आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
<<चांगलीच मारलीय बाजी
<<चांगलीच मारलीय बाजी ८विकेटसने !!>>

राजस्थानचे काहीतरी
राजस्थानचे काहीतरी बिनसल्यासारखे वाटत होते कालच्या मॅचमध्ये.... द्रवीड जरा जास्तच प्रयोग करतोय.... द्रवीड, ओवेस शहा सारखे स्पिन चांगले खेळणारे खेळाडू १५व्या षटकानंतर फलंदाजीसाठी येणे आणि फॉल्कनर, याग्निकसारखे स्लॉग हिटर्स कोलकत्त्याच्या पीचवर मधल्या फळीत येणे हे पूर्णतः अनाकलनीय होते
तरुण खेळाडूंना संधी देणे, त्यांच्यावर जबाबदारी टाकणे हे योग्यच आहे पण Not at the cost of match
बिसला आणि गंभीरसारखे खेळाडू "द्रवीड"सारख्या बरोबर पण बाचाबाची करु शकतात? बाकी शाहरुखच्या संघाकडून वेगळी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. म्हणा ... जसा राजा तशी प्रजा
हॉग जर कोलकत्त्याच्यासारख्या टर्निंग पीचवर इतकी बेक्कार बॉलींग करत असेल तर त्याला पुढच्या कुठल्याच मॅचमध्ये खेळवण्यात अर्थ नाही
काल द्रविड ने ३ र्या नंबर वर
काल द्रविड ने ३ र्या नंबर वर खेळायला हवे होते
जसे जॅक कॅलिस ने केले थांबुन खेळला तसे हवे होते
बिसला आणि गंभीरसारखे खेळाडू "द्रवीड"सारख्या बरोबर पण बाचाबाची करु शकतात? बाकी शाहरुखच्या संघाकडून वेगळी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. म्हणा ... जसा राजा तशी प्रजा>>>>>>>>>> अत्यंत चुकिचा निष्कर्ष
भारतीय मिडीया ही अत्यंत भिक्कार आणि बिनडोक आहे त्यात तर इंटरनेटवरचे पेजेस तर तद्दन फालतुगिरी आणि हरामखोर वृत्तीचे आहे. टीव्हीवर दाखवले गेले आहे काय झाले नेमके...वाद बिसला आणि द्रविड नव्हताच
वाद वॉटसन आणि बिसला चा होता........... वॉटसन ने बॉल मारण्याची अॅक्शन केली आणि बिसलाने त्याला थांब या अर्थाची खुण केली होती तरी सुध्दा वॉटसन त्याच्या समोर चालत गेला आणि शिवीगाळ केली यावरुन गंभीर आणि बिसला ने वॉटसन बरोबर वाद केला या वादामधे द्रविड आणि रहाणे मधे येउन सोडवले...या नंतर सुध्दा मिडऑन ला उभे राहुन वॉटसन ने गंभीर ला शिवीगाळ केली होती हे काल मॅच मधे स्पष्ट दाखवले गेले.......
.
.भारतीय मुर्ख आणि हलकट वृत्तीची मिडीया याला "बिसला, गंभीर विरुध्द द्रविड" असे का रंग देत होती ????
रहाणे,गंभीर पुन्हा फ्लॉप
रहाणे,गंभीर पुन्हा फ्लॉप जाताय...
<< बिसला आणि गंभीरसारखे
<< बिसला आणि गंभीरसारखे खेळाडू "द्रवीड"सारख्या बरोबर पण बाचाबाची करु शकतात?>> मीं हा प्रकार टिव्हीवर नाही पाहिला त्यामुळें मतप्रदर्शन करणं योग्य नाही. पण कितीही मोठा खेळाडू असला तरी एका ठराविक मर्यादेबाहेर त्याची मग्रूरी अजिबात सहन केली जाऊं नये, असं मला ठामपणे वाटतं. आपले अनेक उदयोन्मुख खेळाडू आयपीएलमधे खेळत असतात व त्यांच्यासमोर चांगले आदर्श ठेवणं - निदान वाईट गोष्टी न ठेवणं- ही आयपीएलची प्राथमिक जबाबदारी आहे.
