बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्रखंड-पुरी, हव्या असल्यास साध्या पोळ्या, मसालेभात, बटाटा भाजी, काकडी कोशिंबीर, कैरी चटणी, कढी/ सार. सुरळीच्या वड्या/ढोकळा.

अंगारकीला चंद्रोदय रात्री १०.२३ ला आहे. त्यानंतर जेवणार आहात का? Uhoh का चंद्रोदय व्हायच्या आधीच सोडता उपास? तसं असेल तर ठीक आहे.

चंद्रोदय असा बराच उशीरा असेल तर आम्ही उपासाचेच खातो नेहेमीच्या जेवणाच्या वेळी. वेगळे म्हणून फराळी/ उपासाची मिसळ करता येईल. आम्रखंड किंवा आमरस बरोबर. चंद्रोदय झाल्यानंतर वाटलं तर एगलेस केक कापा आणि खा Happy

रविवारी काही लोकांना बोलवायचे आहे जेवण्यासाठी. ४ मोठी माणसे आणि ४ छोटी मुले आहेत, तसेच आम्ही घरातले ४ लोक. तर झटपट काही करता येइल का? पावभाजी, इडली वगैरे आधी करुन झाले आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी रगडा पॅटिस केले होते.
शनिवारी खुपच बिझि असेल त्यामुळे त्या दिवशी काही तयारी करता येणार नाही.

@मुग्धा-- लेमन तिरामिसु करु शकता.आधीच करुन ठेवले कि व्यवस्थित मुरते.थंड असल्याने ह्या दिवसात छान वाटेल.
Ladies Finger बिस्किट ऐवजी एगलेस केक चे slice वपरु शकता.(पण दुधात भिजवु नका).
मी बेंगलोर अंय्यंगार बेकरी मधुन Plain केक rusk आणुन वापरते.(ते ऑर्डर नुसार बनवुन देतात)
हे rusk वापरले तर थोडे ओले करुन वापरा. हे cake rusk टिकतात हि खुप.

सासुबाई आधी उपास सोडत नाहीत आणि मी ६ ला घरी गेल्यावर स्वयंपाक करणार, त्यामुळे चंद्रोदय झाल्यावरचं जेवणार,
केक आधी करुन ठेवीन. लेमन तिरमिसु छान ऑप्शन आहे, पण जे नातेवाईक येणारेत त्यात सगळे पारंपारिक पदार्थ आवडणारे आहेत,
संध्याकाळी नातेवाईक येतील ते रात्री उशीरा जेवुन जातील.
सध्या ठरवलेला बेत-

संध्या.- दाण्याच्या कुटाचा लाडू, उपासाची कचोरी, वेफ़र्स, चहा-कॉफ़ी/ सरबत.

जेवण- आमरसाचा शिरा- पुरी, तळलेले मोदक, वरण-भात, मसालेभात, मटकीची उसळ, खोबर्‍याची चटणी, पापड, बटाटा भजी किंवा सुरळीच्या वड्या.

आणि सासुबाईंना चॉकोलेट केक आवडतो कमी क्रीम डेकोरेशन केलेला, म्हणून तसा केक.
अजुन काही कमी-जास्त, सगळ मलाचं कराव लागेल, त्यामुळे काही नियोजनासाठी टिप्स???

मुग्धा, शीरा, खोबर्‍याची चटणी आधी करुन फ्रीज करता येइल. उपासाच्या दिवशी सकाळी काढून फ्रीज मधे ठेव थॉ करायला. शीरा आयत्या वेळी मावे. पुर्‍या आधी करुन ठेवता येतील. मोदकाचे सारण आधी करुन ठेव. संध्याकाळी आल्यावर एकीकडे वरण-भात-उसळ कुकरमधे होईल. एकीकडे मसालेभात. त्याच वेळात मोदक. (हे मी ४ बर्नर आहेत धरुन लिहीले.) सुरळीच्या वड्यां ऐवजी भजी करायला सोपे जाईल. केक आधी करुन ठेव. आयत्यावेळी फक्त आयसिंग.

प्रिती, अकु धन्यवाद. आज भरवशाचा मदतनीस बाबाबरोबर रेसट्रॅकवर त्यामुळे शेवटी पाव-भाजी, कॉर्न वडे- सॉस, कुल्फी असे ठरले. त्यातली लाजोच्या रेसीपीने केलेली कुल्फी चाखायच्या नावाखाली खाऊन झाली. Happy

दिविजा,>>>>>उकडलेले बटाटे +मटार-दाणे भाजी, फ्लॉवर-मटार, मटकीची/ मुगाची गोडा मसाला घालून उसळ, कोबी+ मटार+ बटाटा.

