संत्रा कुल्फी

Submitted by _प्राची_ on 9 April, 2013 - 07:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दूध साधारण १ मोठा मग.
साखर २ चमचे
काजू, बदान, पिस्ते, चारोळी यांची एकत्रित पूड १ चमचा (ऐच्छिक)
संत्र्याचा गर - २ चमचे

क्रमवार पाककृती: 

प्रथम १ मग दूध उकळायला ठेवावे. त्यात साखर व सुकामेव्याची पूड घालून दाट होईपर्यन्त आटवावे.
ते आटेपर्यन्त एक छान केशरी रंगाचे संत्रे घ्यावे. संत्र्याचे साल वरून एक इंच व्यासाच्या वर्तुळात अलगद काढून घ्यावे. मग बोटाने अलगद आतला गर कोरून काढावा. अगदी जसा च्या तसा काढता येणार नाही, थोडा रसही निघेल. तो सगळा एका वाटीत काढून ठेवावा. त्यातून चांगला गर २ चमचे वेगळा करावा. उरलेला रस पिउन टाकावा.
आटलेले दूध गार झाले के त्यात संत्र्याचा गर घालावा.
ते सर्व मिश्रण कोरलेल्या संत्र्याच्या सालात ओतावे. फ्रिजर मधे ठेवून कुल्फी थंड होऊ द्यावी.
वाढताना धारधार सुरीने ४ तुकडे करून द्यावेत.

Kulfi.jpg

वाढणी/प्रमाण: 
एकास एक !
अधिक टिपा: 

अशीच म्ह्णे आंब्याची कुल्फी पण करतात. उत्साही लोकांनी करून पहावी.

माहितीचा स्रोत: 
परवा एका पार्टी मधे खाल्ली होते. लगेच घरी येऊन प्रयोग केला.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्रात जी संत्री मिळतात ती रंगाने हिरवी असतात आणि साल गराला घट्ट चिकटलेली नसते. ही कुल्फी करण्यासाठी किनु वापरावीत का?

साधना तू बरेच दिवस गायब होतीस म्हणून मी सालींचे फोटो नाही काढले आणि बघ अचानक आलीस Lol
अग आणि मलाही तोच डाउट होता कडवटपणाचा पण आजीबात कडवट नाही लागत.

काय कल्पक रेसिपी आहे. धन्यवाद. नक्की करुन बघणार. दिपा तुमचे फोटो थोडे मोठे हवे होते.
जागूचे फोटो (नेहमीप्रमाणेच) अत्यंत आकर्षक!

मी दूध आटवत बसण्यापेक्षा घरात असलेले व्हॅनिला आईसक्रीम वितळवून त्यात संत्र्याचा गर घालून ते भरुन ठेवलंय. tt.gif
आता काय होईल त्याचा फोटो टाकीन.

हा छोट्या संत्र्याचा वितळलेले आईसक्रीम प्रयोग. चांगले झाले, पटकन झाले. संत्र्याचे तुकडे/गर जरा करकरीत लागत होते. गर अजून कमी घालायला हवा होता कारण संत्रे लहान होते.

santra1.JPGsantra2.JPG

वरुन स्ट्रॉबेरी सिरप. Proud

santra3.JPG

अरे वा .. लोलाची एकदम वेगळीच दिसत आहे .. गर जास्त आहे म्हणून असेल ..

ही क्विक ऑरेंज आईसक्रीम आयडीया छान आहे ..

करुन पाहीली आणि जमली पण Happy
स्वयंपाकघरात प्रथमच खुप काही creative केल्याच अभिमान वाटला Proud
मी सालांसकट नाही खाल्ली परंतु त्या सालांमुळे अप्रतिम फ्लेवर आला होता. फ्रिजर उघड्ले तरी संत्र्याचा घमघमाट येत होता !
मस्त कल्पना शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद !

Pages