळगून नारळ फोडणे, हे प्रतिकात्मक बळी देण्यासारखे आहे.
किंबहुना कोणे एके काळी अती हिंसा झाल्यामुळे लोक या प्रकारच्या प्रथांपासून दूर इतर अहिंसक धर्माकडे वळू लागले, तेव्हा ही अशी प्रथा निर्माण केली गेली.

बळी देणे ही जर अंधश्रद्धा असेल,
तर प्रतिकात्मक बळी देणे ही श्रद्धा कशी काय ब्वा?

भल्तीच थिन लाईन आहे इथे या दोघांमध्ये.

***

टोणगे,
फेसबुक.
समजतंय का काही? तिकडे जावा अन खुश र्‍हावा.

लिंबाजीराव,
धन्यवाद.
अहंकार या अर्थीच माज वापरला होता. पराकोटीचा आत्मविश्वास असे म्हणू हवे तर.
लैंगिक उद्दिपनात असण्याचा पशूंचा काळ या अर्थी तो शब्द वापरलेला नव्हता.

raina, i agree with every word. Have felt similar set of emotions n dilemmas.

रैना
भारी व नविनच माहिती समजली.

याबद्द्लचा तुमचा दृष्टीकोणही योग्य आहे.

उत्सुकतेपोटी एक प्रश्न.
या सगळ्या बद्दल अंधश्रद्धा निर्मूलनासारखा दृष्टीकोण असणारे लोक देखिल तिकडे आहेत, की सगळेच आपण नारळ फोडतो तसे डुकराचे पिलू बळी देतात?

चिनुक्स,
तुम्ही नाही म्हटलात हो. मीदेखिल नारळ फोडणे ही अंधश्रद्धा आहे असेच बोलतोय इथे.

इथे अनेक लोकांनी म्हटले आहे, की नारळ फोडल्याने मनाला बरे वाटते. किंवा नारळवड्या आवडतात इत्यादी. मग काय बिघडले नारळ फोडला तर?

त्याच वेळी, बोकड बळी चा विषय आला तेव्हा ते वाईट असे सगळेच म्हणताहेत.
तिथे मी म्हटलो की त्या बोकडाचे मटन छान लागते.

एक प्रतिकात्म बळी अन एक खराखुरा बळी.
श्रद्धा अन अंधश्रद्धा कुठे संपते अन कुठे सुरू होते?

जीव घेण्याबद्द्लच बोलायचे, तर नारळातही त्या झाडाच्या बाळाचा जीव आहेच, जो, ते नारळ फोडल्याने नष्ट झाला...

इब्लिस- आपण नारळ फोडतो तसेच निर्विकारपणे. नारळाच्या ऐवजी डुक्कर फक्त.
मी जिवंत डुक्कार पाहिले नाही. सोयीसाठी आख्खे रोस्टेड पिग असते. त्याची मान डिपार्टमेंट हेडने मीट क्लोवर वापरुन धडावेगळी करायची.

त्यातही ती फेंगशुई भानगड असते, मुहुर्त असतो. त्या डुकराची मान त्या ट्रेवर अमुक एका कोनाला असावी लागते.

कोरियात एका जगप्रसिद्ध अमेरिकन बँकेच्य उद्घाटनप्रसंगी त्या शुभमुहूर्तावर जिवंत डुकराचा बळी दिल्याचे ऐकले.

नाही, सगळेच असे करत नाहीत अर्थातच- डुक्कर कापणे वगैरे.
पण ते छत्री प्रकरण फार शिरेस आहे.

तसेच न्युमरॉलॉजी छाप भयंकर खूळ आहे. फेंगशुईमास्टर ने सांगीतले म्हणून स्वतःचे नावच बदलून घ्या. ते शुभच नाही. बदलून घ्या म्हणजे कुठपावेतो? सर्व ऑफिशयल डॉक्युमेंटस सकट बदलून घ्या. बर्थ सर्टिफिकेट, पासपोर्ट, सगळे.