भाउ द्रविड बरोबर बाचाबाची
भाउ द्रविड बरोबर बाचाबाची झालीच नाही आहे...ही मिडीया वांग्याची साल वडाला लावत आहे
>>वाद बिसला आणि द्रविड
>>वाद बिसला आणि द्रविड नव्हताच.....वाद वॉटसन आणि बिसला चा होता
असेलही.... पण तरी टीव्हीवर बिसला आणि गंभीर ज्या पद्धतीने द्रवीडशी बोलताना दिसले आणि रहाणेला मध्ये पडावे लागले ते बघून तरी केकेआर अतिआक्रमक वाटत होते... अर्थात वॉटसन पण पुटपुटताना दिसला... पण ती शिवीगाळ न वाटता चिडचिड वाटत होती!
>>पण कितीही मोठा खेळाडू असला तरी एका ठराविक मर्यादेबाहेर त्याची मग्रूरी अजिबात सहन केली जाऊं नये, असं मला ठामपणे वाटतं
म्हणजे द्रवीडने मग्रुरी केली असेल असे तुम्हाला म्हणायचेय की काय? (बहुतेक नसावे)
<< म्हणजे द्रवीडने मग्रुरी
<< म्हणजे द्रवीडने मग्रुरी केली असेल असे तुम्हाला म्हणायचेय की काय? >> असं म्हणण्याइतपत मीं मग्रूर वाटतो तुम्हाला ?
टीव्हीवर बिसला आणि गंभीर ज्या
टीव्हीवर बिसला आणि गंभीर ज्या पद्धतीने द्रवीडशी बोलताना दिसले >>>> सरळच बोलत होते त्यांचा मुद्दा असा होता की त्याने ( वॉटसन ने) सुरुवात केलेली त्याला जाउन आधी बोल...बिसला ने फक्त उत्तर दिले... सरळ आहे गंभीर हा केकेआर चा कॅप्टन आहे त्याच्या साथिदाराला कोणी विनाकारण शिवी दिली तर तो पाठराखण साथीदाराची करेल ........ द्रविड त्याला समजवायला गेला .खर तर त्याने वॉटसन ला समज द्यायला हवी...
भारतीयाने भारतीयाची बाजु घ्यायला हवे जे गंभीर ने लगेच केले .....
>>भारतीयाने भारतीयाची बाजु
>>भारतीयाने भारतीयाची बाजु घ्यायला हवे
मला वाटते की भारतीयाने भारतीयाची बाजू घेण्याएवजी जो योग्य त्याची बाजू घ्यायला हवी....
>>जे गंभीर ने लगेच केले ....
मग कोहली बहुतेक त्याला परदेशी वाटत असावा
मालकाच्या शिव्या खाण्यापेक्षा
मालकाच्या शिव्या खाण्यापेक्षा हे बरे वाटत असेल खेळाडूंना...
अरे ते लोक तिकडे ग्राउंडवर
अरे ते लोक तिकडे ग्राउंडवर भांडले म्हणून लगेच तुम्ही इकडे भांडू नका... इतका मसाला तर पाहिजे ना आयपीएलमध्ये .... नाहीतर ती टेस्ट मॅच नाही का होणार?
द्रवीडला पण राग येतो हे बघून तो माणूस असल्याची खात्री पटली
आधीच्या सगळ्या अंदाजवाणी
आधीच्या सगळ्या अंदाजवाणी बर्यापैकी बरोबर आल्याच्या जोरावर आजची ही अजुन एक अंदाजवाणी:
आज दिल्ली जिंकणार
आजचे स्टार असतील सेहवाग आणि उमेश यादव
बुमरंग सट्टा लावा...........४
बुमरंग सट्टा लावा...........४ पैसे मिळतील...

.
या मी लावु तुमच्या नावाने
आजचा दिवस मोर्केल आणि
आजचा दिवस मोर्केल आणि वार्नरचा....
