दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाहोर (पाकिस्तान) तुरुंगात जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेले सरबजितसिंग यांचे दु:खद निधन झाले आहे. Sad

Sad

Sad

Sad

मुस्लीम सत्यशोधक समाज चे कार्यकर्ते असगर अली इंजिनीयर यांचे काल मंगळवारी निधन झाले. सामान्यपणे धार्मीक कल्पना जर जाचक वाटत असतील तर धर्म बदलणे हा उपाय अनेक कार्यकर्त्यांनी योजला परंतु धर्मात राहुन धर्माचे खरे मर्म सांगणार्‍यात मुस्लीम सत्यशोधक चे कार्यकर्ते खरे समर्पीत मानावे लागतील.

असगर अली इंजिनीयर यांना श्रध्दांजली

असगर अली इंजिनीयर यांना श्रध्दांजली
आजच्या लोकसत्ताने त्यांचा इस्लामिक स्त्रीवादावरचा लेख छापलाय.

बस्तर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यातून नक्षलवाद्यांचा क्रूर चेहरा पुढे आला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सुरक्षा दल आणि प्रशासन घटनास्थळी पोचल्यानंतर अंगावर शहारे आणणारे दृश्‍य दिसून आले होते. या हल्ल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा, 'सलवा जुडुम'चे संस्थापक आणि राज्याचे माजी गृहमंत्री महेंद्र कर्मा यांच्यासह 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक ऋतुपर्ण घोष यांचं वयाच्या ४९च्या वर्षी निधन<<< फारच धक्कादायक.

श्रद्धांजली.

Pages