..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव तुम्ही देखिल विशिष्ट आणि हुशार जमातीतले दिसता! >> नाही ब्वा ! पण कुठली जमात माझ्या आवडीचे काय अप्रतिम पदार्थ करते याची नोंद असते मेंदूत. Happy

लोक्स, माझे कोडे ओळखा की.

कोडं क्र. ०५/८०:

'ए, आली बघ तुझी हिरॉइन'. मित्राचं बोलणं ऐकून K Onler Kom ने मागे वळून पाहिलं. तिला बघून त्याचा चेहेरा फुलला.
'यार, आज तरी बोल तिच्याशी' मित्राने ढोसलं तसा Onler धीर एकवटून पुढे गेला.
'हॅलो, मी Onler' किंचित हसून तो म्हणाला.
'हाय' ती म्हणाली. त्याला आपलं नाव ठाऊक आहे हे तिला माहित होतं. रोज संध्याकाळी घरी जाताना त्याला आणि त्याच्या मित्रांना मैदानात फुटबॉल खेळताना ती पहायची. तो आपल्याकडे पहात असतो हेही तिने हेरलं होतं.
'माझ्या उद्या महत्त्वाचा सामना आहे. येशील तू बघायला?'
'जमलं तर नक्की येईन' ती म्हणाली.
'ओह सह्ही! मग तर मी लकी ठरेन' तो चाचरत म्हणाला.
"तुझ्या जर्सीवरचा नंबर पहाता तुला नक्कीच लकची गरज आहे Onler' असं म्हणून ती खळखळून हसली.
'अंहं. हा नंबर माझ्यासाठी लकी आहे' असं म्हणून Onler ने एक हिन्दी गाणं तिला म्हणून दाखवलं आणि ती चक्क लाजली.

ओळखा बरं गाणं.

क्लू: हे गाणं गोल्डन एरातलं नाही.

कोडं क्र. ०५/८१:

'तुला माहित आहे ना सोनया, की तू हे सगळं सांगायला नकार देऊ शकतेस. आम्ही तुला फोर्स करू शकत नाही. पण तू सगळं सांगितलंस तर मात्र तुझ्या जीवाला धोका आहे'. अभिजित म्हणाला.
'माहित आहे मला. पण माझ्या वडिलांबद्दल, त्यांच्या ड्रग्जच्या व्यवसायाबद्दल मला जेव्हढी म्हणून माहिती आहे ती मी सगळी तुम्हाला देणार आहे. हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. लवकरात लवकर.'
'बरं सांग, आम्ही ऐकतोय'.
३ तास निघून गेले. अभिजितने बरोबरच्या सहकार्‍यांना थोडा वेळ आराम करून यायला सांगितलं. आणि सोनयाला म्हणाला 'रात्रीचा १ वाजलाय. तू पण थोडी विश्रांती घे आता. ह्यापुढले काही दिवस फार गडबडीचे असणार आहेत.'
'नाही अभिजित. मला आता थांबायचं नाही. माझ्या वडलांबद्दल एकदाचं सगळं सांगून टाकलं की मनावरचं ओझं कमी होईल. आत्ता तर एक वाजतोय."

हेच तिला गाण्यात कसं सांगता आलं असतं?

क्लू: हे गाणं गोल्डन एरातलं नाही.

स्निग्धा नाही.

०५/७७:
क्लू १: तो किडा अगदीच लहान असतो....चिलटच म्हणा ना
क्लू २: किड्याचे चित्र बघत असतानाच लाईट जातात आणि सर्व जण मेणबत्त्या घेऊन शोधू लागतात त्या किड्याला

आता आलंच पाहिजे.

स्वप्ना.. ०५/८०

तेरा साथ है तो मुझे क्या कमी है
अंधेरों से भी मिल रही रोशनी है

किंवा "छोडेंगे ना हम तेरा साथ, ओ साथी मरते दम तक"?

अर्थात आकड्याच्या पलिकडे गाणं कुठेच जुळत नाहीये. Uhoh

कोडं क्र. ०५/८१:

'तुला माहित आहे ना सोनया, की तू हे सगळं सांगायला नकार देऊ शकतेस. आम्ही तुला फोर्स करू शकत नाही. पण तू सगळं सांगितलंस तर मात्र तुझ्या जीवाला धोका आहे'. अभिजित म्हणाला.
'माहित आहे मला. पण माझ्या वडिलांबद्दल, त्यांच्या ड्रग्जच्या व्यवसायाबद्दल मला जेव्हढी म्हणून माहिती आहे ती मी सगळी तुम्हाला देणार आहे. हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. लवकरात लवकर.'
'बरं सांग, आम्ही ऐकतोय'.
३ तास निघून गेले. अभिजितने बरोबरच्या सहकार्‍यांना थोडा वेळ आराम करून यायला सांगितलं. आणि सोनयाला म्हणाला 'रात्रीचा १ वाजलाय. तू पण थोडी विश्रांती घे आता. ह्यापुढले काही दिवस फार गडबडीचे असणार आहेत.'
'नाही अभिजित. मला आता थांबायचं नाही. माझ्या वडलांबद्दल एकदाचं सगळं सांगून टाकलं की मनावरचं ओझं कमी होईल. आत्ता तर एक वाजतोय."

