संत्रा कुल्फी

Submitted by _प्राची_ on 9 April, 2013 - 07:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दूध साधारण १ मोठा मग.
साखर २ चमचे
काजू, बदान, पिस्ते, चारोळी यांची एकत्रित पूड १ चमचा (ऐच्छिक)
संत्र्याचा गर - २ चमचे

क्रमवार पाककृती: 

प्रथम १ मग दूध उकळायला ठेवावे. त्यात साखर व सुकामेव्याची पूड घालून दाट होईपर्यन्त आटवावे.
ते आटेपर्यन्त एक छान केशरी रंगाचे संत्रे घ्यावे. संत्र्याचे साल वरून एक इंच व्यासाच्या वर्तुळात अलगद काढून घ्यावे. मग बोटाने अलगद आतला गर कोरून काढावा. अगदी जसा च्या तसा काढता येणार नाही, थोडा रसही निघेल. तो सगळा एका वाटीत काढून ठेवावा. त्यातून चांगला गर २ चमचे वेगळा करावा. उरलेला रस पिउन टाकावा.
आटलेले दूध गार झाले के त्यात संत्र्याचा गर घालावा.
ते सर्व मिश्रण कोरलेल्या संत्र्याच्या सालात ओतावे. फ्रिजर मधे ठेवून कुल्फी थंड होऊ द्यावी.
वाढताना धारधार सुरीने ४ तुकडे करून द्यावेत.

Kulfi.jpg

वाढणी/प्रमाण: 
एकास एक !
अधिक टिपा: 

अशीच म्ह्णे आंब्याची कुल्फी पण करतात. उत्साही लोकांनी करून पहावी.

माहितीचा स्रोत: 
परवा एका पार्टी मधे खाल्ली होते. लगेच घरी येऊन प्रयोग केला.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंडाको पाणी आया. मस्त गारेगार. पण संत्रा रसाने दूध फाटणार नाही ना? ( प्रश्न वेडगळ वाटु शकतो. )

आणी फ्रिझरमध्ये किती वेळ ठेवावे? बर्फाळ होईल की मऊ? मिक्सरमध्ये परत फेटायचे नाही का इतर आईस्क्रीमसारखे? ( जास्त प्रश्नाबद्दल क्षमस्व. )

संत्र्याचा रस नव्हे गर घालायचा आहे तोपण दूध थंड झाल्यावर, मग नाही फाटत दूध. मी फ्रीजर मधे ठेवण्याआधी हॅन्ड ब्लेन्डर वर फिरवले होते कारण आमच्याकडे साय आवडत नाही. पण काही जणांना तशी साय आवडते कुल्फी मधे. मी ४ तास ठेवली होती. छान घट्ट झाली.

मस्तच दिसतेय, छान कृती.

<<परवा एका पार्टी मधे खाल्ली होते. लगेच घरी येऊन प्रयोग केला.>> दॅट्स द स्पिरीट Happy

मला हा प्रकार पायनॅपल किंवा सीताफळ वापरून करायचा आहे. कन्डेन्स्ड मिल्क किंवा हाफ-अँड-हाफ वापरून कुल्फी बनवता येते का? प्रश्न बावळट असेल तर माफ करा, पण मला दूध आटवत बसण्याइतका पेशन्स नाहीये Wink

भारी आहे आयडिया. मागे संजीव कपूरने खाना खजाना मध्ये असाच हापूस आंबा पोखरुन त्यात मँगो कुल्फी सेट करायला ठेवली होती.

झेपणेबल वाटतंय पण थोडी भिती पण वाटतेय..मी कधीही कुठलीही कुल्फी/आइस्क्रिम इ. घरी बनवलं नाहीये...
ते फोटो वरच्या रेसिपीच्या पानावर टाकल्यास अजून छान वाटेल...(एक फु.स.)

मस्त आहे आयडीया ..

नुसतं दुध आटवून फ्रीझ केलं तर स्मूथ टेक्स्चर येतं का कुल्फी ला? आणि कन्डेस्ड मिल्क किंवा क्रीम वगैरे काही न घालता ती गाढी मलाईदार होते का? Happy

अजून एक वेडगळ प्रश्न Lol
संत्र्याच्या सालीत कुल्फीचे दुध ओतल्यानंतर कुल्फी सालाजवळ त्या पांढर्‍या सालीमुळे कडवट नाही कां लागत?
पण अतिशय कल्पक आणि एक्सायटींग पाकृ आहे... मी आजच बनवेन :))

Pages