आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
कोडं क्र ०५/५८: "तू नक्की
कोडं क्र ०५/५८:
"तू नक्की विचार केला आहेस ना?' जगतच्या स्वरांत काळजी होती. मानसीने त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंच हसली.
'तू एव्हढं टेन्शन का घेतोयस जगत?'
'तसं नाही मानसी. तू भूमी आणि अंबरला प्रेमानेच वागवशील ह्याची खात्री आहे मला. पण तरीही सावत्र आईबद्दल एक वाईट प्रतिमा आहे समाजात. उगाच काहीबाही ऐकून येतील आणि तुझ्याशी वाईट वागतील.'
'तू अजिबात काळजी करू नकोस. मी सगळं संभाळून घेईन' मानसीच्या स्वरात आत्मविश्वास होता.
'बरं. अजून एक सांग. तू खूश आहेस ना?'
मानसीने गोल्डन एरातल्या एका गाण्याने त्याला उत्तर दिलं. ओळखा ते गाणं
उत्तरः
तुम्हे पाकर हमने जहां पा लिया है
जमीं तो जमीं आसमा पा लिया है
लोकहो मला ओळखता येईल असे गाने
लोकहो मला ओळखता येईल असे गाने लिहा ना

जाई
जाई
कोडं क्र ०५/५९: पेट ली आणि
कोडं क्र ०५/५९:
पेट ली आणि त्याची गर्ल फ्रेन्ड फेक ली ५ वर्ष एकमेकांना ओळखत होते. हिन्दी गाण्यांची आवड हा त्यांच्यातल्या समान दुवा. शेवटी त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. बोहोल्यावर फादरने 'हं, आता काय तुमच्या लग्नाच्या आणाभाका आहेत त्या घेऊन टाका बरं' असं म्हटल्यावर त्यांनी काय गाणं म्हटलं असेल?
सोप्पं आहे. त्यामुळे क्लूजची गरज नाही.
कोडं क्र ०५/६०: 'मला सासू
कोडं क्र ०५/६०:
'मला सासू हवी' मधल्या रत्नपारखी कुटुंबातल्या तीन सुनांपैकी एक सून तिच्या नवर्यासोबत टोपीकरांच्या देशात सुट्टी घालवायला गेली. तिथे तिने धाकट्या राजकुमाराला पाहिलं आणि त्याच्यावर जाम फिदा झाली. भारतात परत आल्यावर सदानकदा त्याचंच गुणगान. एके दिवशी घरात शेजारच्या अगरवाल भाभी मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीचं निमंत्रण द्यायला आल्या. त्यांच्यासमोर सुध्दा तिने तीच टेप वाजवली. भाभींना काही कळेचना. तेव्हा मोठी सून त्यांना समजावयला पुढे सरसावली. पण भाभींना मराठी कळत नव्हतं. त्यामुळे तिने एक हिन्दी गाण म्हणून त्यांना सिच्युएशन समजावून द्यायचा प्रयत्न केला. तिचं इंग्लिशचं ज्ञान अगाध त्यामुळे भाभी अधिकच गोंधळल्या. तिने कोणतं गाणं म्हटलं असेल?
क्लू: हे गाणं हिन्दी असलं तरी कुठल्याच पिक्चरमधलं नाहिये.
कोडं क्र ०५/५९: हे(/है) मैने
कोडं क्र ०५/५९:
हे(/है) मैने कसम ली..
हे(/है) तूने कसम ली..
हे आहे का?
कोडं क्र ०५/६०: हरी वरून
कोडं क्र ०५/६०:
हरी वरून असणार.
श्रध्दा बरोबर! कोडं क्र
श्रध्दा बरोबर!
कोडं क्र ०५/५९:
पेट ली आणि त्याची गर्ल फ्रेन्ड फेक ली ५ वर्ष एकमेकांना ओळखत होते. हिन्दी गाण्यांची आवड हा त्यांच्यातल्या समान दुवा. शेवटी त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. बोहोल्यावर फादरने 'हं, आता काय तुमच्या लग्नाच्या आणाभाका आहेत त्या घेऊन टाका बरं' असं म्हटल्यावर त्यांनी काय गाणं म्हटलं असेल?
सोप्पं आहे. त्यामुळे क्लूजची गरज नाही.
उत्तरः
हे मैने कसम ली..
हे तूने कसम ली
मामी रस्ता बरोबर आहे.
