..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

०५/६२:

ये 'दिल' ना होता 'बेचारा'
'कदम' न होते आवारा
जो/तो(?) खूबसूरत 'कोई' अपना हमसफर होता... (कोड्याच्या संदर्भात 'तो' फिट बसतंय पण गाण्यात 'जो' आहे बहुधा.)

जिप्सी, शाब्बास! Happy

श्रमातेला देखिल दोन शाब्बासक्या! दुसरही उत्तर बरोबरच वाटतंय.

कोडी मस्त आणि कठीणही होती स्वप्ना. Happy

कोडं क्र ०५/६२:

मिताली वैतागून गेली होती. आपल्या आयुष्याचा एव्हढा महत्त्वाचा निर्णय दुसर्या लोकांवर अवलंबून असावा ह्याचा तिला अतिशय राग आलेला होता. पण करते काय? सगळ्या गोष्टींचा गुंता झालेला होता. राजकारण आणि ते पण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे.
कोण कुठला अफगाणीस्तानमधला दिलावर खान. त्याच्या गावात २ वर्ष पाउस पडलेला नाही आणि गुरांना खायला वैरण नाही. त्याची सोय करा मगच मी ओसामा कुठे आहे ते सांगतो हा त्याचा पवित्रा.
बिहारमधून गुरांच्या वैरणीची सोय झाली असती पण त्याची व्यवस्था बघणारा अधिकारी जागेवर असेल तर ना. आज युपीत तर उद्या एकदम तामिळनाडूमध्ये अशी त्याची गत. हा सत्यजित कदम म्हणजे ईदका चांद झाला होता.
आणि त्याच्याशी संपर्क होऊन हा प्रश्न सुटल्याशिवाय मी लग्नाचा विचारही करणार नाही असं तिला Edward Choi ने निक्षून सांगितलं होतं. त्याच्या करियरचा प्रश्न होता.

मितालीला तिच्या मैत्रिणीने फोन केला तेव्हा ती आपला हाल-ए-दिल कसा व्यक्त करेल?

उत्तर:
ये दिल ना होता बेचारा कदम ना होते आवारा
तो खूबसुरत कोई अपना हमसफर होता

श्रध्दा, गाण्यात 'जो' आहे हे मला माहित नव्हतं. तसं असेल तर हे कोडं बरोबर नाही.
धन्स मामी Happy

हो, गाण्यात 'जो' आहे. नंतर लिरिक्स बघितले.
'जर' कुणी खूबसूरत हमसफर असता तर दिल बेचारा नसता आणि कदम आवारा नसते, असं आहे ते. त्यामुळे 'जो'!

ओह, थॅन्क्स श्रध्दा. मी आपलं दिल बेचारा नसता आणि कदम आवारा नसते तर कुणी खूबसूरत हमसफर असता असा अर्थ काढला होता आजवर.

ह्यावरून आठवलं. ९२.७ वर अन्नू कपूरचा एक प्रोग्रॅम लागतो रात्री ९ ते ११. १-२ दिवसांपूर्वी त्याने एक किस्सा सांगितला. 'मेरा जीवन कोरा कागज कोराही रह गया. जो लिखा था आसूओंके संग बह गया' ह्या ओळीबद्दल. एकदा राजस्थानमध्ये एका माणसाने त्याला विचारलं होतं की "कागदावर काही लिहिलं असेल तर तो कागद कोरा कसा? आणि काही लिहिलं नव्हतं तर अश्रूंसोबत काय वाहून गेलं? तेव्हढं जरा समजावून सांगा' Happy

जिप्सी, आर्या धन्स Happy

स्वप्ना, त्या तो च्या ऐवजी जो आहे म्हणून अर्थामध्ये काही बदल होत नाहीये. डोन्टच वरी.

कोडं एकदम कडक होतं. लै भारी, लै भारी. Happy

कोडं क्र ०५/६४:

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ भारतात येऊ इच्छितात हे कळल्यावर मनमोहन सिंगांनी नाक मुरडलं. 'देहाती औरत' प्रकरणानंतर त्यांचं तोंडही पहायची त्यांची इच्छा नव्हती. पण परराष्ट्र खात्यातल्या महत्त्वाच्या लोकांनी एक प्लान त्यांना समजावून सांगितला आणि मनमोहनना कसंबसं राजी केलं.

नवाझ शरीफ तडक पाकिस्तानातून भारतात आले नाहीत. तर जगभरच्या नेत्यांना भेटून मग घरी जायच्या आधी भारतात आले. जगभर फिरल्याने त्यांना सॉल्लीड जेटलॅग झाला होता. नक्की कुठला दिवस आहे, काय वेळ आहे हे त्यांना अजिबात ठाऊक नव्हतं. विमानतळावर आल्या आल्या ते तडक मनमोहनना भेटायला गेले.

'गुड मॉर्निंग, मनमोहनसिंगजी.' ते म्हणाले. पण मनमोहनसिंग अळिमिळी गुपचिळी. शरीफ चपापले. इथे दुपार झाली का काय असं त्यांना वाटलं. 'गुड आफ्टरनून' ते परत म्हणाले. तरी मनमोहनसिंग गप्पच.