आयुष्य कोष्टकात बसत नाही. लॉजिकमध्ये तर नाहीच नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन चालणे फार अवघड आहे. बहुसंख्यांना कसलेच प्रश्न पडत नाहीत, ते मजेत वाटचाल करत असतात.
रॅशनल वाट चालू पाहणारा माणूस एकटा पडत जातो हळूहळू किंवा तर्ककर्कश्श होत जातो. दोन्ही वाईटच.>>> हे ही खरंय. आणि मग बर्‍याचदा हे असं होवू नये म्हणून थोड्याफार तडजोडी केल्या जातात. ह्म्म्म्म.

<रॅशनल वाट चालू पाहणारा माणूस एकटा पडत जातो हळूहळू किंवा तर्ककर्कश्श होत जातो. दोन्ही वाईटच>

हे वाक्य अजिबातच पटलं नाही. रॅशनलिस्ट चळवळ ही फार मोठी आहे. दाभोळकर गेल्यानंतर चारच दिवसांत हे ऐकायला मिळेल, असं वाटलं नव्हतं. सोयीच्या स्त्रीवादाइतकाच सोयीचा रॅशनलिझमही वाईट असतो. Happy

हे वाक्य अजिबातच पटलं नाही. रॅशनलिस्ट चळवळ ही फार मोठी आहे. दाभोळकर गेल्यानंतर चारच दिवसांत हे ऐकायला मिळेल, असं वाटलं नव्हतं. सोयीच्या स्त्रीवादाइतकाच सोयीचा रॅशनलिझमही वाईट असतो. >>> सोयीचा रॅशनलिझम वाईटच हे मान्य. पण आपल्याला मान्य नसूनही फक्त दुसर्‍यांसाठी तडजोडी कराव्या लागत नाहीत का? अगदी कधीच पटत नसूनही करावं लागलंय असं होतंच नाही का? माझ्या बाबतित तरी होतं. कधी कधी हे रॅशनली चुकीचं आहे हे माहित असूनही त्यामूळे खूप काही नुकसान होत नाहीये ना, मग असू दे असं म्हणत चालवून घ्यावं लागतं.

अल्पना +१

कधी कधी हे रॅशनली चुकीचं आहे हे माहित असूनही त्यामूळे खूप काही नुकसान होत नाहीये ना, मग असू दे असं म्हणत चालवून घ्यावं लागतं. > +१

जसे तुम्ही यंत्रांसमोर फोडलेला नारळ चालवून घेता तसेच.
तिथेही ती 'क्षुल्लक बाबीसाठी किती वाद घालणार' ही सोयच असते. हाँ उद्या अगदीच बोकड कापायला लागले किंवा सॅटेलाईट प्रक्षेपणासाठी पंचांग पहायला लागले तर गोष्ट वेगळी.

<जसे तुम्ही यंत्रांसमोर फोडलेला नारळ चालवून घेता तसेच.
तिथेही ती 'क्षुल्लक बाबीसाठी किती वाद घालणार' ही सोयच असते. हाँ उद्या अगदीच बोकड कापायला लागले किंवा सॅटेलाईट प्रक्षेपणासाठी पंचांग पहायला लागले तर गोष्ट वेगळी.>

यालाच मी सोयीचा रॅशनलिझम म्हणतो आहे. दोन्ही कृतींमागचा हेतू एक, तर त्यांपैकी एकच कृती आपण चालवून का घ्यावी? Happy
असो. आता तेचतेच मुद्दे यायला लागले आहेत. माझा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

यालाच मी सोयीचा रॅशनलिझम म्हणतो आहे. दोन्ही कृतींमागचा हेतू एक, तर त्यांपैकी एकच कृती आपण चालवून का घ्यावी? >> हे पटतंय. चुकीचं आहे हे ही कळत पण तरी करावं लागतं. कारण समाजातले काही टक्केच लोक रॅशनल आहेत. वैयक्तिक आयुष्यात रॅशनलिझम पाळण शक्य असतं, पण सार्वजनिक ठिकाणी आपण अल्पसंख्यांमध्ये असतो. आणि त्यातही आपण डिसिजन मेकर असू तर बरंच काही साध्य होतं. पण जर तसं नसेल तर डोकेफोड करूनही बहूतांशी वेळा पदरी काही पडत नाही.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमाच इतकी सुक्ष्म आहे की कधी आपण ती सीमा ओलांडून अंधश्रद्धा पाळू लागतो तेच कळत नाही.

