..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं क्र ०५/७५:

इशा दचकून झोपेतून जागी झाली. तिला घाम फुटला होता आणि हात थरथरत होते. तिने कसाबसा बेडजवळ असलेला दिवा लावला. थोडं थंड पाणी प्यायल्यावर तिला बरं वाटलं. कसलं भयानक स्वप्न होतं ते. कुठल्याश्या घनदाट जंगलातून ती जीव घेऊन धावतेय आणि चेहेरा नसलेलं कोणीतरी तिच्यामागे लागलंय. नुसत्या विचारानेच तिचा पुन्हा थरकाप झाला. आजूबाजूला खच्चून बिल्डिंग्ज असतानाही तिला एकदम एकटं एकटं वाटायला लागलं. घड्याळात पाहिलं तर पहाटेचे २ वाजले होते. एव्हढ्या रात्री घरी फोन केला तर आई घाबरेल. मित्रमंडळीपैकी कोणाची झोपमोड करावीशी वाटेना. पण ती खरंच खूप घाबरली होती. काय करावं ह्याचा विचार करत असताना तिला एकदम आठवलं की मागच्या महिन्यापासून परिसरातील सोसायट्यांनी एकत्र येऊन रात्रीचा गस्त घालणारा पहारेकरी नेमला होता. बाहेरच्या रस्त्यावरून तो सोटा आपटत 'जागते रहो' असं ओरडत दर तासाला जायचा. इशाला आधी ते ऐकून खूप हसायला आलं होतं आणि मग त्याचा त्रास वाटायला लागला होता. आज मात्र बिछान्यावर अस्वस्थपणे पडून रहात ती त्याची वाट पहायला लागली.

गाणं म्हणण्याची तिची स्थिती असती तर तिने कोणतं गाणं म्हटलं असतं?

०५/०७५ : तुम पुकार लो
तुम्हारा इंतजार है
ख्वाब चुन रही है रात
बेकरार है

उत्तरः
तुम पुकार लो
तुम्हारा इंतजार है
ख्वाब चुन रही है रात
बेकरार है
तुम्हारा इंतजार है

स्वप्ना, बक्षीस म्हणून चपातीचे लाडू चालतील. Happy

सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोडं क्र ०५/७६:

नील आर्मस्ट्राँगचं लग्न झालं. पण तो खूप बिझी असल्याने त्यांना हनिमूनला जाता आलं नव्हतं. त्यामुळे सौ. आर्मस्ट्राँग थोडी नाराज होती. पण एके दिवशी आर्मस्ट्राँग लवकर घरी आला आणि तिला म्हणाला 'अग, बॅगा पॅक कर. आपल्याला लगेच निघायचं आहे.'
'अहो, पण कुठे?'
'हनिमूनला गेलो नाही म्हणून इतके दिवस भूणभूण करत होतीस ना? आता चल जाऊ या'.
'अहो, पण कुठे जायचंय म्हणते मी?'
'सिक्रेट आहे ते' तो डोळे मिचकावत म्हणाला.
'ओहो, सिक्रेट आहे काय?' असं म्हणत सौ. आर्मस्ट्राँग एक गाणं गुणगुणायला लागली. आणि श्री. आर्मस्ट्राँगनेही हसून तिला साथ दिली.

सांगा बरं ते गाणं.

चलो दिलदार चलो चांद के पार चलो
हम है तय्यार चलो

मामी, तुला श्रींखंड आणि पुरी Happy

कोडं क्र ०५/७२:

पहिला वायरलेस संदेश भारतात पाठवला असता तर मार्कोनीने कुठलं गाणं म्हटलं असतं?

कोडं क्र ०५/७४:

गणेशोत्सवासाठी वर्गणी मागायला बॉलिवुड स्टार्स निघाले तर बॅकग्राउन्डला कोणतं गाणं वाजेल?

दिवाळीचा फराळ खाउन सुस्तावले का सगळे? Happy

कोडं क्र ०५/७२:

पहिला वायरलेस संदेश भारतात पाठवला असता तर मार्कोनीने कुठलं गाणं म्हटलं असतं?

उत्तर
हवाओ पे लिख दो, हवाओ के नाम हम अनजान परदेसियों का सलाम

कोडं क्र ०५/७४:

गणेशोत्सवासाठी वर्गणी मागायला बॉलिवुड स्टार्स निघाले तर बॅकग्राउन्डला कोणतं गाणं वाजेल?