हेच तिला गाण्यात कसं सांगता आलं असतं?

क्लू: हे गाणं गोल्डन एरातलं नाही.

उत्तरः
रात बाकी बात बाकी
होना है जो हो जाने दो

बात 'बा' की - वडिलांची गोष्ट

माधव, तुला पाकातले चिरोटे डबाभरुन

कोडं क्र. ०५/८२:

तिचे दोन्ही भाऊ ऑस्ट्रेलीयन क्रिकेट टीममध्ये खेळत होते. आणि ती अख्खी टीम कोणी 'अरे' म्हणायच्या आधीच 'कारे' म्हणणार्यातली. पण तो तरुण मात्र तिच्यावर बेहद्द खुश होता. "लग्न करायचं तर हिच्याशीच मग तिचे भाऊ काही का करोत" असं त्याने मुळी ठरवूनच टाकलं होतं. खूप खटपटी लटपटी करून त्याने तिचा नंबर मिळवला. एके रात्री हिम्मत करून तिला फोन लावला आणि गोल्डन एरामधलं एक मस्त गाणं असं म्हटलं की पहिल्याच फटक्यात तिने 'हो' म्हटलं. कोणतं असेल ते गीत?

कोडं क्र. ०५/८३:

'अरे, मला सांगितल्याशिवाय ती कुठे जात नाही. अवनीला पण काही माहीत नाही म्हणतोस तू. मला तर काही सुचेनासंच झालंय बघ' पंकज हवालदिल झाला होता.
'हे बघ, तू फोन ठेव आणि स्वस्थ राहा. मी पोचतोय तिथे आत्ता. तेव्हढ्यात येईल ती घरी' सुहास, त्याचा मोठा भाऊ त्याला समजावत म्हणाला.
'सुहास, काय झालंय रे?' त्याच्या बायकोने अवनीने घाबरून विचारलं.
'अग, अभिका घरात नाहीये. कुठे जातेय सांगून गेली नाहीये आणि तिचा फोन पण लागत नाहीये'.
'मी पण येते तुझ्याबरोबर. मला घरात चैन पडायचं नाही.' अवनी आणि अभिका खास मैत्रिणी झाल्या होत्या.
अर्ध्या तासात दोघे पंकजकडे पोचले. तोपर्यंत परिस्थितीत काही बदल झाला नव्हता. फक्त पंकजने तिच्या मित्र-मैत्रिणींना फोन करायला सुरुवात केली होती. अभिकाचं फ्रेंड सर्कल मोठं होतं. सुहास आणि अवनी पण त्याच कामात लागले. तिथे काही पत्ता लागेना तसं अवनी शेजारच्या मॉलमध्ये जाऊन आली. काही परिचितांना फोन केले. शेवटी अगदीच निरुपाय होऊन परिसरातल्या हॉस्पिटलमध्ये फोन केले. पण कुठे काही हाती लागलं नाही.

सुहास आणि पंकज पोलीस स्टेशनवर निघाले तेव्हा अवनी घरीच थांबली. न जाणो अभिका घरी आली तर. खिडकीजवळ उभं राहून राहून तिचे पाय दुखायला लागले. सहज ओठांवर गाण्याची एक ओळ आली आणि तिच्या लक्षात आलं की ती ओळ तिच्या परिस्थितीला चपखल बसते.

ओळखा गोल्डन एरातल्या गाण्याची ती ओळ.

०५/०८० एक तेरा साथ हमको दो जहां से प्यारा है
तू है तो हर सहारा है

चुकलंय . तो एम सी मेरी कोम चा नवरा.

बात 'बा' की - वडिलांची गोष्ट >>> हे सह्ही होतं, स्वप्ना.

या धाग्यावर सगळ्यात जास्त कोडी स्वप्नानंच विचारली आहेत आणि तिच्या सिच्युएशन्सही मस्त असतात. स्वप्नाकरता एजोटापा. आणि स्वप्नाला एक इमॅजिकाचं तिकीट!