मामी रस्ता बरोबर आहे. कडेकडेने जा बघू
कोडं क्र ०५/६०: 'मला सासू
कोडं क्र ०५/६०:
'मला सासू हवी' मधल्या रत्नपारखी कुटुंबातल्या तीन सुनांपैकी एक सून तिच्या नवर्यासोबत टोपीकरांच्या देशात सुट्टी घालवायला गेली. तिथे तिने धाकट्या राजकुमाराला पाहिलं आणि त्याच्यावर जाम फिदा झाली. भारतात परत आल्यावर सदानकदा त्याचंच गुणगान. एके दिवशी घरात शेजारच्या अगरवाल भाभी मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीचं निमंत्रण द्यायला आल्या. त्यांच्यासमोर सुध्दा तिने तीच टेप वाजवली. भाभींना काही कळेचना. तेव्हा मोठी सून त्यांना समजावयला पुढे सरसावली. पण भाभींना मराठी कळत नव्हतं. त्यामुळे तिने एक हिन्दी गाण म्हणून त्यांना सिच्युएशन समजावून द्यायचा प्रयत्न केला. तिचं इंग्लिशचं ज्ञान अगाध त्यामुळे भाभी अधिकच गोंधळल्या. तिने कोणतं गाणं म्हटलं असेल?
क्लू: हे गाणं हिन्दी असलं तरी कुठल्याच पिक्चरमधलं नाहिये.
उत्तरः
ऐसी लागी लगन मीरा हो गयी मगन
वो तो गली गली हरी गुन गाने लगी
ओ: मालिका न बघण्याचा परिणाम न
ओ: मालिका न बघण्याचा परिणाम न काय!
मस्त होतं हे कोडं, स्वप्ना!
हयला ... हे तर माझं गाणं.....
हयला ... हे तर माझं गाणं..... (ह्या गाण्यातुन कॉलेज मधे मला खुप बेजार केलं होतं..... त्या वेळेस "हरी" च्या ठिकाणी "मोहन" घालुन हैराण केलं होतं माझ्या ग्रूपने.....मस्त आठवण...)
त्या वेळेस "हरी" च्या ठिकाणी
त्या वेळेस "हरी" च्या ठिकाणी "मोहन" घालुन हैराण केलं होतं माझ्या ग्रूपने >>>
कोडं क्र ०५/६१: हात
कोडं क्र ०५/६१:
हात मुरगळल्यामुळे आदित्यला दोन आठवडे सक्तीची विश्रांती मिळाली होती. घरात बसून बसून तो जाम वैतागला होता. सकाळी सकाळी कपाट तरी नीट लावून टाकावं म्हणून त्याने सगळे Drawers रिकामे केले आणि जमिनीवर फतकल मारून काय हवं काय नको ते बघण्यात तो गुंतला. अचानक त्याची नजर टेबलावर ठेवायच्या २ जुन्या घड्याळावर गेली. 'आयला, इथं आहेत होय ही. गेला महिनाभर शोधतोय' असं पुटपुटत त्याने ती बाजूला काढली. सेल्स घालून पाहिलं तर दोन्ही चालत होती. पण दोन्हीचे stands मोडले होते. 'इथंच होती फेव्हिकॉलची ट्यूब' असं म्हणत तो उठला. पण ती काही सापडेना.
'बोंबला. आता काय?' असं म्हणत त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं तर शेजारची रागिणी बाहेरचं अंगण झाडत होती.
'ओह, ही कशी काय आज घरी?'
"बेटा! मनमे लड्डू फुटा" तशी त्याची गत् झाली. रागिणी आणि तिचे आईबाबा शेजारी रहायला येऊन २-३ महिने झाले होते. तिच्याशी बोलायची संधी आदित्य सोडणं शक्यच नव्हतं. तो लगेच बाहेर गेला.
'हाय रागिणी'
'ओह हाय आदित्य. हात कसा आहे आता?'
'बरा आहे. पण घरात बसून वैतागलो होतो. तू आज घरी कशी?'
'अरे आज थोडं प्रोजेक्टचं काम आहे. आई म्हणाली घरीच कर. तू ये ना मला मदत करायला. म्हणजे दुसरं काही करत नसलास तर हं'
नेकी और पूछ पूछ. 'आई, मी रागिणीला प्रोजेक्टमध्ये मदत करून येतो' असं ओरडत तो बाहेर पळाला तोपर्यंत तिने सगळं सामान व्हरांड्यात आणून ठेवलं होतं.
'अरे वा! पटकन झालं काम. मदत केल्याबद्दल आभार.'
'त्यात काय? मी मोकळाच होतो. अरे बाप रे! १ वाजला? आई शंख करत असेल माझ्या नावाने. जेवायला जायला हवं' असं म्हणत आदित्य उठला.
'ए, तू घड्याळं कशाला घेऊन आला होतास?'
आदित्य हिंदी गाणं म्हणून तिला कसं उत्तर देईल?
कोडं क्र ०५/६२: मिताली
कोडं क्र ०५/६२:
मिताली वैतागून गेली होती. आपल्या आयुष्याचा एव्हढा महत्त्वाचा निर्णय दुसर्या लोकांवर अवलंबून असावा ह्याचा तिला अतिशय राग आलेला होता. पण करते काय? सगळ्या गोष्टींचा गुंता झालेला होता. राजकारण आणि ते पण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे.