नागपंचमीचेच पहा ना. नागाविषयी कुतुहल, भीती यातून त्यांची प्रतिकात्मक पूजा म्हणजे नागपंचमीला नागाची मातीची मूर्ती, चित्र किंवा वारुळाची पूजा करण्याची पद्धत पडली, त्याचे रुपांतर जिवंत नाग पकडून आणून, त्यांना दूध पाजून, त्यांची तोंडे शिवून किंवा दात पाडून वेगवेगळे खेळ करण्याची पद्धत कधी झाले ते कळलेच नाही.

आज समाजात नुसत्या धार्मिक अंधश्रद्धा नाहीत तर वैद्यकीय, आर्थिक अंधश्रद्धादेखील बर्‍याच फोफावल्या आहेत.
जसे तुळतुळीत टकलावर केस उगवून आणणारी तेले, लेप, लिंगाचा आकार वाढवणारी यंत्रे अश्या वैद्यकीय अंधश्रद्धा तर सहा महिन्यात पैसे दुप्पट करुन देणार्‍या स्कीम या आर्थिक अंधश्रद्धा
(माझ्या एका मित्राने हे केस उगवणारे तेल कुठून तरी इंदूरजवळून आणलेले. लावताना तो हॅड ग्लोज घालायचा का? तर वैद्याने सांगितले की तळहाताला लागले की तळहातावरही केस उगवतील. यावर काय बोलायचे कप्पाळ!! :))

हे असे अशास्त्रीय औषधे विकणारे भोंदू वैदू आणि भाबड्या लोकांना गंडवणारे एजंट यांवर देखील काहीतरी उपाय करायला हवा.

एकदा खरगपूर आय आय टी मधे एका लॅबमधे काही कामानिमित्त गेले असताना एका महागड्या, प्रगत, आयात केलेल्या इक्विपमेन्टवर कुंकवाने स्वस्तिक काढून, फुलं वाहून पूजा केलेली पाहिली होती. मी आणि बरोबर आलेले माझे एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ मित्र अवाक, थक्क, हताश वगैरे सगळं काही एकदम झालो होतो..

>>

त्यात गैर काय? श्रद्धा नाही कशावर, आणि दुसरे करत आहेत त्यांना नावे ठेवायला सगळ्यात पुढे Sad

आमचा पगार सरकार देतं. लोकांच्या पैशातून मी माझ्या वैयक्तिक श्रद्धा पूर्ण करणं मला चूक वाटतं. हे प्रकार शनिवारीरविवारी कोणी केले असते, तर एकवेळ मी मान्य केलं असतं. पण एक अख्खा दिवस एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेत काम होत नाही, हा मला पैशाचा, वेळेचा अपव्यय वाटतो
>>.

मग आंबेडकर जयंती
गांधी जयंती

या दिवशी सुट्टी का, जास्त काम करा आणि गांधी नेहरू आंबेडकरांना श्रद्धांजली वहा, त्या दिवशीचा पगार सरकारला परत करा, कसें?

ऑफिसच्या पीसी वरुन किती लोक मायबोलीची कामे करतात? ते तितक्या वेळाचा पैसा कंपनीला परत करणार आहेत का?

चांगली चर्चा आहे

पण
.
.
कोणी........कृपया .....श्रध्दा आणि अंधश्रध्दा यांची व्याख्या करतात का .....?