आता मात्र शरीफना काय करावं ते कळेना. 'काय आहे. जेटलॅग झालाय ना. नक्की किती वाजलेत तेच माहित नाहिये. गुड इव्हिनिंग , मनमोहनसिंगजी.' ते म्हणाले. पण काही उपयोग नाही.

शरीफ कुठलं गाणं म्हणतील?

क्लू: हे गाणं एक ड्युएट आहे. पण हिरविणीच्या तोंडच्या ओळी अपेक्षित आहेत
(शरीफने देहाती औरत म्हटलं असो वा नसो. निदान कोड्यात तरी त्याच्या तोंडी हिरविणीच्या ओळी देऊन वचपा काढलाय मी.)

कोडं क्र ०५/६४:>>>

देखो रुठाना करो, बात नजरोंकी सुनो
हम ना बोलेंगे कभी, तुम सतायाना करो...

बहूतेक......

०५/०६४ आए हैं दूर से मिलने हुजूर से
कहिए जो कुछ तो कहिए
ऐसे भी चुप ना रहिए दिन है के रात है

याच गाण्यावर मी टाकलेलं कोडं http://www.maayboli.com/node/35529?page=5

कोडं क्र ०५/६४:

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ भारतात येऊ इच्छितात हे कळल्यावर मनमोहन सिंगांनी नाक मुरडलं. 'देहाती औरत' प्रकरणानंतर त्यांचं तोंडही पहायची त्यांची इच्छा नव्हती. पण परराष्ट्र खात्यातल्या महत्त्वाच्या लोकांनी एक प्लान त्यांना समजावून सांगितला आणि मनमोहनना कसंबसं राजी केलं.

नवाझ शरीफ तडक पाकिस्तानातून भारतात आले नाहीत. तर जगभरच्या नेत्यांना भेटून मग घरी जायच्या आधी भारतात आले. जगभर फिरल्याने त्यांना सॉल्लीड जेटलॅग झाला होता. नक्की कुठला दिवस आहे, काय वेळ आहे हे त्यांना अजिबात ठाऊक नव्हतं. विमानतळावर आल्या आल्या ते तडक मनमोहनना भेटायला गेले.

'गुड मॉर्निंग, मनमोहनसिंगजी.' ते म्हणाले. पण मनमोहनसिंग अळिमिळी गुपचिळी. शरीफ चपापले. इथे दुपार झाली का काय असं त्यांना वाटलं. 'गुड आफ्टरनून' ते परत म्हणाले. तरी मनमोहनसिंग गप्पच.

आता मात्र शरीफना काय करावं ते कळेना. 'काय आहे. जेटलॅग झालाय ना. नक्की किती वाजलेत तेच माहित नाहिये. गुड इव्हिनिंग , मनमोहनसिंगजी.' ते म्हणाले. पण काही उपयोग नाही.

शरीफ कुठलं गाणं म्हणतील?

क्लू: हे गाणं एक ड्युएट आहे. पण हिरविणीच्या तोंडच्या ओळी अपेक्षित आहेत

उत्तरः
आए हैं दूर से मिलने हुजूर से
कहिए जो कुछ तो कहिए
ऐसे भी चुप ना रहिए
दिन है के रात है

कोडं क्र ०५/६५:

'काय करतो ग तुझा नवरा?' जयाला तिच्या मैत्रिणींनी विचारलं तेव्हा ती लाजलीच.
'अग सांग की'
'त्याच्या कुटुंबाचा मिठाईचा व्यवसाय आहे. उत्तर भारतात त्यांची मिठायांच्या दुकानांची साखळी आहे'
'अय्या, म्हणजे लग्नानंतर तुझा एक हात दुधात, एक तुपात' अनघाने टाळीसाठी हात पुढे केला.
'तर काय, बघ हं आम्हाला स्वस्तात द्यायची मिठाई - मावा पेढे, खव्याचे मोदक, बालूशाही, जिलबी वगैरे' मायाने टाळी देत म्हटलं.
यथावकाश जयाचं लग्न झालं. तिच्या नवर्‍याला खगोलशास्त्राची फार आवड. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तो तिला वांगणीला आकाशदर्शनाच्या कार्यक्रमाला घेऊन गेला.
'कसला पोळीसारखा गोल चंद्र आहे' पांढर्‍याधोप चंद्राकडे बघत जया हरखून म्हणाली.
ह्यावर तिच्या नवर्‍याने चंद्राचं वर्णन केलं पण खास त्याच्या स्टाईलने. गाणं ओळखा बघू.

कोडं क्र ०५/६६:

'अजय, ऐकलंस का? इनॉर्बिट मॉलमध्ये रविवारी ओरिगामी स्पर्धा आहे. आता दाखवू या त्या सुनीलला कोण बाप आहे ते.' मुकुल तावातावाने म्हणाला.
'नक्कीच. हम तो कबसे तय्यार है'

रविवारी सकाळी स्पर्धा सुरु झाली तेव्हा सुनीलने आपल्या सगळ्या मित्रांना बोलावलं होतं. आणि ते जोरजोरात त्याला चिअर करत होते. गाणी म्हणत होते, नाचत होते, शिट्ट्या वाजवत होते. सगळे स्पर्धक अगदी वैतागून गेले होते. शेवटी सेक्युरिटीच्या लोकांनी त्यांना गप्प केलं.