उदयन, अंदाज चुकला तर चुकतो
उदयन,
अंदाज चुकला तर चुकतो कधीकधी म्हणून सोडून देता येते... पण पैसे लावून बुडले तर काय घ्या!
तुम्ही लावले पैसे तर माझी हरकत नाही.... जिंकलात तर मी काही हिस्सा मागणार नाही आणि हारलात तर तुमची माझी ओळख नाही
जिंकलात तर मी काही हिस्सा
जिंकलात तर मी काही हिस्सा मागणार नाही आणि हारलात तर तुमची माझी ओळख नाही >>>>> या बाबतीत मी स्वार्थी....... मी हिस्सा देणार नाही...:खोखो:
.
आम्ही फँटसी खेळ खेळणारे.... आपण सांगितलेले खेळाडु घेतो....... आला अंदाज बरोबर तर पोईंट मिळतील नाही तर नाही
बुमरँग, तुमच्या भरव्श्यावर
बुमरँग,
तुमच्या भरव्श्यावर सेहवाग आणि उमेश यादव ला घेतलेय माझ्या फँटसी टीममध्ये!
सहवाग खुपच चाचपडत खेळतोय... पुढे खुलेल ही अपेक्षा
जयवर्धने नक्कीच आउट नव्हता
मटा - राजस्थान रॉयल्सचा
मटा -
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविड याच्याशी कोणताही वाद झाला नसून , त्याच्याबद्दल मला आदरच आहे , असे स्पष्टीकरण कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने दिले आहे. आयपीएल-६ टी-२० क्रिकेट स्पर्धेत राजस्थान आणि कोलकाता यांच्यामध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यादरम्यान गंभीर आणि द्रविड यांच्यामध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.
या सामन्यात कोलकात्याचा डाव सुरू असताना फलंदाज मनविंदर बिस्ला आणि राजस्थानचा गोलंदाज शेन वॉटसन यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी बिस्लाला शांत करण्यासाठी द्रविड पुढे सरसावला. त्यावेळी बिस्लाने द्रविडला वॉटसनला शांत करण्याची सूचना केली. दुसऱ्या बाजूस फलंदाजी करत असलेला गंभीरही या वादात सहभागी झाल्याने , वातावरण अधिकच तापले. अखेर द्रविडनेच हा वाद शांत केला.
.
.
मी लिहिलेले बरोबर होते
.
आज दिल्ली जिंकणार आजचे स्टार
आज दिल्ली जिंकणार
आजचे स्टार असतील सेहवाग आणि उमेश यादव>>>>>>>
.
आजचा दिवस मोर्केल आणि वार्नरचा...>>>>>>>>>>>>>>
.
कालचा दिवस खर्या अर्थाने दिल्लीचाच होता......काय अप्रतिम फलंदाजी केली व्वा....डोळ्यांचे पारणे फिटले ..
ज्या संघात सेहवाग, वॉर्नर , जयवर्धने, पठाण मोर्कल, बोथा , यादव, सारखे दिग्गज होते त्या संघाने ८० रन्स बनवणे नक्कीच अभिमानास्पद बाब होती...;) पुण्याला हायसे वाटले असेल की आपल्याला इथे सुध्दा काटें की ट्क्कर मिळत आहे
<< पुण्याला हायसे वाटले असेल
<< पुण्याला हायसे वाटले असेल की आपल्याला इथे सुध्दा काटें की ट्क्कर मिळत आहे>> तसं पाहिलं तर 'पानिपत' पुण्यापेक्षां आपल्यालाच जवळचं आहे, हें हल्लीं दिल्लीच्या लक्षांत आलंय !
उदयन वाचले ते.... गंभीरचे
उदयन वाचले ते....
गंभीरचे स्टेटमेंट वाचून जरा बरे वाटले..... म्हणजे परीस्थिती इतकीही काही वाईट नाही!