धन्यवाद स्वाती, माझ्याकडे तीन बर्नरची शेगडी आहे, आजचं जमेल तेवढं करुन ठेवीन, उद्या जमेल तर लवकर निघणार ऑफ़ीसमधुन, लग्न झाल्यापासुन ४ माणसांपेक्षा जास्त स्वयंपाक केला नाहीये. त्यात आमच्याकडे उपासाच्या दिवशी बाहेरच्या कोणी काहीही केलेलं चालत नाही अणि बाहेरुन आणेलेलं चालत नाही. म्हणुन थोडं टेन्शन आलयं.

मटकीची/ मुगाची गोडा मसाला घालून उसळ >> हिची रेसीपी द्या पहिलीतल्या विद्यार्थ्याना >>>>>>>>>
म्हणजे काय???? चेष्टा करताय का माझी???? ,खरचं नाही कळलं

मुग्धा, वैशालीने स्वतःला ती रेसिपी हवी असेल म्हणून तसं म्हटलं असेल :-). तू स्वतःवर ओढवून घेऊ नकोस. तुझी कशाला चेष्टा करेल ती? आणि इथे सगळेच मनमोकळेपणाने मदत मागतात, करतात. एखादी गोष्ट येत नसेल तर ते सांगण्यात कमीपणा मानत नाहीत. उलट तिने बघ, स्वतःला पहिलीतली विद्यार्थिनी म्हणून कसं हसत खेळत घेतलंय! Happy

तेल > जिरं-मोहोरी > हि.मी. > ह + ला.ती. + गो. का. म. > भिजवलेले मोडाचे मूग > जरा परता > पाणी > मीठ > गूळ. आलं पण घालता येईल मिरची बरोबर.

अरे रेसिपी हवी आहे.
मला ह्या सगळ्या उसळी वाटण घालुन (कांदा खोबर्‍याच) करता येतात.. गोडा मसाला घालुन नाही येत

चेष्टा करत नाही Sad

वैशाली, उसळीला अंगासरसा रस ठेवायचा म्हणजे कोरडी नाही होणार. हवे तर थोडे ओले खोबरे वाटून घाल आणि त्याप्रमाणात गोडा मसाला जरा जास्त घाल.

लसूण वगळून आले,कोथिम्बीर,हिरवी मिरची व आवडीप्रमाणे ओला नारळ/ सुके खोबर्‍याचे वाटण घालूनही मटकी/मूगाची उसळ छान होते! बघा ट्राय करून अन कळवा कशी झाली ते!

वैशाली, अश्विनी...मी पण जरा हसत खेळत घ्यायचं म्हणूनच असं विचारलं...
सगळ्यांच्या रेसिपी छान आहेत, आता त्यात माझ्या रेसिपीची भर..

जरा जास्त तेलाची जिरं-मोहरी- हिंग-हळद, लाल ति. आणि कढिपत्ता ( अत्यावश्यक ) घालून फोडणी + गोडा मसाला, वर कपभर पाणी , गूळ, ओलं खोबरं- कोथिं. पाणी उकळलं की मोडवलेलं कडधान्य घालुन मध्यम आचेवर २ शिट्या, छान शिजते. वरुन हवं तर ओलं खोबरं- कोथिं.

काही(८-१०) ज्ये ना लोक चहाला येणारेत रविवारी.
गोड म्हणून आंबे कापायचे असं बाबांनी ठरवलंय (त्यात बदल होणे नाही.. Happy )
पावसाळ्याचा गारवा आहे हवेत त्यामुळे सरबत नाहीच. चहा-कॉफीच असेल.
एक काहीतरी तिखटामीठाचा स्नॅक आयटम करावा असा प्लॅन आहे.
काहीच सुचलं नाही तर अ‍ॅसॉर्टेड भजी (कांदा, बटाटा, केळी, ओव्याची पाने मिळाल्यास) असे ठरतेय.
ज्ये ना असले तरी मेजर पथ्ये नाहीत कुणाला.

भजीपेक्षा ब.वडे कर. किंवा बदल म्हणून सा. वडे. बरोबर चटणी- नारळाची आणि चिंचेची. ब्रेडचा ऑप्शन ठेवू शकतेस ब वड्यांबरोबर. ज्ये ना मिटक्या मारत होममेड वडापाव खातात! Happy

काहीही तेलकट नको असेल तर उपमा नाहीतर इडली-सांबार कर. आमच्याकडले ज्ये ना हे(च्च) पदार्थ अगदी आवडीने खातात. बाधणं वगैरे प्रकार होत नाहीत यात. मग बरोबर एखादी बर्फी आणि कॉफी. आंबे येतच आहेत मागाहून Happy

Pages