आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
०५-५३: 'बडा' नटखट (नट - दाणे,
०५-५३:
'बडा' नटखट (नट - दाणे, खट - चिंचेचा कोळ... लोल) है रे किशन कन्हैया
का करे यशोदा मैया
- अमर प्रेम
श्र, तुला यशोताईंचे एक डझन
श्र, तुला यशोताईंचे एक डझन बटाटेवडे विथ नटखट चटण्या! आणि एक सलाम.
कोडं क्र. ०५/५३ :
नवरा गेल्यापासून बटाटेवड्यांची टपरी चालवून येशूताईंनी आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं होतं. पोरगंही लहानपासून आईला थोडीफार मदत करायचं. आता हाताशी आलेला मुलगा आपल्या व्यवसायातच आपल्याला व्यवस्थित मदत करू लागेल असा विचार करून येशूताईंनी त्याचं ट्रेनिंग सुरू केलं.
आईच्या हाताखाली आठ दिवस बटाटेवड्यांचं सारण शिकून झाल्यावर आज एकट्यानंच सगळं सारण बनवण्याचा किसनचा पहिलाच दिवस होता. पण जरा झोलच झाला .... लसणीच्या चटणीकरता लागणारे शेंगदाणे आणि आंबटगोड चटणीकरता लागणारी चिंच या दोन्ही गोष्टी त्यानं चुकून बटाट्याच्या भाजीतच घालून टाकल्या.
गिर्हाईकांनी आज वड्याला नाकं का मुरडली हे येशुताईंना स्वतः एक वडा खाल्यावर कळलं. मग टपरी बंद करून वड्यांच तसंच उरलेलं सामान घेऊन त्या घरी आल्या. आल्यावर एक वडा किसनला देऊन त्यांनी त्यांची तक्रार सांगितली. कोणतं गाणं म्हणून?
उत्तर :
बडा (वडा) नटखट (नट = दाणे, खट = खट्टा = चिंच) है रे किशन कन्हैया
का करे यशोदा मैया
श्रद्धा, मामी
श्रद्धा, मामी ____________/\_______________
५० आणि ५१ साठी मामींना
५० आणि ५१ साठी मामींना वाफाळलेला भात, आंब्याचं झणझणीत लोणचं, तळलेला पापड आणि कोथिंबीर वड्या घातलेली कढी
काय मामी, कसं आहे बक्षीस?
५२ सोडवायचा प्रयत्न केला नाही
५२ सोडवायचा प्रयत्न केला नाही कोणीच. मीच उत्तर सांगते.
कोडं क्र. ०५/५२:
'आई ग' घरी आल्या आल्या चित्रा दाणकन सोफ्यावर बसली आणि चप्पल काढून पाय चोळू लागली.
'काय ग चित्रा, काय झालं?' तिच्या आईने बाहेर येत विचारलं.
'अग, बिनडोक बीएमसीवाल्यांनी सगळ्या टाईल्स उखडून ठेवल्यात ४ दिवसांपासून. धडपडले मी. पाय मुरगाळलाय बहुतेक. आई ग'
'तरी सांगत होते मी. एव्हढ्या हाय हिल्सच्या चपला घालू नकोस म्हणून. पण माझं ऐकशील तर ना'
चांगली ४ दिवस ट्रीटमेन्ट घेतल्यावर आत्ता कुठे चित्राचा पाय बरा होत होता. तेव्हढ्यात संध्याकाळी नागपूरहून तिची मामेबहीण नमिता आली.
'ए काय ग चित्रा, मी एव्हढी आले आणि तू धडपडून घेतलंस. आता काय घरात बसून रहायचं?' आल्या आल्या तिने तोफ डागली.
'मला काय हौस आहे घरी बसायची? पण काय करणार? पाय वाईट मुरगाळलाय. अजून २ दिवस तरी बाहेर जायची परवानगी नाही डॉक्टरांची.' ४ दिवस घरी बसायला लागल्याने चित्रा पण वैतागली होती.
'ते काही नाही. मी तरी आज जेवल्यावर नाईट वॉकला जाणार.' नमिता म्हणाली.
ह्यावर तिला परावृत्त करण्यासाठी चित्राने काय गाणं म्हटलं असेल?