कोडं क्र. ०५/८३:

'अरे, मला सांगितल्याशिवाय ती कुठे जात नाही. अवनीला पण काही माहीत नाही म्हणतोस तू. मला तर काही सुचेनासंच झालंय बघ' पंकज हवालदिल झाला होता.
'हे बघ, तू फोन ठेव आणि स्वस्थ राहा. मी पोचतोय तिथे आत्ता. तेव्हढ्यात येईल ती घरी' सुहास, त्याचा मोठा भाऊ त्याला समजावत म्हणाला.
'सुहास, काय झालंय रे?' त्याच्या बायकोने अवनीने घाबरून विचारलं.
'अग, अभिका घरात नाहीये. कुठे जातेय सांगून गेली नाहीये आणि तिचा फोन पण लागत नाहीये'.
'मी पण येते तुझ्याबरोबर. मला घरात चैन पडायचं नाही.' अवनी आणि अभिका खास मैत्रिणी झाल्या होत्या.
अर्ध्या तासात दोघे पंकजकडे पोचले. तोपर्यंत परिस्थितीत काही बदल झाला नव्हता. फक्त पंकजने तिच्या मित्र-मैत्रिणींना फोन करायला सुरुवात केली होती. अभिकाचं फ्रेंड सर्कल मोठं होतं. सुहास आणि अवनी पण त्याच कामात लागले. तिथे काही पत्ता लागेना तसं अवनी शेजारच्या मॉलमध्ये जाऊन आली. काही परिचितांना फोन केले. शेवटी अगदीच निरुपाय होऊन परिसरातल्या हॉस्पिटलमध्ये फोन केले. पण कुठे काही हाती लागलं नाही.

सुहास आणि पंकज पोलीस स्टेशनवर निघाले तेव्हा अवनी घरीच थांबली. न जाणो अभिका घरी आली तर. खिडकीजवळ उभं राहून राहून तिचे पाय दुखायला लागले. सहज ओठांवर गाण्याची एक ओळ आली आणि तिच्या लक्षात आलं की ती ओळ तिच्या परिस्थितीला चपखल बसते.

ओळखा गोल्डन एरातल्या गाण्याची ती ओळ.

उत्तरः
'जाऊ' कहा बता ए दिल

कोडं क्र. ०५/८०:

'ए, आली बघ तुझी हिरॉइन'. मित्राचं बोलणं ऐकून K Onler Kom ने मागे वळून पाहिलं. तिला बघून त्याचा चेहेरा फुलला.
'यार, आज तरी बोल तिच्याशी' मित्राने ढोसलं तसा Onler धीर एकवटून पुढे गेला.
'हॅलो, मी Onler' किंचित हसून तो म्हणाला.
'हाय' ती म्हणाली. त्याला आपलं नाव ठाऊक आहे हे तिला माहित होतं. रोज संध्याकाळी घरी जाताना त्याला आणि त्याच्या मित्रांना मैदानात फुटबॉल खेळताना ती पहायची. तो आपल्याकडे पहात असतो हेही तिने हेरलं होतं.
'माझ्या उद्या महत्त्वाचा सामना आहे. येशील तू बघायला?'
'जमलं तर नक्की येईन' ती म्हणाली.
'ओह सह्ही! मग तर मी लकी ठरेन' तो चाचरत म्हणाला.
"तुझ्या जर्सीवरचा नंबर पहाता तुला नक्कीच लकची गरज आहे Onler' असं म्हणून ती खळखळून हसली.
'अंहं. हा नंबर माझ्यासाठी लकी आहे' असं म्हणून Onler ने एक हिन्दी गाणं तिला म्हणून दाखवलं आणि ती चक्क लाजली.

ओळखा बरं गाणं.

क्लू: हे गाणं गोल्डन एरातलं नाही.

माधव्, स्निग्धा, तुम्हा दोघांची गाणी बसली असती पण माझ्या मनात होतं 'मै तेरा हू, तू मेरी है सनम, आजा मेरी बाहोंमे आ'. Happy

K Onler Kom हा मेरी कोमचा नवरा आहे. १३ नंबर अनलकी मानतात.

कोडं क्र. ०५/८४:

'ही घे डीव्हीडी. मागच्या आठवड्यापासून डोकं खात होतास ना माझं. आता बघ ह्या विकेन्डला. मला माहित आहे तुला किमी काटकरला बघायचंय.' प्रमोद म्हणाला.
'मग काय गोविंदाला बघू? ही घे तुझी डीव्हीडी. आणि काय रे तू काय त्या करण नाथला बघणार आहेस का? तू पण मनिषासाठीच धोशा लावला होतास ना ह्या चित्रपटाचा'. विनोदने पण ऐकून घेतलं नाही.
'बरं बरं, फिट्टंफाट झाली म्हण ना. चल येतो'. प्रमोदने पाणी ओतलं.

ह्या प्रसंगात प्रमोदच्या तोंडी गोल्डन एरातलं एक गाणं छान शोभलं असतं.

Pages