आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
अमिताभ+ हेमा
अमिताभ+ हेमा
छे केदार, रणधीर आणि जया ने
छे केदार, रणधीर आणि जया ने इतरांसोबत कुठे काम केले जास्त ?
आणि भरत, हे दोघे नाहीत.
०५/४२ क्लू - ३
गाणे लताचे आहे. अशी गाणी तिने अगदी मोजकीच गायली आहेत. पण कॅब्रे नाही आणि मुजराही नाही.
भरत, या क्लू नंतर उत्तर यायलाच हवे.
दिनेशदा, किसी को पता ना चले
दिनेशदा,
किसी को पता ना चले बात का
के है आज वादा मुलाकात का...... ??
हिरो हिरवईन म्हाईत न्हाई
ही जोडी राज कपूर नर्गिस असेल
ही जोडी राज कपूर नर्गिस असेल किंवा त्यात किशोरकुमार मधुबालापैकी एक असेल.
स्निग्धा, गाणे जुळले असते पण
स्निग्धा, गाणे जुळले असते पण बाकीचे संदर्भ लागत नाहीत.
ते गाणे लताचेच. कलाकार बहुतेक निशी... हि जानी दुष्मन, नागिन सारख्या मल्टी स्टारर्सची निर्माती होती.
भरत, राज कपूरच्या बायकोने (
भरत, राज कपूरच्या बायकोने ( कृष्णा ) कुठे कधी सिनेमात काम केले ?
हो की
हो की
भरत, या चित्रपटातले नायक
भरत, या चित्रपटातले नायक नायिका नवराबायको नव्हते.. त्यांनी आपपल्या नवर्या / बायको सोबत इतर चित्रपट केले.
आता आणखी एखादा क्लू दिला तर तो थेटच द्यावा लागेल.
मामीला आठवयला हवे. जिप्स्याला पण कदाचित आठवेल.
दूंगी तैनू रेशमी रुमाल प्रेम
दूंगी तैनू रेशमी रुमाल
प्रेम पुजारी
देव आनंद - वहिदा
ये हूई ना बात ! ( अपेक्षा
ये हूई ना बात ! ( अपेक्षा होतीच म्हणा .)
०५/४२
इतिहास संशोधक राजवाड्यांना पक्की खबर होती कि सुरींदर कौर यांच्याकडे पानिपत युद्धाच्या काळातला एक अस्सल दस्तावेज आहे. सुरींदर कौर यांचे पूर्वज मराठी होते हे त्यांना माहीत होते आणि त्याचा त्यांना अभिमानही होता. पण पानिपतातील पराभवामूळे ते तिथे राहिले याची खंतही होती. त्यामूळे त्यांनी तो रेशमी लखोटा कधीच कुणाला दाखवला नव्हता.
राजवाड्यांना तो हवाच होता कारण त्यामूळे त्यांचे संशोधन पुर्णत्वाला गेले असते.
आता नावावर जाऊ नका, राजवाडे आणि सुरींदर दोघेही तरुण होते. त्यामूळे राजवाड्यांनी आपला चार्म वापरायचे ठरवले. आधी बरीच फोनाफोनी / डेटींग / चॅटींग करुन त्यांनी सुरींदर कडून वचन मिळवलेच.
कुणालाही न कळवता, एकांतात, रात्री उशीरा एखाद्या बागेत भेटलास तर तो दस्तावेज देईन.. असे सुरींदर ने सांगितले.. तर ते कुठल्या गाण्यात ?
उत्तर =
दूंगी तेणू रेशमी रुमाल
हो बांके जरा देरे आना
चित्रपट - प्रेमपुजारी
गायिका - लता
पडद्यावर वहीदा रेहमानचा भांगडा ( अशी गाणी लताने फार कमी गायलीत. ) यू ट्यूबवर आहे बहुतेक. अवश्य बघा.
संगीतकार - एस्डी.
देव आनंद ने कल्पना कार्तिक बरोबर ( टॅक्सी ड्रायव्हर ) आणि वहिदाने तिच्या नवर्यासोबत ( शगुन) चित्रपट केले. देव आनंदने तर मधुबाला ते टिना मुनीम अशा दोन पिढ्यांतील नायिंकासोबत काम केले.
रुमाल = ऐतिहासिक दस्तावेज.
छान होतं हे कोडं. सुरिंदर
छान होतं हे कोडं. सुरिंदर कौर(पंजाबी) हा आणखी एक क्लु का?