उत्तरः
तू ना जाने आसपास है खुदा
मामींना वाफाळलेला भात,
मामींना वाफाळलेला भात, आंब्याचं झणझणीत लोणचं, तळलेला पापड आणि कोथिंबीर वड्या घातलेली कढी >>> अरे वा, धन्यवाद धन्यवाद. मस्तय बक्षीस.
कोडं क्र. ०५/५३: 'काय ग नेहा,
कोडं क्र. ०५/५३:
'काय ग नेहा, किती वेळ थांबलोय मी chat वर? ९:३० म्हणाली होतीस ना?' मयुरेश वैतागला होता.
'सॉरी मयू, अरे मी आणि आई सानेंकडे गेलो होतो त्यांच्या नातीच्या बारश्याला. मी नवी सून म्हणून खास आमंत्रण होतं.' नेहाचा चेहेरा पडला होता. मयुरेशला हसू आवरत नव्हतं. पण तरी रागावण्याचा अभिनय चालू ठेवत तो म्हणाला 'सगळ्यांसाठी वेळ आहे तुझ्याकडे आणि नवर्यासाठी नाही.'
'सॉरी म्हटलं ना रे. असं काय करतोस?' नेहा रडवेली झाली होती.
'अग, अग. मी गम्मत करत होतो तुझी. सॉरी यार' आता ही रडते की काय अशी भीती वाटून मयुरेश घाईघाईने म्हणाला.
'कसली गम्मत. एक तर आपलं लग्न झाल्यावर लगेच २ आठवड्यात तुला ऑनसाईट जावं लागलं. त्यातून माझा पासपोर्ट नाही. आठवड्यातून ३ वेळा chat करायचं." नेहा कायकाय बोलत होती. पण मयुरेशचं लक्षच नव्हतं. तो तिच्याकडे पहात राहिला. किती सुंदर दिसत होती ती बोलताना. त्याला दोघांच्यातलं अंतर आणखी प्रकर्षाने जाणवलं. ती इथे असती तर?
मनातली गोष्ट हिंदी गाण्याचा आधार घेऊन त्याने नेहाला कशी सांगितली?
दूर रह कर ना करो बात, करीब आ
दूर रह कर ना करो बात, करीब आ जाओ?
माधवला गरमागरम भाजलेली,
माधवला गरमागरम भाजलेली, लिंबू, तिखट, मीठ लावलेली कणसं आणि आलं घातलेला च्याय गरम!
कोडं क्र. ०५/५३:
'काय ग नेहा, किती वेळ थांबलोय मी chat वर? ९:३० म्हणाली होतीस ना?' मयुरेश वैतागला होता.
'सॉरी मयू, अरे मी आणि आई सानेंकडे गेलो होतो त्यांच्या नातीच्या बारश्याला. मी नवी सून म्हणून खास आमंत्रण होतं.' नेहाचा चेहेरा पडला होता. मयुरेशला हसू आवरत नव्हतं. पण तरी रागावण्याचा अभिनय चालू ठेवत तो म्हणाला 'सगळ्यांसाठी वेळ आहे तुझ्याकडे आणि नवर्यासाठी नाही.'
'सॉरी म्हटलं ना रे. असं काय करतोस?' नेहा रडवेली झाली होती.
'अग, अग. मी गम्मत करत होतो तुझी. सॉरी यार' आता ही रडते की काय अशी भीती वाटून मयुरेश घाईघाईने म्हणाला.
'कसली गम्मत. एक तर आपलं लग्न झाल्यावर लगेच २ आठवड्यात तुला ऑनसाईट जावं लागलं. त्यातून माझा पासपोर्ट नाही. आठवड्यातून ३ वेळा chat करायचं." नेहा कायकाय बोलत होती. पण मयुरेशचं लक्षच नव्हतं. तो तिच्याकडे पहात राहिला. किती सुंदर दिसत होती ती बोलताना. त्याला दोघांच्यातलं अंतर आणखी प्रकर्षाने जाणवलं. ती इथे असती तर?
मनातली गोष्ट हिंदी गाण्याचा आधार घेऊन त्याने नेहाला कशी सांगितली?