जो पर्यंत व्याख्याच स्पष्ट होणार नाही..... तो पर्यंत नेमके कुणाच्या मते अमुक प्रकार हा श्रध्देत येतो...आणि तमुक प्रकार अंधश्रध्दा मधे येतो...

Happy

@चिनुक्स - बाकी सर्व मूर्ख आणि आपण च शहाणे ही तुमची मोठी अंधश्रद्धा आहे.

तुम्ही तुमच्या मालकीची कंपनी, दुकान, प्रयोगशाळा काढा आणि मग नारळ फोडायचा की नाही, यंत्राची पूजा करायची की नाही ते त्या कंपनी पुरते ठरवा.

केवळ बरं बाटावं म्हणून असत्याच्या गाभ्यावर आधारलेली गोष्ट करणे इतके महत्वाचे का वाटते? लहानपणापासून आजूबाजूला कार्यकारणभावाशिवाय केल्या जाणार्‍या अशा अनेक गोष्टींचे पाहून अनुकरण केले जाते. प्रश्न विचारण्याची, सारासार विचार करण्याची मानसिकता खुडून टाकली जाते, मग या लहानशा असत्याच्या बीजापासून निर्माण झालेली सवय केवळ तिथेच थांबते का? त्याचा वृक्ष होतोच ना. नुकत्याच जन्माला आलेल्या कुठल्याही अर्भकाला धर्म, जात पात, अज्ञाताची भिती, नशीब ,भूतखेतं या संकल्पना माहीत असतात का? नाही. पण तेच मूल मोठं झाल्यावर या सर्व गोष्टींवती,विश्वास ठेवायला लागतं, त्याचा अभिमान बाळगायला शिकतं. या असत्याचं बीज आपणच पेरुन ते कसं वाढवतो याचा नीट विचार केला तर आपल्या भोवती वाढीस लागलेल्या बर्‍याचशा प्रश्नांमागची मानसिकता आपल्या ध्यानात येईल.>> हे छान लिहीलयत.

@चिनुक्स - बाकी सर्व मूर्ख आणि आपण च शहाणे ही तुमची मोठी अंधश्रद्धा आहे.>> अनुमोदन. कृपया इतरांच्या श्रद्धेला मूर्खात काढू नये.

<<फारएण्ड | 22 August, 2013 - 22:18>>
फारेन्डदादा मस्त समतोल पोस्ट. आवडली.

उदयन, मी काल एक प्रयत्न करून पाहिला होता श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक लिहिण्याचा! पुन्हा लिहून पाहतो.

श्रद्धा = एक अल्टिमेट शक्ती आहे जिच्यामुळे विश्व व त्यातील प्रत्येक बाब अस्तित्वात आहे व कार्यान्वित आहे. त्या शक्तीचे पाठबळ आपल्याला मिळावे व आपल्या अडीअडचणी, संकटे, रोगराई यातून आपल्याला शक्य तितकी मुक्तता मिळावी व सुखाने जगता यावे यासाठी इतर कोणत्याही सजीवाला काहीही त्रास न होऊ देता त्या शक्तीसमोर नमणे व प्रार्थना करणे! यात शास्त्रीय दृष्टिकोनाला महत्व नाही असे मुळीच नाही. फक्त शास्त्र हीसुद्धा त्याच शक्तीची निर्मीती आहे असे मानणे अपेक्षित आहे.

अंधश्रद्धा = आपल्या अडीअडचणी, संकटे, रोगराई नष्ट करण्यासाठी किंवा आपले एकुण भले व्हावे या इच्छेने किंवा आपल्याला भविष्यात कशाचाच त्रास होऊ नये या इच्छेने असे कृत्य करणे जे:

