दाभोळकरांची हत्या आणि आपण

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 20 August, 2013 - 16:26

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो. आपल्या या दोन्ही भुमिका आपण इतक्या सहजतेने पार पाडतो की आपल्या स्वतःच्या या दोन परस्परविरोधी भुमिकांबाबत आपल्या मनात यतकिंचितही प्रश्न उभे रहात नाहीत. बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्‍या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही. कारण तसे प्रश्न उपस्थित करणार्‍या लोकांना इथे जागा नाही, त्यांना मुर्खांच्या आणि माथेफिरुंच्या झुंडीला सामोरे जावे लागते.
मानवी मन हे जिथे जाईल, जे म्हणेल आणि जे करेल त्या सगळ्यामागे त्याचा कम्फर्ट असतोच. ही दुहेरी भुमिका अतिशय कम्फर्टेबल आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते. नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. अनेकांना ती असतेही परंतु माणसाच्या क्रुरपणाला,दडपशाहीला आणि भीतीला शरण गेलेली 'माणसाळलेली माणसं' निमुटपणे या दरवाज्यासमोर रांगा लावतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> मला आणि बाकि कोणाला त्रास होउ नये म्हणून मी नियम पाळिन असं का नाही? <<<<
शन्का बरोबरे तुमची, पण युगानुयुगे चालत आलेली मनुष्यजात इतकी सिधीसाधी सरळमार्गी असती तर एकही देव/धर्म या पृथ्वीतलावर अवतरले नसते याची खात्री बाळगा.
मनुष्यास केवळ एक अन एकच बाब हवे तसे वळवू शकते ती म्हणजे "अज्ञाताची भिती" असे म्हणायलाही माझी हरकत नाही. (या भितीमध्येच, देव/पापपुण्य वगैरे बरोबरच मृत्युचीही भिती धरावी लागेल व याच भितीचा वापर "फाशीच्या शिक्षेतही" केलेला असतो हे विसरून चालणार नाही) व धर्माधारीत रचनेतून पापपुण्याच्या कल्पनेतून बहुसंख्य मनुष्यप्राणी सदाचारी बनुन वागत असतील तर त्यास आक्षेप घेणारे आपण (माझ्यासहित) कोण?
अन ही भिती घालणेच व्यर्थ/अयोग्य असे म्हणायचे असेल, तर तमाम कायद्यातील तमाम गुन्ह्याकरता असलेल्या निरनिराळ्या दंडात्मक/शारीरीक शिक्षांना देखिल बंदी घालावी का? कारण त्या पण "भित्याच" घातलेल्या असतात.

लिंबूदादा, हे माझ्या नवर्‍याला ईमेल मधून आलेले. तुमच्या एका पोस्टीशी सार्धम्य अहए यातल्या अर्थाचे

A typical Monday morning at an unspecified Marriage License Bureau in America:

"Next!"
"Good morning! We want to apply for a marriage license."
"Names?"

"Tim and Jim Jones."

"Jones??!! Are you related?? I see a resemblance."

"Yes, we're brothers."

"Brothers??!! You can't get married."

"Why not?? Aren't you giving marriage licenses to same gender couples?!"

"Yes, thousands. But we haven't had any siblings. That's incest!"

"Incest? No, we are not gay."

"Not gay??!! Then why do you want to get married?"

"For the financial benefits, of course. And we do love each other. Besides, we don't have any other prospects."

"But we're issuing marriage licenses to gay and lesbian couples who've been denied equal protection under the law. If you are not gay, you can get married to a woman."

"Wait a minute. A gay man has the same right to marry a woman as I have. But just because I'm straight doesn't mean I want to marry a woman. I want to marry Jim."

"And I want to marry Tim, Are you going to discriminate against us just because we are not gay?!"
"All right, all right. I'll give you your license. Next!"
Keep going…
"Hi! We are here to get married."
"Names?"

"John Smith, Jane James, Robert Green, and June Johnson."

"Who wants to marry whom?"

"We all want to marry each other."

"But there are four of you!"

"That's right. You see, we're all bisexual.
I love Jane and Robert, Jane loves me and June, June loves Robert and Jane, and Robert loves June and me. All of us are getting married together, as this is the only way that we can express our sexual preferences in a marital relationship."

"But we've only been granting licenses to gay and lesbian couples!"

"So you're discriminating against bisexuals!"

"No, it's just that, well, the traditional idea of marriage is that it's just for couples."

"Since when are you standing on tradition?"