उत्तरः
चंदा को ढुंढने सभी तारे निकल पडे

स्निग्धा, तुला डबाभर खव्याचे गुलाबजाम Happy

०५/७७:
".......तर या सगळ्या समस्यांचे उत्तर आहे मी जनुकीय तंत्रज्ञान वापरून तयार केलेला हा किडा." विकास आपल्या हातातली काचेची हंडी उंचावून सगळ्यांना तो किडा दाखवतो. मागे पडद्यावर पण त्या किड्याचे चित्र दिसू लागते. विकास आपले भाषण पुढे चालू करतो..... "अजून मी ह्याला काही नाव दिले नाहीये पण हा किडा प्लॅस्टीक अन्न म्हणून खातो आणि तो पाण्यात ठेवला तर तो पाण्याचे रुपांतर पेट्रोल मधे करतो"
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो. सगळेजण पडद्यावरच्या प्रतिमेकडे कौतुकाने बघत असतात, तेवढ्यात लाईट जातात. विकासचाच धक्का लागून ती हंडी पडते आणि फुटते. किडा उडतो.
कोन्फरन्स रुममधले सगळे जण मेणबत्त्या पेटवतात आणि किडा शोधू लागतात. शोधता शोधता गाणे पण म्हणतात. कुठले?

कोडं क्र. ०५/७८

भकास अण्णाच्या मास्टरशेफ शोचा फिनाले! शेवटचे ३ स्पर्धक उरले होते - २ पुरुष आणि एक स्त्री. इतके दिवस एकत्र शो करून भकास अण्णाचा जीव त्या स्त्री स्पर्धकावर जडला होता.

आजचा आठवडा होता - पालेभाज्यांचा. भकास अण्णानं केलेली एका विशिष्ट पालेभाजीची एक डिश चाखून जशीच्या तशी त्या ३ स्पर्धकांना बनवायची होती. अण्णाची डिश चाखून झाल्यावर त्यात काय काय पदार्थ घातले आहेत याबद्दल तिचा उडालेला गोंधळ अण्णानं टिपला होता. आपल्या 'सॉफ्टकॉर्नर'ला मदत करण्याची त्याची इच्छा होती पण तो स्वतःहून ती करू शकत नव्हता.

मात्र प्रत्येक स्पर्धकाला अण्णाला एक प्रश्न विचारायची मुभा होती. तिनं या सवलतीचा लाभ घ्यावा म्हणून भकास अण्णा कोणतं गाणं म्हणून तिला हिंट देईल? शिवाय या गाण्याच्या निमित्तानं त्याला त्याच्या भावनाही तिच्यापर्यंत पोहोचवता येतील?

कोडं क्र. ०५/७९

त्याचं अन तिचं नातं तुटणार होतंच कारण त्यांच्यातल्या कुरबुरी वाढतच चालल्या होत्या. पण ती इतकी तडकाफडकी निघून जाईल असं त्याला वाटलं नव्हतं.

ती गेल्यावर तो भिरभिरलाच! अनेक मानसोपचार तज्ञ केले पण गुण लाभेना. शेवटी निसर्गोपचार करणार्‍या त्याच्या एका मित्रानं त्याला सुचवलं की एखाद्या समुद्र किनार्‍यावर जाऊन राहिल्यानं त्याच्या मनाला शांती लाभेल. शिवाय नविन कोणाशी नातं जुळवता आलं तरी त्यामुळे आधीची जखम भरण्यास मदत होईल.

मित्राचा सल्ला पटून त्यानं गोव्याला समुद्रकिनारी एक बंगला बुक केला. तिथल्याच पबमध्ये खुशनाझ दीवाडिया आणि खुशी दीवाण अशा दोन छानशा मैत्रिणीही त्याला मिळाल्या. मात्र अनेक दिवस समुद्रकिनारी राहून आणि दोन मैत्रिणींच्या सान्निध्यात घालवूनही त्याला मनःशांती मिळाली नाही. तर अशा परिस्थितीत तो कोणतं गाणं गाईल?

०५/७९:

चैन आपको मिला, मुझे दीवानगी मिली
होश आपको मिला, मुझे 'बेखुदी' मिली
फिर भी प्यार आपसे करता है दिल..