उत्तरः
दूर रह कर ना करो बात, करीब आ जाओ
हायला, बक्षीस लय भारी आहे.
हायला, बक्षीस लय भारी आहे. ठांकू!
आप कोडं क्र ०५/५४ किती
आप कोडं क्र ०५/५४
किती मनापासून तिनं त्याच्यावर प्रेम केलं होतं. पण तो तिला कायमच आपली मैत्रिण मानत आला, त्यापेक्षा जास्त काही नाही. पुढे त्याचं एका वेगळ्या जातीतल्या मुलीशी प्रेम जमलं पण त्या मुलीच्या समाजाला हे अजिबात मान्य नव्हतं. शेवटी दोघे पळून आले आणि काही दिवसांकरता तरी कुठेतरी आश्रय घ्यावा म्हणून नेमके तिच्याकडेच मदत मागितली. आपल्याबद्दल ती कोणाला सांगणार नाही याची त्याला खात्री होतीच.
दोघे जण कॅप्सुलमध्ये बसून तिच्या हृदयात जाऊन राहू लागले.
त्याच्या भावी बायकोच्या समाजातले लोक काही गप्प बसले नव्ह्ते. त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपाशी जाऊन, त्यांना भेटून 'आता आमचं काही म्हणणं नाही. दोघांनी आमच्यापाशी यावं. आम्ही स्वत:हून त्यांचं लग्न लावून देऊ.' वगैरे सांगत होते पण ते किती वरवरचं आहे हे दिसतंच होतं. त्यांच्या या सांगण्याला भुलून काही दिवसांनी त्यानं बाहेर येण्याचा विचार केला. मात्र तिला ते लोक नक्की दगा देणार आहेत हे कळत होतं म्हणून तिनं त्यांना एक गाणं म्हणून बाहेर येण्यापासून परावृत्त केलं....
०५/०५४: हमारे दिलसे ना जाना
०५/०५४:
हमारे दिलसे ना जाना धोखा ना खाना दुनिया बडी बेइमान
०५/५४: तुम जो चले गये तो,
०५/५४:
तुम जो चले गये तो, होगी बडी खराबी..
तुम्हे दिल में बंद कर लूं दरियामें फेंक दूं चाबी..
(आस पास)
माधवचे बरोबर आहे बहुधा. ते गाणं मला माहीत नाहीये.
माधवला खमंग थालीपीठं आणि चहा.
माधवला खमंग थालीपीठं आणि चहा. दोन चहा पिऊन अॅसिडीटी तर नाही ना होणार?
आप कोडं क्र ०५/५४
किती मनापासून तिनं त्याच्यावर प्रेम केलं होतं. पण तो तिला कायमच आपली मैत्रिण मानत आला, त्यापेक्षा जास्त काही नाही. पुढे त्याचं एका वेगळ्या जातीतल्या मुलीशी प्रेम जमलं पण त्या मुलीच्या समाजाला हे अजिबात मान्य नव्हतं. शेवटी दोघे पळून आले आणि काही दिवसांकरता तरी कुठेतरी आश्रय घ्यावा म्हणून नेमके तिच्याकडेच मदत मागितली. आपल्याबद्दल ती कोणाला सांगणार नाही याची त्याला खात्री होतीच.
दोघे जण कॅप्सुलमध्ये बसून तिच्या हृदयात जाऊन राहू लागले.
त्याच्या भावी बायकोच्या समाजातले लोक काही गप्प बसले नव्ह्ते. त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपाशी जाऊन, त्यांना भेटून 'आता आमचं काही म्हणणं नाही. दोघांनी आमच्यापाशी यावं. आम्ही स्वत:हून त्यांचं लग्न लावून देऊ.' वगैरे सांगत होते पण ते किती वरवरचं आहे हे दिसतंच होतं. त्यांच्या या सांगण्याला भुलून काही दिवसांनी त्यानं बाहेर येण्याचा विचार केला. मात्र तिला ते लोक नक्की दगा देणार आहेत हे कळत होतं म्हणून तिनं त्यांना एक गाणं म्हणून बाहेर येण्यापासून परावृत्त केलं....