शगुनमधली सगळी गाणी क्लास आहेत. खय्याम-साहिर
हो ना. प्रेमपुजारी मधली
हो ना.
प्रेमपुजारी मधली गाणी(च) छान होती. सिनेमा तेवढा खास नव्हता.
प्रेम के पुजारी हम है ( एस्डी ) शोखियो मे घोला जाये ( किशोर लता ) रंगीला रे ( लता ) फुलोंके रंग से ( किशोर )
माधव यांना वाढदिवसाच्या
माधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!
>>माधव यांना वाढदिवसाच्या
>>माधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!
+१
०५/४३ तर अशीच एका माणसाची
०५/४३
तर अशीच एका माणसाची गंमत. त्याच्या घराच्या मागे जाई जुईचे मांडव होते. पण बागेची नीट निगा न राखल्याने किंवा नैसर्गिक शेतीवर विश्वास असल्याने, मांडवाखाली गवत भरपूर. त्यातच भरपूर रानटी फुले फुलायची. पण कशी कुणास ठाउक, मांडवाखालच्या तणांची पर्वा न करता, मांडवावरचे वेल पण खुप फुलायचे.
तो माणूस आणि त्याची प्रेयसी त्या मांडवाखाली भेटत... तर त्याची प्रेयसी भेटीच्या आधी कुठले गाणे म्हणत असेल ?
थोडा आऊट ऑफ बॉक्स विचार करा बरं
दिनेशदा बंगले के पीछे हाए
दिनेशदा
बंगले के पीछे हाए बेरी के नीचे
काटा लगा हे गाण तर नव्हे ना
मला तर आधी ते 'एक चमेली के
मला तर आधी ते 'एक चमेली के मंडवे तले' आठवलं.
जाई, बेरी/ बोरं कुठे
जाई, बेरी/ बोरं कुठे ?
आर्या.. आणखी थोडा विचार करायला हवा !
०५/४३, पहिला क्ल्यू -
०५/४३,
पहिला क्ल्यू - गाण्याचा अर्थ थोडा गूढ आहे पण त्यातल्या प्रतिमा अनोळखी नाहीत.
०५/४३, या क्लू वरून तर गाणे
०५/४३,
या क्लू वरून तर गाणे ओळखताच आले पाहिजे.
या गायिकेने आणि आशा भोसलेने एक गाणे स्वतंत्ररित्या गायलेले आहे. पण ते हे नव्हे. असा योग आणखी एका
गाण्याच्या बाबतीत आला, पण ती दुसरी गायिका, आशा भोसले नव्हे.
आणि हो Out of Box ... लक्षात आहे ना ?
०५/४३: दिनेश, गाणे मराठी आहे
०५/४३: दिनेश, गाणे मराठी आहे का?
जाईन विचारीत रानफुला?
माधव, बरोबर वाटतंय
माधव, बरोबर वाटतंय
या गायिकेने आणि आशा भोसलेने
या गायिकेने आणि आशा भोसलेने एक गाणे स्वतंत्ररित्या गायलेले आहे. पण ते हे नव्हे.>>>>>किशोरी आमोणकर आणि आशा भोसले.
गीत गाया पत्थरोने ???
क्या बात है माधव ! ०५/४३ तर
क्या बात है माधव !
०५/४३
तर अशीच एका माणसाची गंमत. त्याच्या घराच्या मागे जाई जुईचे मांडव होते. पण बागेची नीट निगा न राखल्याने किंवा नैसर्गिक शेतीवर विश्वास असल्याने, मांडवाखाली गवत भरपूर. त्यातच भरपूर रानटी फुले फुलायची. पण कशी कुणास ठाउक, मांडवाखालच्या तणांची पर्वा न करता, मांडवावरचे वेल पण खुप फुलायचे.
तो माणूस आणि त्याची प्रेयसी त्या मांडवाखाली भेटत... तर त्याची प्रेयसी भेटीच्या आधी कुठले गाणे म्हणत असेल ?
उत्तर :-
जाई न विचारीत रानफुला
भेटेल तिथे ग सजण मला...
जाई ला सुचायला पाहिजे होतं.
