दाभोळकरांची हत्या आणि आपण

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 20 August, 2013 - 16:26

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो. आपल्या या दोन्ही भुमिका आपण इतक्या सहजतेने पार पाडतो की आपल्या स्वतःच्या या दोन परस्परविरोधी भुमिकांबाबत आपल्या मनात यतकिंचितही प्रश्न उभे रहात नाहीत. बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्‍या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही. कारण तसे प्रश्न उपस्थित करणार्‍या लोकांना इथे जागा नाही, त्यांना मुर्खांच्या आणि माथेफिरुंच्या झुंडीला सामोरे जावे लागते.
मानवी मन हे जिथे जाईल, जे म्हणेल आणि जे करेल त्या सगळ्यामागे त्याचा कम्फर्ट असतोच. ही दुहेरी भुमिका अतिशय कम्फर्टेबल आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते. नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. अनेकांना ती असतेही परंतु माणसाच्या क्रुरपणाला,दडपशाहीला आणि भीतीला शरण गेलेली 'माणसाळलेली माणसं' निमुटपणे या दरवाज्यासमोर रांगा लावतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभकामाआधी नारळ का फोडायचा? काम व्यवस्थित व्हावं म्हणून. 'आपण नारळ फोडला म्हणजे आता काम व्यवस्थित होणार' हे समाधान मिळत असेल काहींना. पण म्हणजे नारळ फोडून तुम्ही कोणाकडूनतरी कशाचीतरी अपेक्षाच करत आहात ना? असंच समाधान गंडेदोरे बांधून, बळी देऊनही लोक मिळवतात. मग शुभकामाआधी नारळ फोडणं आणि आजार बरा व्हावा म्हणून कोंबडीचा बळी देणं, यात फरक काय, एवढाच माझा प्रश्न आहे मघापासून. स्मित

<"शुभ कामाआधी नारळ फोडू नका" असं कोणत्या आधारावर फोर्स करु शकतोस? >
मी कोणालाही असं फोर्स करू शकत नाही. आपण तसं करू नये, हे मला कळतं फक्त. पण मी फोर्स करत नाही, म्हणजे मला मान्य आहे, असं नव्हे. माझी नाराजी फक्त मी व्यक्त करतोय. जाणवणारा थोडाफार धोका दाखवून देतोय. >>>> यासगळ्यासाठी +१

एक तर नारळ वाल्यांचा धंदा बसणार तरी किंवा तेजीत तरी येणार इतकेच मला ह्या नारळ वाले प्रतिसाद पाहून कळते आहे

केवळ बरं बाटावं म्हणून असत्याच्या गाभ्यावर आधारलेली गोष्ट करणे इतके महत्वाचे का वाटते? लहानपणापासून आजूबाजूला कार्यकारणभावाशिवाय केल्या जाणार्‍या अशा अनेक गोष्टींचे पाहून अनुकरण केले जाते. प्रश्न विचारण्याची, सारासार विचार करण्याची मानसिकता खुडून टाकली जाते, मग या लहानशा असत्याच्या बीजापासून निर्माण झालेली सवय केवळ तिथेच थांबते का? त्याचा वृक्ष होतोच ना. नुकत्याच जन्माला आलेल्या कुठल्याही अर्भकाला धर्म, जात पात, अज्ञाताची भिती, नशीब ,भूतखेतं या संकल्पना माहीत असतात का? नाही. पण तेच मूल मोठं झाल्यावर या सर्व गोष्टींवती,विश्वास ठेवायला लागतं, त्याचा अभिमान बाळगायला शिकतं. या असत्याचं बीज आपणच पेरुन ते कसं वाढवतो याचा नीट विचार केला तर आपल्या भोवती वाढीस लागलेल्या बर्‍याचशा प्रश्नांमागची मानसिकता आपल्या ध्यानात येईल.

मी कोणालाही असं फोर्स करू शकत नाही. आपण तसं करू नये, हे मला कळतं फक्त. पण मी फोर्स करत नाही, म्हणजे मला मान्य आहे, असं नव्हे.>>
करेक्ट. हेच मी ही करते.

माझी नाराजी फक्त मी व्यक्त करतोय. जाणवणारा थोडाफार धोका दाखवून देतोय. >> मात्र हे त्या श्रद्धेचा/अंधश्रद्धेचा डायरेक्ट धोका/हार्म किती यावर अवलंबून आहे. माझ्या टीमला नव्या प्रोजेक्टआधी नारळ फोडून समाधान मिळत असेल अन त्याने त्यांचं मनोबल वाढत असेल तर मी त्या क्षणी त्याचे धोके सांगून त्यांचं मनोबल कमी करत नाही. नंतर मांडेन मी ते विचार.
पण त्याऐवजी ते बोकड कापायला निघाले तर मात्र मी तिथल्या तिथे समज देईन. या दोन अंध/श्रद्धांमधला फरक चांगलाच ठळक आहे अन तेवढा प्रत्येक सुज्ञास समजतो. किंवा माझ्या अवतीभवती तेवढे सुज्ञ लोक वावरतात, असं म्हणा हवंतर.