उत्तर :
हमारे दिलसे ना जाना धोखा ना खाना दुनिया बडी बेइमान
कोडं क्र ०५/५५ प्यारेलाल
कोडं क्र ०५/५५
प्यारेलाल रतलामी ..... एक सिरीयल किलर! मुलींना आपल्या देखणेपणामुळे, संभाषणचातुर्यानं भुरळ घालायची आणि मग काही दिवसांनी एखाद्या एकांत स्थळी बोलावून त्यांचा खून करायचा हे सत्र कितीतरी दिवस सुरू होतं. बिंदिया मात्र कशीबशी त्याच्या तावडीतून आपला जीव वाचवून पळाली होती आणि या माणसाच्या तावडीत आता यापुढे इतर कोणी मुलगी सापडू नये त्याच्यावर पाळत ठेऊन होती.
लवकरच प्यारेलालनं एक नविन मुलगी हेरलीच. तिला नोकरी देतो म्हणत झुलवत राहिला. तिनं त्याच्यामागे खुपच तगादा लावला तेव्हा त्यानं तिला एक इमेल पाठवून 'उद्या अमुकअमुक ठिकाणी ये. तिथे तुझा इंटरव्हू होईल आणि तुला नोकरी दिली जाईल' असं सांगितलं.
पण बिंदीयानं त्याचा अकांउंट हॅक केला होता. तिनं प्यारेलालची इमेल वाचली आणि लगेच त्या मुलीला आपल्या अकाउंटमधून दुसरी इमेल करून दुसर्या दिवशीच्या इंटरव्हूबद्दल सतर्क केलं.
तिनं स्वत:च्या इमेलमध्ये कोणतं गाणं लिहिलं असेल?
बचके रहेना रे बाबा तुझपे नजर
बचके रहेना रे बाबा तुझपे नजर है
असाच अंदाज हां
जाई, नाही.
जाई, नाही.
कोडं क्र ०५/५६ एक मगरी आणि
कोडं क्र ०५/५६
एक मगरी आणि मगर रात्री गुपचुप भेटायचं ठरवतात. मगरी वेळेत पोचते. पण तो येतच नाही. ती २ रात्री त्याची वाट पहाते. मग व्याकुळ होऊन गायला लागते? तर ती कुठलं गाणं गाईल?
कोडं क्र ०५/५६ हमें तुमसे
कोडं क्र ०५/५६
हमें तुमसे प्यार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिना
५/५६ चांद फिर निकला मगर तुम
५/५६
चांद फिर निकला मगर तुम ना आये
मामी, ये मुलाकात एक बहाना है
मामी, ये मुलाकात एक बहाना है ?
कोडं क्र ०५/५७: 'काय रे
कोडं क्र ०५/५७:
'काय रे पोरांनो, ह्या वेळी सोसायटीच्या गॅदरिंगला काय कार्यक्रम आहे तुमचा?' जिन्यावर बसलेल्या कोंडाळ्याकडे पाहून शहाणे काकांनी प्रश्न केला.
'अंकल, ह्या टाईमला आम्ही मेटॅलिक म्युझिक चा प्रोग्राम अॅरेन्ज केलाय' स्मृती तिच्या मते 'मराठी' त बोलली.
'मेटॅलिक म्युझिक?' शहाणे काकांच्या चेहेर्यावर प्रश्नचिन्ह पाहून अजेय पुढे सरसावला. सोसायटीतल्या नेणत्यांना जाणते करण्याची कामगिरी त्याच्यावर होती.
'म्हणजे फक्त मेटलच्या वस्तू घेऊन त्यातून म्युझिक बनवायचं. नेहमीची वाद्यं नसणार'. आपल्याला 'वाद्य' हा आद्य मराठी शब्द सुचल्याचा आनंद त्याच्या चेहेर्यावर होता.
'अस़ं का? बरं बरं" शहाणेंना परिस्थितीचा अंदाज आला होता. पण तरी त्यांनी खडा टाकलाच. 'नुस्तंच म्युझिक आहे का कोणी गाणार पण आहे?'
'गाणार तर. आमचा कॉलेजमधला फ्रेन्ड आहे ना सायरस तो येणार आहे. तो आणि त्याचा ट्विन ब्रो....'
