जिरं १ टिस्पून, तमालपत्र १,२ , टोमॅटो प्युरे १ मध्यम कॅन, ८,१० काजू पाण्यात भिजवून मग पेस्ट करुन, लाल तिखट-चवीप्रमाणे, हळद १ टीस्पून, कसूरी मेथी १,२ टेबलस्पून, फ्रेश /हेवी क्रिम साधारण १ कप, पनीर साधारण पाव किलो किंवा १५,२० तुकडे ,(जशी ग्रेवी हवी असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं), मीठ चवीप्रमाणे
एका पातेलीत तेल गरम करुन त्यात जिरं ,तमालपत्र घालून फोडणी करावी. त्यावर टोमॅटो प्युरे घालून झाकण घालून थोडा वेळ उकळी काढावी. मग त्यात हळद, लाल तिखट घालून नीट मिक्स करुन काजू पेस्ट घालून पुन्हा उकळी काढावी. नंतर त्यावर कसूरी मेथी हाताने चुरुन आणि फ्रेश क्रिम घालून पुन्हा शिजू द्यावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घालावेत व पुन्हा झाकण घालून शिजवावे.
लागणारे जिन्नस हे अंदाजे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करावं. तांच अमेरिकेत इंडियन ग्रोसरीमध्ये किंवा अमेरिकन ग्रोसरीमध्ये हेवी क्रीम मिळतं ते वापरावं.
ही रेसिपी एकदम हीट आहे. नवरा
ही रेसिपी एकदम हीट आहे. नवरा आणि सासु दोघानीही चाटुन पुसुन खाल्ली. दोघाना एकाचवेळी खुश करण्याची एकदम सोपी ट्रीक.
- सुरुचि
आज करून बघितली, छान
आज करून बघितली, छान झाली...शनिवारी पार्टीसाठी करायची आहे, आधी करून ठेवली आणि पुन्हा गरम केली तर क्रीम फाटणार वगैरे नाही ना?मला वॉलमार्टात हेवी व्हिपिंग क्रीम मिळाले ते घालून केली..
नाही फाटणार.
नाही फाटणार.
थॅन्क्स, सायो, पटकन उत्तर
थॅन्क्स, सायो, पटकन उत्तर दिल्याबद्द्ल..मस्तच आहे रेसिपी!
सायो, काल बनवली होती ही
सायो, काल बनवली होती ही रेसिपी.
मस्त.
नवरा, सासु नि लेक तिघांनीही चाटुन-पुसुन खाल्ली
मी पण केली होती
मी पण केली होती पार्टीसाठी..लोकांना आधी हॉटेलमधून मागवली आहे असं वाटलं....
मस्तच आहे रेसिपी! माझी एक
मस्तच आहे रेसिपी!
माझी एक शंका- tomato paste & tomato puree हे वेगळे असते का?
टोमॅटो पेस्ट खूप घट्ट असते.
टोमॅटो पेस्ट खूप घट्ट असते. त्यात आंबटपणा जावा म्हणून बरंच फ्रेश क्रिम घालावं लागतं. प्युरे ओतता यावं अशा कन्सिस्ट्न्सीची असते.
सायो, परवा परत केलेली या
सायो,
परवा परत केलेली या पद्धतीने पनीर माखनी.... एकदम यम्मी आणि झटपट होणरा प्रकार... अत्ता पर्यंत ३-४ वेळा केलिये. पण परवा आठवणीने फोटो काढला
वॉव.. सुपर लाजो!!!
वॉव.. सुपर लाजो!!!
मस्त दिसतेय लाजो
मस्त दिसतेय लाजो
खुप सुंदर दिसतेय लाजो.
खुप सुंदर दिसतेय लाजो.
आज केली होती! अ प्र ती म! फार
आज केली होती! अ प्र ती म! फार भारी होते, मी लाईट क्रिम वापरले.
(फोटो न.न्तर टाकते)
खुप मस्त रेसिपी आहे.
