संत्रा कुल्फी

Submitted by _प्राची_ on 9 April, 2013 - 07:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दूध साधारण १ मोठा मग.
साखर २ चमचे
काजू, बदान, पिस्ते, चारोळी यांची एकत्रित पूड १ चमचा (ऐच्छिक)
संत्र्याचा गर - २ चमचे

क्रमवार पाककृती: 

प्रथम १ मग दूध उकळायला ठेवावे. त्यात साखर व सुकामेव्याची पूड घालून दाट होईपर्यन्त आटवावे.
ते आटेपर्यन्त एक छान केशरी रंगाचे संत्रे घ्यावे. संत्र्याचे साल वरून एक इंच व्यासाच्या वर्तुळात अलगद काढून घ्यावे. मग बोटाने अलगद आतला गर कोरून काढावा. अगदी जसा च्या तसा काढता येणार नाही, थोडा रसही निघेल. तो सगळा एका वाटीत काढून ठेवावा. त्यातून चांगला गर २ चमचे वेगळा करावा. उरलेला रस पिउन टाकावा.
आटलेले दूध गार झाले के त्यात संत्र्याचा गर घालावा.
ते सर्व मिश्रण कोरलेल्या संत्र्याच्या सालात ओतावे. फ्रिजर मधे ठेवून कुल्फी थंड होऊ द्यावी.
वाढताना धारधार सुरीने ४ तुकडे करून द्यावेत.

Kulfi.jpg

वाढणी/प्रमाण: 
एकास एक !
अधिक टिपा: 

अशीच म्ह्णे आंब्याची कुल्फी पण करतात. उत्साही लोकांनी करून पहावी.

माहितीचा स्रोत: 
परवा एका पार्टी मधे खाल्ली होते. लगेच घरी येऊन प्रयोग केला.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कन्डेस्ड मिल्क किंवा क्रीम वापरल नाही. इथे उत्तर प्रदेशात अतिशय दाट, मलईदार दूध मिळतं (कदाचित त्यामुळे) माझी कुल्फी तरी अगदी मलईदार झाली होती. मी नेहमी कुल्फी दूध आटवूनच करते. बाकी त्यात काहिही घालत नाही. पण तुम्ही तुमची नेहमीची कुल्फीची रेसिपी नक्कीच फॉलो करू शकता. फक्त त्यात संत्र्याचा गर मिसळायचा. अगदी तयार कुल्फी मिक्स पण चालेल असे वाटते.

मी केली, छान झाली. गर काढणे, वाटले होते त्यापेक्षा बरेच सोप्पे आहे. दुध थोदे कमी पडले म्हणुन वर पल्प्ची भर घातली, ते पण छान दिसले/ लागले.
.
mb.jpg

जागू मस्त फोटो काढले आहेत. मला हे जमतच नाही. पदार्थ करताना उत्साहाच्या भरात फोटो काढणे राहून जाते नेहमीच. सगळ्याना कल्पना आवडली म्हणून हे लिहिल्याचे समाधान वाटते आहे. लिहिण्याआधी जरा संकोच वाटत होता.

ए, कस्ली भारी रेसिपी... पण सोप्पी वाटतेय.
ह्या जागूचा भर मायबोलीवर एक जाहीर सत्कार...
केलं ते केलं... वर आणि जबरी फोटोपण टाकलेत.

जागू, ते प्रत्येक स्टेपचे फोटो टाकलेस हे मस्त, आता करायचा प्रयत्न करेन. संत्र्याचं वरचं साल काढणंच जरा कठीण काम वाटतं आहे.

मी पण करुन बघितली पण थोडी अगोड झाली होती. पुढच्यावेळी योग्य ती काळजी घेण्यात येइल.
पहिल्या पोस्टमधील फोटोसारखी (दिसायला) छान झाली नाही.
थोडे पिकलेले संत्रे वापरावे.

लई भारी ... आम्ही आज केली , आणि गट्ट्म . खुप सही झाली होती , डिट्टो जागुच्या फोटो सारखीच देखणी झाली होती ... आमच्यात सगळे गोडखाउ असल्यामुळे साखर वाढ्वुन घातली होतिच ... धन्स या सोप्प्या कुल्फीसाठी ...उद्या परत करायची का असं म्हणतायत सगळे Happy

धन्स धन्स धन्स सगळ्यांना. पण हाची प्रेरणा दिपाची रेसिपी आहे. Happy म्हणून तिला स्पेशल थॅक्स.

शैलजा आजिबात कठीण नाही साल काढण सुरीने एकदम पटकन निघत.

ही कुल्फी ज्यांनी खाल्लीय त्यांनी ती सालीसकट खाल्लीय की साल काढुन >????? (माहिताय मुर्ख प्रश्न आहे ते पण तरीही.... Happy )

साधना, सालीला कपासारखं पकडून आतून कोरून खाल्ली असणार. मी एकदा नविन प्रकार म्हणून ही कुल्फी विकत घेऊन खाल्ली होती तेव्हा साल खायची हिम्मत नव्हती झाली Uhoh

मी संत्रा साल खाऊ शकेन पण आतला पांढरा भाग कडु असतो गं..... कुल्फीची चव बिघडायची.

रच्याकने, तुला विकतची कुठे मिळाली?

Pages