'सायनस किंवा व्हायरस असेल' शहाणेंनी पीजे मारला. सगळी पोरं नम्रपणे हसली.
'काय अंकल तुमी पण जोक मारते. त्याच्या ब्रोचं नेम आहे विकी'
'अच्छा अच्छा. चालू देत. चालू देत' सोसायटीच्या तमाम मेंबर्सची शहाणेना कीव आली. त्यांच्यापुढे काय संकट वाढून ठेवलंय त्यांना माहित नव्हतं.
गॅदरींगच्या दिवशी जो कार्यक्रम झाला त्यावरून सायरसच्या भावाचं नाव सायनस किंवा व्हायरसच असायला हवं होतं ह्याची त्यांना खात्री पटली.
'काय शहाणें? कसा झाला म्हणे यंग जनरेशनचा कार्यक्रम?' पै काकांनी विचारलं. ते पुण्याला गेल्यामुळे ह्या ऑडिओ-व्हिज्युअल अत्याचारातून वाचले होते.
उत्तरा दाखल शहाणेंनी एक जुनं गाणं म्हणून दाखवलं त्यांना आणि दोघे हसत सुटले.
शाब्बास स्निग्धा. तुला कोल्ड
शाब्बास स्निग्धा. तुला कोल्ड कॉफी विथ चॉकलेट आईस्क्रीम!
कोडं क्र ०५/५५
प्यारेलाल रतलामी ..... एक सिरीयल किलर! मुलींना आपल्या देखणेपणामुळे, संभाषणचातुर्यानं भुरळ घालायची आणि मग काही दिवसांनी एखाद्या एकांत स्थळी बोलावून त्यांचा खून करायचा हे सत्र कितीतरी दिवस सुरू होतं. बिंदिया मात्र कशीबशी त्याच्या तावडीतून आपला जीव वाचवून पळाली होती आणि या माणसाच्या तावडीत आता यापुढे इतर कोणी मुलगी सापडू नये त्याच्यावर पाळत ठेऊन होती.
लवकरच प्यारेलालनं एक नविन मुलगी हेरलीच. तिला नोकरी देतो म्हणत झुलवत राहिला. तिनं त्याच्यामागे खुपच तगादा लावला तेव्हा त्यानं तिला एक इमेल पाठवून 'उद्या अमुकअमुक ठिकाणी ये. तिथे तुझा इंटरव्हू होईल आणि तुला नोकरी दिली जाईल' असं सांगितलं.
पण बिंदीयानं त्याचा अकांउंट हॅक केला होता. तिनं प्यारेलालची इमेल वाचली आणि लगेच त्या मुलीला आपल्या अकाउंटमधून दुसरी इमेल करून दुसर्या दिवशीच्या इंटरव्हूबद्दल सतर्क केलं.
तिनं स्वत:च्या इमेलमध्ये कोणतं गाणं लिहिलं असेल?
उत्तर :
ये मुलाकात एक बहाना है
प्यार (प्यारेलाल रतलामी) का सिलसिला पुराना है
'सायनस किंवा व्हायरस असेल'
'सायनस किंवा व्हायरस असेल' शहाणेंनी पीजे मारला. सगळी पोरं नम्रपणे हसली.
>>> स्वप्ना...
कोडं क्र ०५/५६ एक मगरी आणि
कोडं क्र ०५/५६
एक मगरी आणि मगर रात्री गुपचुप भेटायचं ठरवतात. मगरी वेळेत पोचते. पण तो येतच नाही. ती २ रात्री त्याची वाट पहाते. मग व्याकुळ होऊन गायला लागते? तर ती कुठलं गाणं गाईल?
चांद फिर निकला मगर तुम ना आये
कर्रेक्ट केदार!
कोडं क्र ०५/५८: "तू नक्की
कोडं क्र ०५/५८:
"तू नक्की विचार केला आहेस ना?' जगतच्या स्वरांत काळजी होती. मानसीने त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंच हसली.
'तू एव्हढं टेन्शन का घेतोयस जगत?'
'तसं नाही मानसी. तू भूमी आणि अंबरला प्रेमानेच वागवशील ह्याची खात्री आहे मला. पण तरीही सावत्र आईबद्दल एक वाईट प्रतिमा आहे समाजात. उगाच काहीबाही ऐकून येतील आणि तुझ्याशी वाईट वागतील.'