खुप मस्त रेसिपी आहे. पहिल्यांदाच पहिल्याच प्रयत्नात सगळ्यांना खुप आवडली.
पण माझी भाजी थोडी आंबट लागत होत्ति. काय चुकले असेल? मी काजु पेस्ट घालायला विसरले होते. त्याच्यामुळे तर नसेल झाली.
जर असे भाजी झल्यावर आंबट पणा कमी करायचा असेल तर काय करावे?
तसेच नंतर जर आंबट्पणा वाढवाय्चा असेल तर काय करावे?
आणि प्युरे साधारण वाटी च्या प्रमाणात कीती घ्यावी? माझ्याकडे मोठी बाटली आहे त्यामुळे पण प्रमाण चुकले असेल बहुतेक.
पण मी ही परत नक्कि करुन बघणार आहे.
तसेच जर २०-२५ जणांसाठी करायचीच झाली तर सगळे कीती प्रमाणात घ्यावे?
आंबट झाली तर फ्रेश क्रिम कमी
आंबट झाली तर फ्रेश क्रिम कमी पडलं प्युरेच्या तुलनेत. तसंच काजू पेस्ट घालूनही आंबटपणा कमी होतो.
माझ्याकडे प्रमाण असं नाहीये. तूच तुझ्या अंदाजानुसार वाढव.
काजूपेस्ट वगळता येइल का?
काजूपेस्ट वगळता येइल का? त्याऐवजी दुसरा पर्याय आहे का? मगजबिया वाटून घालु?
तसेच फ्रेश क्रीमला पण पर्याय हवाय प्लीज.
चिन्नु मी खूपदा विसरते
चिन्नु मी खूपदा विसरते काजूपेस्ट घालायला.
तरीसुद्धा छान होते चवीला भाजी. पण क्रीमला पर्याय नाही. अमुलचं टेट्रापॅकमधलं क्रीम किंवा घरची साय फेटून घालते मी.
क्वचित कधी भाजी जास्त आंबट लागली तर मिल्क पावडर घालते मी यात थोडीशी.
काजू ऐवजी मी (नेहमीच) अक्रोड
काजू ऐवजी मी (नेहमीच) अक्रोड वापरते, थोडे बदाम पण छान लागते. मला आता बेदाणे घालून बघायचे आहेत
बहुतेक त्यानी गोडवा येइल.
मी साखर / गूळ हाताशी असेल ते घाल्ते, विकतची प्युरी असेल तर आंबट होते, घरच्या प्युरीला एवढा आंबटपणा नसतो.
छानच होते ही भाजी, माझ्या मुलाला खूप आवड्ते. बर्याचदा डब्याला देते सोपी पडते सकाळी करायला.
विकतची प्युरी असेल तर आंबट
विकतची प्युरी असेल तर आंबट होते, घरच्या प्युरीला एवढा आंबटपणा नसतो.>>+१
काजूपेस्ट वगळता येइल का?
काजूपेस्ट वगळता येइल का? त्याऐवजी दुसरा पर्याय आहे का? मगजबिया वाटून घालु?
>>. चिन्नु, याच नव्हे तर कुठल्याही काजूपेस्ट रेसिपीमधे मी निम्म्याहून जास्त मगजबिया आणि थोडे काजू घेते. काजूचा फ्लेवर येतो आणि मगजबियांच्या पेस्टने घट्टपणा (कॅलरीपण कमी) या हिशोबाने.
विकतची टोमॅटॉ प्युरी घेतल्यास नक्की आंबट झाली होती माझी पनीर माखनी. घरची टोमॅटो पेस्ट घातली तर रंग इतका डार्क येत नाही. पण चवीला उत्तम होते. ही रेसिपी दिसायला एकदम शाही वगैरे दिसते पण करायला झटपट आहे.