कोण कुठला अफगाणीस्तानमधला दिलावर खान. त्याच्या गावात २ वर्ष पाउस पडलेला नाही आणि गुरांना खायला वैरण नाही. त्याची सोय करा मगच मी ओसामा कुठे आहे ते सांगतो हा त्याचा पवित्रा.
बिहारमधून गुरांच्या वैरणीची सोय झाली असती पण त्याची व्यवस्था बघणारा अधिकारी जागेवर असेल तर ना. आज युपीत तर उद्या एकदम तामिळनाडूमध्ये अशी त्याची गत. हा सत्यजित कदम म्हणजे ईदका चांद झाला होता.
आणि त्याच्याशी संपर्क होऊन हा प्रश्न सुटल्याशिवाय मी लग्नाचा विचारही करणार नाही असं तिला Edward Choi ने निक्षून सांगितलं होतं. त्याच्या करियरचा प्रश्न होता.
मितालीला तिच्या मैत्रिणीने फोन केला तेव्हा ती आपला हाल-ए-दिल कसा व्यक्त करेल?
कोडं क्र ०५/६३: 'अहो, पण मी
कोडं क्र ०५/६३:
'अहो, पण मी सांगतेय ना तुम्हाला. माझे सासू सासरे काही माझा छळ वगैरे करत नाहीयेत.'
'सुरेखाबाई, तुम्ही दबावाखाली येऊन सांगत नाही कशावरून?'
'कमाल आहे तुमची. इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन मी कशाला खोटं बोलेन? तुम्ही आहात ना इथे?'
'मिस्टर कारखानीस. तुमचे हे सगळे शेजारी काय सांगताहेत मग? आणि का?'
'माझं ऐका इन्स्पेक्टर. गणपतीच्या दिवसात जोरजोरात लाऊडस्पीकर लावला म्हणून मी त्यांची तक्रार केली होती. त्याचा बदला घेताहेत ते. तुम्ही रेकोर्ड पहा ना तपासून."
'माझा तुमच्यावर विश्वास नाही अजिबात.'
'बरं. माझं ऐकू नका. पण माझ्या सुनेचं तर ऐकाल.'
हेच कारखानीसांनी हिंदी गाणं म्हणून कसं सांगितलं असतं?
कोडं क्र ०५/६१: दो घडी वो जो
कोडं क्र ०५/६१:
दो घडी वो जो पास आ बैठे
हम जमाने से दूर जा बैठे ?????
नाही मामी
नाही मामी
अरे लोक्स, कोणीच नाहिये इथे.
अरे लोक्स, कोणीच नाहिये इथे. डिसेंबरच्या २०१३ आत १०० चं टार्गेट पुरं करायचं का?
तुच दे बाई उत्तर आता तुझ्या
तुच दे बाई उत्तर आता तुझ्या कोड्यांची
स्वप्ना थिंकण्यासाठी थोड़ा
स्वप्ना थिंकण्यासाठी थोड़ा टाइम दे
पहिल्या कोड्यात गम, घडी असं
पहिल्या कोड्यात गम, घडी असं काहि आहे का?
बाकिच्यांचे क्लु प्लीज
1) जिंदगी की ना टूटे
1) जिंदगी की ना टूटे लड़ी
प्यार करले हर घड़ी
हे आहे का
कोडं क्र ०५/६१: तेरे पास आके
कोडं क्र ०५/६१:
तेरे पास आके मेरा वक्त गुजर जाता है
दो घडी के लिए गम जाने किधर जाता है ????
क्ल्यु.. क्ल्यु... क्ल्यु!!!!
क्ल्यु.. क्ल्यु... क्ल्यु!!!!
जिप्स्या...तुला थंडगार
जिप्स्या...तुला थंडगार व्हॅनिला आईसक्रीम मिल्कशेक
कोडं क्र ०५/६१:
हात मुरगळल्यामुळे आदित्यला दोन आठवडे सक्तीची विश्रांती मिळाली होती. घरात बसून बसून तो जाम वैतागला होता. सकाळी सकाळी कपाट तरी नीट लावून टाकावं म्हणून त्याने सगळे Drawers रिकामे केले आणि जमिनीवर फतकल मारून काय हवं काय नको ते बघण्यात तो गुंतला. अचानक त्याची नजर टेबलावर ठेवायच्या २ जुन्या घड्याळावर गेली. 'आयला, इथं आहेत होय ही. गेला महिनाभर शोधतोय' असं पुटपुटत त्याने ती बाजूला काढली. सेल्स घालून पाहिलं तर दोन्ही चालत होती. पण दोन्हीचे stands मोडले होते. 'इथंच होती फेव्हिकॉलची ट्यूब' असं म्हणत तो उठला. पण ती काही सापडेना.