१५ घडया घालून एखादा पक्षी करायचा ही स्पर्धा होती. अजय आणि मुकुल मन लावून हंस आणि मोर बनवत होते. त्यांचं काम होतही आलं होतं.

पण इथे सुनील मात्र अडला होता. त्याच्या १२ घड्या झाल्या होत्या आणी कागद फाटला. शेवटचं एक मिनिट उरलं होतं. दुसरा कागद घेऊन त्याने १४ घड्या घातल्या आणि बेल वाजली. परिक्षकांनी त्याला त्याचं काम ठेवायला लावलं.

ते बघून मुकुल अजयला काय म्हणाला?

गाणं गोल्डन एरातलं नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. Happy

खोया खोया चांद, खुला आसमान
खोया = मावा

मामी Proud तुला माव्याचे मोदक ताट भरून

मामे, त्यातले अर्धे मोदक इथे पाठवून दे. >>> नक्की देईन पण लग्नाच्या पहिल्या वाढदिवासाकरता बायकोला घेऊन वांगणीला आकाशदर्शनाला जाणार नाही असं प्रॉमिस कर पाहू. Happy

कोडं क्र ०५/६६:

'अजय, ऐकलंस का? इनॉर्बिट मॉलमध्ये रविवारी ओरिगामी स्पर्धा आहे. आता दाखवू या त्या सुनीलला कोण बाप आहे ते.' मुकुल तावातावाने म्हणाला.
'नक्कीच. हम तो कबसे तय्यार है'

रविवारी सकाळी स्पर्धा सुरु झाली तेव्हा सुनीलने आपल्या सगळ्या मित्रांना बोलावलं होतं. आणि ते जोरजोरात त्याला चिअर करत होते. गाणी म्हणत होते, नाचत होते, शिट्ट्या वाजवत होते. सगळे स्पर्धक अगदी वैतागून गेले होते. शेवटी सेक्युरिटीच्या लोकांनी त्यांना गप्प केलं.

१५ घडया घालून एखादा पक्षी करायचा ही स्पर्धा होती. अजय आणि मुकुल मन लावून हंस आणि मोर बनवत होते. त्यांचं काम होतही आलं होतं.

पण इथे सुनील मात्र अडला होता. त्याच्या १२ घड्या झाल्या होत्या आणी कागद फाटला. शेवटचं एक मिनिट उरलं होतं. दुसरा कागद घेऊन त्याने १४ घड्या घातल्या आणि बेल वाजली. परिक्षकांनी त्याला त्याचं काम ठेवायला लावलं.

ते बघून मुकुल अजयला काय म्हणाला?

>>> बस एक घडी वालं कायबाय असणार.

स्वप्ना, अजिबातच डोके चालेनासे झालेय. हल्ली हिंदी गाणी कमीच ऐकतोय. पोर्तुगीज गाण्यांची कोडी घालू काय ?

खुप गाणी आपल्या गाण्यांच्या चालीवरच असतात Happy

०५/६६:
'गजर'ने किया है इशारा
'घडी'भरका है खेल सारा
तमाशा(??) बन जायेंगे खुद तमाशा,
बदल जायेगा ये नजारा... Happy

हे का?

कोडं क्र ०५/६६:

'अजय, ऐकलंस का? इनॉर्बिट मॉलमध्ये रविवारी ओरिगामी स्पर्धा आहे. आता दाखवू या त्या सुनीलला कोण बाप आहे ते.' मुकुल तावातावाने म्हणाला.
'नक्कीच. हम तो कबसे तय्यार है'

रविवारी सकाळी स्पर्धा सुरु झाली तेव्हा सुनीलने आपल्या सगळ्या मित्रांना बोलावलं होतं. आणि ते जोरजोरात त्याला चिअर करत होते. गाणी म्हणत होते, नाचत होते, शिट्ट्या वाजवत होते. सगळे स्पर्धक अगदी वैतागून गेले होते. शेवटी सेक्युरिटीच्या लोकांनी त्यांना गप्प केलं.

१५ घडया घालून एखादा पक्षी करायचा ही स्पर्धा होती. अजय आणि मुकुल मन लावून हंस आणि मोर बनवत होते. त्यांचं काम होतही आलं होतं.

पण इथे सुनील मात्र अडला होता. त्याच्या १२ घड्या झाल्या होत्या आणी कागद फाटला. शेवटचं एक मिनिट उरलं होतं. दुसरा कागद घेऊन त्याने १४ घड्या घातल्या आणि बेल वाजली. परिक्षकांनी त्याला त्याचं काम ठेवायला लावलं.

ते बघून मुकुल अजयला काय म्हणाला?

उत्तरः
'गजर'ने किया है इशारा
'घडी'भरका है खेल सारा
तमाशा ये बन जायेंगे खुद तमाशा,
बदल जायेगा ये नजारा

Pages