'तू अजिबात काळजी करू नकोस. मी सगळं संभाळून घेईन' मानसीच्या स्वरात आत्मविश्वास होता.
'बरं. अजून एक सांग. तू खूश आहेस ना?'
मानसीने गोल्डन एरातल्या एका गाण्याने त्याला उत्तर दिलं. ओळखा ते गाणं.
०५-५७: टीन कनस्तर पीट पीट कर
०५-५७:
टीन कनस्तर पीट पीट कर गला फाडकर चिल्लाना
यार मेरे मत बुरा मान ये गाना है न बजाना है
हे आहे का?
कोडं क्र
कोडं क्र ०५/५८:
ओ.मितवा.सुन.मितवा.तुझ.को.क्या.डर.है.रे
ये.धरती.अपनी्.है,अपना.अंबर.है.रे
श्रध्दा बरोबर! तुला मिनी
श्रध्दा बरोबर! तुला मिनी बाकरवडीची चाट + मलई आईसक्रीम बक्षीस
कोडं क्र ०५/५७:
'काय रे पोरांनो, ह्या वेळी सोसायटीच्या गॅदरिंगला काय कार्यक्रम आहे तुमचा?' जिन्यावर बसलेल्या कोंडाळ्याकडे पाहून शहाणे काकांनी प्रश्न केला.
'अंकल, ह्या टाईमला आम्ही मेटॅलिक म्युझिक चा प्रोग्राम अॅरेन्ज केलाय' स्मृती तिच्या मते 'मराठी' त बोलली.
'मेटॅलिक म्युझिक?' शहाणे काकांच्या चेहेर्यावर प्रश्नचिन्ह पाहून अजेय पुढे सरसावला. सोसायटीतल्या नेणत्यांना जाणते करण्याची कामगिरी त्याच्यावर होती.
'म्हणजे फक्त मेटलच्या वस्तू घेऊन त्यातून म्युझिक बनवायचं. नेहमीची वाद्यं नसणार'. आपल्याला 'वाद्य' हा आद्य मराठी शब्द सुचल्याचा आनंद त्याच्या चेहेर्यावर होता.
'अस़ं का? बरं बरं" शहाणेंना परिस्थितीचा अंदाज आला होता. पण तरी त्यांनी खडा टाकलाच. 'नुस्तंच म्युझिक आहे का कोणी गाणार पण आहे?'
'गाणार तर. आमचा कॉलेजमधला फ्रेन्ड आहे ना सायरस तो येणार आहे. तो आणि त्याचा ट्विन ब्रो....'
'सायनस किंवा व्हायरस असेल' शहाणेंनी पीजे मारला. सगळी पोरं नम्रपणे हसली.
'काय अंकल तुमी पण जोक मारते. त्याच्या ब्रोचं नेम आहे विकी'
'अच्छा अच्छा. चालू देत. चालू देत' सोसायटीच्या तमाम मेंबर्सची शहाणेना कीव आली. त्यांच्यापुढे काय संकट वाढून ठेवलंय त्यांना माहित नव्हतं.
गॅदरींगच्या दिवशी जो कार्यक्रम झाला त्यावरून सायरसच्या भावाचं नाव सायनस किंवा व्हायरसच असायला हवं होतं ह्याची त्यांना खात्री पटली.
'काय शहाणें? कसा झाला म्हणे यंग जनरेशनचा कार्यक्रम?' पै काकांनी विचारलं. ते पुण्याला गेल्यामुळे ह्या ऑडिओ-व्हिज्युअल अत्याचारातून वाचले होते.
उत्तरा दाखल शहाणेंनी एक जुनं गाणं म्हणून दाखवलं त्यांना आणि दोघे हसत सुटले.
उत्तरः
टीन कनस्तर पीट पीट कर गला फाडकर चिल्लाना
यार मेरे मत बुरा मान ये गाना है न बजाना है
मामी, तुम्ही दिलेलं गाणं
मामी, तुम्ही दिलेलं गाणं चाललं असतं पण माझ्या डोक्यात गोल्डन एरातलं गाणं आहे.
Pages