चिन्नू, काजू पेस्ट वगळूनही
चिन्नू, काजू पेस्ट वगळूनही चालेल. मगज बियांबद्दल कल्पना नाही तसंच घरच्या प्युरेबद्दलही नाही. फ्रेश क्रिम ऐवजी दूध चालेल पण त्याने घट्ट न होता जरा पातळच होईल. तेव्हा ते शक्यतो स्किप करू नकोस.
थँक यू सर्वांना अल्पना, साय
थँक यू सर्वांना
अल्पना, साय फेटून घालेन. नंदु, आईपण मगजबिया+काजु वापरते अश्या ग्रेव्हींमध्ये. सायो थँक्स गं.
काजु + क्रिम घातल्याने 'शाही'
काजु + क्रिम घातल्याने 'शाही' चव येते
फक्त घट्टपणा येण्यासाठी हवे तर थोदे कॉर्नफ्लार पेस्ट करुन प्युरे मधे घालता येइल...आणि क्रिम ऐवजी दुधाची पावडर पण मग अस्सल'चव नाही येणार
चिन्नू, साय फेटून घालणार
चिन्नू, साय फेटून घालणार असशिल तर अगदी ताजी साय नको घालुस. ताज्या सायीपेक्षा एक दिवस फ्रिजात ठेवलेली साय जास्त मऊ फेटल्या जाते असा अनुभव आहे. (ताजी साय फेटताना त्याचे बारिक कण कण रहातात, स्मुथनेस येत नाही)
साय+ मिल्क पावडर ने पण तशीच शाही चव येते. बर्याचदा पनीर माखनी आणि दाल माखनीमध्ये मी हे काँबिनेशन वापरलं आहे.
ओके अल्पना. हो, साय व्यवस्थित
ओके अल्पना. हो, साय व्यवस्थित फेटली जात नाही. साय+मिल्क पॉ. लक्षात ठेवेन.
लाजो, आयडीया चांगली आहे, पण तू म्हणतेस तसं चव बदलेल.
मगज बिया म्हणजे?
मगज बिया म्हणजे?
मला ह्या वीकेन्ड ला गेटटुगेदर
मला ह्या वीकेन्ड ला गेटटुगेदर ला जायचे आहे. मी सकाळी करुन ठेवली आणि संध्याकाळी परत गरम केली तर चालेल का? आत्ता उन्हाळा प्रचंड आहे तर काही प्रोब्लेम येइल का? क्रीम फाटणार तर नाही ना?
मला भाताबरोबर खायला करायची आहे तर ग्रेव्ही पातळ करण्यासाठी काय करु? पनीर जास्तच पाहीजे आहेत. सगळे पनीर चवीने खाणारे लोक आहेत.
आणि प्युरे नंतर टाकायची झाली तर ती वेगळी शिजवून मग टाकावी लागेल का?
>>मी सकाळी करुन ठेवली आणि
>>मी सकाळी करुन ठेवली आणि संध्याकाळी परत गरम केली तर चालेल का?>> सकाळी करून, फ्रिजमध्ये ठेवून संध्याकाळी गरम केली तर चालेल.
>>मला भाताबरोबर खायला करायची आहे तर ग्रेव्ही पातळ करण्यासाठी काय करु>> हेवी क्रिमचं प्रमाण वाढवावं लागेल.
>> प्युरे नंतर टाकायची झाली तर ती वेगळी शिजवून मग टाकावी लागेल का>> दिली आहे तशीच रेसिपी फॉलो करणार का? मी तरी प्युरे वेगळी शिजवून वगैरे घातलेली नाही त्यामुळे माहित नाही.
आधी करुन ठेवायची असेल तर टॉम
आधी करुन ठेवायची असेल तर टॉम ग्रेव्ही आधी बनवुन ठेवायची आणि क्रिम आणि पनीर अगदी गरम करायच्या वेळेस घालता येइल.
मगज बिया म्हणजे watermelon
मगज बिया म्हणजे watermelon seeds. इथे तरी दुकानात ह्याच नावाने मिळतात.
निर्मयी, लाजो+१. क्रीम ऐनवेळेला घातलेलं बरं.
Pages