यात 'समुद्रकिनार्‍याचं' काही येत नाहीये, त्यामुळे चूक असावं. पण गाण्यात बेखुदी आहे हे नक्की! Happy

आला.

हम बेखुदी में तुमको पुकारे चले गये.
सागर मे जिंदगी को उतारे चले गये.
का? यात आहे समुद्र. Happy

७९:

कोई सागर दिल को बहलाता नही.
बेखुदीमें भी करार आता नही.

माय बॅड! फुल विचारफोकस आधी बेखुदीवर गेला होता.

कोडं क्र. ०५/७८

भकास अण्णाच्या मास्टरशेफ शोचा फिनाले! शेवटचे ३ स्पर्धक उरले होते - २ पुरुष आणि एक स्त्री. इतके दिवस एकत्र शो करून भकास अण्णाचा जीव त्या स्त्री स्पर्धकावर जडला होता.

आजचा आठवडा होता - पालेभाज्यांचा. भकास अण्णानं केलेली एका विशिष्ट पालेभाजीची एक डिश चाखून जशीच्या तशी त्या ३ स्पर्धकांना बनवायची होती. अण्णाची डिश चाखून झाल्यावर त्यात काय काय पदार्थ घातले आहेत याबद्दल तिचा उडालेला गोंधळ अण्णानं टिपला होता. आपल्या 'सॉफ्टकॉर्नर'ला मदत करण्याची त्याची इच्छा होती पण तो स्वतःहून ती करू शकत नव्हता.

मात्र प्रत्येक स्पर्धकाला अण्णाला एक प्रश्न विचारायची मुभा होती. तिनं या सवलतीचा लाभ घ्यावा म्हणून भकास अण्णा कोणतं गाणं म्हणून तिला हिंट देईल? शिवाय या गाण्याच्या निमित्तानं त्याला त्याच्या भावनाही तिच्यापर्यंत पोहोचवता येतील?

उत्तर : मेरे दिल (डिल) मे आज क्या है,
तू कहे तू मै बता दूं ......

माधव, बरोब्बर. तुला शेपूचे डझनभर पराठे आणि बरोबर शेपूची चटणी! Happy

मामी, शे पू ???? उत्तर ओळखल्यावर बक्षिस द्यायचे असते गं, शिक्षा नाही. Happy

दिवाळीचे उरलेले कानवले पळतील Happy

दिवाळीचे उरलेले कानवले पळतील >>>> कानवले? माधव तुम्ही देखिल विशिष्ट आणि हुशार जमातीतले दिसता! Wink Happy

आणि दिवाळीत खूप मिठाया खाल्या ना? आता शेपूचे पराठे खा गुपचुप! पानात काही टाकलेलं चालणार नाही. Happy

कोडं क्र. ०५/७९

त्याचं अन तिचं नातं तुटणार होतंच कारण त्यांच्यातल्या कुरबुरी वाढतच चालल्या होत्या. पण ती इतकी तडकाफडकी निघून जाईल असं त्याला वाटलं नव्हतं.

ती गेल्यावर तो भिरभिरलाच! अनेक मानसोपचार तज्ञ केले पण गुण लाभेना. शेवटी निसर्गोपचार करणार्‍या त्याच्या एका मित्रानं त्याला सुचवलं की एखाद्या समुद्र किनार्‍यावर जाऊन राहिल्यानं त्याच्या मनाला शांती लाभेल. शिवाय नविन कोणाशी नातं जुळवता आलं तरी त्यामुळे आधीची जखम भरण्यास मदत होईल.

मित्राचा सल्ला पटून त्यानं गोव्याला समुद्रकिनारी एक बंगला बुक केला. तिथल्याच पबमध्ये खुशनाझ दीवाडिया आणि खुशी दीवाण अशा दोन छानशा मैत्रिणीही त्याला मिळाल्या. मात्र अनेक दिवस समुद्रकिनारी राहून आणि दोन मैत्रिणींच्या सान्निध्यात घालवूनही त्याला मनःशांती मिळाली नाही. तर अशा परिस्थितीत तो कोणतं गाणं गाईल?

उत्तर :

कोई सागर दिल को बहलाता नही
बेखुदी में भी करार आता नहीं.....

श्र, शाब्बास! तुला एक खापरी पापलेट बक्षिस. (जागूकडून घे).
माधव तुलाही शाब्बासकी आणि तुला त्या गोव्याच्या पबचा एक मल्टिपल एंट्री पास.

Pages