अवांतर-
'नारळ' हे नरबळीचे प्लेसहोल्डर आहे असे वाचल्याचे आठवते. त्याचे मानवी शिराशी असलेले साधर्म्य (कवच, आत मांस, द्रव वगैरे) आणि नरबळी देण्यातल्या प्रॅक्टिकल अडचणी ( ! ) या कारणांनी त्या फळाची त्या कामासाठी निवड झाली आणि लोकप्रियता वाढली, असा एक प्रवाद आहे.

ही चर्चा व्यर्थ आहे इतकेच मला बोलायचे होते !!!!!!!!!!!!! काही निवडक व्यक्तीच व मुद्देही तेच तेच आहेत म्हणजे एकाच मुद्द्याभवती घुटमळत आहोत आपण Happy
भाषा वाईट वापरली गेली नसावी माझ्याकडून असे वाटते पण लोकाना न आवडत असेल बहुधा

शेवटचा प्रतिसाद ह्या धाग्यावर मी निघालो

जाता जाता

ही भाषा माझी गझलेने बिघडवली
अर्थांचे म्हणणे तसेच नाही मित्रा

~वैवकु

पूर्वी भोपळाही कापत.>> पंजाबात बघितलं आहे हे. नववधूला घरी घेवून येतात तेंव्हा त्य गाडीच्या चारी दिशांना भोपळा आणि नारळ फोडून भिरकावतात.

पण त्याऐवजी ते बोकड कापायला निघाले तर मात्र मी तिथल्या तिथे समज देईन.
<<
अर्र!.
असं करू नका हो!
त्या मटणाची चव लै भारी असते.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा.
भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायात श्रद्धा तीन प्रकारच्या असतात, सात्विक, राजस (मोठेपणा ,सत्ता मिळवण्यासाठी/मिरवण्यासाठी श्रद्धा ), तामस (घातपात, बळी,नृशंस मार्गाने संपत्ती, इच्छित वस्तू मिळवण्याचे अघोरी प्रकार ) , असे श्रीकृष्णाने सांगितलेय.
गीतेत भक्तांचेही चार प्रकार वर्णिले आहेत, आर्त (वेदनापीडित) जिज्ञासू (कुतुहलयुक्त, अभ्यासूही ) अर्थार्थी (रिटर्न्स मागणारे ,ज्ञानी (सारे समजून परमपदाला पोचूनही भक्ती करणारे).

यातच सारे काही आले. अगदी सगळे प्रकार आले.

भारत ही धर्मभूमी आहे, युद्धातही सतत माझा धर्म कोणता याचा विचार करणार्‍या सत्प्रवृत्तांची. हा धर्म खूप मोठा, खूप सूक्ष्म आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम राजस व तामस श्रद्धांमधून उद्भवणारे क्रौर्य, तसेच आर्त व अर्थार्थी भक्तांच्या निकडीचा गैरफायदा घेणारे भोंदू लोक यांच्यासाठी आहे. यात धर्म आहेच कुठे ? धर्माच्या नावाखाली अधर्म मांडणारी माणसे आहेत..

चर्चा फारच पुढे गेली आहे, पण लिहिल्याशिवाय राहवत नाही, खंडेनवमीला पुजा करुन लोक काम करत नाहीत अशी टीका वाचली, हे खरे असेल तर तो कामचुकारपणासाठी कारण शोधले आहे असे वाटते, मी जिथे(खाजगी कंपनीमध्ये) काम करायचो तिथे, पुजा करुन मिठाइ खाउन कामाला लागयचो. त्यामुळे यामध्ये कामचुकारपणा जास्ती आहे , श्रद्धेचा संबंध कमी हे माझे मत.
आणि पगार घेउन काम करत नाहीत हा नियम खंडेनवमीलाच का लावयचा? कामाच्या वेळेत कितीतरी लोक चहा प्यायला म्हणुन जातात ते तास-तास भर येत नाहीत किंवा १५ Augustला झेंडावंदन झाल्यावर काम करायला काय हरकत आहे? उगिच खंडेनवमीच्या पुजेवर तुमचि श्रद्धा नाही आणि कोणाचीतरी आहे तर का विरोध करताय? (जर तुम्हाला त्रास न देता सगळे होत असेल तर?)