'बोंबला. आता काय?' असं म्हणत त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं तर शेजारची रागिणी बाहेरचं अंगण झाडत होती.
'ओह, ही कशी काय आज घरी?'
"बेटा! मनमे लड्डू फुटा" तशी त्याची गत् झाली. रागिणी आणि तिचे आईबाबा शेजारी रहायला येऊन २-३ महिने झाले होते. तिच्याशी बोलायची संधी आदित्य सोडणं शक्यच नव्हतं. तो लगेच बाहेर गेला.
'हाय रागिणी'
'ओह हाय आदित्य. हात कसा आहे आता?'
'बरा आहे. पण घरात बसून वैतागलो होतो. तू आज घरी कशी?'
'अरे आज थोडं प्रोजेक्टचं काम आहे. आई म्हणाली घरीच कर. तू ये ना मला मदत करायला. म्हणजे दुसरं काही करत नसलास तर हं'
नेकी और पूछ पूछ. 'आई, मी रागिणीला प्रोजेक्टमध्ये मदत करून येतो' असं ओरडत तो बाहेर पळाला तोपर्यंत तिने सगळं सामान व्हरांड्यात आणून ठेवलं होतं.
'अरे वा! पटकन झालं काम. मदत केल्याबद्दल आभार.'
'त्यात काय? मी मोकळाच होतो. अरे बाप रे! १ वाजला? आई शंख करत असेल माझ्या नावाने. जेवायला जायला हवं' असं म्हणत आदित्य उठला.
'ए, तू घड्याळं कशाला घेऊन आला होतास?'
आदित्य हिंदी गाणं म्हणून तिला कसं उत्तर देईल?
उत्तरः
तेरे पास आके मेरा वक्त गुजर जाता है
दो घडी के लिए गम जाने किधर जाता है
>>स्वप्ना थिंकण्यासाठी थोड़ा
>>स्वप्ना थिंकण्यासाठी थोड़ा टाइम दे
ओक्के!
आर्या
कोडं क्र ०५/६२:
क्लू १ - नावात बरंच काही आहे.
क्लू २ - वैरणला पर्यायी शब्द शोध
कोडं क्र ०५/६३:
क्लू - सुरेखा कारखानीसांची कोण? मराठीत आणि टोपीकरांच्या भाषेत सुध्दा.
०५/६३ - दिल (DIL - Daughter
०५/६३ -
दिल (DIL - Daughter in Law) की आवाज भी सुन मेरे फसाने पे न जा
मेरी नजरों की तरफ देख जमाने पे न जा
हे आहे का?
कोडं क्र ०५/६३: 'अहो, पण मी
कोडं क्र ०५/६३:
'अहो, पण मी सांगतेय ना तुम्हाला. माझे सासू सासरे काही माझा छळ वगैरे करत नाहीयेत.'
'सुरेखाबाई, तुम्ही दबावाखाली येऊन सांगत नाही कशावरून?'
'कमाल आहे तुमची. इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन मी कशाला खोटं बोलेन? तुम्ही आहात ना इथे?'
'मिस्टर कारखानीस. तुमचे हे सगळे शेजारी काय सांगताहेत मग? आणि का?'
'माझं ऐका इन्स्पेक्टर. गणपतीच्या दिवसात जोरजोरात लाऊडस्पीकर लावला म्हणून मी त्यांची तक्रार केली होती. त्याचा बदला घेताहेत ते. तुम्ही रेकोर्ड पहा ना तपासून."
'माझा तुमच्यावर विश्वास नाही अजिबात.'
'बरं. माझं ऐकू नका. पण माझ्या सुनेचं तर ऐकाल.'
हेच कारखानीसांनी हिंदी गाणं म्हणून कसं सांगितलं असतं?
क्लू - सुरेखा कारखानीसांची कोण? मराठीत आणि टोपीकरांच्या भाषेत सुध्दा.
उत्तर
दिल की आवाज भी सुन मेरे फसाने पे न जा
मेरी नजरों की तरफ देख जमाने पे न जा
सुरेखा कारखानीसांची कोण? मराठीत आणि टोपीकरांच्या भाषेत सुध्दा - सून आणि (DIL - Daughter in Law)
श्रध्दा ला ३-४ मोठ्ठे स्कूप्स सॉफ्टीचे. प्रत्येक स्कूप वेगळ्या फ्लेवरचा
कोडं क्र ०५/६३:
कोडं क्र ०५/६३: स्वप्ना-----??
दिल (Daughter in law - DIL) की आवाज भी सुन मेरे फसाने पे न जा
मेरी नजरों की तरफ देख जमाने पे न जा
Pages