"Well, I mean, you have to draw the line somewhere."

"Who says?? There's no logical reason to limit marriage to couples.
The more the better. Besides, we demand our rights!
The mayor says the constitution guarantees equal protection under the law. Give us a marriage license!"
"Sigh! All right, all right! Next!!"

"Hello, I'd like a marriage license."

"In what names?"

"David Deets."

"And the other man?"

"That's all! I want to marry myself."

"Marry yourself??!! What do you mean?"

"Well, my psychiatrist says I have a dual personality, so I want to marry the two together. This way, I can file a joint income-tax return and reduce my taxes."

नारळ फोडण्याला जे विरोध करतायत त्यांचा मी तीव्र शब्दात विरोध करतो.

आधीच आमच्या कोकणात नगदी पिक नाही. त्यात नारळ विकून चार पैसे इथल्या शेतकऱ्याला
मिळाले तर तुमचे काय बिघडले.

इथे मला प्रांतीयवादाचा वास येतोय. धिक्कार आहे या प्रवृत्तीचा.

Rofl

लै बरोबर लिंबू भाव.

म्हणून बुद्धी वापरूच नका.

बाबावाक्यंप्रमणं या मंत्राचा जप नित्य करा.

पन काय हो? या तुमच्या लॉजिकमधे कुणा तिसर्‍याला तरी स्वतःचं डोकं चालवावंच लागत असेल ना?

चिनूक्स,

>> यंत्रांना फुलं वाहणं आणि ईश्वरावर श्रद्धा यांचा काय संबंध?

भारतीय तत्त्वज्ञानांनुसार ईश्वर सर्वत्र भरलेला आहे. त्यामुळे तो यंत्रातही आहेच. त्याद्वारे आपल्याला अनुकूल राहावा अशी प्रार्थना आहे. त्यानिमित्त फुलं वाहिली जातात. मात्र प्रत्येक माणसाला त्यामागील तर्क माहीत असेलंच असं नाही. अर्थात डोळस श्रद्धा केव्हाही उपयुक्त आहेच. Happy

आ.न.,
-गा.पै.

डॉ. दाभोळकर जिवंत असेपर्यंत,त्यांना पाठींबा देण्यासाठी, त्यांच्या बद्दल विचार करण्यासाठी देखील मला वेळच मिळाला नाही, तशी फारशी गरज देखील वाटली नाही कारण त्यांच्यावर (इतरांच्या वर) सगळं सोपवलं असल्यासारखं मी नेहमी सारखा निवांत आणि माझ्या कामात बिझी होतो. आता दु:ख तर खुप होतं.
त्यात आपण तर बुवा, आजकाल शक्यतो कुणीतर मेल्या नंतर जागं होतो, मग खुप भरभरुन बोलतो, लिहितो देखील, जमल्यास अर्धी रजा घेऊन मोर्च्यात देखील सहभागी होतो, त्यातही जमल्यास कैमेरा पुढे येतोच, कोण करतं एवढं सांगा बघु, हे करताना देखील किती त्रास सहन करावा लागतो माहित आहे ? (आता या निमित्ताने मला थोडी प्रसिद्धीही मिळते हे देखील मान्य आहे.) पण या मुळेच तर आपलं सरकार पुरतं हादरल, एका दिवसात आपल्यापुढे सपशेल शरणागती पत्करली आणि एकदाचा तो कायदा मंजुर करण्याच ठरवलं, आता यापुढे राज्यात अंधश्रद्धा शिल्लक उरणार नाही, कुणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा होईल हे नक्की. तसेच आता सगळे गुन्हेगार देखील सापडतील आणि वर त्यांना शिक्षा देखील होईल अशी खात्री आहे.
शेवटी खुन करणार्‍यांना कुणाची भिती कशी वाटली नाही हा प्रश्न देखील पडतोच.

आज राज्यात चांगल काम करणार्‍याला संपवण आणखी सोप झालं आहे, कारण खुन केल्यावर नंतरच सगळं सांभाळायला राजकिय हितसंबंध असले कि झालं.शिक्षेची भिती ती कसली ?
या पुढे या पुरोगामी राज्याच्या जनतेच्या भल्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं असेल, करत असतील ते थोडे तरी जिवाला घाबरतील कि आणखी जोमाने काम करतील ? घाबरुन जाणार्‍यांच प्रमाण ९० % टक्के , त्याहुन जास्त असेल अस मला वाटतं.
कारण दाभोळकरां सारखे जीव झोकुन देणारे तर लाखात एखादेच असतात..