<उगिच खंडेनवमीच्या पुजेवर तुमचि श्रद्धा नाही आणि कोणाचीतरी आहे तर का विरोध करताय? (जर तुम्हाला त्रास न देता सगळे होत असेल तर?)>

प्रश्नाचं उत्तर अगोदर देऊन झालं आहे. Happy

लोकहो,

>> शास्त्रज्ञांनाच जर स्वतःच्या उपकरणांची पूजा करावीशी वाटत असेल तर त्यांच्या विचारसरणीत काहीतरी
>> गडबड आहे असं नाही का वाटत?

का वाटावी? तसंही पाहता विज्ञानाची कुठलीही शाखा ठामपणे ईश्वराचं अस्तित्व नाकारीत नाही. ना कुठलीही शाखा ईश्वराचं अस्तित्व ठामपणे स्वीकारीत नाही. मग ईश्वरावर जर श्रद्धा बाळगली तर ती अवैज्ञानिक कशी?

आ.न.,
-गा.पै.

< पगार घेउन काम करत नाहीत हा नियम खंडेनवमीलाच का लावयचा? कामाच्या वेळेत कितीतरी लोक चहा प्यायला म्हणुन जातात ते तास-तास भर येत नाहीत किंवा १५ Augustला झेंडावंदन झाल्यावर काम करायला काय हरकत आहे? >

तेही चूकच. पण चहा पिणं आणि श्रद्धा यांचा संबंध नाही.
१५ ऑगस्टला अधिकृत सुट्टी असते. त्या दिवशी काम करणं अपेक्षित नसतं. त्यामुळे तक्रारीस जागा नाही.
सर्वांत महत्त्वाचं. कारखाना आणि प्रयोगशाळा यांत फरक आहे. प्रयोगशाळेत काम करणार्‍यांनी रॅशनल असावं, अशी अपेक्षा असते.

युरोपातल्या LHC (Large Hardon Collider) मध्ये भारतातील १०० च्या वर वैज्ञानीक काम करत होते.

ह्या प्रोजेक्ट मधिल DAE (Dept of Atomic Energy) च्या महत्वपुर्ण सहभागा प्रित्यर्थ CERN ला DAE ने

२ मि उंचीची नटराजाची मुर्ती भेट दिली होती.

नटराजाचीच मुर्ती का ?

असे प्रश्न आपल्याला पडतात ? ह्यात तुम्हाला अंधश्रद्धा वाटते ?

Hundreds of years ago, Indian artists created visual images of dancing Shivas in a beautiful series of bronzes. In our time, physicists have used the most advanced technology to portray the patterns of the cosmic dance. The metaphor of the cosmic dance thus unifies ancient mythology, religious art and modern physics.

हे त्या मूर्तीशेजारी लिहिलंय. यात कुठली अंधश्रद्धा आली?
'ताओ ऑफ फिजिक्स'चा त्याला संदर्भ आहे.

अंधश्रद्दा नव्हे, अंधश्रद्धा. Happy

या व्याख्या इतक्या ढोबळ नाहीत. Happy
असो. 'ताओ ऑफ फिजिक्स' वाचलं तर काही गोष्टी उलगडतील.

टोणगे,
पुन्हा पुन्हा तेच तेच, कितींदाही त्याचे स्पष्टीकरण देऊन झालेले असले तरी नव्या डू आयडीने लिहिण्याच्या तुमच्या चिकाटीला सलाम. फेसबुक इज मेड फॉर यूर काईंड ऑफ गाईज.

चिनुक्स,
पुन्हा शांतपणे उत्तर दिल्याबद्दल अभिनंदन.

साती, डोक्या ऐवजीच नारळ फोडायची प्रथा निर्माण झालिये... नरबळीचे प्रतिक आहे ते. उगं नै देवाला वहायच्या नारळाला शेंडी शिल्लक ठेवत Proud

इब्लिस,
तुमच्या बोलण्याचा रोख कळला नाही, पण माझ्या समजूतीप्रमाणे तुम्ही शेंडीचं लिहिलेलं बरोबर आहे. उद्या तपासून अधिक लिहितो.

इब्लिस,

लोकांनी तुला ईतक दुर्लक्ष केल तरीही तुझी ज्यात त्यात तोंड घालायची सवय काय जात नाय !

सोन्याच्या नॉनो कणा बद्दल झालेल विसरलात वाटत !!

चिनुक्सने शांतपणे उत्तर दिल्याबद्दल कौतुकच आहे,

बर्याच लोकांची त्यांनी बोलती बंद केलेली आहे, विपुत जाऊन पायधरणी केली तरीही अपनी टांग उपरच !!

Pages