पण या सगळ्या प्रकरणात राजस्थान फेअरप्ले चार्ट मध्ये २ नंबरवर गेले
काय बुमरँग, तुमच्या मागच्या भविष्यवाणींचा ट्रॅक रेकॉर्ड बघून काल सेहवाग, यादवला घेतले आणि त्यांनी मात्र घोर निराशा केली.... नशीब सेहवागला कॅप्टन करता करता मिश्राला केले
आज द्रवीडने भलते प्रयोग न करता सहज सोपे खेळावे.... द्रवीडसाठी सलामी किंवा वनडाऊन हाच योग्य पर्याय आहे
आयपीएल संघ आणि त्यांचे
आयपीएल संघ आणि त्यांचे जावई
१) चेन्नई सुपर किंग्सः- मुरली विजय
२) कोलकता ना रायडर्स :- युसुफ पठाण
३) मुंबई इंडीयन्स : - सचिन तेंडुलकर
४) पुणे वॉरिअर्स : - अशोक डिंडा (तशी सगळीच टीम आहे)
५) बंगलोर रॉयल चॅलेंजर्स :- तिलकरत्ने दिलशान
६) राजस्थान रॉयल्स :- अजिंक्य रहाणे
७) दिल्ली डेअर डेव्हिल्स :- डेव्हिड वॉर्नर
८) हैद्राबाद सनराईज : - हनुमा विहारी
९) किंग्स ११ पंजाब :- अॅडम गिलख्रिस्ट.
.
.
..:)
वन करेक्शनः ७) दिल्ली डेअर
वन करेक्शनः
७) दिल्ली डेअर डेव्हिल्स :- योहान बोथा
आज द्रवीडने भलते प्रयोग न
आज द्रवीडने भलते प्रयोग न करता सहज सोपे खेळावे..>>>>>>> द्रविड चा प्रोब्लेम काय आहे की तो नव्या लोकांना संधी देण्याच्या नादात पाय कुल्हाडीवर मारुन घेतो... ज्या ठिकाणी गंभीर ने ब्रेट ली ला बसवुन ३ स्पिनर्स खेळवले अश्या वेळेला स्पिन चांगला खेळणारा सलामीला अन्यता वनडाउन हवा... इथे स्पिन खेळणारा आलाच नाही खेळायला..गंभीर ने नरेन ला ११ व्या षटकात गोलंदाजी दिली.. ती द्रविड ची आणि वॉटसन ची वाट पाहुनच...शेवटी नरेन ने वॉटसन ला आउट केलेच ....:)
आज सोप्पी लढत आहे पुणे वॉरिअर्स बरोबर.......परंतु संघनिवड न झाल्याने निराश झालेला युवराज सामन्याचा रंग कधीही बदलु शकतो..उथप्पा आणि युवराज बरोबर फिंच जर चालले तर द्रविड ला जड जाईल..
योहान बोथा >>>>>>> नाही कारण
योहान बोथा >>>>>>> नाही कारण त्याला संधी तशी फारच कमी मिळाली आणि जी मिळाली ती स्पिनर्स ला फायदा देणार्या खेळपट्टीवर नाही मिळाली जसे की कोलकता चेन्नई हैद्राबाद अश्या ठिकाणी त्याला संधीच दिली नाही
(No subject)
मस्तच भाउ . .पण पुणे सर्व
मस्तच भाउ
.
.पण पुणे सर्व भारत भर फिरत आहे "पानिपत" करुन घेण्यासाठी......गंगा यमुना सरस्वती तापी भारतातल्या सर्वच नद्या त्यांनी ओलांडल्या
>>योहान बोथा >>>>>>> नाही
>>योहान बोथा >>>>>>> नाही कारण....
अरे पण तो ऑल राउंडर म्हणून संघात आहे ना... मग फलंदाजीत काय दिवे लावले त्याने?
तो नॉन परफॉर्मर असल्यामुळेच राजस्थानने त्याला रिटेन केले नाही
>>परंतु संघनिवड न झाल्याने निराश झालेला युवराज सामन्याचा रंग कधीही बदलु शकतो.
तशी रहाणेची पण निवड झालेली नाहीये... तो उचकुन खेळला तर मजा येईल.... मागच्या सीझनचा रहाणे बघण्यासाठी उत्सुक आहे
६०० वा प्रतिसाद
६०० वा प्रतिसाद
Pages