कारण खुन केल्यावर नंतरच सगळं सांभाळायला राजकिय हितसंबंध असले कि झालं.शिक्षेची भिती ती कसली ?>>>>

यक्झ्यअ‍ॅक्टली Happy

:कपाळाला हात आणि घड्याळाकडे डोळे लावून बसलेली बाहुली: Wink

बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. >>>
इंजिनिअर झाला म्हणजे तुम्हाला काय ४ हात , ४ पाय येतात कि पंख , शिंगं फुटतात ? इंजिनिअर, डॉक्टर , प्राध्यापक असल्याचा आणि धर्म , देव ह्यांना महत्व न देण्याचा काय संबंध ? medical , physics , chemistry , bio , mechanics हि जशी शास्त्रे आहेत तसेच spiritualism हे सुधा शास्त्रच आहे . आपला ह्या शास्त्राचा अभ्यास नसल्यामुळे भोंदू आपल्याला सहज ठगवतात .

कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते.>>>
exactly . बुद्धिवादाचा अहंकार असणारे हेच करत असतात .

मुळात हे वैज्ञानिक मार्गाने जावून व धर्म वगैरे बाबीना मागे टाकून नक्की जायचे कुठे असते ??? तुम्हाला माहीत आहे काय>>>+१११११
बोला . नक्की जायचंय कुठे तुम्हाला ??

हजारों गोष्टी आजुबाजुला घडताना दिसतील. इथे हजारों पळवाटा आहेत, फक्त खर्च करायला पैसा पाहीजे. पैसा असेल तर रेडिमेड पुण्य पण विकत मिळेल.>>>
तुम्ही लेखात काय लिहिलंय ? इथे काय बोलताय ? लेखात वैज्ञानिक मार्ग, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि देव- धर्म ह्याबद्दल लिहिलंय . आता पाप - पुण्य मध्ये आणताय . एकाच विषय धरा आणि त्यावरच चर्चा करा . लेखाचं शीर्षक तर तिसरंच काहीतरी आहे

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा क्रौर्य, अमानवी वर्तन यांनी स्पष्ट केलेली असते हे मान्य व्हावे / करायला हवे.
माझे भले व्हावे म्हणून एक बोकड कापणे ही अंधश्रद्धा आणि माझे भले व्हावे म्हणून देवासमोर वाकणे ही श्रद्धा!>>> +११११११११

ज्ञानेश
दाभोलकरांनी अंधश्रद्धे विरोधात केलेली काही कामे उल्लेखनीय आहेतच . परंतुते विनाकारण aggressive झालेले दिसतायेत . अगदी श्री कृष्णांनी सुधा भगवद्गीतेत सांगितलेल्या गोष्टींविरुद्ध केलेली बाष्फळ बडबड मात्र मान्य नाही. ते खोटं आहे हे ते सिद्ध करू शकले नाहीत. ते खरं आहे हे सिद्ध करणाऱ्या, अध्यात्म क्षेत्रात विशिष्ट उंची गाठलेल्या अनेक लोकांनी दिलेली chalenges त्यांनी स्वीकारलेली नाहीयेत. साधा response सुधा देण्याची तसदी त्यांनी घेतली नाहीये.

रोज माणसं किड्या मुंग्यांसारखी मरतायेत . रोज अनेक अपघात होतायेत . कुठं आगी लागतायेत , कुठं पावसात , वादळ वार्यात , भूकंपात तर कुठं दुष्काळात बळी जातायेत .मोठ मोठ्या आजारांनी लोक मार्तायेत . शेकड्यानं आत्महत्या होतायेत .कुठं काहीही कारण नसताना अचानक मृत्यू येतायेत . रोज किती जणांचे खून होतायेत . चोर्या, दरोडे, फसवा-फसवी , विश्वासघात ह्याचं तर अमाप पिक आलंय . रोजचा पेपर उघडला तर सगळ्या ह्याच बातम्यांनी भरून गेलेला दिसतो
वैज्ञानिक दृष्टीकोन ,विज्ञान इतकं पुढं गेलंय तर विज्ञान हे सगळं का थांबवत नाहीये ? विज्ञानाला नैसर्गिक आपत्तींचे साधे अंदाज सुधा लावता येत नाहीत . मृत्यू रोखता येत नाहीत कि मेलेल्याला पुन्हा जिवंत करता येत नाही . विज्ञान शरीराचे लाड करण्याची उपकरणं निर्माण करण्यापलीकडे काहीही करू शकलेलं नाहीये . विज्ञान (ज्याच्यात ज्ञान नाही ते)