१. इतर सजीवांना इजा अथवा मनस्ताप पोहोचवेल
२. निर्जीव बाबींना हानि पोहोचवेल व (स्वतःचा अथवा कोणाचीतरी, कोणत्याही प्रकारची) संपत्ती कमी अथवा नष्ट होईल
३. सिद्ध झालेल्या शास्त्रीय पुराव्यानुसार अतार्किक अथवा निरर्थक, असंबद्ध असेल व त्यातून वेळ, पैसा, श्रम यांचा अपव्यय होईल
४. सिद्ध झालेल्या शास्त्रीय पुराव्यानुसार अतार्किक व खोटे असेल मात्र प्रभावीपणे ते केल्यामुळे इतर कमी ज्ञानी अथवा अज्ञानी मानवांच्या मनात अश्या कृत्याच्या महतीबाबत विश्वास निर्माण होऊन समाजातील काही घटक दिशाहीन विचार करू लागतील

Happy

सरकारचे व समाजाचे निधर्मीकरण मलाही पसंत नाही. सर्व धर्मांचा समान आदर जरूर असावा. जेथे बहुसंख्य लोकांना त्यांच्या धार्मिक गोष्टींचा काही भाग कार्यालयात (ऑफिस. मंगल कार्यालय नव्हे Happy )व इतरत्र सार्वजनिक ठिकाणी करायचा असेल तर तो त्या कार्यालयाचे जे जबाबदार लोक आहेत त्यांना जेवढे मान्य आहे तेवढा जरूर व्हावा. लोकांच्या मोटिवेशनचाच तो एक भाग आहे.

यावर कोणी टँजंट टाकण्याआधी एक खुलासा करतो:
१. माणसाचा जीव वाचवणे, कोणाला साधी दुखापत सुद्धा न होउ देणे. कोणालाही - यात श्रीमंतांपासून अगदी टोकाच्या गरिबापर्यंत सगळे आले आणि सगळे सारखे.
२. अशा कार्यक्रमाने कोणाला त्रास होत असेल तर त्यावर योग्य मार्ग काढणे
३. असे कार्यक्रम करण्याची संधी सर्वांना त्या कार्यालयातील लोकसंख्येच्या साधारण समान प्रमाणात असणे
४. अशा कार्यक्रमाने कार्यालयाचे मोठे नुकसान न होणे.

या प्रायोरिटीज महत्त्वाच्या आहेत, कदाचित अजूनही असतील. असे कार्यक्रम करताना वरच्या गोष्टींना धक्का पोहोचत असेल तर या गोष्टींच्या बाबतीत तडजोड नाही.

काही स्पेसिफिक उदाहरणे, जी मला अजिबात गैर वाटत नाहीतः
१. मशीनला फुले वाहणे, कुंकू वाहणे
२. वर्षातून एकदा ऑफिसमधे सत्यनारायणाची पूजा करणे, रिक्षावाले स्टॅण्डवर करतात तेही मला गैर वाटत नाही. पण अडलेल्या व्यक्तीला भाडे नाकारून नव्हे. कारण त्याने वरच्या गोष्टींमधे तडजोड होते.
३. मुख्यमंत्र्याने विठ्ठलाला अभिषेक करणे
४. एखाद्या ऑफिसात सार्वजनिक गणपती बसवणे. ऑफिसच्या पैशानेही.
५. गुढीपाडव्याला हापिसच्या दारात माळा घालणे.

श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक लिहिण्याचा>>>>>>>>>>> बेफीजी... आपले प्रतिसाद मी कालच वाचले होते...
आपण जो फरक करत आहे तो सुध्दा एका विशिष्ट प्रकारे योग्यच आहे

परंतु मी.. व्याख्या विचारत आहे.... शास्त्रशुध्द पध्दतीची व्याख्या... प्रत्येकाची वेगवेगळी असेल .. परंतु एक व्याख्या असेलच...

दोन गोष्टींमधे फरक करणे आणि दोन्ही गोष्टींची व्याख्या करणे ....हे दोन्ही वेगवेगळे असे किमान मला वाटते...

आपण निव्वळ फरक करत राहतो... त्यामुळे जास्त विसंवाद .. गैरसमज वाढीस लागतात...

त्यापेक्षा व्याख्या केली तर... बरे होईल.....

Pages