जिप्स्या, बरोबर तेच गाणं. आणि दुसरे गाणे, माझे माहेर पंढरी.. पं. भीमसेन जोशी
०५/४४: दादर स्टेशनवर ट्रेन
०५/४४:
दादर स्टेशनवर ट्रेन थांबली आणि ती तरुणी त्यातून खाली उतरली. तिला घ्यायला कोणी आलं नव्हतं ना तिने कोणाला फोन केला. स्टेशनच्या बाहेर पडायची लगबगही तिने केली नाही. नुसतीच इथे-तिथे पहात उभी राहिली. तिच्याकडे फारसं सामानही नव्हतं. कोपर्यात उभ्या दोन पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने ही बाब लगेच हेरली 'पोरगी पळून आली आहे असं दिसतंय' एक दुसर्याला म्हणाला. अशी पळून आलेली मुलं वाईट मार्गाला लागायच्या आत त्यांना आईबापांच्या स्वाधीन करायचं हे ते आपल्या कर्तव्याचा एक अविभाज्य भाग मानत.
'काय ग पोरी? नाव काय तुझं? आहेस कोण? आणि आलीस कुठनं?' त्यांनी जवळ जात तिला विचारलं.
दोन पोलिसांना बघूनही ती मुलगी अजिबात भांबावली नाही. तिने आपल्या पिशवीतून एक डबा काढला आणि त्यात हात घालून एक मूठभर शेव-गाठी दोघांच्या हातावर ठेवल्या. दोघे गोंधळले.
'आम्ही काय विचारतोय तुला?' एकाने दरडावून विचारलं तेव्हा तर ती मुलगी मिश्किलपणे हसली.
तिने परत थोड्या शेव-गाठी काढल्या आणि एक हिन्दी गाणं म्हणून आपली ओळख सांगितली.
कोणतं गाणं असेल ते?
०५/४४: >>>मेरा नाम है चमेली,
०५/४४: >>>मेरा नाम है चमेली, मै हु मालन अलबेली
चली आयी हु अकेली बिकानेर से
०५/४४: दादर स्टेशनवर ट्रेन
०५/४४:
दादर स्टेशनवर ट्रेन थांबली आणि ती तरुणी त्यातून खाली उतरली. तिला घ्यायला कोणी आलं नव्हतं ना तिने कोणाला फोन केला. स्टेशनच्या बाहेर पडायची लगबगही तिने केली नाही. नुसतीच इथे-तिथे पहात उभी राहिली. तिच्याकडे फारसं सामानही नव्हतं. कोपर्यात उभ्या दोन पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने ही बाब लगेच हेरली 'पोरगी पळून आली आहे असं दिसतंय' एक दुसर्याला म्हणाला. अशी पळून आलेली मुलं वाईट मार्गाला लागायच्या आत त्यांना आईबापांच्या स्वाधीन करायचं हे ते आपल्या कर्तव्याचा एक अविभाज्य भाग मानत.
'काय ग पोरी? नाव काय तुझं? आहेस कोण? आणि आलीस कुठनं?' त्यांनी जवळ जात तिला विचारलं.
दोन पोलिसांना बघूनही ती मुलगी अजिबात भांबावली नाही. तिने आपल्या पिशवीतून एक डबा काढला आणि त्यात हात घालून एक मूठभर शेव-गाठी दोघांच्या हातावर ठेवल्या. दोघे गोंधळले.
'आम्ही काय विचारतोय तुला?' एकाने दरडावून विचारलं तेव्हा तर ती मुलगी मिश्किलपणे हसली.
तिने परत थोड्या शेव-गाठी काढल्या आणि एक हिन्दी गाणं म्हणून आपली ओळख सांगितली.
कोणतं गाणं असेल ते?
उत्तरः
मेरा नाम है चमेली, मै हु मालन अलबेली
चली आयी हु अकेली बिकानेर से
जिप्स्याला प्लेट भरून खव्याचे गुलाबजाम
जिप्स्याला प्लेट भरून खव्याचे
जिप्स्याला प्लेट भरून खव्याचे गुलाबजाम>>>>हुर्रे!!!!
दिनेशदा मला वाटले हिँदी गाणे
दिनेशदा मला वाटले हिँदी गाणे असेल
मराठीचा विचारच आला नाही डोक्यात
०५/०४५ शेवटी व्हायचं तेच
०५/०४५
शेवटी व्हायचं तेच झालं. जिप्सीण जिप्स्याच्या प्रेमात पडलीच. तेंव्हाच्या त्यांच्यातल्या संवादासाठीच हे गाणे लिहिले असावे. ओळखा. खूप सोप्पय.
Pages