रोज माणसं किड्या मुंग्यांसारखी मरतायेत . रोज अनेक अपघात होतायेत . कुठं आगी लागतायेत , कुठं पावसात , वादळ वार्यात , भूकंपात तर कुठं दुष्काळात बळी जातायेत .मोठ मोठ्या आजारांनी लोक मार्तायेत . कुठं काहीही कारण नसताना अचानक मृत्यू येतायेत . रोज किती जणांचे खून होतायेत . चोर्या, दरोडे, फसवा-फसवी , विश्वासघात ह्याचं तर अमाप पिक आलंय वैज्ञानिक दृष्टीकोन ,विज्ञान इतकं पुढं गेलंय तर विज्ञान हे सगळं का थांबवत नाहीये ?>>
देव आतापर्यंत असे थांबवत होता ?

देव आतापर्यंत असे थांबवत होता ?>>>
कर्माचा सिद्धांत थांबवत होता .आणि देवाला श्रध्देन शरण गेलं तर जीवावर आलेलं बोटावर निभावतं हे १००% खरं आहे . तुम्ही ज्याला विज्ञान म्हणताय त्या विज्ञाना मुळे लोकांची वाईट , नीच कर्मे वाढली आहेत . ह्या जगात प्रत्येक चांगल्या वाईट कर्माची किंमत चुकती करावीच लागते . त्यातून कुणाचीही सुटका नाही . विज्ञान ह्यातून सुटण्याचा मार्ग दाखवतं का ? विज्ञाना कडे दुःखातून सुटण्याचा मार्ग आहे का ? लोक फक्त शरीराला सुख कसं देता येईल हेच बघत असतात . त्यासाठी वाटेल ते करायला धजावतात . फक्त स्वताचा विचार करतात . दुसरे गेले उडत .
विज्ञानाने soul conciousness नाहीसा करून body conciousness वाढवलाय

महादेव७१,

>> तुमच्यासारख्या लोकांमुळेच "देव" संकल्पना बदनाम झाली आहे. आता पुरे करा.

विज्ञानातलं काहीही कळंत नसतांना त्यावर भलंथोरलं व्याख्यान झोडणाऱ्यांमुळे विज्ञान बदनाम झालंय असं तुम्हाला वाटंत नाही का?

आ.न.,
-गा.पै.

रोज माणसं किड्या मुंग्यांसारखी मरतायेत . रोज अनेक अपघात होतायेत . कुठं आगी लागतायेत , कुठं पावसात , वादळ वार्यात , भूकंपात तर कुठं दुष्काळात बळी जातायेत .मोठ मोठ्या आजारांनी लोक मार्तायेत . कुठं काहीही कारण नसताना अचानक मृत्यू येतायेत . रोज किती जणांचे खून होतायेत . चोर्या, दरोडे, फसवा-फसवी , विश्वासघात ह्याचं तर अमाप पिक आलंय वैज्ञानिक दृष्टीकोन ,विज्ञान इतकं पुढं गेलंय तर विज्ञान हे सगळं का थांबवत नाहीये ?>>विज्ञान कितीही श्रेष्ठ असले तरी देव तो देवच . आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना.

देव हे सर्व थांबवू शकतो ? जर असेल तर घडव्तोच का ? एका २ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार झाला विज्ञान थांबवू शकत नाही परंतु ज्याचे सार्या सृष्टीवर नियंत्रण आहे तो तर थांबू शकतो पण का थांबवत नाही?.. ह्यावरून एका कवितेची आठवण झाली.

देवा तुझ्यासमोर माणुसकीवर त्यांनी केले बलात्कार,
तू गप्प राहिलास ,
आम्ही GOD MAKER
देतो तुला नोटीस NEGLIGANCE ऑफ ड्युटी ची

नेट, कॉम्पुटर,मोबाइल वापरून वर विज्ञानावर टीका वा....

कॉम्पुटर, नेट, मोबाइल ह्या गोष्टी मनसोक्त वापरून वर विज्ञानावर टीका........

लोक फक्त शरीराला सुख कसं देता येईल हेच बघत असतात . त्यासाठी वाटेल ते करायला धजावतात . फक्त स्वताचा विचार करतात . दुसरे गेले उडत .
विज्ञानाने soul conciousness नाहीसा करून body conciousness वाढवलाय
<<

इथे 'सत्कर्मे' करून, शरीर सुखे टाळून, मग पुढे काय मिळते?

स्वर्ग?

स्वर्ग म्हणजे काय? अप्सरा, सोमरस, मज्जा. हो ना? 'वर' जाऊन जे मिळेल याची खोटी आश्वासने देऊन तुमच्यासारखे ढोंगी लोकांना मूर्ख बनवतात, त्यांची कीव येते.

जर मला या शरीरास सुख देण्याची परवानगी नाही, तर 'देवाने' हे शरीर दिलेच कशाला? उगं स्वतःलाच खोटे सांगून स्वत:च्या जीवाला त्रास देणे म्हणजे धर्माचरण व देवभक्ती होते का?

तुमचा 'सोल' लवकरात लवकर मुक्त करा. माबोवरून समाधी घ्या पाहू पट्कन? फाऽर बरे होईल.

त्याच प्रमाणे विज्ञानाने दिलेली चप्पल, कपडे, घरे, रस्ते, सायकल/स्कुटर्/गाडि, चूल, इ. चा वापर बंद करा. सोल कॉन्शस व्हा.चूल कशाला हवी? गॅसशेगडी तर विज्ञानाचा अतिरेक! ताबडतोब वापर बंद करा. जंगलात जाऊन कंदमुळेफळे शोधा. विज्ञानप्रणित वस्त्रे कशाला हवीत? केळीची पाने वल्कले म्हणून गुंडाळा. अन सगळ्यात बेक्कार तो काँपुटर!! तात्काळ फेका तो. तुमच्या 'सोल' मधून डायरेक्ट विचार ब्रॉडकास्ट करा.

तात्पर्य, टळा इथून. सारिका ट्रिपल तिर्री, अवतारकार्य संपवा आता. जगाचा विचार करा. आमचा विचार करा. फार स्वतःचा विचार करता बा तुम्ही. Wink

नमस्कार,

OMG मधे ऐक वाक्य होते "धर्म माणसाला अपंग बनवतो नाहीतर अतिरेकी"
इथे धर्माचे दोन अपंग अतिरेकी सारिका आणि पैलवान दिसत आहे.

धन्यवाद

इब्लिस,

१.
>> स्वर्ग म्हणजे काय? अप्सरा, सोमरस, मज्जा. हो ना? 'वर' जाऊन जे मिळेल याची खोटी आश्वासने देऊन
>> तुमच्यासारखे ढोंगी लोकांना मूर्ख बनवतात, त्यांची कीव येते.

अहो, वाळवंटी पंथांत स्वर्ग म्हणजे सर्वस्व आहे. हिंदू धर्मात आत्मतत्त्व समजावून घेणं हे सर्वस्व आहे.

२.
>> त्याच प्रमाणे विज्ञानाने दिलेली चप्पल, कपडे, घरे, रस्ते, सायकल/स्कुटर्/गाडि, चूल, इ. चा वापर बंद करा.
>> सोल कॉन्शस व्हा.चूल कशाला हवी? गॅसशेगडी तर विज्ञानाचा अतिरेक! ताबडतोब वापर बंद करा. जंगलात जाऊन
>> कंदमुळेफळे शोधा. विज्ञानप्रणित वस्त्रे कशाला हवीत? केळीची पाने वल्कले म्हणून गुंडाळा. अन सगळ्यात
>> बेक्कार तो काँपुटर!! तात्काळ फेका तो. तुमच्या 'सोल' मधून डायरेक्ट विचार ब्रॉडकास्ट करा.

यामुळे धर्म कसा वाढीस लागेल बरं?

आ.न.,
-गा.पै.

दिनेश्क,

>> OMG मधे ऐक वाक्य होते "धर्म माणसाला अपंग बनवतो नाहीतर अतिरेकी"
>> इथे धर्माचे दोन अपंग अतिरेकी सारिका आणि पैलवान दिसत आहे.

विज्ञान कशाशी खातात ते तुम्हाला माहीत नाही. तुम्ही OMG बघत बसा. तुमची झेप तिथपर्यंतच आहे.

आ.न.,
-गा.पै.

नाठाळ,

>> तिर्रीला हाणलं तर पैलवानाला झोंबलं

वर इब्लिस यांनी लिहिलेला संदेश आणि माझा प्रतिवाद दिसला नाही का? डोळे फुटले तर नाही ना तुमचे? वैयक्तिक चिखलफेकीत करायला मी काय तुमच्यासारखा आहे? मी तात्विक धुळवड खेळतो. कळलं?

आ.न.,
-गा.पै.

Pages